✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 02/10/2021 - 14:19  ·  लेख
लेख
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अ‍ॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-india-to-continue-advocating-right-of-free-expression-twitter/articleshow/80781473.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
67522 वाचन

💬 प्रतिसाद (266)

प्रतिक्रिया

त्यांना सिरियसली घ्यायची गरज

सौंदाळा
Fri, 02/12/2021 - 11:14 नवीन
त्यांना सिरियसली घ्यायची गरज नाही. त्यांनी मिग, मिराज, सुखोई हे एच.ए.एल मधे बनते असे विधान केले होते. ही त्यांची समज आणि कुवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

खोटं काय आहे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2021 - 11:20 नवीन
आपण 'पॅगॉग त्सोवर' आपला हक्क आपण फिंगर ८ पर्यंत सांगत होतो. (मागील एक चर्चा) आपली सैनिक फिंगर पाच पर्यंत पेट्रोलिंग करत होते तर काल गृहमंत्र्यांनी आता आपण फिंगर तीन पॉइंटवर आपला बेस असेल असे सांगितले यात आपण माघार घेतली असे वाटत नाही का ? आपण आपल्या भारतीय सैन्याचं मनोबळ खच्चीकरण केलं नाही का ? आता ती सीमारेषा असल्यामुळे ते क्षेत्र कोणाचेचे नाही असे युक्तीवाद रेटायचे असतील तर विषयच संपला. मी या विषयातला तज्ञ नाही, जाणकार नाही. आपण या द्वीपक्षीय चर्चेत आपण बॅकफूटवर येऊनही कसे जिंकलो समजावून सांगा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

जरा थांबा. लष्कर अधिकृतपणे जे

श्रीगुरुजी
Fri, 02/12/2021 - 13:28 नवीन
जरा थांबा. लष्कर अधिकृतपणे जे सांगते, त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी उघड सांगत नाही. क्वचित अनावधानाने ते बाहेर येते. दोन दिवसांपूर्वी माजी लष्करप्रमुख जनरल व्हि. के. सिंह यांनी एक निसटते विधान केले होते. ते अनावधानाने केले की जाणीवपूर्वक केले, हे माहिती नाही. परंतु त्यातून काहीतरी बाहेर आले आहे ते समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

He is a born idiot. Just

श्रीगुरुजी
Fri, 02/12/2021 - 13:24 नवीन
He is a born idiot. Just enjoy his comedy show. Don't take him seriously.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हम्म

इरसाल
Mon, 02/15/2021 - 18:10 नवीन
ते एक जण स्वतः आणी त्यांच्या कुटुंबियांसोबत "टोले हाणत" असतात, आणी हे सतत "घणाघात" करत असतात. पुर्वाश्रमीचा रेस्पेक्टीव्हली घंटा बडवणे व घण घालणे हा व्यवसाय असला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सहमत आहे ....

मुक्त विहारि
Mon, 02/15/2021 - 18:13 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

आपण हक्क फिंगर 8 सांगत आहो तर

रात्रीचे चांदणे
Fri, 02/12/2021 - 11:48 नवीन
आपण हक्क फिंगर 8 सांगत आहो तर चीन 2 पर्यंत सांगत आहे. आपला बेस आधीपासूनच फिंगर 3 लाच होता तर चीन चा फिंगर 8 ला. चीन ने फिंगर 5 ला नवीन बेस बनवून जैसे थे परिस्थिती बदलल्या मुळे तिथे संघर्ष झाला. चीन ने फिंगर 5 ला बेस बनवल्या मुळे आपण आपले सैनिक फिंगर 4 पर्यंत पुढे गेले ते पण फिंगर 4 च्या टोका वरती. आत्ता आपण फिंगर 4 चे सैनिक फिंगर 3 पर्यंत घेऊन येणार आहोत तर चीन फिंगर 5 चे सैनिक फिंगर 8 पर्यंत माघारी घेऊन जाणार आहे. ह्या पूर्वी आपण फिंगर 8 पर्यंत तर चीन फिंगर 5 पर्यंत पेट्रोलींग करत नवीन सहमती नुसार पेट्रोलींग सध्या तरी बंद असणार आहे। म्हणजेच भारत आणि चीन साठी ही win win परिस्तिथी आहे. पण ह्यात एकाच खोच वाटतेय की पेंगँग सरोवरात आपल्या सैनिकांची position ही सैनिकी दृष्ट्या फायद्याची होती, तर दौलत बेग भागात चीन फायद्या मध्ये आहे. आत्ता तिथला वाद कसा संपतो त्यावर सर्व अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments

आपला बेस कँप

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2021 - 12:06 नवीन
आपला बेस कँप फिंगर चार होता आपण तेथून आठपर्यंत पर्यंत पेट्रोलिंग करतो होतो. कालच्या मंत्र्यांच्या म्हणनन्यानुसार आता 'तीन वर' आपला बेस कँप असेल. आपल्या दृष्टीने फिंगर चारवर पाय घट्ट रोवणे गरजेचे होते, तो आपला बेस कँप होता. आता आपण एक पाऊल मागे आलो आहोत हे स्पष्ट आहे. आता आपलं पुढे असणारं पेट्रोलिंग बंद करणे आपल्यासाठी नुकसानीचे असणार आहे, ते चीनी नंबर एकचे नाटकी आहेत आम्ही मागे जात आहोत असे म्हणुन त्यांनी पुन्हा घुसखोरी केली तर नवल वाटायचे काहीही कारण नाही. मागे एकदा आपला मिपाकर अभ्या त्याच चर्चेत म्हणाला होता.'' भारत रणांगणावर जिंकतो आणि टेबलावरची चर्चेत हरतो'' हेच खरे वाटायला लागले आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

आपला बेस कँप फिंगर चार होता

रात्रीचे चांदणे
Fri, 02/12/2021 - 12:31 नवीन
आपला बेस कँप फिंगर चार होता आपण तेथून आठपर्यंत पर्यंत पेट्रोलिंग करतो होतो नाही ,गलवाण संघर्ष पूर्वी आपला बेस फिंगर 3 लाच होता तर चीन चा 8 होता, आत्ता पण आपला बेस फिंगर 3 लाच राहणार आहे तर चीन चा 8 मध्येच राहणार आहे. प्रश्न पेट्रोलिंग चा आहे कारण भारत आणि चीन दोघेही फिंगर 5 आणि 8 दरम्यान पेट्रोलिंग करत होते. सध्या जरी पेट्रोलिंग बंद केले तरी भविष्यात जेंव्हा चालु होईल त्यावेळी परत संघर्ष होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे राम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2021 - 12:59 नवीन
कमीत कमी आपणच लिहिलेल्या प्रतिसादाला तरी विसरु नका. ( दुवा ) जर, मंत्र्यांच्या आणि आपल्या म्हणन्यानुसार आपला बेस कँप फिंगर तीन (परमनन्ट बेस) असता तर आम्ही आमच्याच भागावर आहोत ते सांगायची गरज नव्हती, कारण आम्ही तिथे ऑलरेडी होतोच. आता जर बेस कँप चार मानायचा नसेल तर, काय बोलायचे. आपण तिथेच होतो आणि पुढे जात होतो. आता बेस तीन वरुनही आपण आठपर्यंत किंवा पाच पर्यंत पेट्रोलिंग करायचो आता तेही बंद होणार असेल तर यातही आपला विजय नाही. एकही इंच मागे हटणार नाही, असे म्हणालोय पण आपण आपली पेट्रोलिंगचा जो हक्क होता तो आता गमावला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

तुम्ही जो माझ्या प्रतिसादाचा

रात्रीचे चांदणे
Fri, 02/12/2021 - 13:23 नवीन
तुम्ही जो माझ्या प्रतिसादाचा दुवा दिलाय त्यात मी फिंगर 4 ला आपला बेस आहे असं म्हटलेले नाही. त्यात मी स्पष्ट लिहलय की फिंगर 3 ला आपला लहानसा बेस आहे तर फिंगर 4 जवळ निरीक्षण चौकी आहे. सध्या तरी दोन्हीही देश पेट्रोलींग करणार नाहीत, त्यामुळे आपण हक्क गमावला असेल तर चीन नेही गमावला आस म्हणू शकतो. चीन वर किती विश्वास ठेवायचा हा वेगळा भाग. हा त्या निरीक्षण चौकी पर्यंत आपले सैनिक जाऊ शकणर का ते माहिती नाही. पण आपला शेवटचा बेस हा फिंगर 3 लाच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरं...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2021 - 13:41 नवीन
निरिक्षण चौकी चार पासून परमनंट बेस तीनवर परत जाणे यात आपली माघार आहे की नाही ? एकच सांगा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

अर्रर्र.. सॉरी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2021 - 14:00 नवीन
''आत्ता आपण फिंगर 4 चे सैनिक फिंगर 3 पर्यंत घेऊन येणार आहोत'' आपलं उत्तर प्रतिसादात मिळालं आहे. धन्स. वर प्रतिसादात मी फिंगर पॉइंट चारला ( निरिक्षण चौकीला) बेस प्वाइंट चार म्हणालो, ते फिंगर प्वॉइंट चार असेच वाचावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लष्कर जे जाहीर सांगते

श्रीगुरुजी
Fri, 02/12/2021 - 14:17 नवीन
लष्कर जे जाहीर सांगते त्यापेक्षा वस्तुस्थिती बरीचशी वेगळी असू शकते. २०१७ मध्ये डोकलाम येथे ४ महिने सैन्य समोरासमोर असूनही चिन्यांना भारतीय सैनिकांवर हल्ला करणे जमले नव्हते. उलट माघारी जावे लागले होते. भारताने १९६२ ची आठवण ठेवावी, भारताला धडा शिकविणार असा प्रचार सातत्याने चीनकडून सुरू होता. परंतु चीनला काहीही करता आले नव्हते. सिक्कीमला गेलो असताना आमच्या गाडीचा चालक स्थानिक सिक्कीमी होता. त्याचा भाऊ सैन्यात होता. त्याच्या सांगण्यानुसार डोकलाम येथे भारत-चीन चकमक झाली होती व त्यात भारतीय सैनिकांनी चिन्यांना जोरदार मार दिल्याने चीनला मागे जावे लागले. खरेखोटे देव जाणे. मागील ९ महिन्यांपासून युद्धाची भाषा करणारे चिनी आता सामोपचाराने मागे जाताहेत, यामागे बरेच काही घडले असण्याची शक्यता आहे. कदाचित अमेरिकेत नवीन अध्यक्ष आल्याचाही परीणाम असावा. या गोष्टी बाहेर येण्याची शक्यता फारशी नाही. भारतीय लष्करी अधिकारी जे सांगतात त्यापेक्षा बरेच काही वेगळे असू शकते. ऑगस्ट २०२० मध्ये भारतीय सैन्याने एका रात्रीत गुपचुप लडाख सीमेवरील महत्त्वाच्या शिखरांवर ताबा मिळविला होता. त्याचाही काही परीणाम असावा. माझा भारतीय लष्कर व पंतप्रधान यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वस्तुस्थिती बरीचशी वेगळी असू शकते

कपिलमुनी
Fri, 02/12/2021 - 17:51 नवीन
लष्कर खोटे बोलते असे म्हणायचे आहे का ? की स्वतःला बरे वाटेल तीच समजूत करुन रहायचे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नक्कीच ती आपली माघार असेल पण

रात्रीचे चांदणे
Fri, 02/12/2021 - 14:21 नवीन
नक्कीच ती आपली माघार असेल पण अधिकृत माहिती नाही. एवढंच नाही तर पेंगँग सरोवरात आपण फिंगर 4 च्या टोका वरती जाऊन बसल्यामुळे सैनिकी दृष्ट्या आपण वरचढ होतो तर दैलत बेग भागात चीन वरचढ आहे. म्हणजे दौलत बेग भागातून disengagements करताना आपल्याला सावध राहायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नक्कीच ती आपली माघार असेल पण

रात्रीचे चांदणे
Fri, 02/12/2021 - 14:23 नवीन
नक्कीच ती आपली माघार असेल पण अधिकृत माहिती नाही. एवढंच नाही तर पेंगँग सरोवरात आपण फिंगर 4 च्या टोका वरती जाऊन बसल्यामुळे सैनिकी दृष्ट्या आपण वरचढ होतो तर दैलत बेग भागात चीन वरचढ आहे. म्हणजे दौलत बेग भागातून disengagements करताना आपल्याला सावध राहायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

काळे मांजर
Fri, 02/12/2021 - 13:59 नवीन
koo ऐप चा डोमेन यूएसए मध्ये आहे आणी रजिस्टर चीन मध्ये. आत्मनिर्भरभारत जिंदाबाद! म्हणे
  • Log in or register to post comments

तृणमूलचे राज्यसभा सदस्य दिनेश त्रिवेदींचा राजीनामा

चंद्रसूर्यकुमार
Fri, 02/12/2021 - 14:00 नवीन
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायची घोषणा केली आहे. त्यांनी राज्यसभेतच आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे आणि आम्हाला काही बोलायला बंदी आहे असे ते म्हणाले. ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री होण्यापूर्वी मनमोहनसिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या. २०११ मध्ये बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्या जागी दिनेश त्रिवेदींची रेल्वेमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली होती. २०१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात त्यांनी तिकिटाचे दर माफक १ रूपयाने वाढवल्यावर ममतांनी थयथयाट केला आणि त्यांना ती भाववाढ रद्द करायला लावली आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले. त्यावेळी रेल्वेला आपण दुसरी एअर इंडिया बनू द्यायची आहे का हा प्रश्न दिनेश त्रिवेदींनी उभा केला होता. दिनेश त्रिवेदी हा निदान थोडीफार तरी भविष्याची चिंता असलेला नेता आहे असे त्यावेळी वाटले होते. तसेच ममता बॅनर्जींचा जो गेल्या काही वर्षात आक्रस्ताळेपणा वाढला आहे त्यात दिनेश त्रिवेदींनी त्यांना कधी साथ दिल्याचे दिसले तरी नाही.
  • Log in or register to post comments

भारत-चीन लडाख प्रश्नावर लेख

श्रीगुरुजी
Fri, 02/12/2021 - 17:53 नवीन
भारत-चीन लडाख प्रश्नावर लेख https://www.loksatta.com/explained-news/understand-why-how-china-accept-indias-stand-dmp-82-2399682/
  • Log in or register to post comments

फक्त जाणकारांसाठी

श्रीगुरुजी
Fri, 02/12/2021 - 19:35 नवीन
फक्त जाणकारांसाठी https://bolbhidu.com/rule-of-exices-department/
  • Log in or register to post comments

ही गोष्ट खरी आहे का?

मुक्त विहारि
Sat, 02/13/2021 - 09:12 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-chitra-wagh-accuse-shivsena-sanjay-rathod-in-pune-girl-suicide-case-sgy-87-2399851/
  • Log in or register to post comments

बाय द वे ....

मुक्त विहारि
Sat, 02/13/2021 - 18:27 नवीन
हे सरकार आल्यापासून, तरूणींच्या आत्महत्या वाढल्या आहेत का? की, ह्या फक्त योगायोग्याच्या गोष्टी आहेत? कुणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतेय तर कुणी थेट मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीवर ..... आता काय काय करून दाखवतील? ते काही सांगता येत नाही ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

.

काळे मांजर
Sat, 02/13/2021 - 18:35 नवीन
योग्याच्या गोष्टीही आहेत म्हणे हाथर्स सेंगर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

राज्यपालांना विमानातून उतरवणे

श्रीगुरुजी
Sat, 02/13/2021 - 18:38 नवीन
राज्यपालांना विमानातून उतरवणे, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, रेणू शर्मा प्रकरण, पूजा चव्हाण प्रकरण इ. फक्त एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापरले जात आहे. मविआ पक्ष व विरोधी पक्ष या दोघांनाही खरा तपास करण्याऐवजी ही प्रकरणे वापरून एकमेकांना अडचणीत आणून वचपा काढायचा आहे. भाजप व शिवसेना या दोन बोक्यांच्या भांडणात कॉंग्रेस-राष्ट्रवादी मलई खात आहेत. महाराष्ट्र भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष अत्यंत युसलेस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सहमत आहे

मुक्त विहारि
Sat, 02/13/2021 - 18:50 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नक्की काय झाले?

सॅगी
Sat, 02/13/2021 - 14:01 नवीन
Canada भाषा बदलली की जमिनीवर आले?
  • Log in or register to post comments

कॅनडाला पूर्ण रडवायला हवे

चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/13/2021 - 14:07 नवीन
कॅनडाला पूर्ण रडवायला पाहिजे. फार माजलेत लेकाचे. ना आर्थिक सुपरपॉवर, ना लष्करी सुपरपॉवर, ना तंत्रज्ञानातील सुपरपॉवर, कायम अमेरिकेची शेपूट म्हणून राहण्यात धन्यता मानणारा देश नक्की कोणत्या आधारावर हुषार्‍या करतो? कित्येक दशकांपासून कॅनडाने खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. त्या देशाला सरळ करायलाच पाहिजे. जस्टीन ट्रुडो तीन-चार वर्षांपूर्वी भारतात आला होता तेव्हा मोदींनी त्याची फार दखल घेतली नव्हती. यापेक्षा जास्त कडक धोरण कॅनडाबरोबर ठेवायला पाहिजे असे वाटते. तथाकथित शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची पूर्ण किंमत वसूल करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

ते काय नळ वरल भांडण आहे काय,देशा देशात मतभेद असतात म्हणून कोणी स

Rajesh188
Sat, 02/13/2021 - 20:18 नवीन
मतभेद असतात देशात मग कोणी संबंध तोडत नाही असे वागायला लागले तर एक दिवस ऐकट पडाल, कधी maure होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हा सल्ला या ग्रुपबद्दल

पिनाक
Sat, 02/13/2021 - 20:26 नवीन
हा सल्ला या ग्रुपबद्दल तुम्हाला स्वतःला द्यायला हवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कॅनडाला कोरोना प्रतिबंधक लस

श्रीगुरुजी
Sat, 02/13/2021 - 14:29 नवीन
कॅनडाला कोरोना प्रतिबंधक लस भारताकडून हवी आहे. त्यामुळे भाषा बदलली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

असे काय नसते

काळे मांजर
Sat, 02/13/2021 - 17:13 नवीन
पाकिस्तानलाही फुकट लस मिळणार आहे वर्गात लाडू आणले की दन्गा करणार्यालाही देतातच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हं

सॅगी
Sat, 02/13/2021 - 17:30 नवीन
लाडू खाऊन फुकटेगिरीही करायची आणि नंतर लाडू देणार्‍याविरोधात बोंबही मारायची असा दुतोंडीपणा आहे तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळे मांजर

त्या दंगा करणाऱ्या पोराबद्दल

बाप्पू
Sat, 02/13/2021 - 20:45 नवीन
त्या दंगा करणाऱ्या पोराबद्दल मांजर खूप प्रेम बाळगून आहे. कितीही केले तरी त्यांचे हृदय तिकडेच असते. मांजर शरीराने फक्त इथे आहे कारण एवढं चांगल दूध आणि इतर खाऊ इथेच भेटतो ना. पण मन मात्र "तिकडे" गुंतलेले असते. गद्दार ते गद्दार च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

कसले गद्दार?

काळे मांजर
Sat, 02/13/2021 - 21:47 नवीन
बिल गेट फाउंडेशन , क्लिंटन ट्रस्ट पैसे गोळा करून कुणाकडून तरी स्वस्तात लस खरेदी करून पाकिस्तानला देणार आहेत पेपरात आले आहे हे कुणीतरी म्हणजे आपणच असणार आहोत बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

पण

काळे मांजर
Sat, 02/13/2021 - 22:33 नवीन
आपली जनता का विकत लस घेणार ? लस का सशुल्क असेल ? पीएम केअर फंड संपला का? ---- कुणाला तरी लस पोचली तर मोदी म्हणजे हनुमान म्हणून कुणीतरी ट्विट केले होते म्हणे मायबोलीवरचे लोक नाचत होते , पाकिस्तानला लस देऊ नये म्हणून मी म्हटले असे होत नाही , हू , बिल गेट , क्लिंटन ट्रस्ट कुणीतरी घेऊन त्यांना डोस देणार ( गेली 2 दशके एच आय व्ही प्रोग्रॅम जगभर असाच सुरू आहे , त्यावरून मी अंदाज केला ) आणि दोन दिवसानंतर तसेच घडल्याची बातमी आली https://www.gatesfoundation.org/How-We-Work/Quick-Links/Grants-Database/Grants/2020/04/INV-015719 धनगरी औषधाने माझा गुढगा तल्लख झाल्याबद्दल बाळूमामास दंडवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळे मांजर

.

काळे मांजर
Sat, 02/13/2021 - 22:45 नवीन
पाकिस्तानला लस देणे गरजेचे आहे काँग्रेसच्या काळात अतिरेकी आले तरी आर्मी व पोलीस त्यांना ठार करत होते , कोर्ट फाशी देत होते भाजपवाले पकडलेला मसूद पुन्हा सोडून येतात , त्यामुळे भाजपवाले राहिनात का मागे , पण पाकडे सगळे व्हेकसिनेट करणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळे मांजर

काळे मांजरसाहेब (का बाईसाहेब?)

भंकस बाबा
Sun, 02/14/2021 - 00:05 नवीन
मसूदवर याआधीही चर्चा झाली आहे मसूद सोडला असेल तर काँग्रेसने सोडलेले अतिरेकी पण काही कमी नाहीत. शिवाय तामिळी टायगर आणि खलिस्तानवादी ही काँग्रेसचीच अपत्ये आहेत. आता उरली बात ती लस पाकिस्तानला पुरवण्याची! इथे पण मोदींनी गुगली टाकली आहे. 25 करोडच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पापिस्तानात काही लाख लसी मोफत पाठवल्या आहेत. साहजिकच त्या मिळवण्यासाठी तुतूमैमै होणार! गमतीची गोष्ट अशी आहे की पाक ह्या लशींचा पूरवठा सिंध, पंजाब, स्वात प्रांतात कधीच करणार नाही. त्यामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ह्या भागात अजून असंतोष धुमसणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळे मांजर

१८० प्रवाशांचा जीव

श्रीगुरुजी
Sun, 02/14/2021 - 08:43 नवीन
१८० प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी तडजोडीशिवाय इतर कोणताही पर्याय भारताकडे नव्हता, यावर मिपावर सविस्तर चर्चा झाली आहे. बाकी हजरतबाल मशिदीला लष्कराने वेढा घालून आत अडकविलेल्या ६ अतिरेक्यांना हलवापुरी, बिर्याणीची मेजवानी देऊन सुखरूप पाकिस्तानला जाऊन देणे, युनियन कार्बाईडच्या अँडरसनला खास विमानाने भोपाळहून दिल्लीत आणून राष्ट्रपतींंबरोबर मेजवानी देऊन सुखरूप अमेरिकेत पाठवणी करणे, क्वाट्रोचीमामाला सुखरूप भारतातून इटलीला पाठवून त्याच्या खात्यातील दलालीचे ४० लाख डॉलर्स मुक्त करणे या कॉंग्रेसी काळात झालेल्या गैरकृत्यांचा अंध भक्तांना सोयिस्कर विसर पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

-१

शा वि कु
Sat, 02/13/2021 - 22:07 नवीन
प्रतिसाद आवडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

सामान्य लोकांना लस मुफ्त उपलब्ध होणार नाही

Rajesh188
Sat, 02/13/2021 - 17:42 नवीन
सामान्य लोकांना मुफ्त लस दिली जाईल अशा थापा मारणाऱ्या सरकार नी पलटी मारलेली आहे सामान्य लोकांस मुफ्त मध्ये लस दिली जाणार नाही.ती सशुल्क असेल.
  • Log in or register to post comments

छान

काळे मांजर
Sat, 02/13/2021 - 18:19 नवीन
आमचा पहिला डोस फुकट झाला 5 फेब्रुवारीला 3 दिवस दुखले एकदम विकनेस येतो आता काय त्रास नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

लस

सॅगी
Sat, 02/13/2021 - 19:04 नवीन
लस दंडावर घेणे हा एकच पर्याय आहे का? कमरेवर दिली तर कमी दुखेल नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळे मांजर

लस का सशुल्क असेल ? पीएम केअर

आग्या१९९०
Sat, 02/13/2021 - 22:17 नवीन
लस का सशुल्क असेल ? पीएम केअर फंड संपला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सरकार कडेच

Rajesh188
Sat, 02/13/2021 - 20:12 नवीन
त्याची माहिती असेल ,दंडावार ध्यायची की खुब्यावर,
  • Log in or register to post comments

काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन

चंद्रसूर्यकुमार
Sat, 02/13/2021 - 22:29 नवीन
२०२२ पर्यंत काश्मीरी पंडितांचे काश्मीर खोर्‍यात पुनर्वसन केले जाईल असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. जोपर्यंत काश्मीरी पंडित त्यांच्याच देशात निर्वासिताचे जीणे जगत आहेत तोपर्यंत आपल्याला सेक्युलर म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही. काश्मीरी पंडितांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काच्या घरी जायला मिळावे ही अपेक्षा. त्याबरोबरच काश्मीर खोर्‍याला देशाच्या इतर भागाला जोडणारा रेल्वेमार्ग बनवला जाईल आणि २५ हजार नोकर्‍या काश्मीर खोर्‍यात निर्माण केल्या जातील असेही ते म्हणाले. आताची तरूण पिढी काश्मीर खोर्‍यात परत जायला कितपत उत्सुक असेल याची कल्पना नाही. पण ज्या भूमीतून त्यांच्या आधीच्या पिढ्यांना काश्मीरी दहशतवाद्यांनी हुसकावून लावले तिथे त्यांचे घर त्यांच्या नाकावर टिच्चून व्हायलाच हवे. https://timesofindia.indiatimes.com/india/governments-2022-jk-plan-resettlement-of-kashmiri-pandits-25k-jobs-train-link/articleshow/80899281.cms?fbclid=IwAR0roeR6LURyNVhvkBPcnlDl6EOWIB0WucC-WoeYVIOk5gQY90bio9la6dw
  • Log in or register to post comments

काळया बोक्याच्या

बाप्पू
Sat, 02/13/2021 - 22:35 नवीन
काळया बोक्याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

छान

काळे मांजर
Sat, 02/13/2021 - 22:37 नवीन
काश्मिरी पंडित प्रकरण झाले तेंव्हा केंद्रात भाजप व व्हीपिसिंगच होते आता शहा त्यांचे पुनर्वसन करतील तर चांगली गोष्ट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

राजकारणी लोकांच्या बोलण्यावर

Rajesh188
Sat, 02/13/2021 - 22:54 नवीन
राजकीय लोकांच्या बोलण्यावर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे कोणीच गंभीर पने बघत नाही.मिपाकर लोकांना भलताच विश्वास आहे अमित शह वर. अमित शाह बोलले ते अमलात येईल च ह्याची 1 टक्का पण खात्री नाही. आणि हे बसलेत बाशिंग बांधून. काय म्हणावे ह्या लोकांना. अजुन 15 लाख काही आले नाहीत अकाउंट मध्ये. दाऊद ला पण फर्फडत आणणार होते . तो उलट आता जास्त बिन्धास्त आहे त्याला माहित हे कुचकामी सरकार आहे. निरव आणि मोदी करोडो घेवून गेले ते तिकडे मस्त लाइफ एन्जॉय करत आहेत. महागाई कमी करणार होते आतापर्यंत च्या भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त महागाई आता आहे. काळे धन अजुन सफेद होत नाही. एक नाही हजारो आश्वासन आणि मोठ मोठ्या गप्पा ह्या सरकार नी मारल्या . आणि 0 पूर्ण केल्या. Thapade सरकार आहे. चीन ल काही तरी देवून त्यांना माग पाठवण्याचे नाटक केले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

कसं काय हो ...

सुक्या
Sun, 02/14/2021 - 03:30 नवीन
अजुन 15 लाख काही आले नाहीत अकाउंट मध्ये. मल तर ते ३ वर्षापुर्वीच मिळाले. तुम्हाला कसे नाही मिळाले अजुन? बँक अकाउंट वगेरे ठिक आहे ना? केवाय सी केली का? बँकेत जाउन एकदा विचारुन या. मला मिळाले आहेत. माझा रेफरंस दिला तरी चालेल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा