अभंगाची गोडी
चिपळाची जोडी
विठ्ठल नाम माळी
भक्ती फुले भाबडी...
अगम्य भिंती तोडी
शरीर झोला सांडी
चराचर चैतन्य बहू
मना सुख जोडी...
वेल वाढती वाकडी
शोधे आधार बापुडी
नाही बांडगुळ हे जाण
तू बांध नामाची झोपडी...
वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...
-भक्ती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5499
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाट पाहून थकली
वाट पाहून थकलीयेईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...
याचा अर्थ काय ?
मोक्ष मिळेल म्हणून वाट पाहून
In reply to वाट पाहून थकली by गॉडजिला
मोक्ष मिळेल म्हणून वाट पाहून जीव थकलाय पण अजूनही तो मिळाला नाहीये. रोज रोजच सूर्यास्त पाहावा लागतोय म्हणजे अजूनही हे दैनंदिन जीवन चालूच आहे. मोक्षाची वाट बघणे सुरुच आहे असे काहीसे म्हणावयाचे आहे असे वाटते.
थँक्यू प्रचेतस जी
In reply to मोक्ष मिळेल म्हणून वाट पाहून by प्रचेतस
धन्यवाद
जिलाजी धन्यवाद
In reply to मोक्ष मिळेल म्हणून वाट पाहून by प्रचेतस
जिलाजी धन्यवाद
धन्यवाद प्रचेतस!
थोडासा वेगळा अर्थ ,
मोक्ष हा आहे पण तीचे रूप अजूनही साजिरे झाले नाही असे रोजच्या दिनक्रमात वाटते,ऐहिक जीवन सोडून आपल्यालाही मोक्षाची आस आहे..त्याने जीव थकतो.पण सायंकाळी सुंदर सूर्य बुडताना वाटतं ना कधी कधी आज दिवस खरोखर सुंदर होता,असाच उद्याही सुंदर दिवस व्हावा आणि असाच रोज रोज सूर्य बुडताना पाहावा...हाही ऐहिक जीवनातला त्या दिवसातला मोक्ष आहे.
विठ्ठल विठ्ठल _/\_
हाही अर्थ वेगळाच, आवडला.
In reply to जिलाजी धन्यवाद by Bhakti
हाही अर्थ वेगळाच, आवडला.
विठ्ठल विठ्ठल _/\_
In reply to जिलाजी धन्यवाद by Bhakti
एकदम छान!
वाट पाहून थकली
In reply to जिलाजी धन्यवाद by Bhakti
वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग(?)
डोळ्यांत सूर्य बुडी...
इथे का मग (?) वाक्याने गोंधळ उडतो इतके सगळे व्यवस्थित काव्य शेवटी प्रश्न कसा पाडून संपले ते काही झेपले न्हवते. अगदी प्रत्यक्ष प्राच्यविद्या संशोधक संस्थेकडून जरी सकारात्मक स्पष्टीकरण आले होते तरीही...
पण शेवटच्या ओळी प्रश्न न्हवे तर समाधान दाखवत आहेत हा उलगडा आपण केल्याने.
अब सब ठीक..._/\_
बुडी का बुडे?
In reply to वाट पाहून थकली by गॉडजिला
अन्वय लावायचा झाला तर, सूर्य रोज रोज डोळ्यात का बुडे - असा होईल. सूर्य बुडे असं पाहिजे ना? सूर्य बुडी असं क्रियापद होणार नाही. सूर्याने बुडी मारली - इथे बुडी हा शब्द बरोबर आहे, पण तो इथे क्रियापद नाही. फक्त 'डे' तुमच्या वरच्या डीकारान्त वाक्यांशी यमक साधणार नाही ही समस्या आहे खरी!
बरोबर
In reply to बुडी का बुडे? by पुष्कर
पण एवढा विचार नाही केला मी, तरीही तो शब्द समर्पक वाटला आणि लिहीला.
अच्छा
In reply to बरोबर by Bhakti
हरकत नाही.
छान.
रचना आवडली. लिहिते राहा.
संत नामदेवांची सहज आठवण आली-
मुख्य मातृकांची संख्या | सोळा अक्षरे नेटक्या
समचरणी अभंग | नव्हे ताळ छंदो भंग ||
-दिलीप बिरुटे
विठ्ठल विठ्ठल सर्वांना _/\_
विठ्ठल विठ्ठल
सर्वांना _/\_