कदाचित...
... हे षडयंत्र असेल कदाचित???
तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ...
कदाचित धर्मभोळी माणसं होती.
उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती.
...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता.
...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता.
... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं???
... चक्रिवादळ.
आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी.
... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी...
आहो मंदिराचा इतिहास काय पाहता..
सोमनाथ काय ? काशिविश्वेश्वर काय? अयोध्या काय? तुळजाभवानी काय? पांडुरंग काय? ...
... आणि अफगाणिस्तानातील प्रचंड बुध्द काय?
... आणि हे बुतशिकीन पर्यंत सिमीत नव्हतं.
प्रचंड कत्तल,अगणित बलात्कार, बेसुमार कुतरओढ.
सगळ कसं ? मुक्याला ... हाक ना बोंब.
कारण तेव्हा मार्क्स नव्हता.
तेव्हा अयोध्याचा राम काय?, प्रभासपट्टणचा सोमनाथ काय?, काशीचा विश्वेश्वर काय?,महाराष्ट्राची तुळजाभवानी काय?
ही सगळी त्या काळात माणसाला देवत्व प्राप्त करून देणारी विद्यापीठं होती. आणि ही धर्मभोळी, देवभोळी तलवारीने सरसर कापली जात होती.
... म्हणे आपलं नालंदा, तक्षशीला, वल्लभी हे ऑक्स्फर्ड, केंब्रीजच्या पेक्षा दर्जेदार होतं???
काय माहित???
...पण नालंदा बख्तियार खिलजीने जाळलं हे मात्र शंभर टक्के खरं.
का ? कशासाठी?...
पुन्हा तेच त्या काळात मार्क्स नव्हता.
...नाही तर मार्क्स साहेबांच सगळ औरच होत.
त्यांचा जन्म जर्मनीत,
राहायचे इग्लड,
लिहायचे अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम साठी,
आणि लिखाणाचा विषय भारतातील धर्म आणि समाजजीवन...
हाच क्रम जर उलटा झाला असता तर आपला 'दास कॅपीटल'
...
...
... कदाचित नव्या रूपात आम्हाला भेटला असता...
... आणि हो तुमचा समाजवाद पण.
... कदाचित.
छान आहे. आणखी येऊद्या.
ही कविता आहे ?
गद्य म्हणून वाचा, हाकानाका.
मारकस्भाव, गद्य, पद्य आणि
ही कविता नाही त्याच्या मनातलं
आणि आता खिलजी च्या वारसांना
रावसाहेब याला बॅलंस साधणे म्हणतात, काइंड ऑफ एक्विलीब्रीअम
आणि लिखाणाचा विषय भारतातील
मिपावर स्वागत
छान.
आवडली!!!