✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)

श
श्रीगुरुजी यांनी
Sun, 03/14/2021 - 19:28  ·  लेख
लेख
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corporations-in-andhra-pradesh/articleshow/81496372.cms#_ga=2.225653400.363988111.1611478902-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52154 वाचन

💬 प्रतिसाद (163)

प्रतिक्रिया

नाही.. आत्ता नाही.

आनन्दा
Mon, 03/15/2021 - 19:04 नवीन
नाही.. आत्ता नाही. अजून ६ महिने थांबा प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बाटला हाऊस चकमक

चंद्रसूर्यकुमार
Mon, 03/15/2021 - 18:53 नवीन
२००८ च्या बाटला हाऊस चकमकीत पोलिस अधिकारी मोहनचंद्र शर्मा यांना ठार मारल्याप्रकरणी दिल्लीतील कोर्टाने आरिझ खानला देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. बाटला हाऊस चकमक झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणे रात्रभर तळमळत ढसढसा रडत होत्या. आपले युगपुरूष अरविंद केजरीवाल हे पण ही चकमक बोगस होती असे म्हणाले होते. आता या मंडळींची यावर प्रतिक्रिया काय असेल?
  • Log in or register to post comments

ममता बॅनर्जी

अनन्त अवधुत
Mon, 03/15/2021 - 20:23 नवीन
म्हणाल्या होत्या कि ही चकमक खरी असेल तर राजकारण सोडेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आता पुन्हा बांध फुटून

श्रीगुरुजी
Mon, 03/15/2021 - 21:40 नवीन
आता पुन्हा बांध फुटून अश्रूपात होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

चंद्रसूर्यकुमार
Mon, 03/15/2021 - 23:31 नवीन
सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. Image removed. सांगलीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून त्यांनी १९८६ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जनता पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणुक लढवली आणि जिंकली. ही पोटनिवडणुक माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे झाली होती. त्या पोटनिवडणुकीत संभाजी पवारांनी विष्णूअण्णा पाटील यांचा पराभव करून खळबळ उडवली. संभाजी पवार १९९० आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही जनता दलाचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. १९९५ मध्ये तर सांगलीशेजारच्या मिरज विधानसभा मतदारसंघातूनही जनता दलाचे प्रा.शरद पाटील यांनी विजय मिळवला होता आणि पूर्ण महाराष्ट्रातून अस्तंगत होणार्‍या जनता दलाचे दोन आमदार सांगली जिल्ह्यातून आले होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मी सांगलीत राहायला होतो. तेव्हा माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा सांगलीत आले होते आणि मतदारसंघात जनता दलाचे दोन आमदार असतानाही पक्षाचा लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार का नाही ही विचारणा त्यांनी स्थानिक नेत्यांकडे केली होती असे वाचल्याचे लक्षात आहे. संभाजी पवारांचा १९९९ मध्ये काँग्रेसच्या दिनकर पाटील यांनी पराभव केला. २००३ मध्ये संभाजी पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी पण सांगलीत आले होते. २००४ मध्ये संभाजी पवार भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढले पण विष्णूअण्णा पाटील यांचे चिरंजीव मदन पाटील यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवली आणि ते जिंकले. संभाजी पवार दुसर्‍या तर काँग्रेसचे १९९९ ते २००४ या काळातील आमदार दिनकर पाटील तिसर्‍या क्रमांकावर होते. २००९ मध्ये संभाजी पवारांनी २००४ च्या पराभवाची परतफेड केली. २००९ ची विधानसभा निवडणुक सांगलीत गणेशोत्सवादरम्यान अफजलखान वधाचे पोस्टर लावल्यामुळे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर झाली होती. त्यावेळी मदन पाटील काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यांचा संभाजी पवारांनी पराभव केला. तसेच शेजारच्या मिरजमधूनही भाजपचे उमेदवार म्हणून सुरेश खाडे निवडून आले होते. सांगली आणि मिरज मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपने २००९ मध्ये यश मिळवले. २०१४ मध्ये वाढत्या वयामुळे संभाजी पवारांनी निवडणुक लढवली नाही. सांगली भागात त्यांचे नाव बर्‍यापैकी आदराने घेतले जायचे हे मी बघितले होते. त्यांना श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

सचिन वाझे प्रकरणावरून किरीट सोमय्यांचा शरद पवारांना सवाल....

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 07:23 नवीन
https://www.loksatta.com/pune-news/kirit-somaiya-question-to-sharad-pawar-on-sachin-waze-case-said-msr-87-svk-88-2421483/ सामान्य लोकांनी, असामान्य लोकांसाठी, निवडून दिलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील.
  • Log in or register to post comments

सामान्य लोकांनी, असामान्य

सुबोध खरे
Tue, 03/16/2021 - 10:24 नवीन
सामान्य लोकांनी, असामान्य लोकांसाठी, निवडून दिलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील. असे नसून असामान्य लोकांचे, सामान्य लोकांनी निवडून न देताही मागच्या दाराने आलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ते पण आहेच म्हणा ...

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 10:47 नवीन
80% लोकांनी नाकारलेल्या पक्षाचे मुख्यमंत्री होऊ शकतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अजब लोकशाही ..

चौकटराजा
Wed, 03/17/2021 - 15:52 नवीन
अजब लोकशाहीचा किस्सा एकदा प्रमोद महाजन यानी एका चिनी अधिकार्‍याला सान्गितला होता. १८२ खासदार असलेला भाजपाचा प्रमोद महाजन विरोधी पक्षात तर रमाकान्त खलप हा म गो पक्षाचा एकमेव खासदार केन्द्र सरकारात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

खरंच अजब लोकशाही!

वामन देशमुख
Wed, 03/17/2021 - 16:36 नवीन
प्रमोद महाजनांचे हे भाषण मी ऐकले होते. लोकशाहीचा काळा विनोद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

शिवसेना नेते वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करा”, इति नितेश राणे

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 07:34 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/investigate-shiv-sena-leader-varun-sardesai-along-with-waze-nitesh-rane-msr-87-2421342/ हे नक्की काय गौडबंगाल आहे? "वरूण सरदेसाई ", यांचा काय संबंध? अर्थात, सामान्य लोकांसाठी काम करणारे, असामान्य सरकार असल्याने, योग्य तो निर्णय नक्कीच घेतील....
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/16/2021 - 10:55 नवीन
ते पोलिस आयुक्त परमबीर सिंग ह्यांचीही कोठडीत ठेउन चौकशी केली पाहिजे. त्यांच्या छुप्या आशीर्वादाशिवाय हे सचिन वाझे अतिरेकी चाळे करू शकले नसते.
  • Log in or register to post comments

सुशांतच्या निधनानंतर रिहा

सौंदाळा
Tue, 03/16/2021 - 11:03 नवीन
सुशांतच्या निधनानंतर रिहा चक्रवर्तीबरोबर गुलुगुलु बोलणारे हेच ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.loksatta.com

मराठी_माणूस
Tue, 03/16/2021 - 13:21 नवीन
https://www.loksatta.com/nagpur-news/obstruction-of-finance-department-for-assistant-professor-recruitment-abn-97-2421640/ आर्थिक परिस्थितीची समस्या फक्त शिक्षण क्षेत्रालाच का ?
  • Log in or register to post comments

काय बोलावं ते सुचेना ...

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 13:29 नवीन
काय बोलावं ते सुचेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्तांचा राजीनामा

चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/16/2021 - 14:23 नवीन
राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य स्वपन दासगुप्ता यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा उद्यापासून ग्राह्य धरला जावा अशी विनंती त्यांनी केली आहे. Image removed. २०१६ मध्ये दासगुप्तांची नियुक्ती राज्यसभेवर झाली होती. नियमाप्रमाणे असे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये कोणत्या राजकीय पक्षात सामील झाले तर हरकत नसते पण त्यानंतर ते कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास ते अपात्र ठरतात. दासगुप्ता वेगवेगळ्या टिव्ही चॅनेलवर भाजपची बाजू मांडताना अनेकदा दिसतात पण त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. मात्र परवा भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली त्यात हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर मतदारसंघातून उमेदवार म्हणून स्वपन दासगुप्तांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. म्हणजेच त्यांचा भाजपत प्रवेश होणार आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना पक्षाकडून त्यांच्या वतीने फॉर्म-बी भरला जाणार आणि ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील आणि त्यांना कमळ हे पक्षाचे चिन्ह देण्यात यावे असे पक्षाकडून निवडणुक आयोगाला सांगितले जाणार. सहा महिन्यांची मुदत उलटून गेल्याने दासगुप्तांनी स्वतःच राजीनामा दिला असता तर ते बरे झाले असते. पण तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील कृष्णनगरच्या खासदार महुवा मोईत्रा यांनी दासगुप्तांचे नाव उमेदवारांच्या यादीत असल्याबद्दल आक्षेप घेतला आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. स्वतः स्वपन दासगुप्तांनी याची माहिती पुढील ट्विट करून दिली आहे.

I have resigned from the Rajya Sabha today to commit myself totally to the fight for a better Bengal. I hope to file my nomination as BJP candidate for the Tarakeshwar Assembly seat in the next few days.

— Swapan Dasgupta (@swapan55) March 16, 2021
  • Log in or register to post comments

हे पूर्वी आऊटलुक साप्ताहिकाचे

श्रीगुरुजी
Tue, 03/16/2021 - 15:34 नवीन
हे पूर्वी आऊटलुक साप्ताहिकाचे संपादक होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

नाही

चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/16/2021 - 16:20 नवीन
हे पूर्वी आऊटलुक साप्ताहिकाचे संपादक होते का?
नाही. ते विनोद मेहता. स्वपन दासगुप्ता आऊटलुकमध्ये नव्हते. अवांतरः पूर्वी स्वपन दासगुप्ता आणि चंदन मित्रा हे दोन पत्रकार चर्चांमध्ये भाजपची बाजू मांडायचे. पण चंदन मित्रा काही वर्षांपूर्वी तृणमूलमध्ये गेले. युट्यूबवर जून १९८८ च्या पोटनिवडणुकांवरील प्रणॉय रॉयचा व्हिडिओ मिळाला. याच पोटनिवडणुकांमध्ये वि.प्र.सिंग अलाहाबादमधून जिंकले होते. या कार्यक्रमात तरूणपणचे प्रणॉय रॉय, विनोद दुआ, चंदन मित्रा आणि शेखर गुप्ता दिसतील.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्रीगुरुजी
Tue, 03/16/2021 - 16:32 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

रिझवींचं मुंडकं छाटण्यासाठी बक्षीस, वकिलाविरोधात FIR दाखल

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 16:36 नवीन
https://maharashtratimes.com/india-news/quran-verses-row-lawyer-booked-for-announcing-reward-to-behead-waseem-rizvi/articleshow/81530763.cms
  • Log in or register to post comments

गळा कापणे हे धर्मकार्य आहे..

बापूसाहेब
Tue, 03/16/2021 - 19:16 नवीन
गळा कापणे हे धर्मकार्य आहे.. आणि आता भारत असुरक्षित नसतो.. असहिष्णूंता नसते.. UNA मध्ये जायची गरज नसते.. ट्विटर वर टिवटिवाट आणि अवॉर्ड वापसी करायची नसते. कारण #फेक्युलरिज्म.. रंगपंचमी आणि दिवाळी च्या वेळेस कुत्र्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल लेख च्या लेख लिहिणारे बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेते, PETA वाले/वाल्या आज 50 हुन जास्त कुत्र्यांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यामुळे समाजात खरे कुत्रे आणि कुत्र्या कोण हे दिसले. #JusticeForShera
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दुतोंडी माणसे,

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 19:32 नवीन
समाजात भरपूर आहेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

माझा रिझवींना पाठिंबा आहे

गामा पैलवान
Tue, 03/16/2021 - 19:31 नवीन
कुराणातले वादग्रस्त भाग वगळण्याच्या बाबतीत माझा रिझवींना पाठिंबा आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चिंचवड येथील, शिवसेना शाखा प्रमुख, murder case....

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 18:23 नवीन
https://www.esakal.com/pimpri-chinchwad/chinchwad-shiv-sena-branch-chiefs-vijay-surve-murder-case-revealed-420135
  • Log in or register to post comments

सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार उद्धवजी?” इति फडणवीस

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 19:13 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/how-many-more-people-will-be-saved-for-power-uddhavji-devendra-fadnavis-msr-87-2422100/ छापील बातमी आहे....
  • Log in or register to post comments

केशव उपाध्येंंनी विचारले तर

श्रीगुरुजी
Tue, 03/16/2021 - 21:49 नवीन
केशव उपाध्येंंनी विचारले तर हरकत नाही. पण फडणवीसांनी असा प्रश्न विचारणे अत्यंत हास्यास्पद व ढोंगीपणाचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बँकेचा संप चालू आहे

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 19:27 नवीन
फक्त देणे भोवती च गोल गोल फिरण्यासाठी आयुष्य वाया घालवू नका. बँक कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे तिकडे पण थोडे लक्ष असू द्या. भारत जसा खूप मोठा आहे तसेच भारतात समस्या पण खूप आहेत. फक्त शिवसेना आणि सत्ता मिळाली नाही तर दुखः किती कुरवाळत बसणार.
  • Log in or register to post comments

बँक कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 19:31 नवीन
काम करायला लागेल, म्हणून त्यांना दूःख होत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

खाजगीकरण होतेय.. बँक

बापूसाहेब
Tue, 03/16/2021 - 19:43 नवीन
खाजगीकरण होतेय.. बँक कर्मचारी आता जरा सचोटीने आणि भरीव काम करतील अशी अपेक्षा... काम न केल्यास वरून बांबू बसणे आणि नोकरी जाण्याची भीती निर्माण होणे गरजेचे आहे.. सरकारी सिस्टीम मध्ये हे होत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सगळ्या सरकारी बँका ( SBI

आग्या१९९०
Tue, 03/16/2021 - 20:30 नवीन
सगळ्या सरकारी बँका ( SBI सोडून ) येस बँकेला देऊन टाका. खासगी म्हणजे सगळं शिस्तबद्ध. आणि घोटाळा होऊन बुडलीच तर आहेच RBI आणि SBI वाचवायला. फक्त इथल्या अर्थतज्ञ बोकीलांची सल्लामसलत करून निर्णय घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

एक महत्वाची माहिती: जेव्हा

पिनाक
Tue, 03/16/2021 - 23:00 नवीन
एक महत्वाची माहिती: जेव्हा तुम्ही बँकेत पैसे ठेवता (म्हणजे बँकेला पैसे कर्जाऊ देता) किंवा त्यांचे शेअर्स घेता तेव्हा ती संपूर्णपणे तुमची जोखीम असते. सरकार तुम्हाला बँकेत पैसे ठेवा असं सांगायला येत नाही. किंवा ठेऊ नका असेही सांगायला येत नाही. सरकारी असो वा खाजगी, जर बँक बुडाली तर कायदेशीर पद्धतीने क्लेम करब्याव्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करावी ही गोष्ट चुकीची निघालि तर तुम्ही आणि तुमचे नशीब. लिमिटेड लैआबिलिटी मुळे बँकेच्या बोर्डावर पण (जर त्यांनी fraud केला नसेल तर) कायदेशीर कारवाई करता येत नाही. म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टमेंट चे निर्णय चुकले तरी तुम्ही काही करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सहमत. त्यामुळे सरकारी बँकांचे

आग्या१९९०
Tue, 03/16/2021 - 23:13 नवीन
सहमत. त्यामुळे सरकारी बँकांचे खासगीकरण केल्याने समस्या उद्भवणार नाही असेही म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

असे च असेल

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 23:26 नवीन
बँकांची ची काहीच जबाबदारी नसेल.बँक बुडाली बँकेच्या चुकीच्या निर्णय मुळे तरी. तर बँका हव्यात कशाला. हा पहिला प्रश्न. माणसांनी रोख पैसे घरात ठेवले तर इन्कम टॅक्स वाले तिकडे का कोलमडत असतात. बँका काहीच जबाबदारी नसेल तर. बँकेच्या बाहेर असणाऱ्या किती ही मोठ्या रक्कमे ला ब्लॅक money म्हणता येणार नाही. सरकार जबरदस्ती करत आहे लोकांना बँकेत पैसे ठेवण्यासाठी. किती तरी उदाहरणे देता येतील. नोट बंदी कशा साठी केली. बँक आणि सरकार जर लोकांनी बँकेत पैसे ठेवावे म्हणून जबरदस्ती करत नाही तर . ब्लॅक money ची व्याख्या ऐकायला आवडेल. पिणाक जरा ब्लॅक money ची व्याख्या सांगा. डिजिटल पेमेंट ची जबरदस्ती का.? हे पण जरा विस्कटून सांगा. चेक नी payment ची जबरदस्ती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

सरकार तुम्हाला बँकेत पैसे

मराठी_माणूस
Wed, 03/17/2021 - 09:39 नवीन
सरकार तुम्हाला बँकेत पैसे ठेवा असं सांगायला येत नाही.
रोखीचे व्यवहार करुन नका असे कोण सांगते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

बंधन आहेत ना

Rajesh188
Wed, 03/17/2021 - 10:19 नवीन
प्रॉपर्टी आणि जमिनी चे व्यवहार रोख रक्कम देवून करण्यास बंधन आहे. असे काही व्यवहार आहेत त्या मध्ये रोख रक्कम देवून व्यवहार करण्यावर बंधने आहेत. घरात किती ही पैसे ठेवण्यास बंधन नाही पण त्याचा हिशोब द्यावा लागणार. हीच गेनाबाची मेख आहे. त्या मुळे तुम्ही घरात जास्त मोठी रक्कम ठेवू शकत नाही. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे ह्याचा अर्थ च बँकेत पैसे ठेवण्यास लोकांना प्रवृत्त करणे हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सामान्य लोकांच्या

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 20:45 नवीन
ठेवू ज्या बँकेत असतात त्यांची सुरक्षा हे तुमचे खासगी भांडवलदार करणार आहेत का? की बँकेचे मालक च सर्व पैसे घेवून पसार होतील. असे झाले तर कोणाला फाशी वर चढवले पाहिजे त्या वेळेस. प्रश्न फक्त कर्मचाऱ्यांचा नाही. सामान्य लोकांचे पैसे सुरक्षित राहतील की नाही राहणार हा पण आहे. ह्या देशात अतिशय दुर्गम भाग पण आहे तेथील लोकांना हे खासगी बँकेचे मालक,आणि आता चे देशाचे मालक शेठ हे सेवा देतील का. की फक्त मुंबई ,पुण्यात च खासगी बँकेचे मालक ब्रांच चालवतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

ज्यांना खासगी बँकांवर विश्वास

आग्या१९९०
Tue, 03/16/2021 - 20:53 नवीन
ज्यांना खासगी बँकांवर विश्वास आहे त्यांनी सरकारी बँकेत खाते काढू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रश्नाचे व्यापक रूप असते

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 20:49 नवीन
खासगी कारण झाल्या मुळे फक्त कर्मचारी संकटात येतील आणि बाकी काही प्रश्न च निर्माण होणार नाहीत. एवढा संकुचित विचार फक्त बुद्धीचे दिवाळे निघाले आहेत त्याच व्यक्ती करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इतकी चांगली संधी सोडू नका

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 21:17 नवीन
तुम्ही पण एखादी बॅन्क विकत घेऊ शकता ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

राजेश जी तुमच्या प्रतिसादाला

बापूसाहेब
Tue, 03/16/2021 - 21:58 नवीन
राजेश जी तुमच्या प्रतिसादाला आपला पास.. कारण मी अनुभवावरून बोललो. आजवर मी जवळपास 14 बँकेच्या सेवा वापरल्या आहेत, त्यामध्ये सहकारी, खाजगी, सरकारी, इंटरनॅशनल अश्या सर्व प्रकारच्या बँका आहेत. त्या अनुभवावरून मी सांगु शकतो कि खाजगी बँकामध्ये कस्टमर ला योग्य तो मानसन्मान दिला जातो. कामे विनाकारण अडवली जातं नाहीत आणि शक्यतो प्रत्यक्ष बँकेत जाण्याचे प्रसंग फार कमी येतात. कामे लवकर आणि वेळेत पूर्ण होतात. खाजगी असली तरी govt चे सगळे नियम पाळूनच व्यवहार होतात त्यामुळे खाजगी बँका धोकादायक पण सरकारी बँका विश्वासार्ह हा जावईशोध कुठून आला ते माहिती नाही. असो. बँकेचं खाजगीकरण झाल्याने नेमके काय परिणाम होतील हे एखाद्या निष्पक्ष मिपाकरांकडून वाचायला आवडेल. त्याचबरोबर जे काही कर्मचारी आत्ता संप करत आहेत त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?? त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत कि पगार कमी होणार आहेत.?? कोणी जाणकार व्यक्ती स्पष्टीकरण देऊ शकेल काय.??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जाणकार व्यक्ती असे वाचावे..

बापूसाहेब
Tue, 03/16/2021 - 22:00 नवीन
जाणकार व्यक्ती असे वाचावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

जाणकार व्यक्ती असे वाचावे..

बापूसाहेब
Tue, 03/16/2021 - 22:04 नवीन
जाणकार व्यक्ती असे वाचावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

काम करावे लागणार. वारंवार

साहना
Wed, 03/17/2021 - 08:54 नवीन
काम करावे लागणार. वारंवार पगारवाढ होणार नाही. टार्गेट पूर्ण करावी लागतील, प्रमोशन निव्वळ वर्षांनी होणार नाहीत तर परफॉर्मन्स पाहून होतील. कार्यक्षम लोकांना जास्त पगार तर निर्बुद्धांना कमी पगार मिळेल. युनियन लोकांची दादागिरी चालणार नाही. माझ्या मते आपले पैसे सरकारी बँकेतून काढून घेण्याची हि योग्य वेळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

असंच म्हणतायेणार नाही.

शाम भागवत
Wed, 03/17/2021 - 09:02 नवीन
असंच म्हणतायेणार नाही. परिस्थिती बदलली की माणसेही बदलतात. १९९५ नंतर खूप मोठ्या प्रमाणावर स्वेच्छा निवृत्ती घेतली गेली. त्यानंतर उरलेल्यांचे काम खूप वाढले होते. त्यामुळे त्यानंतर बँकेची नोकरी पूर्वीसारखी फारशी आरामदायक राहिलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

प्रश्न फक्त कर्मचाऱ्यांचा नाही

Rajesh188
Wed, 03/17/2021 - 09:15 नवीन
अनेक प्रश्न आहेत त्या मधील किरकोळ प्रश्न कर्मचारी लोकांचे पगार आणि कार्यक्षमता आहे. खरे गंभीर प्रश्न वेगळेच आहेत. कर्ज घेवून तो बुडवणारा आणि बँक चालवणारा एकच असेल तर सर्व सामान्य लोकांच्या ठेवी सुरक्षित राहतील ह्याची शास्वती कोण देणार .? ग्रामीण भागात बँकिंग सेवा हे खासगी बँक वाले देतील का?, खूप प्रश्न आहेत सध्या हे दोनच सांगितले. फक्त कर्मचारी आणि त्यांचे पगार ह्या फालतू गोष्टी भोवती च फिरू नका. काम केले की त्याचा मोबदला दिलाच पाहिजे. फुकट तर कोणी काम करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

Pulwama मध्ये

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 19:50 नवीन
४० crpf चे जवान मारले गेले होते.तो स्फोट कोणी घडवला,एवढी मोठी स्फोटक देशात आलीच कशी हे अजुन इतके दिवस होवून सुद्धा सरकार ला माहीत नाही. ना ज्यांनी स्फोट घडवला ते पकडले गेले. त्याची चर्चा टीव्ही वर होत नाही. पण सचिन वझे म्हणजे राष्ट्रीय प्रश्न झाला आहे.
  • Log in or register to post comments

थापाडेराव

सुबोध खरे
Tue, 03/16/2021 - 19:52 नवीन
थापाडेराव जरा थोडं तरी वाचत चला https://en.wikipedia.org/wiki/2019_Pulwama_attack
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अहो ,

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 19:55 नवीन
परमपूज्य राहुल गांधी, यांचे शिष्य आहेत... त्यामुळे, जास्त विचार न करताच मते व्यक्त करतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तो बदला घेऊन झाला

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 19:53 नवीन
अभिनंदनला का सोडावे लागले? ह्याचा अभ्यास करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

३०० kg

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 20:06 नवीन
३०० kg स्फोटक देशाच्या सीमा ओलंडून देशात आलीच कशी ती कोणी आणली?,ती आणायला कोणी मदत केली.? त्या व्यक्ती वर कोर्टात केस चालू आहे का.? फक्त strike केला की प्रश्न संपतात का? खरे साहेब ह्याची उत्तर असतील तर ध्या . आमची पण थोडी माहीत वाढेल. सचिन वझे ची कशी पॉइंट to पॉइंट माहिती येत आहे समोर.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा