Skip to main content

शेअरमार्केट ची बाराखडी... भाग ० : सुरुवात

लेखक गणेशा यांनी शनिवार, 20/03/2021 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे. गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता. -- शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो.. पण तुम्ही जर अभ्यास करुन यात उतरत असाल तर नक्कीच risk खुप कमी असते .. यात ढोबळ मनाने Long term आणि Short term ( positional) असे दोन भाग आहेत. Intraday आणि future - Options ( speculative ) हे विभाग अनुभवा नंतरच करावेत हे माझे म्हणणे आहे. शेअर मार्केट म्हणजे निर्णय क्षमता, patience , timing आणी consistency ह्यांचे अचुक मिश्रण होय. शेअर मार्केट कडे व्यवसाय म्हणुन बघितला गेला की slow and steady wins the race ही म्हण लागु पडते. कुठल्याही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन किंवा अभ्यास पुर्ण लक्ष दिले तर शेअर मार्केट मध्ये यशस्वी होता येते. शेअर मार्केट मध्ये बौधीक कष्ट असतात.. कुठे ही फक्त बातम्या आणि प्रलोभनांमुळे तुम्ही तात्पुरते पैसे कमवु शकता परंतु कायम आणि सातत्य दाखवुन तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आला तर नक्कीच तुम्ही यसस्वी होउ शकता. ज्यांना अभ्यास करायचा नसतो तेच लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी होतात. शेअर मार्केट मध्ये आपण आपले Target set करायचे.. Long term Target आणि Short term Target set केल्यावर त्या साठी लागणारा अभ्यास आपण करत जायचा.. महिन्याला आपण जे पैसे टाकु ते कश्या पद्धतीने गुंतवायचे , Short termसाठी काय काय गणिती साणि सांखिकी अभ्यास आपण करायचा ते आपण हळु हळु पुढे पाहु. आपला portfolio आपण बनवायचा. त्या साठी आपण किती वर्षासाठी किती रक्कम जमा करतोय हे सेट करुन त्या प्रमाणे महिन्याला त्या त्या कंपणीमध्ये पैसे टाकायचा निर्णय घ्यायचा, त्याच बरोबर दर महिन्याला आपण Long term (fundamental नुसार) आणि Short term (Technical नुसार) साठी investment करत असु तर आपल्या महिन्याच्या रक्कमेतुन त्याचे distribution करायचे. आता माझे २ उदा. देतो समजा मी असे ठरवले आहे, की माझे जे १५ वर्ष राहिलेले होम लोन मला ५-८ वर्षात पुर्ण करायचे आहे, किंवा मला लॉंग टर्म साठी काही पैसे पाहिजेत तर मी ते पैसे Fundamentally strong असलेल्या shares मध्ये टाकत जायचे. १२-१५ Fundamentally strong shares अभ्यासांती आपण वेगवेगळ्या sector मधुन घ्यायचे आणी आपल्या Long term Investment च्या फक्त 7-8 % एका कंपणीत टाकायचे. यालाच तुम्ही स्वताचा Personal mutual fund पण म्हणु शकता. या बरोबर , तुम्ही Short term Investment goal ठरवुन, उदा. मी माझ्या मुलीची पुढच्या वर्षीची फी जमा करण्यासाठी, माझा Term Insurance भरण्यासाठी Investment करत असेल तर Technical, graphs, indicators यांचा अभ्यास करुन त्यातुन कमी वेळेत पैसे निर्माण करायचे. या साठी वेगवेगळे portfolios बनवले तरी चालतील. १. या फोटो मध्ये, मी अर्धे अर्धे पैसे दोन्ही Long term आणि Short term विभागात टाकत आहे. १० लाख मी ८ वर्षात टाकेल असे धरले आहे.

२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे . profit/month हा graph दाखवत आहे. यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)

---- पुधील भागात आपण Share market fundamentals यावर भर देवु आणि नंतर Technical कडे जावु. क्रमशः अवांतर : तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे. technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय. (मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर) - गणेशा (IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-) )

वाचने 65745
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

मस्त सुरुवात

मस्त सुरुवात

बऱ्याच शंका आहेत हळू हळू विचारल्या जातील.

बरं झालं, उत्तम सुरुवात आभार. शक्यतो मराठीतच माहिती द्यावी असे सुचवतो. बाकी, तुम्ही जे ठरवाल ते मान्य. काही टीप वगैरे, आम्ही आमच्या फायदा आणि नुकसानीस जवाबदार असू या अटीवर तरीही चालेल. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (मार्केटवर लक्ष असलेला मिपाकर)

शेयरमध्ये अजिबात रस नाही ... पण, वाचणार नक्कीच ... भेंडी, राजकारणी लोक नसते तर, जनता खरेच सुखी झाली असती...

In reply to by मुक्त विहारि

शेयरमध्ये अजिबात रस नाही ...
वॉव...!थँक्यू व्हेरी मच. देवाचेही खूप खूप आभार. -दिलीप बिरुटे

&#128076


खूप छान धागा!! शुभेच्छा! शॉर्ट टर्म मी गेली अनेक वर्षे केले पण गेल्या एक वर्षात मी इंट्राडे मध्ये उतरलो. एक वर्षात असे लक्षात आले की मी वर्षानुवर्षे इंट्राडे करण्याची संधी घालवली. पण देर आये दुरुस्त आये! आपल्या धाग्यावर जमेल तसे अनुभव टाकेन, आपली हरकत नसल्यास!

कृपया मध्येच बंद करु नका किंवा शक्यतो मोठे गॅप टाकू नका ही नम्र विनंती. पुढील लेखनासाठी शुभेच्छा _/\_

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.. बिटाकाका, नक्कीच उलट तुमचे अनुभव लिहा.. आवडेल. Intraday मी करत नाहीये अजून, शिकणे जास्त महत्वाचे, त्यानंतर आपोआप सगळे सोप्पे वाटत असेलच. तुमच्या मुळे मला intraday च्या स्ट्रॅटेजी कळतील जे मी करत नाही अजूनही. Intraday ला time द्यावा लागतो हि आणखिन एक गोष्ट, आणि कंपनीचे काम बघुन (IT) स्वतःची कंपनीच्या मिटींग्स (जी नविन सुरु केलीये ) बघुन तो time देता येणार नसल्याने, आणि माझे उद्धीष्ट साध्य होत असल्याने ते नंतर निवांत करेल.. मास्टरमाईंड मोठे गॅप न टाकण्याचा प्रयत्न करतो, पण वेळेच्या कमतरते मुळे थोडे अवघड वाटतेय. हा भाग छोटा होता, पुढील भाग fundamental चा मोठा असेल.. शनिवारी रविवारी लिहीत राहील नक्क्कीच.. त्या आधी हि वेळ मिळाल्यास लिहिणारच.. माझी सुद्धा रिव्हिजन होतेय आणि. प्राध्यापक बिरुटे सर नक्कीच, धन्यवाद. टिप्स वगैरे नाही, पण पुर्ण सिरीज नंतर एक धागा रोजच्या विश्लेषणास काढणार आहे.. त्या आधी बेसिक पुर्ण करूयात राजेश जी नक्कीच विचारा, आवडेल. इतर सर्वांचे आभार... हे असे लिखान नक्की कसे आणि कुठून करायचे, काय काय कव्हर करायचे हे खरे तर अवघड काम आहे, कारण हा व्हास्ट विषय आहे.. पण थोडक्यात कळेल असे लिहिण्याचा प्रयत्न करतो..

In reply to by पिनाक

माझ्या मते अनुभवानुसार खालील कंपन्यांचे समभाग fundamentally strong असून कायमच उत्तम परतावा देतात. - Infosys, TCS, L & T, Reliance, Maruti Suzuki, Hero Motors, SBI यातील कोणत्याही ३-४ कंपन्यांच्या (जमल्यास सर्व कंपन्यांच्या) समभागाचा साठा करीत रहा. शक्यतो कधीही विकू नका. खूप भांडवली नफा मिळत असेल तर विकून नफा मिळवा आणि कालांतराने जेव्हा समभागाचा भाव कमी होईल तेव्हा परत विकत घ्या.

In reply to by पिनाक

श्री गुरुजी धन्यवाद.. @ पिनाक फंडामेन्टल धाग्यावर या बाबत जास्त चर्चा करता येइल .. लिहिण्याचे माणस आहे, परंतु मध्येच Fundamentals किंवा technical कोणी विचारले तर त्यावर चर्चा किंवा विचार येथेच वाढत जाइल ... तरीही Fundamental शेअर म्हणजे काय, कसे ओळखायचे हे त्या भागात हा प्रश्न जास्त योग्य पध्तीतेने सांगता येइल. तरीही सेक्टर प्रमाणे निवडायचे - उदा. Material (chemical) sector घेतला तर Asian paint आणि pidillite inida Fmcg - colgate pomolive, ITC, HUL, TATA Consumer IT : Infy, TCS Bank : HDFC bank AMC : HDFC AMC Digital : SBI cards Pharma: auro pharma, cipla असे शेअर्स असतील. त्या त्या क्षेत्रातील मोठ्या/मिड कॅप कंपण्या आणि त्यांचे पुर्ण विशेल्षण, इतर त्याच सेक्टर मधील कंपण्यांबरोबर त्यांचे Comparison असे महत्वाच्या गोष्टी आपण पुढे पाहुच. फक्त एकच, जास्त कंपण्या घ्यायच्या नाहीत १०-१५ कपंन्या घेतल्या की त्यांना व्यवस्थित ट्रॅक करता येते. मी माझा फंडामेंटल अभ्यास, २-३ महिने केला होता, तेंव्हाच ते शेअर्स घेतले. आणी तो अभ्यास करताना, इतर आनखिन कंपण्या ही चांगल्या वाटल्या किंवा युनिक होत्या त्या कंपण्या मी पोझिशनली म्हणुन माझ्याकडे १-२ महिन्या साठी घेत राहिलो .. उदा. (यात Small cap पण घेतो मी ) Biocon , hdfc life, HEG, BOB,SBI,Fed BANK, Marksans pharma Cement sector chyaa shreedigvijay cement ,ambuja cement तुम्ही एकदा अभ्यास सुरु केला की आपोआप पुढील अभ्यास होत राहतो.. आणि येथे आपण वयक्त्यिक अभ्यास यावर भर देवु. गुगल ओपन केले तरी अशी कोणते शेअर्स घ्यावे असे अनेक विडीओ समोर येतात, त्यामुळे तेच का हे शोधने महत्वाचे .. धन्यवाद.

In reply to by गणेशा

धन्यवाद. वरील पैकी काही शेअर्स माझ्याजवळ आहेत, पण ते अभ्यास न करता घेतलेले आहेत. वेळ मिळाला तर थोडे वाचन करून पाहीन.

टिप्स आणि ट्रिक नकोत फ़क्त अभ्यास कसा केलात एवढेच लिहा.

स्तुत्य उपक्रम आणि छान, माहितीपर धागा. माझ्या सारख्या शेअराडाणी व्यक्तीसाठी अति उपयुक्त ! मात्र धाग्याचे शीर्षक वाचून एक शंका - आता बाराखडी ऐवजी चौदाखडी आहे ना ? कारण अँ आणि ऑ चा मराठीमध्ये समावेश केला गेला. त्यामुळे bank हा शब्द मराठीत बँक असा लिहिता येतो हिंदी मध्ये मात्र तो बैंक असा (माझ्या मते चुकीचा) लिहिला जातो. उदाहरणार्थ (चौदाखडी) :- क का कि की कु कू के कै को कौ कं कः आणि कॅ कॉ (१३ व १४) अवांतराबद्दल क्षमस्व परंतु ह्या शंकेचे जाणकारांकडून निरसन व्हावे ह्यासाठी हा पंक्ती प्रपंच.

@ गणेशा, हा धागा/सिरीज मिपाच्या 'अर्थजगत' मध्ये शोभून दिसेल. वाचत आहे.

छान धागा. वाचते आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा

बालिश पण प्रश्न असेल तरी विचारतो. कारण शेअर बाजाराशी कधीच संबंध आला नाही पण सर्वच विषयात थोडी फार माहिती असावी म्हणून वाचत असतो. त्या मुळे इंडेक्स कसे ठरतात. शेअर म्हणजे काय,divident म्हणजे काय. पूर्ण शेअर मार्केट ची माहिती घेण्या पेक्षा आपल्या शी संबंधित शेअर वरच लक्ष असले पाहिजे. हे थोडेफार माहीत आहे. प्रश्न हा आहे. बाजाराच्या नियमा प्रमाणे ज्या वस्तू महाग असतात त्या वस्तू ल ग्राहक कमी असतात. आपण भाजी बाजारात गेलो तरी महाग भाज्या न घेता स्वस्त भाज्या घेतो. मग शेअर बाजारात ज्या कंपन्यांचे शेअर चे खूप जास्त आहेत ते कोण खरेदी करते. म्हणजे थोडक्यात मी घेतलेल्या शेअर चा भाव खूप वाढला तर मी तो कोणाला विकायचा? विकत घेणारा ग्राहक कोणी शोधायचा.? विकत घेणारा कोण नसेल तर भाव वाढून सुद्धा मला पैसे कसे मिळतील? आणि ह्या सर्व प्रश्न च एकच प्रश्न महाग शेअर झाले तर ग्राहक नसतील तरी त्याची वाढलेली किंमत आपल्याला कोण देते

In reply to by Rajesh188

किमती वरून कुठलाही शेअर महाग आणि स्वस्त ठरत नसतो,त्याचे निकष वेगळे असतात. किमतीने स्वस्त आहे म्हणून विकलाच जाईल ह्याची खात्री नसते. म्हणून शेअरची liqidity बघणे.

In reply to by Rajesh188

असे बघा, ज्या वस्तूला ग्राहक आहे त्याच वस्तूचे भाव जर जातात (निदान शेअर्स च्या बाबतीत तरी). त्यामुळे जर तुम्ही तुमचा शेअर वर गेला आहे असे गृहीत धरत असाल तर त्याचा अर्थ त्याला घ्यायला ग्राहक ही भरपूर आहेत असेही होते ना. ************** त्या वाढलेल्या किमतीला घेणारे ते लोक असतात जे त्या शेअर ची किंमत अजून वर जाणार आहे असे गृहीत धरून असतात. ते तसे का गृहीत धरतात याला निरनिराळी कारणे आणि त्यांचा अभ्यास कारणीभूत असू शकतात. ************* तुम्हाला ग्राहक शोधावा लागत नाही कारण तुम्ही विकणारे आणि अजून कुणीतरी घेणारे हे एकाच प्लॅटफॉर्म वर खरेदी विक्री करत असता. हा प्लँटफॉर्म प्रोव्हाईड करणारी संस्था म्हणजे एक्सचेंज. एक्सचेंज घेणाऱ्या आणि विकणाऱ्या लोकांच्या ऑर्डर्स मॅच करून execute करते. याव्यतिरिक्तही कस्टडीअन, क्लिअरिंग हाऊस, ब्रोकरेज हाउस अशा काही गोष्टींची या फेअर खरेदी विक्री मध्ये भूमिका असते. ************ *मुद्दाम इंग्रजी टर्म्स चा वापर करतोय म्हणजे त्या जास्त सोप्या पद्धतीने लक्षात येतील.

In reply to by बिटाकाका

माहिती बद्द्ल धन्यवाद म्हणजे विकत घेणारे जास्त म्हणून भाव जास्त हा शेअर मार्केट चा पाया आहे. मी कमतरता म्हणून भाव जास्त असे समजतं होतो.. हे तर समजलं. समजा शेअर विकायचा नाही फक्त divident वर च समाधान मानायचे तर . हा निर्णय योग्य असेल का.. आपण शेअर विकत घेणारी कंपनी निरंतर नफा कमवत असेल तर divident हक्का नी मिळतो की. Promotor share holder ल किती divident द्यायचा हे ठरवतात?

In reply to by Rajesh188

डिव्हिडंड वर समाधान मानायचे हा निर्णय योग्य की नाही हे तुमच्या ट्रेडिंग स्टॅटेजीवर ठरेल. म्हणजेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून काय आणि किती परतावा मिळावा याबद्दल तुमची जी अपेक्षा आहे त्यावर. उदा. तुम्ही ६ महिन्यांपूर्वी अबक कंपनीचा शेअर १०० रुपयाला एक असे १०० घेतले. त्याची आताची किंमत समजा १२५ रु. आहे तर तुम्ही २५०० रु. फायद्यात आहात( ब्रोकरेज आणि टॅक्सेस सध्या बाजूला ठेऊ). समजा अबक कंपनीने २ रु. प्रति शेअर डिव्हिडंड घोषित केला तर तुम्हाला २०० रु. फायदा होईल. आता असेही होऊ शकते की तो शेअर १२५ वरून पुढच्या सहा महिन्यात ११० ला येईल किंवा १३५ ला येईल. माझ्यामते इथे त्या शेअर चा अभ्यास कामाला येईल. त्यानुसार तुम्ही डिव्हिडंड घेत राहायचे की मूळ प्रॉफिट बुक करून घ्यायचा हे ठरेल. अर्थात प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज आणि अपेक्षित परतावा वेगवेगळा असून शकतो.

In reply to by Rajesh188

नुसता नफा पाहून चालत नाही. नफ्याचा पैसा पुन्हा कंपनीत गुंतवल्यास कंपनीला व्यवसाय करून किती परतावा मिळेल, आणि हा परतावा गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे की कमी हे पाहावे लागते. जर गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा नफा व्यवसायात गुंतवून येणारा परतावा जास्त असेल, तर डिव्हिडन्ट न देणे योग्य ठरते. कारण नफा वाटल्यापेक्षा गुंतवल्यास परतावा जास्त येऊन शेअर वधारेल. या उलट पुनःगुंतवणूक करून मिळणारा परतावा अपेक्षेपेक्षा कमी असल्यास डिव्हिडन्ट वाटणे योग्य. कारण परताव्यामुळे शेअर मूल्यात वाढ झाली ती गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा कमीच असणार.

सर्वांचे धन्यवाद. राजेश जी तुमचे प्रश्न चांगले आहेत, उलट devidend चा प्रश्न तर correct विचारला आहे.. ही लेखमाला अश्याच प्रश्नांसाठी आहे, जेणे करून बेसिक ज्ञान वाढेल आणि असे प्रश्न वेगवेगळ्या नजरेने उत्त्तरले जातील... मला थोडा टाइम द्या, आज रात्री उत्तरे देतो..

काही मुद्दे चांगले आहेत १. निवडक १०-१२ कंपन्यांचे समभाग ठेवावे, शक्यतो वेगवेगळ्या सेक्टरमधले(बँकिंग, आय टी,फार्मा,ऑटो,कन्झ्युमर) २. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोलसाठी वेगळे समभाग ठेवावे ३. मधे मधे समभाग खालच्या किमतीला विकत घेउन सरासरी खाली आणत राहणे अजुन वाचण्यास उत्सुक

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सहमत, आपले मुद्दा नं १ आणि ३ खूप महत्वाचे आहेत. मुद्दा नं ३ शॉर्ट टर्म गोल्स साठी विशेष महत्वाचा आहे.

प्रश्न : समजा शेअर विकायचा नाही फक्त Dividend वर च समाधान मानायचे तर . हा निर्णय योग्य असेल का.. आपण शेअर विकत घेणारी कंपनी निरंतर नफा कमवत असेल तर Dividend हक्का नी मिळतो की. Promoter share holder ल किती Dividend द्यायचा हे ठरवतात? -- > Dividend बद्दल प्रत्येकाची मते वेगळी असतात.. परंतु Fast growing company शक्यतो Dividend देत नसेल तर जास्त उत्तम असते. कारण Dividend हा profit चा हिस्सा असतो .. कंपणीच्या cash flow requirements साठी किंवा तो cash flow वाढण्यासाठी जर हे पैसे कंपणी वापरत असेल तर त्या कंपणीच्या Expansion activities साठी हा पैसा जास्त उपयोगी येऊन share holder ला भविष्यात जास्त फायदा मिळु शकतो.. थोडक्यात Dividend ऐवजी Rate of return on Equity हा जास्त लाभदायक असतो. आणि तो महत्वाचा. हा जर कंपणी Stable असेल आणि growth easily achieve होत असेल आणि surplus cash कंपणीकडे रहात असेल तर तीचा काही portion कंपणी Dividend म्हणुन देतात ( उदा. TCS) पण एकुणात, Fast growing economy मध्ये Dividend कंपणीच्या Cash flow , reinvestment आणि profit मध्ये dilution चे काम करतो. त्यामुळे Dividend वर समाधान मानण्यापेक्शा Rate of return on Equity जास्त महत्वाची. दुसरी गोष्ट .. ५००० च्या पुढील Dividend वरती वर्षाला आता(२०२० पासुन) सरकार १० % tax आकारत आहे, त्यामुळे त्या पेक्षा कधी ही Fast growing कंपणी आणि जी Cash flow व्यवस्थीत वापरते भले ती Dividend देत नसेल किंवा अत्यल्प Dividend देत असेल तरी त्या कंपणीत investment करणे कधी ही फायद्याचे . (tax साठी नंतर वेगळा धागा काढणार आहे मी)

In reply to by गणेशा

दुसरी गोष्ट .. ५००० च्या पुढील Dividend वरती वर्षाला आता(२०२० पासुन) सरकार १० % tax आकारत आहे, आता संपूर्ण लाभांश करपात्र आहे. लामांश एकूण करपात्र उत्पन्नात मिळवून त्या एकूण रकमेवर tax slab नुसार कर आकारणी होईल. ५००० पेक्षा जास्त लाभांश असेल तर उद्गम करकपात होईल.

In reply to by श्रीगुरुजी

आता संपूर्ण लाभांश करपात्र आहे.
तसा पूर्वी पण लाभांश करपात्रच होता. पण त्यावेळी लाभांश देण्यापूर्वी कंपनी १५% डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स कापून उरलेला लाभांश शेअरधारकांना द्यायची. त्यामुळे आयकर भरताना मिळालेल्या लाभांशावर कर भरावा लागायचा नाही. त्यातून व्हायचे असे की मोठ्या कंपन्यांचे प्रोमोटर्स वगैरेंना कमी कर भरायचा लागायचा. उदाहरणार्थ रिलायन्सच्या प्रोमोटर्सकडे कंपनीचे तब्बल ३३२ कोटी शेअर्स आहेत. त्यापैकी खुद्द मुकेश अंबानींकडे किती हे तपासून बघायला हवे पण तो आकडा पण कित्येक कोटींमध्ये जाणार हे नक्की. तेव्हा प्रति शेअर ६ रूपये प्रमाणे किमान हजारेक कोटी अंबानींना नुसत्या लाभांशातून मिळाले असतील. आयकरात तो लाभांश उत्पन्न म्हणून धरला तर त्यावर ३०% म्हणजे ३०० कोटी कर भरायला हवा पण डिडिटीप्रमाणे १५० कोटीच भरला जात होता. आता डिडिटी काढून टाकण्यात आला आहे आणि आयकर विवरणपत्र भरताना लाभांश हे पण उत्पन्न धरले जाऊन त्यावर कर भरणे अपेक्षित आहे. या बदलाचा ज्यांना लाभांशामधून घसघशीत उत्पन्न येते त्यांनाच त्रास होईल. इतरांना फार फरक पडणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इन्फोसिसने मागील काही वर्षांत दिलेला लाभांश - २०१६-१७: रू. २५.२५ २०१७-१८: रू. २७.७५ २०१८-१९: रू. ४१:५० २०१९-२०: रू. १८.५० २०२०-२१: रू. २१:५० साधारणपणे २०१७-१८ पर्यंत गुंतवणुकदारांना संपूर्ण करमुक्त लाभांश मिळायचा. आता तुलनेने कमी टक्के लाभांश मिळतो व संपूर्ण लाभांश करपात्र आहे.

In reply to by गणेशा

लाभांश हा शेअरच्या दर्शनी मुल्यावर मिळतो , बाजारातील त्या शेअरच्या किंमतीवर नाही. त्यामुळे प्रत्यक्षात परतावा कमीही मिळू शकतो. फायदा एकच म्हणता येईल की शेअर न विकता हातात लाभांशरूपी रक्कम मिळते. लाभांश वाटल्यावर त्या शेअरचा भाव पूर्व लाभांश इतका होतो.

मग शेअर बाजारात ज्या कंपन्यांचे शेअर चे खूप जास्त आहेत ते कोण खरेदी करते. याच्या उत्तरासाठी मी एक Case study सांगतो :- समजा मी एक साधा व्यवसाय टाकला, आपण असे समजु की मी पेन्सिल बनवण्याचा व्यवसाय टाकला. नंतर मला नफा व्हायला लागला, तर मला असे वाटते की मला माझा Business वाढवण्यास भांडवल लागेल जेणे करुन मी दुकान्/कंपणी टाकुन जास्त प्रमाणात विक्री करुन जास्त नफा कमवेल. मग मी Entity निर्माण करतो , तुम्ही याला कंपणी पण म्हणु शकता. माझ्याकडे दोन रस्ते आहेत, पहिला लोन घ्यायचे, पण यात रिस्क आहे, जर माझा व्यवसाय निट चालला नाही तर मला त्या कर्जाचे हप्ते तर नियमित फेडावे लागेलच. आणी यात मुद्दल बरोबर व्याज पण जाईलच. दुसरा मार्ग समजा मी माझ्या काही मित्रांना सांगितले की माझ्या व्यवसायात येव्हडा profit होतो आहे तर तुम्ही पैसे गुंतवत असाल तर मी तुम्हाला भागिदार (partner ) करुन घेतो. त्या बद्दल तेव्हड्या हिस्स्याचा नफा तुमचा. यात मला व्याज ही जात नाही आणि मुद्दल हि परत द्यावी लागत नाही. यात जे मित्र म्हणजे भागिधारक जे आहेत, ते म्हणजे share holder/भागिदारक. आता समजा मी १० रुपये face value ने shares allot केले ( through IPO) आणि माझ्या कंपणीचा व्यवसाय, त्याच्या पुढील ऑर्डर्स, माझे balance sheet असे पाहुन जास्त लोकाना हे allot झालेले shares पाहिजे असतील तर ते जास्त भावाने ते विकत घेतात. म्हणजे १० रुपये भाव असेल तर ११ रुपयांनी घेतील, मग काही अजुन जास्त .. अशी त्या shares ची किंमत वाढत जाते, shares ची quantity हि ठराविक असते, त्यामुळे Seller असले तरच buyer buy करु शकतात. त्यामुळे जास्त buyer असल्यास share price वाढत जाते. जास्त Seller असल्यास share price कमी होत जाते. त्यामुळे जास्त भाव म्हणजे खरीददार नाही असे होणार नाही. उलट बर्याचदा चांगली कंपणी तीचा चांगला Cash flow तीच्या ऑर्डर्स या पाहुन तीचा भाव वाढत जातो. (मला वाटते नंतर share market basics असा एक धागा काढुन असे प्रश्नांची उत्तरे एकत्र टाकता येतिल ) - गणेशा

प्रश्नाची उत्तर मिळाली,काही शंका दूर होत आहेत. धन्यवाद

लेख आणि प्रतिसाद, दोन्ही मस्तच ....

उत्तम धागा काढला आहेत आणि डिव्हर्सिफिकेशन वैगैरे छान मुद्दे आहेत आता तुम्हाला लवकरच उप धागे काढावे लागतील असे दिसतंय म्हणजे - मूळ ( फंडामेंटल) - तांत्रिक ( चार्ट ) - डेरीवेटीव्ह ( फुचर ऑप्शन ) एक दोन प्रश्न होते - हि गुंतवणूक जी माध्यम किंवा दीर्घ काळाची जी आहे ती डिलिव्हरी करता असे दिसतंय तर ते आपण मार्जिन लोन घेऊन करता कि फक्त स्वतःचे भांडवलवर ? ( भारतात मार्जिन लोन ला काय म्हणतात ते माहित नाही पण उदाहरण द्यायचे तर अमेरिकेत १:१ या प्रमाणात ( टी ५०) लोन मिळते इतर देशात १:३ या प्रमाणात - आपल्या अनुभवात कधी पूर्ण मंदी अनुभवली आहे काय? म्हणजे संपूर्ण बाजारच खाली गेलाय किंवा सामुर्ण बाजार नसला तरी एखादी कंपनी चा समभाग फारच खाली जाऊ लागलं तर % स्टॉप लॉस वार्ता का? % - मंदीचं काळात भारतीय बाजारात फायदा करण्यासाठी डिलिव्हरी मध्ये समभाग शॉर्ट ( आधी विकणे मग घेणे) हे करता येत नाही .. त्यामुळे दीर्घ काळ मंदी असेल तर काय कराल? अर्हताःत हे खरे आहे का कि जरी डिलिव्हरी मध्ये समभाग शॉर्ट करीत येत नसले तरी दिवसाचं ट्रेडिंग मध्ये करता येतात? - पोर्टफोलिओ मार्जिन हा प्रकार भारतात आहे का?

In reply to by चौकस२१२

पोर्टफोलिओ मार्जिन हा प्रकार भारतात आहे का?
शेअर्स प्लेज करून त्यावर तुम्हाला मार्जिन मिळू शकते. डिलिवरी घेत असाल तर ते पैसे भरण्यासाठी थोडा अवधी जास्त मिळतो एवढेच. बाकी प्लेज करणे किती फायद्याचे ते प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीवर ठरते.
आपल्या अनुभवात कधी पूर्ण मंदी अनुभवली आहे काय? म्हणजे संपूर्ण बाजारच खाली गेलाय किंवा सामुर्ण बाजार नसला तरी एखादी कंपनी चा समभाग फारच खाली जाऊ लागलं तर % स्टॉप लॉस वार्ता का?
मागच्याच वर्षी करोनामुळे आलेली मंदी अनुभवलीये. पैसा काढून घेणार असाल तर स्टॉप लॉस लावणं योग्यच. लाँगटर्म साठी खरंतर मंदी ही गुंतवणुकीची उत्तम संधी मानायला हवी, अर्थात् ज्या कंपनीत पैसे गुंतवणार ती त्या लायकीची असली पाहिजे!

आपण म्हणताय ते झाले मार्जिन लोन मी म्हणतोय ते पोर्टफोलिओ माजींन फरक असा कि पोरफोलिओ मार्गी मध्ये जर एखादा लॉन्ग अँड शॉर्ट दोन्ही असेल तर त्याचाच मार्जिन ला फायदा होतो... असो या धाग्यात वाढवत नाही कारण लेखक शॉर्ट करीत नाही आणि भारतात प्रत्यक्ष शेअर शॉर्ट करणे शक्य नाही

In reply to by चौकस२१२

माय बॅड. माझ्या समजण्यात गफलत झाली. मग तुम्ही म्हणताय त्याबद्दल मला माहिती नाही. :-)

छान लेख. वाचत आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत .....

एंजल,शेअरखान्,रेलिगेअर्,जिओजित वगैरे ब्रोकर वेगवेगळे मार्जिन देउ करतात, ज्यात आपल्याला खेळता येते. हे म्हणजे शॉर्ट टर्म लोनच समजा. त्यांच्या पैशावर आपण खेळायचे आणि व्यवहाराअंती घेतलेले मुद्दल परत करुन झालेला नफा/तोटा काढुन घ्यायचा. किंबहुना कोण ब्रोकर किती मार्जिन देतो आणि किती ब्रोकरेज घेतो यावर त्यांची लोकप्रियता ठरते. अगदी ५ पैसा.कॉम किवा झिरोधावर मनापासुन प्रेम करणारे खुप बघितलेत. हे झाले ट्रेडींग. पण ईंट्रा डे, फ्युचर ऑप्शन्स,कमॉडिटी वगैरे मध्ये खेळणार असाल तर रोज डोळ्यात तेल घालुन बसायला हवे. तेव्हढा वेळ (आणि ऐपत) नसल्याने मी त्या भानगडीत पडत नाही. मात्र निवडक १०-१२ समभाग जमवत राहणे, त्यावर सतत लक्ष ठेवणे, अधे मधे थोडा नफा वसुल करणे किवा विकत घेउन अ‍ॅव्हरेजिंग करत राहणे ईतपत करतो. पण ईतकाही धोका पत्करायचा नसेल तर म्युचुअल फंड्स,पी पी एफ झिंदाबाद.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Mutual funds,चा अनुभव नाही... सामान्य माणूस असल्याने, धोपट मार्ग न सोडणेच उत्तम..

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मी देखील हेच करतो. डे ट्रेडींग, फ्यूचर-ऑप्शन्स, कमोडिटी मधे खूपच जास्त अभ्यास आणि सतत लक्ष ठेवावे लागेल जे सध्या तरी शक्य नाहीये. म्युच्युअल फंड एक चांगला प्रकार आहे, पण त्यात डायरेक्ट फंड्स मधे गुंतवणूक करणं श्रेयस्कर पडतं असा अनुभव आहे. बाकी पीपीएफ, एनपीस, सोव्हेरीअन गोल्ड बॉण्ड्स छानच. वेगवेगळ्या बास्केट्स कधीही चांगल्याच. :-)

आपण मार्जिन लोन घेऊन करता कि फक्त स्वतःचे भांडवलवर ? - आपल्या अनुभवात कधी पूर्ण मंदी अनुभवली आहे काय? म्हणजे संपूर्ण बाजारच खाली गेलाय किंवा सामुर्ण बाजार नसला तरी एखादी कंपनी चा समभाग फारच खाली जाऊ लागलं तर % स्टॉप लॉस वापरता का? % त्यामुळे दीर्घ काळ मंदी असेल तर काय कराल? @ चौकस जी, प्रश्न जरी मार्जीन आणि मंदी बद्दल असले तरी थोडे विस्तृत लिहितो - मंदी खरे तर तुम्ही Short term आणि long term असे वेगवेगळे Portfolio बनवत असाल तर तुमच्या Strategies एकाच वेळेस या दोन्ही प्रकारतील shares साठी वेगळ्या असतील उदा. अ. जेंव्हा तुम्ही ५ - ८ वर्षाचा विचार करुन कुठले shares घेतले असतील तर त्याचा fundamental base हा उत्कृष्टच असला पाहिजे .. ते अभ्यासा व्यतिरिक्त फक्त बोली माहितीवर ऐकुन घेतलेले shares नसावेच नसावे. तर अश्या वेळेस मंदी आपल्याला खरेदीची उत्कृष्ट संधी देते.. तुमच्या कडे असलेले shares हे तुम्ही त्याच्या deep ला खरेदी केले पाहिजेत. त्यामुळे "मंदी म्हणजेच संधी" तरीही माणुस चुकू शकतो असे मान्य केले तर fundamental Portfolio बनवताना तुम्ही तुमच्यकडे असलेल्या एकुन भांडवलाच्या फक्त ७-८ % रक्कमच एका share मध्ये गुंतवली पाहिजे. जेणे करुन चुकुन तुमचा अभ्यास चुकीचा ठरला(शक्यता कमी असते ) किंवा कंपणी बंद झाली तरी तुमच्या एकुन भांडवलाचे फक्त ७-८ % च धोक्यात आलेले असतात. याचे माझ्या पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या चुकीच्या share चे उदा देतो. तो का आहे ते. माझ्याकडे १० shares तीन महिने अभ्यास करुन घेतले होते, आणि करोना चे रुप पाहता मला वाटले पुढील काळात Credit cards/online business यांचीच चलती राहिल ते दिसतेय. म्हणुन मी SBI cards हा share समविष्ट केला. पण मला Telecom domain वाढेल असे पण वाटले. मग असलेल्या तीन कंपणीतुन मी reliance/Idea/ Airtel या मध्ये लक्ष घातले. मी जरी अभ्यासांती निर्णय घेत असलो तरी सारासार विचार करता भारतात फक्त तीन कंपणी आहेत त्यामुळे Idea बंद पडणार नाही अशी माझी खात्री झाली. सोबत माझा राजकीय अभ्यास असल्याने मी प्रथमच कर्जबाजारी असलेली Idea माझ्या long term portfolio मध्ये अ‍ॅड केली. हा तसा चुकीचा निर्णय ठरु शकत होता. असे खरे तर केले नव्हते पाहिजे. मग मी reliance १००० रुपयाला माझ्या portfolio ला अ‍ॅड केले, कारण जर Idea बंद पडली तर याचा फायदा reliance ला होईल. आणी Airtel Short term ला technical पध्दतीने घेत आणि विकत राहिलो. आता आपण समजु, मंदी आली किंवा इतर कारणाने idea बंद पडली, तर मी तीचे ३ रुपयाने ४००० shares घेतले आहेत, माझ्या long term portfolio च्या १० %. म्हणजे ते पैसे पुर्ण बुडले नाही तरी बुडतील असे धरले. त्यावेळेस reliance २२०० रुपये झालेला आहे, त्यामुळे त्यात गुंतवलेले १० हजार मला १२००० परत देतायेत. आणि प्रत्येक deep ला चांगले share घेताना मी १३०० ला १८०० ला हे अजुन घेतलेले आहेतच. पण आता Idea ने तग धरलाय आणि प्रत्येक १० रुपये वाढीला मला ४०००० रुपये मिळत आहेत. आणि reliance चे आता माझ्याकडे १५ share झालेत. त्यामुळे कधी कधी मंदीत असा एखादा चुकीचा शरे त्रास देवु शकतो , तर त्याची सोय व्यव्स्थीत केलेली असावी, आणि त्यात गुंतवलेले भांडवल हे योग्य प्रमाणात हवेच. उगाच तो share उद्या १३ ला जाईल म्हणुन लाखो रुपये एकाच share मध्ये टाकु नये. म्हणजे जास्त तोटा होणार नाही. पण ८ वर्षात चुकुन Idea १०० रुपये गेला तर तो मला ४ लाख देइल हे नक्की. पण ही Pure risk आहे, पण एखादा असा share आपल्या portfolio मध्ये असला तरी चालतो अपवाद म्हणुन. पण हा share fundamental criteria fulfil करत नसल्याने मी recommend करत नाहीये. फक्त असा long term portfolio मधील share बद्दल काय होउ शकते ते लिहिले आहे. बाकी चांगले share अ‍ॅडच करावेत. ब. Short term portfolio मध्ये मात्र या उलट राहते. तुम्ही ग्राफ प्रमाणे अभ्यास करता ( नंतरच्या भागात विस्तृत सांगेलच), आणि प्रत्येक analysis हे पुर्ण बरोबर कधीच नसते , त्यामुळे तुम्ही strict stop loss लावलेला हवाच. ( तरीही ऑक्टोबर पासुन माझे १०० % technical बरोबर आले आहे, पण त्या आधी २० % जे चुकले होते ते shares मी लॉस मध्ये काढलेले होते. मी या साठी GTT चा वापर जास्त करतो.

मला वाटते मार्जिन हे भारतात max to max T5 दिवसा करता मिळते, पण माझे म्हणणे मी थोडे विस्तृत मांडतो.. share market मध्ये येणारा सामान्य माणुस असेल तर त्याने स्वताचे भांडवल वापरावे हे कधी हि योग्य राहते, कारण ब्रोकर चे margin वापरत असाल तर तुम्हाला फायदा जसा जास्त होतो तसा तुमचे खुप मोठे नुकसान हि होउच शकते. मी स्वता short/intraday/options करत नसल्याने यात जास्त खोल गेलो नाही. परंतु यात भविष्यात मी जाईल. पण त्या आधी मी ठरवलेले आहे, माझ्याकडे ४ वर्षे अनुभव हवा, माझ्याकडे पैसा हवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्याकडे वेळ हवा.. त्यामुळे ह्या प्रश्नाचे मी व्यवस्थीत उत्तर देवु शकत नाहिये .. परंतु, याबरोबरच Investment बद्दल मी काही बेसिक मुद्दे मांडतो . ( मला खरेच वाटते आहे Share market basics असा धागा काढलाच पाहिजे) Diversification हे Investment चे main सुत्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमची गुंतवणुक नेहमी diversified ठेवली पाहिजे असे माझे मत आहे. त्यामुळे मंदी, Sectorial मंदी आणि इतर वेळेस तुम्ही त्यातुन सावरु शकता ) उदा. तुम्ही तुमच्या गुंतवणीकाचा काही भाग हा बँकेत ठेवावा. ( जर Emergency म्हणुन लागले तर) काही पैसे Mutual funds मध्ये आणि काही पैसे gold किंवा bond मध्ये गुंतवले पाहिजे. जर तुम्ही यातले काही केले नसेल तर तुम्ही share market मध्ये येवु नये असे माझे स्पष्ट मत आहे. (वयक्तीक रीत्या मी स्वता २० जानेवारी २०१८( मुलीचा वाढदिवस) पासुन जेंव्हा मी मार्केट मध्ये येण्याचे ठरवले तेंव्हा पासुन Mutual funds आणि gold मध्ये पैसे गुंतवत आहे, आणि ते फक्त मुलीच्या लग्न आणि higher education शिवाय मी काढणार नाही आणि नंतर २०२० ला मी मार्केट मध्ये आलोय).

In reply to by गणेशा

मार्जिन च्या बाबतीत माझे मत थोडे निराळे आहे. माझ्यामते मार्जिन हे आपल्यासारखे गुंतवणूकदार आणि ब्रोकरेज हाऊस दोघांसाठी विन-विन परिस्थिती आहे. मी इन्ट्राडे आणि शॉर्ट टर्म दोन्ही साठी मार्जिन सोय वापरतो. अर्थात, बहुतेक ब्रोकरेज हाउसेस मार्जिन हे जास्तीत जास्त एक वर्षासाठी देत असल्याने लॉंग टर्म साठी फायदा नाहीये. पण स्वतःची विकत घेण्याची क्षमता (buying power) वाढवण्यासाठी मला वाटतं मार्जिन पेक्षा दुसरा चांगला मार्ग नाहीये. ********** एक उदाहरणासह पाहू. समजा माझ्याकडे ३५ हजार रुपये आहेत. माझ्या अभ्यासाने मी अबक कंपनीचा शेअर घेण्याचे ठरवले आहे ज्याची किंमत ५०० रु. आहे. माझ्या अभ्यासानुसार हा शेअर पुढच्या २ महिन्यांत १५ ते २० टक्के चढणार आहे. आता माझ्याकडे असलेल्या ३५००० रुपयांमध्ये मी या कंपनीचे साधारण ७० शेअर घेऊ शकेन. पण तेच मी मार्जिन सोय वापरली तर माझी घेण्याची क्षमता वाढेल. बहुतेक सगळे मोठे ब्रोकरेज हाऊसेस साधारणपणे ५०% ते ६५% मार्जिन देतात. हे मार्जिन प्रत्येक शेअर नुसार वेगवेगळे असू शकते (ब्रोकरेज हाऊसच्या त्या शेअर च्या रिस्क ऍनालिसिस नुसार). समजा आपला शेअर चांगला आहे आणि ब्रोकरेज हाऊस त्या शेअर साठी ६५% मार्जिन देते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही समजा १ लाखाचे शेअर्स घेतले तर तुम्हाला फक्त ३५ हजार भरायचे आहेत आणि ब्रोकरेज हाऊस ६५ हजार भरेल. आता माझ्याकडे असलेल्या त्याच ३५ हजारांमध्ये मला १ लाखांचे म्हणजेच २०० शेअर्स घेता येतील. समजा तो शेअर खरेच २०% (५०० रु. वरून ६०० रु. ला) चढला तर मला आधी १००x ७०=७००० रु. नफा घेता आला असता तोच मार्जिन मूळे १००x२००=२०००० रु. होईल. आता यात ब्रोकरेज हाऊस चा काय फायदा? तर माझ्यामते त्यांचा दुहेरी फायदा आहे. १. ते तुम्हाला दिलेल्या मार्जिन वर १० ते १३% व्याज आकारतात. वरील उदाहरणामध्ये मी त्यांचे पैसे समजा दोन महिने (शॉर्ट टर्म) वापरले, तर मला साधारणपणे १५०० रु. इंटरेस्ट द्यावा लागेल. म्हणजेच माझा नफा २००००-१५००=१८५०० रु. असेल. म्हणजेच थोडक्यात मी १५००रु. चा धोका पत्करून नफा ७०००रु. वरून १८५०० ला नेण्याची संधी निर्माण केली. २. ब्रोकरेज हाऊसेस चा दुसरा फायदा म्हणजे त्यांचे ब्रोकरेज कमिशन. माझी विकत घेण्याची शक्ती वाढवून ते त्यांची जास्त कमिशन मिळण्याची संधी निर्माण करतात. ********* माझ्या मते बहुतेक सगळीच ब्रोकरेज हाउसेस इंट्राडे साठी मार्जिन सोय घ्यायलाच लावतात. मी तरी इंट्राडे कॅश मोड मध्ये कधी केलेले नाही.

In reply to by बिटाकाका

बिटाकाका, तुम्ही एकदम चांगले समजुन सांगितले आहे, आणि मला एक वर्षासाठी मार्जिन मिळते हे माहिती नव्हते, खरे तर मी तसा प्रयत्न पण कधी केला नाही मार्जिन मिळवण्याचा त्यामुळे हि असेल.. पण तुम्ही यात चोख अभ्यास करून उतरताय हे लिहण्यावरून कळत आहे, पण जे नविन आहेत त्यांनी या पासून थोडे लांब रहावे असे मला वाटते... कारण याची दुसरी बाजू तितकीच जोखमीची आहे... उदा. जर तुम्ही घेतलेले २०० shares,१०० रुपयाने पडून ते ४०० रुपये झाले आणि stop loss hit झाला तर २०००० रुपये इतका तोटा तुम्हाला होईल, पण त्याच वेळेस ब्रोकर कडून घेतलेले ६५००० अधिक १५०० रुपये व्याज हि तुम्हाला द्यावेच लागेल. म्हणजे तुमच्या कडे असलेल्या ३५००० रक्कमेतून तुम्हाला तुम्हाला तोटा सहन करावा लागेल २१५०० रुपये. म्हणजे तुमच्याकडे राहतील (३५०००- २१५०० = १३५०० रुपये.) म्हणजे तोटा हि त्याच प्रमाणात सहन करावे लागेल. त्यामुळे नविन जे लोक मार्केट मध्ये येतील त्यांनी मार्जिन न वापरता आपला अनुभव वाढवून मग risk घेतली पाहिजे असे माझे वयक्तिक मत आहे.. तुमचे असेच अनुभव लिहीत रहा.. आवडला रिप्लाय...

In reply to by गणेशा

तुमच्या वरच्या उदाहरणातील दोन निसटत्या बाजू. १. जर मार्जिन वापरले नाही तर तुमचा तोटा ७० (कारण ३५ हजारात तेवढेच शेअर आले असते) x१०० = ७००० आणि मार्जिन वापरले तर तोटा २१५०० हे गृहीतक मार्जिन शी निगडित नाहीये तर तुमच्या त्या शेअर च्या अभ्यासाशी आणि तुम्ही त्या शेअर मध्ये किती रिस्क घ्यायची ठरवली आहे याच्याशी आहे. म्हणजेच जर तुम्ही तोटा कमी व्हावा म्हणून ७० quantity घेणार असाल तर तीही तुम्ही मार्जिन वापरूनच घेऊ शकता. म्हणजे तीच ७० quantity तुम्ही स्वतःचे १२५०० आणि ब्रोकरेज हाऊस चे २२५०० वापरून घेऊ शकता. म्हणजेच वरील उदाहरणात जर शेअर ४०० ला गेला तर तुम्हाला ७००० + २५० (व्याज) = ७२५० एवढा तोटा होईल. म्हणजेच तुम्ही २५० रुपयांची जास्तीची जोखीम घेऊन स्वतःचे ३५०००-१२५००= २२५०० रु. मोकळे केलेत जे तुम्ही इतर शेअर्स मध्ये डायव्हर्सिफिकेशन करू शकता. याउलट २५० रु. जोखमीत नफ्याची बाजू मी वरच्या प्रतिसादात सांगितली आहे. २. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे जेव्हा ब्रोकरेज हाऊसेस तुम्हाला लाखातले ६५ हजार देत आहेत तेव्हा ते तुम्हाला फक्त व्याज कमावण्यासाठी ओपन एंडेड लोन देत नाहीत तर तुमचे घेतलेले शेअर्स हे त्यांच्याकडे सेबीच्या नियमानुसार तारण ठेवतात. त्यामुळे एका लिमिटच्या वरचा तोटा होत असेल तर ते तुम्हाला तुमचे स्वतःचे मार्जिन वाढवण्याची सूचना करतात. जर तुम्हाला ते शेअर्स ठेवायचे असतील तर तुम्ही स्वतःचे मार्जिन वाढवून ठेऊ शकता नाहीतर मग ब्रोकरेज हाऊस ते स्वतःच विकून तुमचा पुढचा लॉस होण्यापासून वाचवतात. हे मी कदाचित नीट शब्दात इथे समजावू शकलो नसेन तर मी एक उदाहरण घेऊन नंतर विस्ताराने सांगू शकेन. फक्त सांगायचा मुद्दा हा आहे की उलट मार्जिन च्या केस मध्ये लॉस होत असेल तर तो शेअर काढायचा की ठेवायचा हा तुमच्या आणि ब्रोकरेज हाऊसच्या बाजूने महितीपूर्वक निर्णय (informed decision) असेल. त्यामुळे जास्त सेफ आहे असे मला वाटते. याशिवाय असा मार्जिन मध्ये घेतलेला शेअर कोणत्याही क्षणी ब्रोकरेज हाऊसचे पैसे भरून (वरील उदाहरणात २२५००) डिलिव्हरी मध्ये कन्व्हर्ट करता येतो. म्हणजे गरज वाटलेच तर तुम्ही तुमच्या मूळ ३५ हजारात ७० शेअर ह्या परिस्थितीला केव्हाही परत जाऊ शकता.

In reply to by बिटाकाका

धन्यवाद... हे खुप शिकण्यासारखे आहे, तुम्ही छान सांगितले आहे.. या संपूर्ण सिरीज चा मुळ उद्देश हा एकमेकांच्या अनुभवाने आपले ज्ञान वाढवणे हाच आहे.. धन्यवाद.. नक्कीच उपयुक्त माहिती..