पुरेसे मेंबर जमले तर आपण मि. पा. ची कॅलिफोर्निया शाखा सुरु करूयात....
अरे वा! मिपाच्या कॅलिफोर्निया शाखेला आमच्याही शुभेच्छा बरं का! :)
मिसळ-पाव तर ठेवूच पण कायतरी कोंबडं-बकरं ही मारू की...
अरे डांबिसा, शिंच्या तू भट ना?? :) कोंबड्या-बकर्या कसल्या रे मारून खातोस फोकलिच्या?! :)
शाकाहारी लोकांसाठी काहीतरी श्रीखंड-पुरी वगैरे...
हे काही ठीक नाही बरं का बॉस! श्रीखंडपुरी हा पदार्थ एवढा काही खालच्या पातळीचा नाही की तू त्याची 'वगैरे..' या शब्दाने संभावना करावीस! अरे बाबा, श्रीखंडपुरीची तुलना कशाशीच होऊ शकत नाही रे! श्रीखंडपुरीवर जर थोडीफार मात करायचीच असेल तर साक्षात आमरसपुरीलाच मैदानात उतरवावे लागेल! पण तुमच्या कोंबड्या-बकर्यांना श्रीखंडपुरीला मात देणं जन्मात जमणार नाही! :)
मागे एकदा मी 'त्या तिथे पलिकडे, तिकडे....' आमच्या पहिल्या प्रेमावर पक्वांन्नांच्या स्पर्धा घेतल्या होत्या, तेव्हा पुरणपोळी जिंकली होती आणि आमच्या श्रीखंडपुरीचा दुसरा नंबर आला होता! :) असो.. गेले ते तिकडचे दिवस! :)
ड्रिंक्स वगैरे सुद्धा (आमच्या बायकोची फुल परमिशन हाय वो!)...
हं! भेंXX, पण बदनाम मात्र एकटा तात्याच होतो! :)
मुख्य म्हणजे एकत्र येऊन गप्पा-टप्पा करूयात की....
वा वा! जरूर एकत्र या, गप्पा टप्पा गाणी गोष्टी करा आणि आम्हालाही फोटू पाठवा!
बाय द वे, तुमच्या कॅलिफोर्नियापासून विल्मिंगटन किती दूर आहे हो?! :) जमल्यास आमच्या काकाकूंनाही बोलवा हो संमेलनाला! :)
आपला,
(श्रीखंडपुरीप्रेमी!) तात्या.
मी सॅन होजे मध्ये असतो - बे एरियात.
सर्किटरावही सॅन होजेतच असतात. 'एक'सुद्धा येथेच आहे, असे समजते.
नंदनपंत सॅन डिएगोस.
पिडांकाका लॉस एन्जेलेसमध्ये.
पाच मेंबरं इथेच झाली.
आणखी कोणी?
(सदस्यशोधक)बेसनलाडू
अवांतर - पिडांकाका, मागच्या लॉस एन्जेलिस भेटीदरम्यान सॅन्ता मॉनिका बीच, मॅलिबू आणि सनसेट बुलवा राहून गेलं राव :( काही जमत असल्यास बघा, फिरवून वगैरे आणायचं या पोरांना ;)
(भटका)बेसनलाडू
अतिअवांतर - सॅन होजे, कॅलिफोर्निया ते विल्मिंग्टन, नॉर्थ कॅरोलायना अंतर = सुमारे २,८६७ मैल (अंदाजे ४,५८७ किमी) आहे.
(गूगल्या)बेसनलाडू
उत्तम बेत आहे. मात्र सध्या दोघेजण द. कॅलिफोर्नियात आणि तिघे उत्तरेत अशी स्थिती आहे. तेव्हा जरा मधली जागा शोधा की, राव. अर्थात पि. डां. काका मिसळ-पाव, कोंबडं-बकरं, श्रीखंड-पुरी असा जंगी बेत ठेवणार असतील तर अगदी ईशान्य कॅलिफोर्निया देखील चालेल :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
कॅलिफोर्नियात असलेली मंडळीची नावे समजली आणि आनंद वाटला. मिपाचा तिकडे एक कट्टा जमतोय,मैफिली आणि इतर कार्यक्रम होणार आहेत त्याचाही आनंद वाटला. त्यासाठी आमच्याही शुभेच्छा !!!!!
पण, आमचे एक मित्र त्या कार्यक्रमात सहभागी होणार असेल तर तो कार्यक्रम यशस्वी होईल का याबद्दल शंका आहे ? आणि त्यांना कामातुन वेळ मिळालाच तर, मराठी संकेतस्थळावरील मोकाट "वळू '' म्हणुन आमच्यातर्फे त्यांना एक मानपत्रही द्या !!!! :) ( ह. घ्या )
आपला
कधी-कधी कै च्या कै प्रतिसाद लिहिणारा
प्रा.डॉ.... ......
रविवारी येतो आहे मुंबईत. ठरवायचा का 'बेत'?
Done!
नक्की या. साक्षीलाही विचारतो आणि मालवण हॉटेलची 'बैठक' बुक करतो. नीलकांतराव बहुतेक गावी जाणार आहेत, परंतु येताना तुमच्यासोबत त्या लबाड, चावट आणि फाजील नीलहंसालाही घेऊन या! :)
नीलहंसाला किंवा साक्षिला वेळ नसेल तर आपण दोघे समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४ येथे जेवायला जाऊ! अहो काय झकास जेवण असतं! :)
त्या आधी गिरगावातच कुठेतरी बसून दोन दोन पेग मारू! :)
तुम्ही याच तिच्यायला, वाट बघतो..!..:)
तात्या.
अगदी खरेच डांबिस आहात हो! आता पुढच्या आठवड्यात मी जातोय भारतात आणि तुम्ही खुशाल (मला टाकून) मिसळपाव, कोंबडं-बकरं, श्रिखंड पुरी (आणि मुख्य म्हणजे सोमरस!) घेणार?????
(नाराज) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सध्या दोघेजण द. कॅलिफोर्नियात आणि तिघे उत्तरेत अशी स्थिती आहे. तेव्हा जरा मधली जागा शोधा की, राव.
असं दिसतंय खरं! यावर दोन उपाय सुचतातः
१. मी मध्येच आहे, तेंव्हा माझ्याकडे जमायचं. नंदनला काही प्रॉब्लेम येवू नये पण सान होजेवाल्यांना ड्राईव्ह करायला लागेल जरा...
किंवा,
२. तीन लोकं सान होजे मध्ये आहेत तेंव्हा तिथे जमायचं. मला काही प्रॉब्लेम नाही ड्राईव्ह करायला... माझा एक नातेवाईक जवळच (कुपर्टिनोमध्ये) रहातो. तेंव्हा मी तिथे येत असतो. नंदनला जरा लांब पडेल पण तो आधल्या संध्याकाळी निघून माझ्याकडे रात्री राहू शकतो आणि दुसर्या दिवशी सान होजेत येऊ शकतो. काय रे बाबा, नंदन? चालेल का?
काय वाटतं तुम्हाला ते सांगा...
-पिवळा डांबिस
म्हणजे एल ए मध्येच जमूया का? अगदीच मध्यवर्ती नसले तरी त्यातल्या त्यात जवळ पडेल. नाहीतर सॅन डिएगो - सॅन होजे म्हणजे यायचे ९-१० तास, जायचे ९-१० तास व्हायचे. ह्या थँक्सगिव्हिंगला एकूण १४ तास लागले होते, तो अनुभव अजून ताजा आहे :(
बेला, तुला ग्रेहाऊंडन किंवा एक रावांबरोबर यायला जमेल का? पाचवा मेम्बर बहुतेक मार्चपर्यंत बिझी आहे. तेव्हा सध्या तरी आपण चौघेच असू असं दिसतंय.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
हवं तर 'एका'बरोबर गाडीने जमल्यास बघू. नाहीतर सध्या पिडांकाकांना विमानाचे तिकीट पाठवायला सांगून तो खर्च कट्ट्याबद्दल मिसळपावच्या तिजोरीतून वळता करून घेऊ. तुलाही हा उपाय करायला हरकत नाही खरी ;)
(मारवाडी)बेसनलाडू
श्रीखंडपुरीची तुलना कशाशीच होऊ शकत नाही रे! तुमच्या कोंबड्या-बकर्यांना श्रीखंडपुरीला मात देणं जन्मात जमणार नाही!
अरे अरे तात्या, असं मोठ्यानं चारचौघात बोलू नकोस, लोकं हसतील!!! :)))))
आमच्या पहिल्या प्रेमावर पक्वांन्नांच्या स्पर्धा घेतल्या होत्या, तेव्हा पुरणपोळी जिंकली होती
पुरणपोळी नंबर १ हे मान्य! पण फक्त तेलपोळी! पीठपोळी नाही!
ड्रिंक्स वगैरे सुद्धा (आमच्या बायकोची फुल परमिशन हाय वो!)...
हं! भेंXX, पण बदनाम मात्र एकटा तात्याच होतो! :)
आता असतं एकेकाचं नशीब!:)))
बघ एखाद्या ज्योतिष्याला कुंडली दाखवून काय ग्रहांची उलटापालट करता येतेय का! :)
जमल्यास आमच्या काकाकाकूंनाही बोलवा हो संमेलनाला! :)
जरूर! बोलवायला आमची ना नाही, पण प्रवासखर्चाचा विचार केला तर वाचवलेल्या डॉलर्समध्ये काका-काकू जन्मभर विल्मिंग्टनमध्ये मिसळ्पाव खाऊ शकतील! :))
हा देशच असा काहिच्याकाही अफाट आहे बघ!
पिडांकाका, मागच्या लॉस एन्जेलिस भेटीदरम्यान सॅन्ता मॉनिका बीच, मॅलिबू आणि सनसेट बुलवा राहून गेलं राव
अरे मग ये की! माझ्या घरापासून मालीबू बीच फक्त १५ मिनिटांवर आहे आणि सान्ता मोनिका २० मिनिटांवर!!
अगदी खरेच डांबिस आहात हो! आता पुढच्या आठवड्यात मी जातोय भारतात आणि तुम्ही खुशाल (मला टाकून) मिसळपाव, कोंबडं-बकरं, श्रिखंड पुरी (आणि मुख्य म्हणजे सोमरस!) घेणार?????
(नाराज) सुनील
अरे बाबा, तू कशाला नाराज होतोस? तू तर माहेरी चाललास! जा की तिथे जाऊन तात्याच्या खनपटीला बस! म्हणावं पार्टी करूया!! :))
च्यामारी हा म्हन्जे आता इस्ट कोस्टच्या इभ्रतीचा प्रश्न झाला. कुठे गेले ते एडिसन्-ओक ट्री रोड वरचे मराठी मावळे ? मुंग्यानी मेरुपर्वत तर गिळला नाही ना ? मग इस्ट कोस्टवरच्या मिपाकरांचा कसलाच प्रतिसाद नाही ! (एकदम ह. घ्या. !)
मी केवळ हा विकेंड आहे जर्सी मध्ये पुढच्या विकेंडला भारतात परततोय (वन वे तिकिट) :) तेव्हा हा विकांत सामानाच्या बांधाबांधीत जाईल .. तेव्हा मुंबईत कट्टा जमेल तेव्हा मला काउंट करायला विसरू नका :)
-ऋषिकेश
मी बॉस्टन ला आहे. संगणक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतोय University of Massachusetts - Boston मध्ये. शिकत असल्यामुळे ४ चाकी नाही आहे अजून.
इस्ट कोस्ट चा कट्टा कुठे जमवता आहात? न्युयॉर्क ला असेल तर सोपे आणि स्वस्त दोन्हीही पडेल. (काय करणार हो शेवटी कितीही प्रयत्न केला तरी कोकणस्थी बाणा डोके वर काढतोच).
प्रतिक्रिया
एक विनंती
तां आमच्या ताकदीच्या बाहेरलां काम असां!:))
देवा म्हाराजा
या सृष्टीत प्रत्येकाक मर्यादा आसतां!
शुभेच्छा! :)
पाच मेंबरं
न्यू यॉर्कवाशी कोन न्हाई का?
मी सँटा क्लारा मधे आहे..
वा, वा
कै च्या कै
कॅलिफोर्नियात असलेली मंडळीची नावे समजली आणि आनंद वाटला. मिपाचा तिकडे एक कट्टा जमतोय,मैफिली आणि इतर कार्यक्रम होणार आहेत त्याचाही आनंद वाटला. त्यासाठी आमच्याही शुभेच्छा !!!!! पण, आमचे एक मित्र त्या कार्यक्रमात सहभागी होणार असेल तर तो कार्यक्रम यशस्वी होईल का याबद्दल शंका आहे ? आणि त्यांना कामातुन वेळ मिळालाच तर, मराठी संकेतस्थळावरील मोकाट "वळू '' म्हणुन आमच्यातर्फे त्यांना एक मानपत्रही द्या !!!! :) ( ह. घ्या )
आपला कधी-कधी कै च्या कै प्रतिसाद लिहिणारा प्रा.डॉ.... ......
तात्या मला वाचवा...
पेठकरशेठ,
ठरलं...
ठरलं तर मग!
खरेच डांबिस
अरे बेसनलाडू आणि नंदन,
नंदन हो म्हण रे!
ला ला सिटी
ग्रेहाउन्ड नको राव
एल ए जरा अवघड वाटतं आहे.
परवानगी?
हो ना...
मी
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
इस्ट कोस्ट ...
मी मॅसाच्यूसेट्स मधे आहे
मी डीसी मधे ....
फ्लोरिडा?
मी आलो, डि
ए माज्या ईस्टकोस्टवाल्या राजांनू!
सहमत आहे...
पलट!?
लाल
च्यामारी
केवळ हा
मी बॉस्टनकर