✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 3)

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 06/10/2021 - 13:17  ·  लेख
लेख
पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे (https://www.google.com/amp/s/www.mymahanagar.com/mumbai/guardian-minister-aaditya-thackeray-said-mumbai-will-not-be-flood-this-monsoon-season/245752/amp/) ------- Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर "Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर | Mumbai rains update we never claimed that mumbai will not be flooded said mayor kishori pednekar | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-rains-update-we-never-claimed-that-mumbai-will-not-be-flooded-said-mayor-kishori-pednekar-472994.html/amp ---------- बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
61328 वाचन

💬 प्रतिसाद (206)

प्रतिक्रिया

सविस्तर उत्तर

प्रदीप
Tue, 06/15/2021 - 13:10 नवीन
तसे तुम्ही स्वतः कसल्याच उत्तराच्या अपेक्षेत नसता. तरीही इथे ते टाकतोय, सर्वांसाठी. (ऑप-इंडियाचे रीपोर्ट्स वाचणे एक प्रचंड त्रास आहे, ह्यांना कुणीतरी बातमी कशी लिहायची, ते एकदा शिकवा रे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

ही जमीन २ कोटीत विकण्याचा मूळ

श्रीगुरुजी
Tue, 06/15/2021 - 14:08 नवीन
ही जमीन २ कोटीत विकण्याचा मूळ करार मार्च २०११ मध्ये झाला होता. त्याला आता १० वर्षे उलटून गेली. https://www.lokmat.com/national/ayodhya-ram-mandir-land-10-years-ago-agreement-respective-land-was-done-two-crores-a653/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

गरिबी हटवा

कपिलमुनी
Mon, 06/14/2021 - 15:15 नवीन
गरिबी हटवा योजने अंतर्गत 2 कोटीचे 15 मिनिटात 18 कोटी झाले आहेत.
  • Log in or register to post comments

कुंभ मेळ्यातील कोव्हिड टेस्ट्स

कॉमी
Tue, 06/15/2021 - 11:11 नवीन
घटनाक्रम- १. पंजाब मध्ये असणार्‍या एका व्यक्तीला कोव्हिड निगेटिव्ह रिपोर्ट असल्याचा हरीद्वार हेल्थ डिपार्ट्मेंट कडून मेसेज आला, जी टेस्ट त्याने कधी केलीच नव्हती. त्या व्यक्तीने आयसीएमआर कडे तक्रार केली, ज्यांनी राज्य सरकारला कळवले. २.त्यांमुळे रिपोर्ट इश्यू करणार्‍या प्रायव्हेट एजन्सीचा उत्तराखंड आरोग्य खात्याकडून तपास चालू झाला, त्यात असे आढळून आले आहे की नऊ बिगर सरकारी एजन्सीज कडून एकूण ४,००,००० टेस्ट्स केल्या गेलेल्या, त्यातले एका एजन्सीचे १,००,००० (किमान) टेस्ट्स रिपोर्ट बनावट आहेत. ह्यात काही व्यक्तींचे पत्ते, फोन नंबर, इत्यादी बनावट होते असे आढळून आले आहे. तसेच, सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी नेमेलेल्या व्यक्ती होत्या, त्यातल्या ५०% व्यक्ती राजस्थानच्या होत्या, आणि त्यातल्या काही कधी हरिद्वारला गेल्याच नव्हत्या. काहे ठिकाणी एका अ‍ॅन्टिजेन टेस्ट किट मधून ७०० सॅम्पल तपासल्याचे दिसले आहे. (एक किट एकदाच वापरायचे असते.) ३. त्या १,००,००० पैकी फक्त १७७ टेस्ट रिपोर्ट कोव्हिड पॉसिटिव्ह होते (०.१८%), जेव्हा की त्या काळात हरिद्वारचा पॉसिटिव्हिटी रेट १०% होता. एजन्सीजना प्रति अ‍ॅन्टिजेन टेस्ट ३५० रुपये दिले गेले होते, तर आरटीपिसीआर साठी आणखी जास्त मोबदला होता. ४. इतर एजन्सीजचे टेस्ट रिसल्ट सुद्धा आता तपासणीखाली आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/1-lakh-covid-19-tests-during-kumbh-festival-fake-report/articleshow/83525633.cms
  • Log in or register to post comments

खुपच धक्कादायक

यश राज
Tue, 06/15/2021 - 11:35 नवीन
हा जो काही असा काही प्रकार झाला आहे तो खुपच धक्कादायक आहे. कदाचीत टूलकीट चा एक हिस्सा असणार. कोरोनासाठी पद्धतशीर पणे कुंभमेळयाला जवाबदार ठरवण्याचा प्रयत्न झाला व पर्यायाने भारताचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्वांवर सरकारने महामारी अ‍ॅक्ट नुसार कठोरात कठोर शिक्षा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

देशात नक्की कायद्याचे राज्य आहे का?

Rajesh188
Tue, 06/15/2021 - 20:38 नवीन
COVID test मध्ये इतके घोटाळे,फसवाफसवी झाली असेल तर भारतात कायद्याचे राज्य नाही .असेच म्हणावे लागेल. कायदा सुव्यवस्था राखणे ,घोटाळे रोखणे,गैर व्यवहार रोखणे हे ज्या यंत्रणेची काम आहेत . त्या यंत्रणा सक्षम नाहीत. सर्व यंत्रणांची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

बरोबर आहे...

प्रदीप
Tue, 06/15/2021 - 20:58 नवीन
सर्व यंत्रणांची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.
चला, निघा ह्या पुनर्बांधणीच्या कामाला. तुम्ही व्हा पुढे, येथे वेळ घालवू नका. नाहीतरी अलिकडेचे एका चर्चेत तुम्ही म्हटले होतेच, की चर्चा करून काय होते म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

साडेतीन वर्षे हिंदुत्वावरच जोर देणार : संजय राऊत

मुक्त विहारि
Tue, 06/15/2021 - 11:26 नवीन
https://www.google.com/amp/s/www.esakal.com/amp/uttar-maharashtra/marathi-dhule-news-sanjay-raut-tour-in-dhule-district-meet-dhule-shiv-sena -------- काय बोलावं ते सुचेना......
  • Log in or register to post comments

श्री राम मंदिर ट्रस्ट आता या

प्रसाद_१९८२
Tue, 06/15/2021 - 16:18 नवीन
श्री राम मंदिर ट्रस्ट आता या आपटार्ड संजय सिंगवर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. नेहमीप्रमाणे आपटार्ड विनापुरावे कोणावरही बेछुट आरोप करतात व मानहानीचा खटला दाखल होताच नाक घासून माफी मागतात. मात्र या केसमधे श्री राम मंदिर ट्रस्टने माफी वगैरच्या भानगडीत न पडता या खोटारड्या आपटार्डना चांगलाच धडा शिकवला पाहीजे.
  • Log in or register to post comments

थांबा, जरा

प्रदीप
Tue, 06/15/2021 - 17:45 नवीन
भाजप व त्यांच्या अवतीभोवतीच्या संस्थांचा अजिबात भरोसा नाही. सध्या खाका फुगवताहेत खऱ्या. पण वेळ येताच शेपूट घालतील. ट्विटरच्या बाबतीत नुकतेच काय झाले, ते आपण पाहिलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

राम मंदिर ट्रस्ट

Rajesh188
Tue, 06/15/2021 - 20:34 नवीन
राम मंदिर ट्रस्ट स्वच्छ व्यवहार करत आहे हे इथल्या आयडी ना कोणी सांगितले.हे काय त्या ट्रस्ट वर आहेत का? आरोप झाला आहे तर त्याची निःपक्ष चोकशी झालीच पाहिजे आणि दोन महिन्याच्या आत मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

आणि दोन महिन्याच्या आत मध्ये.

नावातकायआहे
Tue, 06/15/2021 - 21:03 नवीन
आणि दोन महिन्याच्या आत मध्ये. आज्ञा महाराज! कोण आहे रे तिकडे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

थोडा वेळ थांबा महाराज

सॅगी
Tue, 06/15/2021 - 21:19 नवीन
नाकाने वांगी सोलतोय, काम झाले की येतोच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

राम मंदिर ट्रस्ट स्वच्छ

श्रीगुरुजी
Tue, 06/15/2021 - 21:08 नवीन
राम मंदिर ट्रस्ट स्वच्छ व्यवहार करत आहे हे इथल्या आयडी ना कोणी सांगितले.हे काय त्या ट्रस्ट वर आहेत का? राम मंदिर ट्रस्ट स्वच्छ व्यवहार करीत नाही हे इथल्या आयडी ना कोणी सांगितले.हे काय त्या ट्रस्ट वर आहेत का? आरोप झाला आहे तर त्याची निःपक्ष चोकशी झालीच पाहिजे आणि दोन महिन्याच्या आत मध्ये. आरोप झाला आहे तर तो सिद्ध केलाच पाहिजे आणि दोन महिन्याच्या आत मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

संजय सिंग हा अत्यंत खोटारडा

श्रीगुरुजी
Tue, 06/15/2021 - 21:05 नवीन
संजय सिंग हा अत्यंत खोटारडा आणि गुंड माणूस आहे. ट्विटर सम्राट रागा आणि ट्विटर सम्राज्ञी प्रिव यांनी नेहमीप्रमाणे कोणतीही माहिती न घेता या बिनबुडाच्या आरोपांवर तातडीने ट्विट्स लिहिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

आरोप

चंद्रसूर्यकुमार
Wed, 06/16/2021 - 09:34 नवीन
हा आरोप करणार्‍यांमध्ये आम आदमी पार्टी आणि त्यातही संजय सिंग आहेत म्हटल्यावर कसलाही घोटाळा झाला नाही याची २००% खात्री. आतापर्यंत वेगवेगळे बिनबुडाचे आरोप करायचे आणि मग पळून जायचे म्हणजेच आरोपांच्या बाबतीत 'हिट अ‍ॅन्ड रन' करायचे या हलकटपणात या बदमाषांच्या टोळीचा कोणीच हात धरू शकणार नाही. आतापर्यंत त्या लोकांनी कित्येक जणांविरूध्द असे आरोप केले आहेत. त्यात नितीन गडकरी आणि अरूण जेटलींचा समावेश आहे. दोघांनीही अब्रूनुकसानीचे खटले केजरीवालांविरूध्द ठोकले होते. पण दोघेही भोळे सांबाचे अवतार निघाले. अरूण जेटली पंजाबी असल्याने त्यांच्यापासून जास्त अपेक्षा होत्या कारण दोस्ती आणि शत्रुत्व या दोन्ही गोष्टी अगदी टोकाला जाऊन निभावणार्‍यांमध्ये पंजाबी लोकांचा समावेश होतो. पण त्यांनी पण केजरीवालांना नुसत्या माफीवर सोडून दिले. चार वर्षांपूर्वीच्या घटनेचा कोणाला विसर पडला असल्यास एक गोष्ट लिहितो. या खटल्यासाठी वकील म्हणून केजरीवालांनी राम जेठमलानींना नेमले होते. कोर्टात एका सुनावणीसाठी उभे राहायला राम जेठमलानी कित्येक लाख रूपये घ्यायचे. आपल्यावरील वैयक्तिक खटल्याच्या सुनावणीसाठीचे एक-सव्वा कोटीचे बिल दिल्ली सरकारच्या नावावर लावायचा हलकटपणा याच केजरीवालांनी केला होता. राम जेठमलानी पण तसे धूर्त निघाले. एखाद-सव्वा कोटीने खरं तर त्यांना काहीही फरक पडणार नव्हता. ते बिल त्यांनी माफ करून टाकले. तेव्हा प्रत्यक्षात दिल्ली सरकारच्या खजिन्यातून राम जेठमलानींना मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक खटल्यासाठी पैसे दिले गेले नव्हते पण गरज पडल्यास तसे करायची युगपुरूष मुख्यमंत्र्यांची तयारी होती हे सगळ्यांना समजले. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुणपत्रिका शोधायला याच टोळीतले काही लोक सगळा कामधंदा सोडून दिल्ली विद्यापीठात चकरा मारत होते. या सगळ्या टोळीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता यांनी कोणावर आरोप केल्यास तो आरोप निखालस खोटा आहे आणि कसलाही घोटाळा झालेला नाही याची पक्की खूणगाठ बांधावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

बिनबुडाचे आरोप करून बदनामी

श्रीगुरुजी
Wed, 06/16/2021 - 10:23 नवीन
बिनबुडाचे आरोप करून बदनामी केल्यामुळे युगपुरुष केजरीवाल यांच्यावर बदनामीचे एकूण ३३ खटले सुरू होते. त्यातील ४ खटल्यात यांनी माफी मागितल्याने ते खटले संपले. उर्वरीत २९ खटले अजून न्यायालयात आहेत. खरं तर फक्त एकदाच माफी मागून सुटण्याची कायदेशीर तरतूद असावी. दुसऱ्या खटल्यापासून थेट तुरुंगात रवानगी करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

शिवसेना आमदार दिलीप लांडेंची कंत्राटदारावर दादागिरी.....

मुक्त विहारि
Tue, 06/15/2021 - 16:21 नवीन
"Special Report | शिवसेना आमदार दिलीप लांडेंची कंत्राटदारावर दादागिरी | Shivsena mla dilip lande humiliates contractor | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/videos/shivsena-mla-dilip-lande-humiliates-contractor-475688.html/amp -----------
  • Log in or register to post comments

मु.वि.

नावातकायआहे
Tue, 06/15/2021 - 18:28 नवीन
मु.वि., हे राहिले :=)) काय बोलावं ते सुचेना......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हो ना ....

मुक्त विहारि
Wed, 06/16/2021 - 09:48 नवीन
आता पुढच्या वेळी लिहीतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

16 कोटी रुपये तीन महिन्यात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून जमा केले.

मुक्त विहारि
Wed, 06/16/2021 - 09:52 नवीन
https://marathi.abplive.com/news/pune/vedika-shinde-was-given-medicine-today-990865/amp ---------- जनताच एकमेकांना मदत करू शकते...
  • Log in or register to post comments

गाझियाबादमध्ये वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यावर....

मुक्त विहारि
Wed, 06/16/2021 - 11:10 नवीन
गाझियाबादमध्ये वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यावर, राहुल गांधी म्हणाले… "On the attack on an elderly Muslim man in Ghaziabad Rahul Gandhi said srk 94 | गाझियाबादमध्ये वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यावर, राहुल गांधी म्हणाले... | Loksatta" https://www.loksatta.com/desh-videsh-news/on-the-attack-on-an-elderly-muslim-man-in-ghaziabad-rahul-gandhi-said-srk-94-2500251/lite/ --------- गाझियाबाद : जय श्री राम घोषणा नाही तावीजवरुन मारहाण; UP पोलिसांनी Twitter सहीत ९ जणांविरोधात दाखल केला दंगलीचा गुन्हा https://www.loksatta.com/desh-videsh-news/ghaziabad-police-lodge-fir-against-twitter-journalists-congress-leaders-for-tweets-on-elderly-man-assault-scsg-91-2500901/ -------- काय बोलावं ते सुचेना ....
  • Log in or register to post comments

मार खाणारा किंवा मरणारा

रात्रीचे चांदणे
Wed, 06/16/2021 - 16:46 नवीन
मार खाणारा किंवा मरणारा मुस्लिम असेल तर जाणूनबुजून त्याला धर्म जोडला जातो. मग कधी रेल्वेत जागेमुळे झालेल्या भांडणात होणारा खून असो किंवा अजून दुसरं काही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

https://www.lokmat.com/crime

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/17/2021 - 17:33 नवीन
https://www.lokmat.com/crime/people-farmers-movement-burnt-one-person-alive-shocking-cause-controversy-came-fore-a301/ आंदोलनातील काही शेतकरी दारू ढोसत बसले होते. त्यांच्यात काही वादावादी झाल्यानंतर त्यांनी एकाला जिवंत जाळले.
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद .....

मुक्त विहारि
गुरुवार, 06/17/2021 - 17:57 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हीच बातमी इथे टाकावी

Rajesh188
गुरुवार, 06/17/2021 - 21:43 नवीन
इतकी ही बातमी महत्वाची नाही. देशात खूप काही घडत आहे जे ह्या बातमी पेक्षा पण किती तरी पटित वाईट आहे. शेतकरी हा घटक हिंदू च आहे आणि शेतकऱ्यांची वाट लावायचा प्रयत्न करणारे हिंदुत्व वादीच सरकार आहे. आणि काहीच माहीत नसताना शेतकऱ्यांना बदनाम करणारे हिंदूच आहेत. आणि बहुसंख्य असणारा हिंदू देशात संकटात आहे असे गळे काढणारे पण हिंदू च आहेत. नक्की हिंदू कोण मुळे संकटात आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

!

नावातकायआहे
Fri, 06/18/2021 - 12:56 नवीन
https://www.lokmat.com/politics/pm-narendra-modi-tops-list-worlds-most-popular-leader-a301/
  • Log in or register to post comments

हृदयद्रावक! मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं....

मुक्त विहारि
Fri, 06/18/2021 - 15:44 नवीन
हृदयद्रावक! मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं; नांदेडमधील मजुराच्या मुलीनं केली आत्महत्या.... "हृदयद्रावक! मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं; नांदेडमधील मजुराच्या मुलीनं केली आत्महत्या | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News" https://lokmat.news18.com/maharashtra/online-learning-stopped-cause-of-no-mobile-phone-daughter-of-laborer-in-nanded-committed-suicide-rm-566760.html ----------- आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेच काही टक्के जनता म्हणणारच की......
  • Log in or register to post comments

+१

कॉमी
Fri, 06/18/2021 - 19:16 नवीन
कॉम्रेड विहारींशी सहमत. सरकारने गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल विकत घेऊन देण्याचे समाजवादी/कल्याणकारी धोरण अवलंबावे. तसे न केल्यास एका वर्गाला बेसिकली शिक्षणापासून वंचित ठेवले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

गॉडजिला
Fri, 06/18/2021 - 19:40 नवीन
कोम्रेड विहारी काकांनी योग्य विधान केले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+१

गॉडजिला
Fri, 06/18/2021 - 19:40 नवीन
कोम्रेड विहारी काकांनी योग्य विधान केले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

इथे पोस्ट टाकण्या पेक्षा

Rajesh188
Fri, 06/18/2021 - 18:42 नवीन
त्या मुलीला मोबाईल घेवून दिला आता तर हिंदू प्रेमी ,राष्ट्रे प्रेमी म्हणून शोभला असता.
  • Log in or register to post comments

पी.एम.सी बँक

चंद्रसूर्यकुमार
Fri, 06/18/2021 - 19:33 नवीन
सेंट्रम कॅपिटलला पी.एम.सी बँकेला सामावून घ्यायची (अ‍ॅक्विझिशन) परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून चालू असलेली पी.एम.सी बँकेच्या खातेदारांची परवड थांबेल अशी आशा आहे. त्यावेळेस आलेली एक बातमी आठवते. एप्रिल २०१९ मध्ये जेट एअरवेज बंद झाल्याने नोकरी गेली आणि त्यानंतर चार-पाच महिन्यात पी.एम.सी बँकेत फिक्स्ड डिपॉझिटला लावलेले ९० लाख रूपये बँक संकटात आल्याने अडकले अशी एकाची अवस्था झाली होती. दुर्दैवाने त्या माणसाने आत्महत्या केली. पी.एम.सी बँक अडचणीत आल्यानंतर काही महिन्यातच येस बँकही अडचणीत आली पण येस बँकेचा आकार मोठा असल्याने ती बँक बुडू देणे अर्थव्यवस्थेसाठी परवडले नसते म्हणून ती बँक वाचवायला सगळ्यांनी धावपळ झाली. पण पी.एम.सी बँकेच्या बाबतीत हे सगळे प्रयत्न झाले नाहीत. पी.एम.सी बँकेच्या प्रश्नानंतर सहकारी बँकांवरही रिझर्व्ह बँकेचे अधिक नियंत्रण ठेवायच्या दृष्टीने बिल संसदेत येत आहे ही चांगली गोष्ट आहे. असेच बिल पतपेढ्यांसाठी पण यावे. अशा किती पतपेढ्या बुडतात आणि त्यांच्या ठेवीदारांचे पुढे काय होते काय माहित. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/rbi-approves-centrum-bharatpe-to-takeover-crisis-hit-pmc-bank/articleshow/83636517.cms
  • Log in or register to post comments

लोकांचे हित जपण्यासाठी

Rajesh188
Fri, 06/18/2021 - 19:57 नवीन
संसदेत बिल आणले जात आहे की सर्वसामान्य लोकांचे बँकेत ठेवलेले पैसे कसे लुटता येतील आणि मित्र मंडळीत कसे वाटता येतील त्या साठी बिल आणले जात आहे . हे पहिले बघितले पाहिजे. ह्या सरकार चा हेतू हा जन कल्याण हा कधीच नव्हता. लोकांना अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

राजेश जी!

नावातकायआहे
Fri, 06/18/2021 - 20:13 नवीन
संसदेत बिल आणले जात आहे की सर्वसामान्य लोकांचे बँकेत ठेवलेले पैसे कसे लुटता येतील आणि मित्र मंडळीत कसे वाटता येतील त्या साठी बिल आणले जात आहे सर, विदा दिलात तर माहितीत भर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अगदी पहाच तुम्ही

प्रदीप
Fri, 06/18/2021 - 20:17 नवीन
तुमच्या अशा धमकीने केंद्र सरकारने घाबरून मात्र हा निर्णय बदलला, तर ती तुमची मोठीच अचिव्हमेंट असेल. तेव्हा, इथे लिहीण्यात वेळ घालवू नका ('चर्चा करण्यांत कसला वेळ घालवताय?"- तुम्हीच इततस्त्र). तेव्हा, व्हा पुढे आणि पहा काय पहायचे ते. चला, चला, पळत सुटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

+१

कॉमी
Fri, 06/18/2021 - 20:05 नवीन
सहमत आहे, चांगली गोष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात लवकरच पुन्हा

श्रीगुरुजी
Fri, 06/18/2021 - 21:45 नवीन
महाराष्ट्रात लवकरच पुन्हा एकदा युती सरकार https://www.lokmat.com/politics/exclusive-bjp-sena-government-maharashtra-soon-narendra-modi-uddhav-thackeray-spoke-phone-discussed-a720/ असं होऊ नये हीच इच्छा आहे व हे होईल असे वाटत नाही. परंतु हे खरंच झालं तर महाराष्ट्रातून भाजप कायमस्वरूपी संपेल हे नक्की.
  • Log in or register to post comments

हहहहहह

कॉमी
Fri, 06/18/2021 - 22:31 नवीन
मज्जा ! एंटरटेनमेंट साठी का हुईना युती हवीच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ही युती खरोखरच झाली तर ती

श्रीगुरुजी
Fri, 06/18/2021 - 22:47 नवीन
ही युती खरोखरच झाली तर ती भाजपच्या निर्लज्जपणाची व लाचारीची परीसीमा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

होण्याची शक्यता तुम्ही म्हणता

कॉमी
Fri, 06/18/2021 - 22:57 नवीन
होण्याची शक्यता तुम्ही म्हणता तशी खूप कमी आहे. निरनिराळ्या घटनांचा वापर करून शिवसेनेला हिंदू विरोधी दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. युती केली तर हिंदुत्वाच्या मुद्द्यातली हवा फुस्स होऊन जाईल. त्याचा देशपातळीवर परिणाम होऊ शकतो. इतका मूर्खपणा भाजप करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बंगालची पार्श्वभुमी बघता ह्या

नावातकायआहे
Fri, 06/18/2021 - 22:49 नवीन
बंगालची पार्श्वभुमी बघता ह्या बातमीवर विश्वास बसतो आहे. अस झाले त लै म्हणजे लैच मजा बघायला मिळेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

परत युती झाल्यास

चंद्रसूर्यकुमार
Fri, 06/18/2021 - 22:58 नवीन
परत युती झाल्यास मी राहतो तिथे लोकसभेला शिवसेनेचा उमेदवार असेल. त्याला मत देणे मला तरी शक्य होणार नाही. विधानसभेला भाजपचा उमेदवार नसेल पण तरीही हा लोचटपणा दाखवल्याबद्दल भाजपला शिक्षा दयायला नुसते नोटा दाबणे पुरेसे होणार नाही. भाजपला शिक्षा दयायला विधानसभेत मी राष्ट्रवादीला मत देईन. लोकसभेत मात्र नोटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पुरोगामी विचारवंतांची प्रतिक्रिया?

चंद्रसूर्यकुमार
Sat, 06/19/2021 - 09:24 नवीन
भाजपने लोचटपणा केला तर बाकी कोणाची नाही तरी पुरोगामी विचारवंतांची नक्की भूमिका काय असेल हा प्रश्न नक्कीच पडतो. गेली चार-पाच दशके शिवसेनेला सतत टोकाचा विरोध करणार्‍या या लोकांनी शिवसेनेला विरोध केला म्हणून शिवसैनिकांचा मारही खाल्ला आहे. निखिल वागळेच्या ऑफिसवर शिवसेनेचा कित्येकदा हल्ला झाला आहे. ४०-५० वर्षे ज्या शिवसेनेला अगदी कडवा विरोध केला तीच शिवसेना केवळ भाजपला (यांच्या भाषेत 'बीजेपी' ला) सत्तेबाहेर बसवले म्हणून या स्वयंघोषित विचारवंतांना आता चांगली वाटायला लागली आहे. मुख्यमंत्री-मुख्यमंत्री असे किती कौतुक या लोकांच्या वर्तुळात असते. भाजपने स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घ्यायची असेल तर असू दे. त्या परिस्थितीत विधानसभेत भाजपला अजिबात मत नाही आणि लोकसभेत माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असेल त्यामुळे नोटा हा निर्णय पक्का आहे. पण तसे झाल्यास निखिल वागळे आणि त्याच्या कळपातील लोकांची प्रतिक्रिया काय असेल? उध्दव म्हणजे 'राईट मॅन इन राँग कंपनी' अशी प्रतिक्रिया असेल की ४०-५० वर्षे शिवसेनेला टोकाचा विरोध आणि द्वेष करत होते तसे परत सुरू होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हे बरोबर आहे, पण असे खरोखरच

श्रीगुरुजी
Sat, 06/19/2021 - 09:47 नवीन
हे बरोबर आहे, पण असे खरोखरच झाल्यास (हे होऊ नये ही तीव्र इच्छा आहे) तथाकथित राष्ट्रवादी असणारे व एकमेकांवर अत्यंत विषारी टीका करणारे किरीट सोमय्या, संजय राऊत, अतुल भातखळकर (हे सेनेवर टीका करणारी रोज किमान १० ट्विट्स लिहीतात) इ. ची भूमिका काय असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

अर्थात ही युती पुन्हा एकदा

श्रीगुरुजी
Sat, 06/19/2021 - 10:01 नवीन
अर्थात ही युती पुन्हा एकदा झाली तरी सामना व अन्य माध्यमातून नेहमीप्रमाणेच भाजपवर अत्यंत अर्वाच्य टीका सुरूच राहील. ही अक्कल दीड वर्षांपूर्वीच का आली नव्हती, शेवटी सत्तेसाठी शिवसेनेचेचीच लाचारी करून पाय धरावे लागले, शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला शरण आणून जमिनीवर आणले, शिवसेनेच्या नादी लागणाऱ्यांना शेवटी शिवसेनेसमोरच झुकावे लागते अशा त-हेची टीका भाजपवर सुरूच राहील. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या रक्तात निर्लज्जपणा पुरेपूर मुरल्याने ही टीका त्यांना गोडच वाटेल. आपली मते व जागा जास्त असूनही शिवसेनेची चाटत बसण्याचे घाणेरडे व्यसन महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे कितीही लाथा बसल्या, कितीही वेळा अपमान झाले, पक्षाचे कितीही नुकसान होत असले आणि कितीही वेळा झिडकारले तरी हे शिवसेनेसमोर लोचटपणा करणे थांबविणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लाथा

चंद्रसूर्यकुमार
Sat, 06/19/2021 - 10:09 नवीन
इतकी वर्षे शिवसेनावाले दररोज उठल्यासुटल्या भाजपला लाथा घालत असतानाही परत कुत्र्यासारखे शिवसेनेमागे शेपूट हलवत हलवत जाणे हा लोचटपणाचा कळस असेल. असे म्हणतात की दुसरा आपल्याला कसे वागवतो ते आपण चालवून घेतो त्यावरून आपल्याला कसे वागवायचे याचे मापदंड आपण इतरांसाठीच निर्माण करत असतो. तसे असेल तर यांना उठल्यासुटल्या लाथा घातलेल्या चालतात नव्हे इतरांनी लाथा घातलेल्या यांना आवडतात असाच संदेश आपल्या वर्तणुकीतून महाराष्ट्र भाजपवाले लोकांना देतील. मी काही मिडियावाला नाही त्यामुळे फार तर मिपासारख्या ठिकाणी त्यांना शाब्दिक लाथा घालणार आणि योग्य वेळ येईल तेव्हा मतदानयंत्रातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१००

सॅगी
Sat, 06/19/2021 - 10:32 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हि बातमी पेड न्यूज सारखी

सुबोध खरे
Sat, 06/19/2021 - 11:46 नवीन
हि बातमी पेड न्यूज सारखी वाटते आहे. भाजपच्या लोकांनी तिघाडीवर विशेषतः शिवसेनेवर टीका कमी करावी आणि संयमाने राहावे म्हणून श्री आशिष जाधव यांनी अशी पुडी सोडली आहे हि शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

शक्य आहे

चंद्रसूर्यकुमार
Sat, 06/19/2021 - 11:52 नवीन
शक्य आहे. पण तशी बातमी आल्यानंतर भाजप समर्थक शिवसेनेवर टीका कमी करण्यापेक्षा भाजपवरच टीका करायला लागलेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा