✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
गुरुवार, 05/13/2021 - 10:47  ·  लेख
लेख
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. gouriamma गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला. गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही. १९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या. १९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्‍या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अ‍ॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या. गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली. नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत. ११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52595 वाचन

💬 प्रतिसाद (166)

प्रतिक्रिया

मोदी ला

सुबोध खरे
Mon, 05/17/2021 - 09:38 नवीन
मोदी ला आपलं वय किती? आपला अनुभव किती? आणि आपली लायकी किती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निपा

जो सातवी पास आहे की नाही

नगरीनिरंजन
Mon, 05/17/2021 - 16:03 नवीन
जो सातवी पास आहे की नाही ह्याचाही पत्ता नाही व अनेकांचा मृत्यु या एका गोष्टीखेरीज इतर प्रत्येक बाबतीत अपयशी ठरला आहे अशा माणसाला संबोधन काय वापरायचे ह्याची काळजी करून आपली लायकी दाखवायची खाज फार! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल

सुबोध खरे
Tue, 05/18/2021 - 19:43 नवीन
नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल येते असे नव्हे. साठ कोटी भारतीय जनतेने ज्याला बहुमताने दोनदा निवडून दिले आहे अशा नेत्याबद्दल इतके अनुदार उद्गार काढून आपण आपली लायकी मात्र दाखवून देताय. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

नोट.

शा वि कु
Tue, 05/18/2021 - 20:03 नवीन
मोदींना आदरार्थी बहुवचन नाही वापरले तरी प्रॉब्लेम आहे. पण इतरत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फावड्या, पेंग्विन, खुजलीवाल म्हणले तर चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कोणत्याही नेत्याबद्दल इतके

सुबोध खरे
Wed, 05/19/2021 - 12:07 नवीन
कोणत्याही नेत्याबद्दल इतके अनुदार उद्गार काढून आपण आपली लायकी मात्र दाखवून देता आहात याचे भान ठेवावे . बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

मुळात या नेत्याबद्दल आशुतोष,

श्रीगुरुजी
Tue, 05/18/2021 - 20:03 नवीन
मुळात या नेत्याबद्दल आशुतोष, संजय सिंह या नालायक विकृतांनी मुद्दाम खोटंनाटं पसरवून त्यांच्या प्रतिमाभंजनाचा अयशस्वी प्रयत्न केला. बहुसंख्य जनतेने या आरोपांवर कणभरही विश्वास ठेवला नाही. जो खरंच किमान एक दोन बुकं शिकलेला आहे, त्याने असले अनुद्गार काढण्याआधी निदान हे आरोप खरे आहेत का खोटे याची स्वतः शहानिशा करायला पाहिजे होती. मिपावर सुद्धा पप्पू आहेत हे पुनःपुन्हा सिद्ध होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महाराजा का महा भिकारी? १.२ अब्ज डॉलर्स देणे!!

नावातकायआहे
Sat, 05/15/2021 - 20:36 नवीन
https://www.esakal.com/global/cairn-energy-sues-air-india-to-enforce-12-billion-dollor-arbitration-award
  • Log in or register to post comments

यात एअर इंडिया चा संबंध नाही.

पिनाक
Sat, 05/15/2021 - 23:50 नवीन
यात एअर इंडिया चा संबंध नाही. भारत सरकारचे देणे आहे. आणि एअर इंडिया भारत सरकारच्या कंपनी असल्याने तिला यात ओढले जात आहे. माझ्या मते असं कितपत करता येते याबद्दल शंका आहे. तसं म्हणायचं तर फक्त अमेरिकन सरकारवर दबाव आणण्यासाठी अमेरिकन संस्थांची भारतातली खाती पण liquidate करता येऊ शकतातच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

रेट्रोस्पेक्टिव्ह

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 05/18/2021 - 11:07 नवीन
कर तेव्हाही निषेधाहार्यच होते, अन आताही, ताबडतोब मागे घ्यायला हवे! जे(बका)टली काकांचा हा निर्णय चुकिचाच. (सेकंड होमलोनव्याजावर कॅप घातली हा ही चुकिचाच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

राजीव सातव यांचे कोरोना व

श्रीगुरुजी
Sun, 05/16/2021 - 10:04 नवीन
राजीव सातव यांचे कोरोना व त्यातून उद्भवलेल्या न्यूमोनियाने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. कॉंग्रेसमधील काही मोजक्या सभ्य, शांत, चांगल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांना श्रध्दांजली. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/congress-leader-mp-rajiv-satav-passes-away/articleshow/82674865.cms
  • Log in or register to post comments

भावपूर्ण आदरांजली

Bhakti
Mon, 05/17/2021 - 10:10 नवीन
कुठे करोनाकाळात त्या एका साध्या गुंडनेत्यांच्या अंत्ययात्रा आणि कुठे असे हिरे _/\_ तस माझा राजकारणाचा अभ्यास कमी आहे,पण महाराष्ट्रातील क्रांग्रेसमध्ये इतका मितभाषी आणि कर्तृत्वान नेता होता हे आता कळाले.नेते अक्षरशः रडत आहेत.पाहून भरून आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भावपूर्ण आदरांजली

Bhakti
Mon, 05/17/2021 - 10:11 नवीन
कुठे करोनाकाळात त्या एका साध्या गुंडनेत्यांच्या अंत्ययात्रा आणि कुठे असे हिरे _/\_ तस माझा राजकारणाचा अभ्यास कमी आहे,पण महाराष्ट्रातील क्रांग्रेसमध्ये इतका मितभाषी आणि कर्तृत्वान नेता होता हे आता कळाले.नेते अक्षरशः रडत आहेत.पाहून भरून आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली

धर्मराजमुटके
Sun, 05/16/2021 - 18:36 नवीन
अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली. बर्‍याचशा गोष्टी पटण्यासारख्या वाटल्या.
  • Log in or register to post comments

अनिल थत्तेंबद्दल व त्यांच्या

शाम भागवत
Sun, 05/16/2021 - 19:37 नवीन
अनिल थत्तेंबद्दल व त्यांच्या या व्हिडिओ बद्दल एक टिप्पण्णी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मुस्लिमबहुल मलेरकोटला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित....

मुक्त विहारि
Sun, 05/16/2021 - 18:50 नवीन
मुस्लिमबहुल मलेरकोटला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित, मुख्यमंत्र्यांचं ईदच्या निमित्ताने गिफ्ट ---------- https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/national/punjab-govt-has-announced-malerkotla-as-the-newest-district-in-the-state-456856.html/amp ------------
  • Log in or register to post comments

""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा

मुक्त विहारि
Sun, 05/16/2021 - 19:09 नवीन
""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा | salman khan warning said please do not participate in piracy serious action would be taken by cyber cell kpw 89 | Loksatta" https://www-loksatta-com.cdn.ampproject.org/v/s/www.loksatta.com/manoranjan-news/salman-khan-warning-said-please-do-not-participate-in-piracy-serious-action-would-be-taken-by-cyber-cell-kpw-89-2472438/lite/?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16211718604180&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan-news%2Fsalman-khan-warning-said-please-do-not-participate-in-piracy-serious-action-would-be-taken-by-cyber-cell-kpw-89-2472438%2F ----------- मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...
  • Log in or register to post comments

मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...

गॉडजिला
Sun, 05/16/2021 - 20:09 नवीन
सर्सकटीकरण... दुसरं काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी पण आधी हिंदी चित्रपट बघत होतो ....

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 11:59 नवीन
संजय दत्तला माफी दिली आणि मी हिंदी चित्रपट सृष्टी बद्दल माहिती घ्यायला सुरूवात केली. जी काही माहिती मिळाली, ती बघून मी तरी, माझ्या घामाचा पैसा मी हिंदी चित्रपट बघण्यासाठी मोजत नाही .... https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vd https://m.youtube.com/watch?v=q4jP1LyOa_8&t=1s https://m.youtube.com/watch?v=5HIQl16gN_c
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 12:02 नवीन
https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk# जब 'बॉबी' के फायनेंस के लिए हाजी मस्तान की चौखट पर पहुँच गए राज कपूर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बापरे हे असं प्रकरण असेल हे कधी उमगलेच नाही

गॉडजिला
Mon, 05/17/2021 - 15:19 नवीन
आपल्यामुळे फार मोठ्या मोहाच्या विषापासुन माझा बचाव झाला आहे. तुम्हाला माझ्याकडून एक वोडका मार्टीनी फ्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी तरी हिंदी चित्रपट बघणे

पिनाक
Mon, 05/17/2021 - 12:17 नवीन
मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...
मी फक्त साऊथ चे डब पिक्चर बघतो. जेंटलमन नंबर 1, पुलीसवाला गुंडा, आज का सिंघम वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मद्रासी सिनेमात काही सीन्स मस्तच असतात ....

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 12:37 नवीन
Heart operation https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MU ------- Banana fighting https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xeg -------- Cigarette Accupressute Technology https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63c ------ ही माझी सगळ्यात आवडती फाईट https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

ही माझी सगळ्यात आवडती फाईट

गॉडजिला
Mon, 05/17/2021 - 15:39 नवीन
ही माझी सगळ्यात आवडती फाईट https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZM अफलातुन कॅम्रा वर्क. पिन ड्रॉप सयलेंन्स, कसलेही पार्श्वसंगीत नाही (एकुण प्रकरण डावखुरे वाटु शकते) अन सोनेपे सुहागा म्हणजे संपुर्ण फाइट सिक्वेंसमधे पाळलेले सोशल डिस्टेंसिंग..... अफलातुन कलाकृती. Cigarette Accupressute Technology https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63c काय ट्रीपी पार्श्वसंगीत आहे... सुरेख. संपुर्ण सिन मात्र चुकवु नये असाच. Banana fighting https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xeg कट्टाकरुन घरी परतल्यावर हा सिन बघणे फार धोकादायक. Heart operation https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MU दिज स्टंट परफॉर्म्ड बाय प्रोफेशनल्स, डाँट ट्राय इट अ‍ॅट होम ही त्यांची पाटी फारच बोलकी आहे... मुवीजी आपण म्हणजे खरोखर कहर आहात.... _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मद्रासी नाही हो :(

उपयोजक
Mon, 05/17/2021 - 18:31 नवीन
कन्नड,तमिळ,तेलुगू,मल्याळम या चार दक्षिण भारतीय भाषा आहेत. तमिळ तेलुगूमधे अॅक्शन मुव्हीज जास्त असतात. कन्नड गरीब वर्गाला नजरेसमोर ठेवून बनवलेले जरा लो बजेट असतात. मल्याळम कथा,पटकथा,दिग्दर्शन याबाबत चारही भाषांमधे दर्जेदार असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तेलुगू

गॉडजिला
Mon, 05/17/2021 - 20:33 नवीन
तेलुगू प्रामुख्याने धमाल गाणी, नृत्य, अवास्तव पण तांत्रीक सफाइदार फाइट सिन्स तमिळ अंगावर येणारा इमोशनल अत्याचार, मारधाड अन एकदंम मातीचा फिल.. बरेचदा नको इतका. डावं सोडता ही येत नाही अशी पंचायत असलेले प्रकरण, पण अत्यंत प्रयोगशील. कन्नड सायफाय, डायनोसोर, सोन्याची खाण, म्युजिकल मर्डर मिस्ट्री... आता इंडस्ट्री कात टाकत आहे, चांगले प्रयोग होत आहेत. मल्याळम प्रामुख्याने लो बजेट पण कथा,पटकथा,दिग्दर्शन, अभिनय याकडे विषेश लक्ष .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

.

कॉमी
Mon, 05/17/2021 - 19:24 नवीन
ह्यातले ऑपरेशन, केळे फाईट, सिगरेट हे सिन हृदये कळेयम या spoof किंवा थट्टेखोर सिनेमातले आहेत. ते गंभीर प्रसंग म्हणून चित्रित नाही झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नका ना बघू

उपयोजक
Mon, 05/17/2021 - 18:27 नवीन
ते डबडे तेलुगू सिनेमे. उत्साह वाढतो मग त्यांचा. फिजिक्स गपचुप कोपर्‍यात उभं राहून स्वत:ची होणारी लक्तरं पाहत असतं तेलुगू सिनेमात. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

राजीव सातव यांच्यावर शासकीय

रात्रीचे चांदणे
Mon, 05/17/2021 - 15:07 नवीन
राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमात अत्यसंस्कार; १५ ते २० हजार लोकांची गर्दी https://react.etvbharat.com/marathi/maharashtra/state/hingoli/congress-mp-rajeev-satav-funeral-at-hingoli-kalamnuri-village/mh20210517135307449 राज्यातील आमदार खासदारांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के. एच. पाटील, महुसल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, पूनर्वसन व मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सतेज पाटील, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार माधवराव जवळगावकर,आमदार राजू नवघरे, आमदार आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाऊ पाटील, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास, सत्यजित तांबे, अमर खानापुरे, गुजरात युवक काँग्रेसचे मानसिंग डोड्या, श्री संपत कुमार, नीरज कुंडल, यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
  • Log in or register to post comments

साध्वी प्रज्ञा

कॉमी
Mon, 05/17/2021 - 16:26 नवीन
साध्वी प्रज्ञा म्हणतात, मी रोज गोमूत्र पिते त्यामुळे मला कोव्हिड झाला नाही. ह्याला म्हणतात जबाबदारीने बोलणे.
  • Log in or register to post comments

'करोनामध्ये मंदिरे बंद आहेत.

श्रीगुरुजी
Mon, 05/17/2021 - 20:16 नवीन
'करोनामध्ये मंदिरे बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही. स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून हे उपास-तापास बंद करा. रोज ४ अंडी खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त पदार्थ भरपूर खा’, असा सल्ला बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू समाजबांधवांना दिला असून या सल्ल्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवरून आक्षेप नोंदवला. या चर्चेतही गायकवाड आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. मुस्लिम समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लिम समाजात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मांसाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून हिंदूंमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे, या वक्तव्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करायला हवी, असे सांगितले असता त्यांनी त्यास नकार दिला, असे शेटे यांनी सांगितले. https://maharashtratimes.com/maharashtra/buldana/dont-fast-in-corona-eat-eggs-and-chicken-sanjay-gaikwad/articleshow/82579215.cms कोरोनासंसर्ग न होण्यासाठी कोणी गोमूत्र पितात तर कोणी कोंबड्या-अंडी चेपतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

Uttarakhand Congress leader

श्रीगुरुजी
Mon, 05/17/2021 - 20:42 नवीन
Uttarakhand Congress leader says ‘corona sent by Lord Krishna’. “Both Corona and Krishna starts with the sound of ‘K’. Hence it’s obvious that the coronavirus has been sent by him in this world,” Uttarakhand Congress vice-president Suryakant Dhasmana reportedly said. ह्याला म्हणतात जबाबदारीने बोलणे. https://www.hindustantimes.com/india-news/uttarakhand-congress-leader-says-corona-sent-by-lord-krishna-bjp-demands-apology-over-comparison/story-JWV7QCdJrGve5Q74b4uTlN.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

धन्यवाद.

कॉमी
Mon, 05/17/2021 - 21:01 नवीन
हि मंडळी पण धन्य आहेत. यादीत डॉ. हर्षवर्धन यांना सुद्धा जागा मिळेल- कोरोनील, ह्या थापाड्या औषधाचे प्रमोशन करायला डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी जातीने उपस्थित होते. हे सुद्धा अत्यंत बेजबाबदार वागणे आहे. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/industry/healthcare/biotech/healthcare/ima-shocked-over-patanjalis-claim-on-coronil-demands-explanation-from-harsh-vardhan/amp_articleshow/81151092.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारतात वाचाळ नेत्यांची संख्या

श्रीगुरुजी
Mon, 05/17/2021 - 22:05 नवीन
भारतात वाचाळ नेत्यांची संख्या अतोनात आहे व असे नेते सर्व पक्षात आहेत. यांचं कधी हसू येतं, कधी चीड येते तर कधी कीव येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले;

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 17:46 नवीन
सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या ------- "Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या - Marathi News | CBI detains four leaders, including two ministers of Trinamool in Narada scam; Mamata banerjee also reached | Latest crime News at Lokmat.com" https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/crime/cbi-detains-four-leaders-including-two-ministers-trinamool-narada-scam-mamata-banerjee-also-reached-a607/amp/?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16212534721257&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcrime%2Fcbi-detains-four-leaders-including-two-ministers-trinamool-narada-scam-mamata-banerjee-also-reached-a607%2F --------------
  • Log in or register to post comments

Narada Scam

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 18:14 नवीन
https://www.google.com/amp/s/www.deshdoot.com/amp/story/political-news/tmc-leaders-arrested-in-narada-sting-case-mamata-banerjee-reaches-cbi-office
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही

कपिलमुनी
Mon, 05/17/2021 - 19:41 नवीन
गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही -खासदार प्रज्ञा ठाकूर
  • Log in or register to post comments

झाले पिऊन इथे...

नावातकायआहे
Mon, 05/17/2021 - 20:11 नवीन
https://misalpav.com/comment/reply/48782/1107967
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती : योगी

कपिलमुनी
Mon, 05/17/2021 - 19:42 नवीन
विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती निर्माण केलीय; योगी आदित्यनाथांचा आरोप
  • Log in or register to post comments

आपण त्यांचं घर उन्हात बांधू.

आग्या१९९०
Mon, 05/17/2021 - 19:58 नवीन
आपण त्यांचं घर उन्हात बांधू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

त्याच बांध तुझा बांध

कपिलमुनी
Mon, 05/17/2021 - 20:29 नवीन
त्याच उन्हात बांध तुझा उन्हात बांध ! सुखी रहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

त्यांचं म्हणजे विरोधी

आग्या१९९०
Mon, 05/17/2021 - 21:22 नवीन
त्यांचं म्हणजे विरोधी पक्षांचं हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

“…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,”

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 19:57 नवीन
“…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,” शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला इशारा.... https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-mla-shahaji-patil-over-ujani-dam-water-issue-maharashtra-government-sgy-87-2473181/lite/ धूसपूस चालू झाली...
  • Log in or register to post comments

चीनने पूर्ण ताकद लावली, अखेर अमेरिकाच इस्रायलसाठी मैदानात उतरली

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 20:35 नवीन
https://maharashtratimes.com/international/international-news/usa-blocks-unsc-statement-against-israel/articleshow/82707745.cms ---------- जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती...
  • Log in or register to post comments

सुधारणा

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/17/2021 - 20:57 नवीन
जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती...
मी पण जवाहरलाल नेहरूंचा पंखा वगैरे अजिबात नाही. मात्र या गोष्टीमध्ये नेहरूंना आणणे अनाठायी वाटते. शीतयुध्दाच्या काळात रशियाला काटशह द्यायला म्हणून अमेरिकेने चीनला मोठे केले किंवा चीनच्या महत्वाकांक्षेकडे/कारवायांकडे दुर्लक्ष केले. पण शीतयुध्द संपल्यावर मात्र चीनला वापरून झाल्यावर अमेरिकेने फेकून का दिले नसावे हे समजायला मार्ग नाही. जर रशियाला अफगाणिस्तानातून हाकलून दिल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील मुजाहिदींना वापरून झाल्यावर फेकून दिले असेल तर हेच १९९१ नंतर चीनबाबत करायला काय हरकत होती हे कळायला मार्ग नाही. अगदी १९९० मध्येही चीनी अर्थव्यवस्था भारतापेक्षा ३०-३५% नेच जास्त मोठी होती म्हणजे चीनला फेकून न देण्यामागे आर्थिक कारण तितके महत्वाचे असेल असे वाटत नाही. शीतयुध्द संपल्यावर वर्षसव्वावर्षात सत्तेत आलेल्या आणि पुढे आठ वर्षे सत्तेत असलेल्या बिल क्लिंटन यांची या प्रकारात जबाबदारी होती असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. क्लिंटन प्रशासनाने चीनला फेकून देणे दूरच राहिले तर त्यापूर्वीच्याच प्रशासनांची चीनचे लाड करायचे धोरण सुरू ठेवले. २००१ मध्ये बुशबाबा सत्तेत आले तेव्हा मात्र चीन बर्‍यापैकी मोठा झाला होता आणि तेव्हा चीनला फेकून देणे कितीतरी जास्त कठीण झाले होते. तेव्हा जवाहरलाल नेहरू बिल क्लिंटन यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती... अशी सुधारणा करायला हवी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

UNSC

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 21:48 नवीन
मध्ये भारताला सहभागी करून घेणार होते .... नेहरूंनी, भारताची जागा, चीनला दिली....वाचनांत तरी असेच आले होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

एक लिंक मिळाली ....

मुक्त विहारि
Mon, 05/17/2021 - 21:53 नवीन
https://www.thehindu.com/opinion/op-ed/nehru-china-and-the-security-council-seat/article26561751.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

समजत नाही

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/17/2021 - 21:59 नवीन
अमेरिका भारताला सुरक्षापरिषदेवर स्थायी सदस्यत्व देणार होती पण नेहरूंने ती ऑफर नाकारली हे नेहमी म्हटले जाते. या दाव्याच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही बाजूंनी लेख वाचले आहेत. एक गोष्ट कळत नाही. सुरक्षापरिषदेवर स्थायी सदस्यत्व म्हणजे काय खिरापत होती का अशी कोणालाही वाटायला? हे पाच स्थायी सदस्य कोण होते? तर दुसर्‍या महायुध्दात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढणारे देश. चिअँग कै शैक चीनमध्ये सत्तेत असताना चीनही दोस्त राष्ट्रांच्या बाजूने जपानविरूध्द लढत होता. चीनमध्ये यादवी युध्द झाले आणि माओने सत्ता काबीज केल्यावर चिअँग कै शैकला फॉर्मोसा (आताचे तैवान) मध्ये आश्रय घ्यावा लागला पण माओच्या चीनला अमेरिकेची मान्यता नव्हती तर तैवानमधील चीनचे सरकार हेच खरे चीनचे सरकार आहे (परागंदा सरकार) असे अमेरिकेचे म्हणणे होते. म्हणून सुरक्षापरिषदेवरील स्थायी सदस्यत्व त्या चीनला दिले गेले होते. नंतरच्या काळात रिचर्ड निक्सन चीनच्या भेटीला गेले आणि माओच्या चीनला अमेरिकेने मान्यता दिली. त्यानंतर तैवानमधल्या चीनची स्थायी सदस्यत्वाची जागा माओच्या चीनला देण्यात आली. या सगळ्यात भारत कुठे आला? त्यावेळी आपल्याला नक्की कोणत्या आधारावर व्हेटो पॉवरसह सुरक्षासमितीवर स्थायी सदस्यत्व दिले जाणार होते? आपण ना आर्थिक ताकद, ना लष्करी ताकद. १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपल्याच लोकांचे पोट भरायला जगापुढे वाडगा पुढे करायला लागायचा. अशा देशाला जगाने व्हेटो पॉवरसह स्थायी सदस्यत्व कोणी असेच देईल हे जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जवाहर लाल नेहरू यांचे आंतरराष्ट्रीय धोरण बघता आणि विशेषतः

मुक्त विहारि
Tue, 05/18/2021 - 05:04 नवीन
काश्मीरचा प्रश्र्न, युनो कडे नेण्याचा, निर्णय बघता, "जर, UNSCचे स्थाई सदस्यत्व भारताला देण्याची इच्छा, इतर देशांनी तयारी दाखवली असेल तरीही ती संधी जवाहर लाल नेहरू यांनी नाकारायची शक्यताच जास्त... दुसरे एक कारण असे की, जवाहरलाल नेहरू, संरक्षण दलातच कपात करू इच्छित होते... ह्या दोन्ही उदाहरणांवरून, जवाहरलाल नेहरूंनी, UNSCचे स्थाई सदस्यत्व नाकारायचीच शक्यता जास्त आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

शक्यता?

कपिलमुनी
Tue, 05/18/2021 - 08:51 नवीन
पुरावे अहेत का ? या नुसत्या थापा आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हॅ

कॉमी
Tue, 05/18/2021 - 09:32 नवीन
कैपण अपेक्षा तुमच्या. नेहरू म्हणलं कि व्हाट्सऍप बास, पुरावे वैगेरे लागत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा