✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चंद्रायण..!

स — सत्यजित..., Wed, 12/02/2020 - 16:50
ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार! पाहून चंद्र-मेळा, क्षितिजास ये उमाळा... नक्षत्र बांधतात तारांस एक-तार! स्वप्नील चंद्र-गाणे मधु-मीलनी उखाणे... गातात फूल, वारे छेडीत गंध-तार! एकांत चंद्र-वेडा, वितळून जात थोडा... देतो अनामिकेला अलगूजशी पुकार! उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार! — सत्यजित

प्रतिक्रिया द्या
12723 वाचन

💬 प्रतिसाद (16)

मस्तच.

कानडाऊ योगेशु
Wed, 12/02/2020 - 20:29 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोड

Bhakti
Wed, 12/02/2020 - 20:44 नवीन
पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोड ! उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार!
  • Log in or register to post comments

वाह!

चांदणे संदीप
गुरुवार, 12/03/2020 - 00:47 नवीन
अप्रतिम, नितळ! सं - दी - प
  • Log in or register to post comments

सुरेख

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 12/03/2020 - 08:43 नवीन
कविता अतिशय आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+१

गोंधळी
गुरुवार, 12/03/2020 - 09:30 नवीन
मस्त 👍
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Fri, 12/04/2020 - 09:24 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!

प्राची अश्विनी
Fri, 12/04/2020 - 11:09 नवीन
अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

सनईचौघडा
Sat, 12/05/2020 - 08:09 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Mon, 12/07/2020 - 20:39 नवीन
धन्यवाद प्राची, सनईचौघडा!
  • Log in or register to post comments

आवडली रे!

राघव
Mon, 12/07/2020 - 21:32 नवीन
अलवार रचना! सुंदर. :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Fri, 12/11/2020 - 16:15 नवीन
धन्यवाद राघव!
  • Log in or register to post comments

सुंदर

धनावडे
Fri, 12/11/2020 - 16:54 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

सुरेख!

रुपी
Fri, 12/11/2020 - 17:59 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Sun, 12/13/2020 - 23:15 नवीन
धन्यवाद धनावडे, रुपी!
  • Log in or register to post comments

मस्त!

तुषार काळभोर
Sun, 01/03/2021 - 16:30 नवीन
अतिशय तरल. उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार! मीटर पण छान मेन्टेन केलाय.
  • Log in or register to post comments

_/\_

सत्यजित...
गुरुवार, 01/07/2021 - 17:44 नवीन
धन्यवाद तुषार!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा