✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंजन आणि कल्पनाविस्तार (३)

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 05/30/2021 - 13:42  ·  लेख
लेख
भाग १ भाग २ कल्पना लढवा ! खाली एका मराठी नियतकालिकातील लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत. शब्द : अर्धशतकात, कमावत्या, वरचढ, घरच्या, मनोवृत्तीत, परंपरेने, अलिखित, कमाईवरच, निर्णयाधिकार, सांगकाम्या, फंदात, भूमिका, समानता. प्रश्न : १. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा. २. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा. ३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी) ४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ? ५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी). मूळ लेखाच्या शीर्षकात असलेले दोन महत्त्वाचे शब्द जाणीवपूर्वक दिलेले नाहीत. तुमच्या उत्तरांमध्ये विविधता दिसावी हा त्यामागचा हेतू आहे. प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. शक्यतो प्रश्न विचारू नका. आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा. मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही. धन्यवाद ! ……………………………
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13259 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज

साहना
Sun, 05/30/2021 - 13:53 नवीन
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा. कुटुंब/महिला अधिकार ह्या विषयावरील लेख आहे असे वाटतो आणि त्याला काही तरी आर्थिक बाजू आहे असे वाटते. २. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा. अधुनिक काळांतील गृहिणीची अवस्था ३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी) वय साधारण ४५ ते ५५ मध्ये असेल. लिंग स्त्री. लेखिका अकॅडेमिया मधील असावी असे वाटते. ४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ? मागील एक वर्ष ५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी). हे सांगणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

गेल्या अर्धशतकात कमावत्या

Bhakti
Sun, 05/30/2021 - 14:49 नवीन
गेल्या अर्धशतकात कमावत्या स्त्रीवर्ग वाढलाच नसून थोडा वरचढच असा वर्ग दिसतो. घरच्या लोकांच्या मनोवृत्तीत कमालीचा बदल घडून परंपरेने अलिखित असे काही नियम बदलून त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. फक्त कमाईवरच परिणाम झाला नाही तर स्त्रीयांची निर्णयाधिकार क्षमताही विकसित झाली आहे. स्त्रीया सांगकाम्या न राहता स्वतः च्या भूमिका मांडत असून समानता आता नांदावी.
  • Log in or register to post comments

गेल्या अर्धशतकात घरातील

गॉडजिला
Sun, 05/30/2021 - 15:57 नवीन
गेल्या अर्धशतकात घरातील कमावत्या व्यक्तीबाबत स्त्रीवर्गात रोष वाढलाच नसून थोडा थोडा करत भांडणे आणि आढ्यातखोरपणा यात थोडा वरचढच असा हा वर्ग झालेला दिसतो. घरच्या लोकांच्या मनोवृत्तीत कमालीचा बदल घडून परंपरेने अलिखित असे काही नियम बदलून त्यांना स्वातंत्र्य दिले आहे या भ्रमक भासातुन बाहेर पडण्याऐवजी त्यांना वादविवादात विशेष उत्साह निर्माण झाला यातुन त्यांच्या फक्त कमाईवरच परिणाम झाला नाही तर स्त्रीयांची निर्णयाधिकार क्षमताही बेबंद विकसीत झाली आहे. स्त्रीया जरी सांगकाम्या न राहता स्वतः च्या आग्रही भूमिका मांडत असून समानता आता नांदावी या मुळे उद्देशाला हरताळ फासण्यात वरचढ होत आहेत. या जिथे अधिकारात नसतात तिथे या समानतेची सोज्वळ भुमीका घेतात पण थोडे संख्याबळ प्राप्त झाल्यास यांना काडीमोड अथवा स्वताचा राखीव फ्लॅट आवश्यक होउन जातो.
  • Log in or register to post comments

१. विषय..कामाच्या ठिकाणी

खेडूत
Sun, 05/30/2021 - 16:06 नवीन
१. विषय..कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता शक्य आहे का २. शीर्षक... नव्या शतकातील स्त्रीयांची आव्हाने आणि निर्णयक्षमता ३. लेखक...पन्नाशी ओलांडलेला पुरुष, व्यवस्थापन सल्लागार ४. काळ..२००० ते २००५ ५. माध्यम..साप्ताहिक. किस्त्रिम परिवार, माहेर, साप्ता. सकाळ वगैरे. किंवा अश्या वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी. टीप: मी २००८ नंतर सर्व मुद्रित माध्यमे वाचणे बंद केले असल्याने असे लेख गेल्या दहा वर्षांत वाचलेले नाहीत! त्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता मोठीच आहे. :)
  • Log in or register to post comments

१. विषय..कामाच्या ठिकाणी

खेडूत
Sun, 05/30/2021 - 16:08 नवीन
१. विषय..कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता शक्य आहे का २. शीर्षक... नव्या शतकातील स्त्रीयांची आव्हाने आणि निर्णयक्षमता ३. लेखक...पन्नाशी ओलांडलेला पुरुष, व्यवस्थापन सल्लागार ४. काळ..२००० ते २००५ ५. माध्यम..साप्ताहिक. किस्त्रिम परिवार, माहेर, साप्ता. सकाळ वगैरे. किंवा अश्या वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी. टीप: मी २००८ नंतर सर्व मुद्रित माध्यमे वाचणे बंद केले असल्याने असे लेख गेल्या दहा वर्षांत वाचलेले नाहीत! त्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता मोठीच आहे. :)
  • Log in or register to post comments

विषय:- स्त्री-पुरुष समानता

गुल्लू दादा
Sun, 05/30/2021 - 17:32 नवीन
विषय:- स्त्री-पुरुष समानता शीर्षक:- वेळेची समानता लेखकाबद्दल:- स्त्री, 30-35 वयोगट, 10 वर्ष आधी तिने कष्ट करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. आज तिची यशोगाथा आपण सगळे वाचत आहोत. काळ:- 2016 ते 2021 माध्यम:- दैनिक (सदर:- माझी संघर्षगाथा). टीप:- कुमार सरांनी कल्पित लेख विचारला नसला तरी माझी कल्पना इथे चिटकवत आहे. धन्यवाद ;) 'कमावत्या' नवऱ्याची चिता समोर जळत होती. मागे फक्त 2 लेकरं आणि पोटाचा प्रश्न ठेवून तो चालता झाला झाला होता. 'परंपरेने' चालत आलेला व्यवसाय करावा असा विचार तिच्या मनात आला. पण सासरच्या लोकांना 'अलिखित' नियम मोडला असे वाटेल. गेल्या 'अर्धशतकात' बरीच स्त्री-पुरुष 'समानता' आली. पण, यांच्या 'मनोवृत्तीत' कधीच बदल व्हायचा नाही. ही आपल्याला 'वरचढ' ठरू पाहते असे त्यांना वाटेल. नवरा होता तेव्हासुद्धा आपल्याला 'निर्णयाधिकार' नव्हताच. त्याच्या 'कमाईवरच' गुजराण करायची. स्त्री सुद्धा कमाई करू शकते ही 'भूमिका' यांना कधी रुचलीच नाही. 'सांगकाम्या' सारखं पडेल ते काम 4 भिंतीत आटपायचं. पण आता नाही. या 'घरच्या' 'फंदात' आपण पडायचं नाही. सर्व बंधने झुगारून तिने नवऱ्याच्या सायकलला पायडलं मारलं आणि जोरात आरोळी ठोकली, "भाजी घ्या भाजी".
  • Log in or register to post comments

वयोगट

गुल्लू दादा
Mon, 05/31/2021 - 09:00 नवीन
वयोगट:- 50 ते 55 असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

आतापर्यंत.... सर्वांनीच

हेमंतकुमार
Sun, 05/30/2021 - 18:04 नवीन
आतापर्यंत.... सर्वांनीच आपापल्या मनातले आणि अगदी मनापासून लिहिलेले आहे. त्याबद्दल अंतरिम आभार !
  • Log in or register to post comments

अजून..

हेमंतकुमार
Mon, 05/31/2021 - 10:58 नवीन
तीन तास मुदत आहे
  • Log in or register to post comments

मैद्याचे पोते झाले प्रातःस्मरणिय काका - एक प्रवास...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/31/2021 - 11:50 नवीन
निवडणुकीत जेमतेम झालेल्या जागांच्या अर्धशतकात काकांना सत्ता भलतीच दूर भासत होती, गेली पाच वर्षे सगळ्या कमावत्या वाटा बंद झालेल्या होत्या आणि "ना खाउंगा ना खाने दूंगा" म्हणणारे वरचढ झाले होते. स्वतःच्या घरच्या लो़कांबद्दल सुध्दा आता काही खात्री वाटत नव्हती, त्यांच्या मनोवृत्तीत होत चाललेले सुक्ष्म बदल चाणाक्ष काकांनी बरोबर हेरले आणि शेवटचा उपाय म्हणून परंपरेने सुरु असलेले राजकारण बाजूला ठेवत एक नवाच धोबीपछाड डाव खेळायचे त्यांनी ठरवले. इतिहास हा नेहमी जेत्यांचाच असतो हा अलिखित नियम त्यांना चांगलाच ठाउक होता, पण यशस्वी जुगार खेळण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नव्हते. शिवाय यापूर्वी केलेल्या कमाईवरच आता गदा यायची चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती, त्यांना चहुबाजूने घेरण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली होती. शेवटी त्यांनी सगळी लाज शरम बा़जूला ठेवत आपला निर्णयाधिकार वापरला आणि अनेक तडजोडी आणि तोडफोडी करत सत्ता पदरात पाडून घेतली. मला "मैद्याचे पोते" असे लाडाने म्हणणार्‍या तुझ्या बाबांचे स्वप्न आपण पूर्ण करुया असे सांगत, एका सांगकाम्याला त्यांनी पदावर बसवले आणि सर्वोच्च पदाच्या फंदात न पडता सुध्दा सगळे लोणी आपल्याच ताटात पडेल याची पक्की सोय करुन घेतली. आता सोयिस्कर रित्या सल्लागाराची भूमिका बजावायला ते मोकळे झाले होते. त्यात ही आपण समानता कशी जपली ये उच्चरवाने जनतेला सांगायला मात्र ते विसरले नाही. लेखक :- सुमार तस्कर वर्तमान पत्र :- अर्थातच "टॉयलेट पेपर" काळ :- बहूतेक सकाळची घाईची वेळ "हग्रलेख टाकायची" पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

दंडवत स्वीकारा

सौंदाळा
Mon, 05/31/2021 - 12:07 नवीन
कहर, फुटलो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

लोल.... प्रचंड हसलो :)

बेकार तरुण
Mon, 05/31/2021 - 12:17 नवीन
लोल.... प्रचंड हसलो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

भारी

Bhakti
Mon, 05/31/2021 - 13:09 नवीन
अगं आई गं ;);) खरच मैद्याचे पोते म्हणत का? गुगलवर सर्च केले :) इन्टरेस्टिंग नाव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

जबरदस्त कल्पना विस्तार :-)

बबन ताम्बे
Mon, 05/31/2021 - 13:25 नवीन
जबरदस्त कल्पना विस्तार केलाय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कहर

गॉडजिला
Mon, 05/31/2021 - 13:59 नवीन
_/\_ हा हा हा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कहर...

संजय पाटिल
Mon, 05/31/2021 - 14:06 नवीन
असला कल्पनाविस्तार फक्त पैजारबुवाच करू शकतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

माऊली, दिलेल्या १३ आलेखबिंदूंतून

अनन्त्_यात्री
Mon, 05/31/2021 - 14:14 नवीन
असे अफलातून "कर्व्ह फिंटिंग" करणे व इतकी छप्परतोड कल्पनाभरारी मारणे केवळ आपल्यालाच जमू शकते_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नेक्स्ट लेव्हल

गुल्लू दादा
Mon, 05/31/2021 - 14:17 नवीन
भारी एकदम;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

एकदम भारी बुवा...

खेडूत
Mon, 05/31/2021 - 14:22 नवीन
एकदम भारी बुवा... तुम्ही आमचा दिवस सुंदर बनवलाय! आता मूळ उत्तराची उत्सुकता फार कमी उरली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बाडिस!

नावातकायआहे
Mon, 05/31/2021 - 16:05 नवीन
बाडिस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

बाडिस

Bhakti
Mon, 05/31/2021 - 17:03 नवीन
बाडिस कालपासून मुड खुपचं खराब होता,पैजरबुवांचा कल्पनाविलास वाचून लयी हसू आले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

हा हा हा

गणेशा
Mon, 05/31/2021 - 14:24 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

हुच्च हुच्च हुच्च!!

तुषार काळभोर
Mon, 05/31/2021 - 17:18 नवीन
२०२१- प्रतिसाद ऑफ द यिअर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+३

हेमंतकुमार
Mon, 05/31/2021 - 13:41 नवीन
उत्तरांमधील विविधता आणि कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्यांमुळे एकंदरीत धमाल येत आहे ! यास्तव मुदत अजून ३ तास वाढवण्यात येत आहे .... :)))) धन्यवाद !
  • Log in or register to post comments

पैजारबुवा, +१

वामन देशमुख
Mon, 05/31/2021 - 15:50 नवीन
😂
  • Log in or register to post comments

स्त्री मुक्ती की मुक्त स्त्री

प्रकाश घाटपांडे
Mon, 05/31/2021 - 16:24 नवीन
स्त्री मुक्ती की मुक्त स्त्री?
  • Log in or register to post comments

येउद्यात..

हेमंतकुमार
Mon, 05/31/2021 - 16:31 नवीन
अजून भराऱ्या.. आज भाप्रवे १८०० ला समारोप करूयात .
  • Log in or register to post comments

माउलींनी निकाल लावलाय

तुषार काळभोर
Mon, 05/31/2021 - 17:22 नवीन
माउलींनी धाग्याचा आधीच निकाल लावलाय (पन इंटेंडेड) तरी.. १. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा. >> स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य २. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा. >> आजच्या कमावत्या स्त्रीचं कौटुंबिक व सामाजिक स्थान ३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी >> ५०+, महिला, उच्च मध्यमवर्गीय, आर्थिक सुस्थितीत, कदाचित नावाजलेल्या विद्यालायात प्राध्यापिका, सुशिक्षित व आर्थिक सुबत्ता असलेली किमान दुसरी पिढी. ४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ? >> १९८०-१९८५ ५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी). >> दिवाळी अंक
  • Log in or register to post comments

समारोप !

हेमंतकुमार
Mon, 05/31/2021 - 17:58 नवीन
सर्वच प्रतिसादकांचे मनापासून आभार ! तुमचा प्रत्येकाचा कल्पनाविस्तार स्वतंत्र व सुरेख आहे. कोणीही आधीचा प्रतिसाद बघून लिहिलेले नाही हे विशेष. बुवांनी जी थेट उत्तर ध्रुवावर भरारी मारली त्याला सलाम ! त्याने धाग्याचा हेतू अगदी सार्थ झाला. आता.... केवळ औपचारिकता म्हणून मूळ लेखाबद्दल माहिती : शीर्षक : पुरुष आणि घरकाम ? विषय: पतीपत्नी दोघेही मिळवते असले तरी घरकामातील पतीचे योगदान कमीच असणे. इथे समानता येण्याची गरज. 2002 मध्ये दैनिकात प्रकाशित. लेखक : ४०+ शहरी पुरुष.
  • Log in or register to post comments

माझा फक्त

गुल्लू दादा
Mon, 05/31/2021 - 19:06 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

माझा फक्त

गुल्लू दादा
Mon, 05/31/2021 - 19:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वाचकांच्या सूचना

हेमंतकुमार
Tue, 06/01/2021 - 07:53 नवीन
हव्या आहेत. अजून काही दिवसांनी नवा खेळ देताना स्वतंत्र धागा काढण्याऐवजी इथेच पुढे चालू करावे असे वाटते. म्हणजे धाग्यांची संख्या उगाचच वाढत जाणार नाही.
  • Log in or register to post comments

धाग्यांची संख्या वाढली तरी

शाम भागवत
Tue, 06/01/2021 - 08:34 नवीन
धाग्यांची संख्या वाढली तरी चालेल, पण प्रत्येक खेळ वेगळाच असावा. पुढे सुध्दा कोणालाही कल्पनाविलास करता येऊ शकेलच की. जर प्रमाण खूपच वाढलं व खूपच लोकप्रीय झालं तर त्यासाठी एक वेगळा विभाग केला की पुरेल.
  • Log in or register to post comments

शा भा

हेमंतकुमार
Tue, 06/01/2021 - 10:32 नवीन
धन्यवाद ! दरवेळी नव्या धाग्याचा अजून एक फायदा दिसून आलेला आहे. तो म्हणजे दरवेळी काही नवे वाचक यात सामील होत आहेत.
  • Log in or register to post comments

बरोबर..

गणेशा
Tue, 06/01/2021 - 10:39 नवीन
बरोबर.. त्याच बरोबर, चित्रा वरून कल्पना विस्तार जास्त मनोरंजक वाटला.. त्यामुळे शब्दा पेक्षा चित्रे जास्त असल्यास अजून मज्जा येईल.. धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सहमत!

लई भारी
Tue, 06/01/2021 - 21:01 नवीन
नविन धागा असेल तर बरे पडेल. यावेळी उशिरा बघितला पण चित्राची कल्पना जास्त चांगली आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा