✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वळण नसलेल्या वाटेवर

क — कर्नलतपस्वी, Mon, 06/27/2022 - 10:43
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर* जेंव्हा कोणीतरी खास भेटतं मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं वादळ आणी पाऊस मग नित्याच होतं पण वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो आणी हवाहवासा गारवा वाटेवर पसरतो भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ पुन्हा एकदा कुशीत येते अन वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते आसेच कुणीतरी खास भेटावे प्रत्येकाला वाटते मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते २७-६-२०२२

प्रतिक्रिया द्या
3782 वाचन

💬 प्रतिसाद (7)

मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/27/2022 - 11:08 नवीन
अगदी .... असे कोणीतरी असावेच आयुष्यात पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

तिसरं आणि चौथ कडवं छान!पण

Bhakti
Mon, 06/27/2022 - 20:04 नवीन
तिसरं आणि चौथ कडवं छान!पण पहिल्या
मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं
याचा विरोधाभास लगेच शेवटी
खास भेटावे प्रत्येकाला वाटते मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते
असं वाटलं.नक्की नागमोडी सरळ की सरळ नागमोडी होत :) भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ पुन्हा एकदा कुशीत येते अन वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते छान!
  • Log in or register to post comments

कुणी अचानक भेटल्याने कवी गडबडला

कंजूस
Mon, 06/27/2022 - 20:07 नवीन
मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते सरळ वाटही नागमोडी असावी वाटू लागते.
  • Log in or register to post comments

हा हा!होता है ऐसाच होता है :)

Bhakti
Mon, 06/27/2022 - 20:09 नवीन
हा हा!होता है ऐसाच होता है :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वा,

हेमंतकुमार
Tue, 06/28/2022 - 09:12 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कर्नलतपस्वी
Tue, 06/28/2022 - 10:52 नवीन
भक्ती,कंजूस आणी कुमारेक सर प्रतीसाद बद्दल धन्यवाद. कंजूस भौ,वळणदार शेवट आवडला.
  • Log in or register to post comments

छान..

गणेशा
Sun, 07/03/2022 - 00:07 नवीन
वळण नसलेल्या सरळ वाटेवर जेंव्हा कोणीतरी खास भेटतं मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं . . . . . आणि नागमोडी वळणं घेता घेता.. कोणी तरी हे खास सरळ निघून जातं अन आयुष्य मग नागमोडी वाटेवर उगा कंदिल बनुन लटकत राहतं... जळत राहतं..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा