Skip to main content

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 20/08/2017 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 231133
प्रतिक्रिया 589

प्रतिक्रिया

In reply to by हेमंतकुमार

डिझेल थेट न जाळता भारिका वापरल्याने स्थानिक प्रदूषण कमी होते. असं वर्णन हवं होतं. पण ठीके. योग्य पाऊल उचलल्याबद्दल रेल्वेचं अभिनंदन. -गा.पै.

सुमो, सुरेखच ! येउद्यात अधूनमधून असेच फोटो.

रेल्वेतील pantry car डबे बंद होणार ... विचाराधीन त्याजागी ३एसी डबे येणार. >> १४०० कोटींचा महसूल वाढणार. बातमी

डिझेल इंजिने पण पुर्णपणे बंद होणार आहेत. फक्त ईलेक्ट्रिक इंजिने चालणार आहेत भारतभर. त्यासाठी लागणारे ईलेक्ट्रिफिकेशन चे काम चालले आहे. मिटरगेज चे ब्रॉड गेज करताना ईलेक्ट्रिफिकेशन चे काम पण केले जाते आहे.

रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालय सुरु करण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली. त्या संदर्भात 'लोटा' घेऊन उतरलेल्या प्रवाशाचे हे १९०९ मधील पत्र : ok सौजन्य : रेल संग्रहालय

जगातील सर्वात लांब फलाट आता हुबळी स्थानकावर होणार. सध्या गोरखपूरचा फलाट जगातील सर्वात लांब आहे. बातमी :

भारतात अगदी मोजक्या ठिकाणी नॅरोगेज ट्रेन अजून आहेत. त्यापैकी एक कालका ते सिमला या मार्गावर धावते. तिच्यासाठी तयार केलेले हे नवे इंजिन नुकतेच सेवेत दाखल झाले : ok

In reply to by कंजूस

माथेरान ची गाडी नॅरोगेज ची आहे तेथे( किंवा तत्सम डोंगर चढणाऱ्या ठिकाणी उदा काल्का शिमला ) ब्रॉड गेज आणणे शक्य नाही. बाकी सपाटीवर जेथे जेथे मीटर/ नॅरो गेज होते तेथे ब्रॉड गेजमध्ये बदलणे हा युनीगेज प्रकल्प चालू आहेच. उदा मुर्तजापूर यवतमाळ किंवा मुर्तजापूर अचलपूर शकुंतला रेल्वे येथे गेज बदलण्याचे काम चालू आहे.

In reply to by सुबोध खरे

२०१८ मधल्या - https://m.economictimes.com/industry/transportation/railways/railways-t… या बातमीवरून लिहिलं. मीटर गेज बऱ्याच ठिकाणी होत्या. पुर्णा -अकोला-खांडवा-इंदौर या मिटरगेज मार्गावर खांडवा ते ओंकारेश्वर प्रवास केला आहे. गाडी चांगलीच पळवतात.

In reply to by कंजूस

बदलू नका. म्हणजे वडोदरा/बडोदा/बरोडा संस्थानच्या भागातून. नंतर आता २०२० मध्ये काही बदल झाला का माहिती नाही.

In reply to by हेमंतकुमार

त्रास लांबीचा असतो. उंच प्रवाशांना पाय आखडावे लागतात. शिवाय वरच्या साइड अपर बर्थला खिडकी आणि चार्जिंग पोर्टही हवे. (आणखी काही राहिलं का?)

चांगली सूचना. भविष्यात वाट पाहू .... 😀

In reply to by हेमंतकुमार

हि राजधानी गेली २ वर्षे चालू आहे. Indian Railways'Central Railway zone which operates 22221/22222 Rajdhani Express which had its inaugural run on 19 January 2019. https://www.thestatesman.com/india/rajdhani-express-trains-to-run-faste…

AC 3-टियर इकॉनॉमी' नावाचा चौथा क्लास, या श्रेणीसाठी वेगळ्या धाटणीचे कोच यामध्ये प्रत्येक प्रवाशासाठी एक वेगळा एसी डक्ट दिला गेला आहे. ज्याला प्रवाशी आपल्या सोयीनुसार सुरु अथवा बंद करु शकतो. >>>> हे छानच ! https://marathi.abplive.com/news/india/indian-railways-new-ac-3-tier-ec…

'मेल-एक्सप्रेस'मध्ये मोबाईल चार्जिंग विसरा ; रेल्वे मंत्रालयाने घेतला हा महत्वाचा निर्णय : रात्रीच्यावेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोबाईल चार्जिंगसाठीचा वीज पुरवठा बंद ठेवण्याबाबत रेल्वे मंत्रालय विचार करत आहे.

In reply to by हेमंतकुमार

स्तुत्य निर्णय. चार्जींग सुविधा नसेल तर इअरफोन न लावता मोबाईल, लॅपटॅापवर गाणी, सिनेमा लावुन ईतरांना त्रास देणारया उपटसोंड्यांना थोडा तरी आळा बसेल. फार डोक्यात जातात हे लोक.

In reply to by हेमंतकुमार

हा खरा प्रश्न आहे. कोणत्याही साइजच्या पिना सॉकेटात घट्ट बसतील असे सॉकेट्स बनवले पाहिजेत. कॉन्टॅक्ट पक्का न झाल्यास स्पिर्कींग होते, कार्बन जमतो हे खरे कारण आहे.

फार डोक्यात जातात हे लोक. >
>>> + १००००००००००० !!

हल्लीच आपल्या रेल्वेचे काही व्हिडियो पाहत होतो ते इथे देतो... मालगाडीच्या गार्ड डब्बा ? हा अतिशय बिनकामाचा डब्बा [ म्हणजेच गार्ड साठीच ! ] टॉयलेट देखील नसलेल्या या डब्यातुन गार्ड कसे प्रवास कसे करत असतील हा प्रश्न मला बराच काळ भेडसवत होता, पणा आता नविन डब्ब्यात ही सोय करण्यात आली आहे. Double Diamond Railway crossing फ्लाइंग बिस्ट चा चॅनल मी अधुन मधुन पाहत असतो यात मला Double Diamond Railway crossing चा व्हिडियो देखील पहायला मिळाला होता. दुसरा देखील देखील माहितीपूर्ण व्हिडियो पाहण्यात आला होता.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- KAKU | काकू | Rap Song by NEHA KULKARNI aka NASTI UTHATHEV | नस्ती उठाठेव | Savage reply to Kaku

चित्रफिती छान !
टॉयलेट देखील नसलेल्या या डब्यातुन गार्ड कसे प्रवास कसे
>> इंजिनमध्येही सोय करायला हवी. सामान्य मेल/एक्सप्रेसचे चालकही बिचारे तसाच प्रवास करतात.

In reply to by हेमंतकुमार

इंजिनमध्येही सोय करायला हवी. सामान्य मेल/एक्सप्रेसचे चालकही बिचारे तसाच प्रवास करतात. अर्रेच्या होय... मालगाडीच्या गार्डचाच इचार करताना इजिंनवाल इसरलो बघा ! :))) बादवे... इंजिन चालु करणे, डब्ब्याचे चाक बदलणे, डब्ब्याचे चाक कसे बनवले जाते इं.. आणि अनेक रोचक व्हिडियो हल्लीच पाहुन झालेत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक पोरगी | Ek Porgi | Full Video Song | Aga Bai Arechyaa 2

भारताच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर बद्दल बरीच माहिती मधे बघितली. एक महाकाय आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट दिसतो आहे. https://www.youtube.com/watch?v=Z6dSYqH8cRo याच्या कमर्शियल फायद्यांबद्दल या क्लिप मधे अजून माहिती आहे https://www.youtube.com/watch?v=mrSgN5ZSaXY पूर्वी मित्राच्या वडिलांकडून त्यांच्या कंपनीचा काही माल मालगाड्यांच्या वॅगन्स मधून कसा जातो. मधेच भुसावळ, जबलपूर वगैरे ठिकाणी साइडिंगला टाकला की किती दिवस राहील पत्ता नसतो. त्यामुळे काही कर्मचार्‍यांना त्या वॅगन्स बरोबर मजल दरमजल करत जावे लागते व त्या त्या गावी राहावे लागते वगैरे मनोरंजक किस्से ऐकले आहेत. या कॉरिडॉर मुळे रेल्वे मालवाहतुकीत नेमकेपणा येइल असे वर्णन वाचले आहे. एकतर नेहमीचे मार्ग मोकळे होतील. दुसरे म्हणजे रेल्वेने माल वाहतूक करताना त्याला लागणारा वेळ वगैरे यात नेमकेपणा आल्याने भारतात नवीन उद्योगांना चालना मिळेल ई. बरेच फायदे दिसतात. एकूणच भारतीय रेल्वेच्या अनेक नवीन क्लिप्स पाहिल्या. धडाक्यात सुरू असलेले विद्युतीकरण, दुहेरीकरण वगैरेबद्दलही. एकूणच खनिज तेलाची आयात यामुळे प्रचंड घटू शकते असे दिसते.

दुवे छान !
धडाक्यात सुरू असलेले विद्युतीकरण, दुहेरीकरण वगैरेबद्दलही. एकूणच खनिज तेलाची आयात यामुळे प्रचंड घटू शकते असे दिसते.
>>> वा, मस्तच...

With the rapid route electrification, Indian Railways has reduced its diesel fuel bill by over Rs 8000 crore in 2020-21, a significant savings for the cash-strapped public transporter. Railways has reduced diesel consumption from 3.06 billion litres in the fiscal 2018-19 to 1.43 billion litres in 2020-21 as more and more diesel locomotives are being replaced with electric ones. https://swarajyamag.com/news-brief/railways-on-electrification-mode-fos…

पण मजा गेली ना. मीटर गेजमध्ये एकदाच बसलोय . खांडवा ते ओंकारेश्वर (रोड). काय वेगात पळवतात. साठ किमी साठ मिनिटांत.

आणि नेरळ-माथेरानची कासवगती सफर तर न्यारीच !

In reply to by हेमंतकुमार

खरोखर कहर आहे इंग्रजांचे ज्ञान आत्मसात केले पण शहाणपण काही शिकलो नाही आपण

In reply to by गॉडजिला

गॉडझिला, इथे इंग्रजी ज्ञानाचा किंवा शहाणपणाचा काय संबंध? लंडनमध्ये अतिवेगामुळे वळणावर ट्राम उलटून अपघात झाला होता. तिथेही ट्रामचालक ट्राम चालवतांना डुलकी लागलेली असतांना पकडला गेला होता. मग इंग्रजांनी इंग्रजांचे ज्ञान आत्मसात केले पण शहाणपण काही शिकले नाहीत असं म्हणायचं का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतीय लोक इंग्रजांप्रमाणे अथवा जास्त मजबूत इमारती अथवा स्टेशने बांधू शकतात पण ती का बांधावीत याचे शहाणपण मात्र दुर्लक्षित करतात

In reply to by कंजूस

हो सर्वात स्वस्त निविदा भरणाऱ्याला कंत्राट दिले जाते. उदा. मुंबईत खड्डा भरण्यासाठी सर्वात स्वस्त निविदा भरणाऱ्याला (L १ ) मागच्या वर्षी कंत्राट दिले गेले त्याचा दर दर घन फुटाला ३७५ रुपये होता. आय आय टी मुंबई च्या अभ्यासाप्रमाणे एक घन फूट खड्डा भरण्यासाठी खर्च ७५० रुपये येतो. आता हेच बघा, सर्वात स्वस्त दरात काम करणारा कंत्राट मिळवण्यासाठी किती पैसे चारणार आणि किती खड्डे भरणार आणि त्यात काय आणि किती सिमेंट भरणार? ? म्हणून २१ व्य शतकात सुद्धा मुंबई सारख्या शहरात खड्डे असणारच.

In reply to by सुबोध खरे

फक्त वाळूवर ठेवतात. पांढूरकी शिंपल्यांची वाळू अधिक चवीला मीठ टाकल्यासारखे शिमिट. डुगडुगु प्रत्येक लादी हलते. आणि हॉटेल, डेअरी,स्न्याकबारवाले दुकान धुतलेले पाणी पुढे काढतात ते या लाद्यात जाऊन अन्न साठते. कुणीही दुकानदार स्वखर्चाने त्या लाद्यांच्या रेघेत थोडे शिमिट टाकत नाही. पावसाळ्यात पुचुक पुचुक पाणी उडते त्या भेगांतून.

SAIL आता युरोपपेक्षा उच्च दर्जाचे लोहमार्ग बनवीत आहे. एक चांगली बातमी

नुकतेच पुणे रेल्वे प्रवासी संघाने अशी एक सूचना केली आहे की डेक्कन क्वीनचा वेग प्रतितास ३०० किलोमीटर करावा ! म्हणजे दिवसात त्याच्या दोन फेऱ्या करता येतील. मात्र घाटरस्ता बघता हे शक्य होईल असे वाटत नाही . त्यासाठी प्रचंड खर्चिक वेगळे लोहमार्ग लागतील हा भाग अजून वेगळा.

In reply to by हेमंतकुमार

परदेशातल्या वेगवान गाड्यांना चारच डबे दाखवलेले असतात, अठरा नाही. दिवसात त्याच्या दोन फेऱ्या करता येतील.?? काम करून परत जाणाऱ्यांना मधल्या वेळेच्या गाडीचा काय फायदा?

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, घाटासाठी नेहमीचा मार्ग वापरता येईल. किंवा एखाददोन अतिरिक्त मार्ग टाकता येतील. अर्थात घाटात गाडी अत्यंत हळू चालणार हे नक्की. मुंबई ते कर्जत अर्धा तास, कर्जत ते खंडाळा अर्धा तास व खंडाळा ते पुणे अर्धा तास असं वेळापत्रक राहील. किंवा मग लांबलचक बोगदा बांधून घाटाचा उतार यथोचित बनवणे हा ही पर्याय आहे. कल्पना चांगली आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अर्धा तासाच्या अंतराने. पहिली मुंबई छत्रपती महाराज टर्मिनस ते पुणे स्टेशन. दुसरी दादर ते शिवाजीनगर.

जुनी चित्रफित छान आहे ! गाडीची इंग्लिशमधील घोषणा ' पूना बॉम्बे' अशी, गोल हॅट घातलेले तिकीट तपासनीस, डब्यामध्ये एखादा सिगरेट ओढणारा पुरुष, विणकाम करणार्‍या स्त्रिया आणि अशी इतर अनेक दृश्य छान वाटली...

ही डेक्कन क्वीन म्हणजे पुलंनी म्हंटल्याप्रमाणे "आपल्या परिवारात तिसर्‍या वर्गाचा स्वीकार" करण्याआधीची वाटते. एकदम रॉयल लुक आहे. ब्रिटिश चित्रपट/सिरीज मधे त्यांच्या गाड्या जशा दाखवतात तशी वाटते. इथे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट आहे पण त्यात म्हंटल्याप्रमाणे निळी लायव्हरी असावी. ती नंतर मग बहुधा ७० च्या दशकात निळी/पांढरी किंवा निळी/पिवळी झाली. डब्यांशी जुळणारी रंगसंगती असलेले डब्ल्यूसीएम इंजिन असताना जशी ती देखणी दिसत असे तशी आता दिसत नाही. मध्यंतरी तिला पुन्हा नवीन लुक देणार असे वाचले होते. पण अजून दिसला नाही. तेव्हा ती ७:२५ ला निघत असे यावरून दिसते.

बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विमानासारखी शौचालये बसवली आहेत. खरंच छान झाले ! आता अनुभव बघायला पाहिजे......

In reply to by हेमंतकुमार

ते म्हणजे...
The newly installed vacuum-bio-toilets are susceptible to get choked as passengers dump cigarette butts, gutka pouches, plastic water bottles, plastic covers, liquor bottles, and food waste into it.

असे व्हायला नको रे !

In reply to by हेमंतकुमार

आज हिम्मत झाली... हे तुम्ही उपप्रतिसाद लेखाला मुख्य प्रतिसाद लिहल्याप्रमाणे स्वतंत्र देण्यामागचे नेमके गमक काय ? की हे मिपाच्या काही जुन्या संस्कृतीशी साधर्म्य राखते ज्याच्या प्रचलीतपणाशी माझा अजुन समागम झालेला नाही ?

In reply to by गॉडजिला

नाही हो, मला एवढा बारकावा नाही समजत ! मी आपला तुमचा ताजा प्रतिसाद होता त्याच्या खालोखाल माझा दिला एवढच.

In reply to by हेमंतकुमार

प्रतिसाद द्या शब्दावर क्लिक केले की लिहायचा फॉर्म येतो... इतरवेळी जो फॉर्म दिसतो तो धाग्याच्या मुख्य प्रतिसादासाठी असतो... आपण इतके चतुरस्त्र व्यक्तीमत्व असुनही आपण असे करत होता यावर विश्वास बसला नाही म्हट्लं एकदा विचारावेच हिम्मत करुन की हे प्रकरण काय आहे... कसयं जसं जशी मिपाची ओळख भिनत चालली आहे तसं मिपा अनेक परंपरांच पाईक असल्याची जाणीवही वाढत चालली आहे म्हणून म्हटलं काही तरी जुनं समजायला मिळेल...

स्वित्झर्लंडमधील रेल्वे स्थानकांवरील घड्याळ मजेशीर असते. त्यामध्ये मिनिट = ५८.५ सेकंद असे गणित असते ! का, ते इथे वाचता येईल. ok

भारतातील पहिल्या दुमजली मालगाडीची (double stack ) चाचणी पूर्ण