✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)

श
श्रीगुरुजी यांनी
Sun, 03/14/2021 - 19:28  ·  लेख
लेख
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corporations-in-andhra-pradesh/articleshow/81496372.cms#_ga=2.225653400.363988111.1611478902-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52154 वाचन

💬 प्रतिसाद (163)

प्रतिक्रिया

आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 22:18 नवीन
https://www.loksatta.com/pune-news/it-is-just-the-beginning-one-part-is-out-the-other-part-is-very-important-fadnvis-msr-87-2420646/ सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं, त्यावेळी अशाप्रकारचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होती की, त्यांना पुन्हा घेतलं पाहिजे. म्हणून त्यावेळी मी अॅडव्हकेट जनरल यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यावेळी मला असा सल्ला दिला गेला होता की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी करोनाचं कारण दाखवून करोनात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतलं.....
  • Log in or register to post comments

मूवी

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 02:30 नवीन
फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना देशांत हजारो घडतात.. फडणवीस सांगत आहेत ते खरे जरी असले तरी त्यांचा हेतू स्वार्थी आहे.. सरकार ल अडचणीत आणणे हा त्यांचा हेतू आहे निःपक्ष प्रशासन असावे हा त्यांचा हेतू नाही. देशातील राजकीय पक्षांची पातळी खालावली आहे. आणि त्याला कारण स्व बुध्दी न वापरता भावनीक निर्णय घेणारी जनता. काँग्रेस नालायक असेल तर BJP सुद्धा नालायक च आहे आणि सेना,राष्ट्रवादी सुद्धा नालायक च आहेत. कारण जनताच त्यांचे प्रतिनिधी योग्य निवडत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना

सुबोध खरे
Mon, 03/15/2021 - 11:58 नवीन
फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना देशांत

हजारो

घडतात.. कशाला थापा मारताय? मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी

बापूसाहेब
Tue, 03/16/2021 - 22:35 नवीन
मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.
झाले गायब..!!! दावा हजाराचा करायचा पण 5 उदाहरणे पण द्यायची नाहीत.. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मौलिक विचार

मुक्त विहारि
Wed, 03/17/2021 - 07:54 नवीन
यांच्या अभ्यासात व्यस्त असतील ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

लोकसत्ता

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 22:27 नवीन
लोकसत्ता लोकप्रिय paper झाला वाटत. अर्णव नी लोकसत्ता मालकंस यशाचा मंत्र दिला.
  • Log in or register to post comments

आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत

उपयोजक
Sun, 03/14/2021 - 23:30 नवीन
आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. :( दु:खद बातमी. ख्रिश्चन धर्मांतरणाला पुन्हा वेग येणार अांध्रात.
  • Log in or register to post comments

जनतेला त्यांच्या लायकीचे

श्रीगुरुजी
Sun, 03/14/2021 - 23:37 नवीन
जनतेला त्यांच्या लायकीचे सत्ताधारी मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

सहमत आहे...

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 22:31 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

स्था.लो. एकवेळ ठीके

गामा पैलवान
Mon, 03/15/2021 - 02:33 नवीन
उपयोजक, स्थानिक लोकप्रतिनिधी वायेसारचे चालतील. आमदार व खासदार नकोत. अर्थात, स्थालो एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर निवडून येणं ही धोक्याची घंटा आहेच. बहुधा छुपा ख्रिश्चन टक्का खूप वाढलेला असावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

काही लोक हे विसरत आहेत

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 02:37 नवीन
राष्ट्रीय पक्ष कोणत्याच लोकांना नको आहेत. प्रादेशिक पक्ष स्थानिक प्रश्न नीट समजून घेवू शकतात असे लोकांना वाटते. प्रथम देश हा सुविचार आहे फक्त फळ्यावर लिहायचं . इतकेच त्याचे महत्व आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

प्रथम देश हा सुविचार आहे फक्त फळ्यावर लिहायचं .

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 22:32 नवीन
आम्ही तरी, प्रथम देश असेच समजतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

धार्मिक विचार करण्या पेक्षा

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 02:34 नवीन
देश हित करणारी उत्तम दर्जा ची माणसं निवडून ध्या. धर्म हा बाजूला ठेवा . हिंदू निवडून दिला म्हणून तो हिंदू चे भले करणार नाही. आणि मुस्लिम निवडून दिलं म्हणजे तो मुस्लिम लोकांचे भले करणार नाही. कोणत्या ही धर्माचा सभ्य व्यक्ती निवडून दिला तर तो मानव हित नक्की च करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

आणि मुस्लिम निवडून दिलं म्हणजे तो मुस्लिम लोकांचे भले करणार नाही

NiluMP
Mon, 03/15/2021 - 21:49 नवीन
Good Joke.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

त्यांना मुस्लिम लीग,

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 07:13 नवीन
खिलाफत चळवळ, रझा संघटने बद्दल काहीही माहिती नाही... तसेही त्यांना, दक्षिण कोरिया बद्दल पण काहीही माहिती नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

अहो थापाडेरावांचे काय ऐकताय?

सुबोध खरे
Tue, 03/16/2021 - 10:18 नवीन
अहो थापाडेरावांचे काय ऐकताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अनभिज्ञ व्यक्तीमत्व आहे

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 10:46 नवीन
माहिती न घेता लिहित असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अनभिज्ञता नाही ही. हे

राघव
Tue, 03/16/2021 - 19:35 नवीन
अनभिज्ञता नाही ही. हे जाणीवपूर्वक लिहिणं आहे. बाकी खुसपटं काढणं, उगाच काहीही बाता ठोकणं हे सर्व शिवसेनेचं लक्षण आहे. ते आता दिसतंच आहे मागच्या ६-७ आठवड्यांपासून. हे सर्व सो कॉल्ड चांगल्या भाषेत लिहिलं म्हणजे प्रतिसाद देखील उडवल्या जात नाहीत. चिथावणीखोर लिहिणं हे अनभिज्ञता नाही तर धागे हायजॅक करण्याची मानसिकता दर्शवतं. कोणतीही चांगली चर्चा होऊच द्यायची नाही असं काहिसं धोरण वाटायला लागलं आहे हे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काहीही बाता ठोकणं हे सर्व शिवसेनेचं लक्षण आहे.

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 20:00 नवीन
आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे... आमच्या डोंबिवली येथील पत्रीपुलाचे जास्तीत जास्त काम आधीच्या सरकारने केले आणि श्रेय उपटायचा प्रयत्न, ह्या सरकारने केला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

जाती धर्माच्या

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 02:40 नवीन
नावा वर राजकारण करणारी लोक मला सर्वात मोठे भामटे वाटतात. त्यांच्या हातून देश हित कधीच होणार नाही.
  • Log in or register to post comments

करून दाखवलं

मुक्त विहारि
Mon, 03/15/2021 - 07:32 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/up-to-90000-patients-in-a-week-in-the-state-abn-97-2420891/
  • Log in or register to post comments

आता मला पण

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 08:01 नवीन
Corona हे थोतांड आहे ह्याची खात्री पटत चालली आहे. लोक पण आता ह्या बातम्या गंभीर पने घेत नाहीत महाराष्ट्र सोडून बाकी राज्यात लोक गर्दी करत नाहीत,सर्वच्या सर्व मास्क वापरतात ,आरोग्य व्यवस्था चांगली असहे,लोक शिस्त प्रिय आहेत, तर बिलकुल नाहीत तरी आकडे येथीलच कसे वाढतात. टेस्ट पण एक थोतांड च आहे. १००० गुणिले लोकसंख्या हा चावटपणा चालू आहे . एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

अनन्त अवधुत
Wed, 03/17/2021 - 01:21 नवीन
एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.
तुमच्या माहितीतले कोणिही गंभीर आजारी न पडो ह्या सदिच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एक पण गंभीर आजारी व्यक्ती

सुबोध खरे
Wed, 03/17/2021 - 12:08 नवीन
एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही. आपण स्वतःला सर्वज्ञ किंवा बुद्ध समजता काय? आणि आपले लाडके मुख्यमंत्री आरोग्य मंत्री जनतेला अंतर ठेवा, मुखवटा घाला, काळजी घ्या म्हणून आवाहन करतात ते काय गांजा पिऊन बोलतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एक पण गंभीर आजारी व्यक्ती

सुबोध खरे
Wed, 03/17/2021 - 12:25 नवीन
एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही. देशाच्या कानाकोपर्‍यात चौदा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पोटनिवडणुका , त्यातही

नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन

झाल्याने पोटनिवडणुका. थापाडेराव राव काहीही वाचत नाहीत काहीही ऐकत नाहीत सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना बोधीवृक्षाखाली बसून आपोआप होतच असते तेंव्हा त्यांना सर्व मिपाकरांनी शरण जावे हे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असेल

Rajesh188
Wed, 03/17/2021 - 15:02 नवीन
पण क्षय रोगांनी भारतात covid पेक्षा जास्त लोक मरण पावतात.(रुग्ण आणि होणारे मृत्यू असे बघा) Covid काळात अनेक रोगांवर उपचार च झाले नाहीत. किंवा बाकी रोगाच्या चाचण्या च झाल्या नाहीत हे पण सत्य आहे. एक लाख ५९ हजार covid मुळे मृत्यू झाले असे सरकारी रेकॉर्ड सांगते पण ह्या मृत्यू झालेल्या लोकात बाकी आजारांनी मरण आलेल्या लोकांचा पण सहभाग आहे . Covid positive pan मृत्यु दुसऱ्याच आजाराने हीच लोक जास्त आहेत. तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते आम्हाला सांगायला लागत आहे. देशाची लोकसंख्या १३० कोटी. Covid रुग्ण सव्वा कोटी पण नाहीत . आणि एकूण मृत्यू १ लाख ५९ हजार. आणि क्षय रोगाचा आकडा तुम्हाला माहीतच असेल. Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात. मग covid ची भीती प्रमाण पेक्षा जास्त दाखवून बाकी आजारांना दुर्लक्षित केले जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असेल

Rajesh188
Wed, 03/17/2021 - 15:02 नवीन
पण क्षय रोगांनी भारतात covid पेक्षा जास्त लोक मरण पावतात.(रुग्ण आणि होणारे मृत्यू असे बघा) Covid काळात अनेक रोगांवर उपचार च झाले नाहीत. किंवा बाकी रोगाच्या चाचण्या च झाल्या नाहीत हे पण सत्य आहे. एक लाख ५९ हजार covid मुळे मृत्यू झाले असे सरकारी रेकॉर्ड सांगते पण ह्या मृत्यू झालेल्या लोकात बाकी आजारांनी मरण आलेल्या लोकांचा पण सहभाग आहे . Covid positive pan मृत्यु दुसऱ्याच आजाराने हीच लोक जास्त आहेत. तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते आम्हाला सांगायला लागत आहे. देशाची लोकसंख्या १३० कोटी. Covid रुग्ण सव्वा कोटी पण नाहीत . आणि एकूण मृत्यू १ लाख ५९ हजार. आणि क्षय रोगाचा आकडा तुम्हाला माहीतच असेल. Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात. मग covid ची भीती प्रमाण पेक्षा जास्त दाखवून बाकी आजारांना दुर्लक्षित केले जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व

सुबोध खरे
Wed, 03/17/2021 - 19:01 नवीन
तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते माहिती आहे. मग काय शनिवार वाड्यावर लाऊड स्पीकर लावून बोंबलू? आजच माझ्या वर्ग मित्राच्या आईच्या स्तनाच्या कर्करोगाची चाचणी केली चौथ्या स्टेज मध्ये आहे ६ महिन्यापासून असलेली गाठ. कोवीड मुळे त्यांनी कुणाला सांगितले नाही. असे रुग्ण रोज पाहतो आहे. आम्हाला सांगायला लागत आहे. आपल्यासारखे बोधीवृक्षाखाली बसून ज्ञान मिळालेले नाही गेली ३७ वर्षे शिकतो आहे .आपल्या ज्ञानाच्या अगाध पातळीला पोहोचायला बहुतेक सात जन्म लागतील Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात. हे ज्ञान मला नाही. The India TB Report 2020 stated that 79,144 deaths due to tuberculosis were reported in 2019. पण क्षय रोगाने चालता फिरता माणूस चार दिवसांत कैलासवासी होत नाही. बरीच वर्षे उपचार नीट न मिळाल्याने /केल्याने जातात. ज्यांचे धडधाकट नातेवाईक असे गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना तुमचे असले अफलातून लॉजिक सांगणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अहो .....

मुक्त विहारि
Wed, 03/17/2021 - 19:33 नवीन
ह्यांचे प्रतिसाद मी जास्त मनावर घेत नाही .... अफाट ज्ञानी व्यक्तीमत्व आहे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

Dr साहेब तुमचे अगदी बरोबर आहे

Vichar Manus
Wed, 03/17/2021 - 19:54 नवीन
Dr साहेब तुमचे अगदी बरोबर आहे पण इथे अजून एक व्यक्ती आहे जी म्हणते केव covid च नाही तर सगळ्या लसी थोतांड आहे, त्यांना पण थोडे ज्ञान दया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या दोघांचेही प्रतिसाद वाचणे

श्रीगुरुजी
Wed, 03/17/2021 - 21:10 नवीन
या दोघांचेही प्रतिसाद वाचणे मी फार पूर्वीच थांबविले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

डॉक्, हे सगळे त्यांना सांगून

राघव
गुरुवार, 04/01/2021 - 13:15 नवीन
डॉक्, हे सगळे त्यांना सांगून उपयोग होणार नाही. स्वतः एकांगी विचार ठेवायचे आणि अख्या जगाला निष्पक्ष विचाराचे ज्ञान द्यायचे हे यांचे लॉजिकल तत्वज्ञान. तर्क हा मुळातच निष्पक्ष ठेवावा लागतो, एकाच विषयाला अनेक कंगोरे असू शकतात हे बेसिक फंडेच यांना माहित नाहीत. किंवा वेड पांघरण्याचा प्रकार आहे. असो. आपल्या प्रतिसादांमधील माहिती आवडते. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उद्या कुणाची म्हैस गाभण नाही राहिली

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 08:02 नवीन
तरी त्याला महाराष्ट्र च दोषी आहे अशी समजणारी सुशिक्षित aadani लोक प्रचंड आहेत.
  • Log in or register to post comments

आता कुणाचीही म्हैस गाभण राहिली

अनन्त अवधुत
Mon, 03/15/2021 - 10:20 नवीन
तरी त्याला केंद्रच दोषी आहेत अशी समजणारी अशिक्षित गुलाम लोक पण भरपुर आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची

मदनबाण
Mon, 03/15/2021 - 08:12 नवीन
Amravati: विजय भाजपचा, पण चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची ‘आताची शिवसेना ही नक्कीच हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असूच शकत नाही’

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)
  • Log in or register to post comments

मदनबाण

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 14:03 नवीन
तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका. ज्यांचे व्हिडिओ तुम्ही लिंक म्हणून देता ती सर्व लोक सत्यवादी हरिश्चंद्र ची संतान नाहीत . तर लांडगे आहेत. कोणाला काय वाटतं हे महत्वाचे नाही .तुम्हाला स्वतःला काय वाटते तेव्हढेच सांगत जा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी फालतू वेळ पण कोणाकडे नसतो . दुनिया काय विचार करते हे त्या विचार करणाऱ्या वर सोडा . फक्त तुम्ही काय विचार करता ह्याच्या शी मिपाकरांना देणेघेणे आहे. लबाड लोकांशी काही देणेघेणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आता परमबीर सिंह आत जाणार का ?

मदनबाण
Mon, 03/15/2021 - 16:26 नवीन
@ राजेश... तुमच्या प्रतिसादास मी फक्त पास म्हणतो ! :))) असो... ताजा कलम :- White Innova car which accompanied explosives-laden Scorpio car recovered from Mumbai Police Commissioner Parambir Singh’s office: Reports राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयातून पांढरी इनोव्हा कार जप्त केली आहे.मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवण्यासाठी या इनोव्हाचा वापर केल्याचा संशय होता. जाता जाता :- वृद्धत्वात देखील मा.शरद पवार यांना किती सगळीकडे हेलपाटे घालावे लागत आहेत, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी. उगाच सगळीकडे डॅमेज कंट्रोल करत बसत स्वतःच्या प्रकृतीस डॅमेज करुन घेउ नये !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

आता परमबीर सिंह आत जाणार का ?

मदनबाण
Tue, 03/16/2021 - 12:35 नवीन
आता परमबीर सिंह आत जाणार का ? परमबीर आत जातील की नाही ते येत्या काळात कळेलच, पण सध्या त्यांची पालखी उचलली जाईल असे दिसते ! जाता जाता :- महाराष्ट्रात इतके मोठे कांड घडले, मुंबई पोलिसांची इज्जत वेशीला टांगली गेली तरी गृहमंत्री अजुन पदावर विराजमान कसे ? नक्की काय काम करुन कशाचा पगार घेतात हे मंत्री महोदय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सोपं आहे...

सॅगी
Tue, 03/16/2021 - 14:02 नवीन
नक्की काय काम करुन कशाचा पगार घेतात हे मंत्री महोदय ?
कायद्याचे राज्य आहे हे माध्यमांतुन सांगण्याचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आणि कायद्याच्या कचाट्यात

सौंदाळा
Tue, 03/16/2021 - 14:03 नवीन
आणि कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या आपल्या माणसांना बाहेर काढायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

परमबीर आत जातील की नाही ते

मदनबाण
Tue, 03/16/2021 - 21:57 नवीन
परमबीर आत जातील की नाही ते येत्या काळात कळेलच, पण सध्या त्यांची पालखी उचलली जाईल असे दिसते ! पालखी उचलली जाईल असे वाटल्यावर यांची फाफललेली दिसतेय कारण अचानक यांना समर्थन देण्यासाठी कृत्रीम टिवटिवाट सुरु करण्यात आला आहे ! ‘Parambir Singh toolkit’: Campaign launched by unidentified groups on Twitter to support Mumbai CP after Shiv Sena backs Sachin Vaze in Antilia case गाड्या वापरणारे पोलिस,गाड्या पार्क करणारे पोलिस,गाड्यांचे नंबर प्लेट्स बदलणारे देखील पोलिसच मग तरी सुद्धा परबीर आणि गृहमंत्री अजुन पदावरच ! रक्षकच भक्षक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची

रंगीला रतन
Tue, 03/16/2021 - 14:27 नवीन
तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका. १८८ प्रभू तुम्ही तर कोणत्याही धाग्यावर प्रतिसादच देऊ नका. आता त्यावर हसायला येत नाही पण कीव येते तुमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Rangila

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 22:09 नवीन
जास्त हसू नका .माझ्या एका प्रश्न चे उत्तर तुम्ही देवू शकत नाही. कशाला बुद्धीचे प्रदर्शन करता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

तुम्हाला

अनन्त अवधुत
Wed, 03/17/2021 - 01:37 नवीन
बर्‍याच जणांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे अजुन द्यायची आहेत. आता ह्याच धाग्यावर इथे काही बोलता आले तर बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

https://epaperdivyamarathi

मराठी_माणूस
Mon, 03/15/2021 - 09:34 नवीन
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/15032021/0/0/ अनोळखी व्यक्तीला किडनी दान करणे , तिही एका उद्योगपतीने सामान्य ट्र्क ड्रायव्हरला अतिशय कौतुकास्पद .
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com

मराठी_माणूस
Mon, 03/15/2021 - 11:27 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/municipal-action-for-recovery-of-property-tax-abn-97-2420888/ आलिशान वाहने बाळगण्याची ऐपत आहे तर मग कर का भरत नसतील ?
  • Log in or register to post comments

घरगुती गॅस सिलिंडर ८०० रू.

आग्या१९९०
Mon, 03/15/2021 - 12:43 नवीन
घरगुती गॅस सिलिंडर ८०० रू. होऊनही अद्याप सबसिडी मिळत नाही. काय ब्र करावं?
  • Log in or register to post comments

सत्तेत मग्न काँग्रेस चे शेवटचे दिवस

Rajesh188
Mon, 03/15/2021 - 14:14 नवीन
सत्तेत मग्न बेधुंद काँग्रेस चे शेवटचे दिवस आणि आता bjp चे वर्तन समान आहे. आता bjp च शेवट आला आहे जसे काँग्रेस च्य ::::::: भागावर लाथ मारून त्यांना बाहेर केले त्याच मार्गाने bjp जात आहे पण खूप लवकर ह्याचे दुःख होत आहे. एक निर्णय क्षमता असणारा पक्ष काहीच दिवसात नष्ट होईल त्याचे दुःख आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मुंगेरीलाल के हसीन सपने

उदयगिरी
Mon, 03/15/2021 - 17:20 नवीन
राजेश जी स्वप्न पाहणे वाईट नाही, जरूर पहा.
  • Log in or register to post comments

राजेशा

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/15/2021 - 17:56 नवीन
बातमी आली रे राजेशा- He (Waze) was initially very reluctant to speak up and denied all allegations. But when he was confronted with technical evidence, that includes his location at several places that he could not explain and footage from CCTV cameras along with results of forensics, he broke down and confessed that he was part of the conspiracy,” the source said. NIA claims Waze's teammate arranged for fake number plate for the explosive-laden SUV to mislead investigators, says more names from Mumbai Police will emerge. द प्रिन्ट वरील बातमी आहे. उद्या आमचे संजय राउत सामनात काय म्हणतात ते बघुया.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा