✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोबाईलमधील डेटा क्लिअर कसा करावा?

व
वेलांटी यांनी
गुरुवार, 07/16/2020 - 16:53  ·  लेख
लेख
माझ्याकडे तीनचार वर्षे जुना सॅमसंग गॅलक्सी ऑनफाईव्ह आहे. मोबाईलमधे स्टोरेज स्पेस कमी आहे. मेमरी कार्डमधेच सर्व डेटा मी सेव्ह करते. मात्र internal storage अतिशय कमी राहिले आहे. एकही नविन अॅप किंवा मोठी फाईल डाऊनलोड होत नाही. Settings-->storage--> अशा पाथने गेल्यास कॅश डेटा आणि miscellaneous असे दोन टाईप्स दिसतात. त्यापैकी कॅश मेमरी डिलिट करता येत आहे आणि नंतर स्पेस वाढलेलीही दिसतेय. मात्र miscellaneous या ऑप्शनपुढे जवळपास 1 GB डेटा use केल्याचे दिसतेय मात्र त्यावर क्लिक केल्यास आतमधे एकही फाईल दिसत नाही. त्यामुळे काही डिलिट करताच येत नाही. याशिवाय हा miscellaneous चा used space दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि मोबाईलची internal memory space कमी होत आहे. हा miscellaneous चा डेटा क्लिअर कसा करावा? आणि मुळात ही miscellaneous memory काय असते कुणी सांगू शकेल काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32022 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

एक लिहायचे राहिले!

वेलांटी
गुरुवार, 07/16/2020 - 17:34 नवीन
ते राॅकेट क्लिनर वगैरे अॅपही वापरून पाहिले पण त्यानेही हा डेटा क्लिअर होत नाहीय.
  • Log in or register to post comments

"All cleaner apps are hoax.

कंजूस
गुरुवार, 07/16/2020 - 18:44 नवीन
"All cleaner apps are hoax. Do nothing as required but only collect your data" ( नेटज्ञान)
  • Log in or register to post comments

महत्वाचा डेटा backup करुन मग

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/16/2020 - 18:58 नवीन
महत्वाचा डेटा backup करुन मग factory reset करुन बघा.
  • Log in or register to post comments

१) पण पुन्हा त्या फाइल्स

कंजूस
गुरुवार, 07/16/2020 - 20:03 नवीन
१) पण पुन्हा त्या फाइल्स वाढतच राहणार त्या कोणत्या ते कसं कळणार आणि घालवणार? २) factory reset ने मेमरी कमी होते का?
  • Log in or register to post comments

फोन जातस्थ करणे

गामा पैलवान
Fri, 07/17/2020 - 17:43 नवीन
कंजूसकाका, जातस्थ ( = फ्याक्टरी रीसेट ) केल्यावर निर्मितीच्या वेळेस असलेली उपरिस्तंभ ( = ऑपरेटिंग सिस्टीम) जशीच्या तशी परत उगवते. सगळे योजकप्रक्रम ( = युजर अॅप्स) नाहीसे होतात. जेव्हा आपण एखादा प्रक्रम स्थापित करतो ( = अॅप इन्स्टॉल करतो), तेव्हा सोबत निर्माण होणारे बदल नोंदविदागारात ( = जर्नल डेटाबेस मध्ये) टिपून ठेवले जातात. तुम्ही नंतर तो प्रक्रम विस्थापित (अन इन्स्टॉल ) केला तरी नोंद व तदनुषंगिक धारिका तशाच राहतात. माझ्या अंदाजे माहितीप्रमाणे अवांतर साठा ( = miscellaneous storage ) वाढण्याचं कारण अनेक प्रक्रम अनेकदा स्थापविस्थापन केल्याने तदनुषंगिक नोंदविदा ठेवणारी धारिका फुगंत आहे. हा प्रकार आयफोनावरही दिसतो. यावर सध्यातरी फोन जातस्थ करणे हा एकमेव पर्याय आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

जातस्थीकरण -

कंजूस
Sat, 07/18/2020 - 10:06 नवीन
जातस्थीकरण -
तुम्ही नंतर तो प्रक्रम विस्थापित (अन इन्स्टॉल ) केला तरी नोंद व तदनुषंगिक धारिका तशाच राहतात. माझ्या अंदाजे माहितीप्रमाणे अवांतर साठा ( = miscellaneous storage ) वाढण्याचं कारण अनेक प्रक्रम अनेकदा स्थापविस्थापन केल्याने तदनुषंगिक नोंदविदा ठेवणारी धारिका फुगंत आहे. हा प्रकार आयफोनावरही दिसतो. यावर सध्यातरी फोन जातस्थ करणे हा एकमेव पर्याय आहे.
होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मराठी भाषेचा जीव घेता काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/18/2020 - 12:58 नवीन
आपला प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. आपण फोनमधे जेव्हा काही अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करतो आणि नंतर कधी तरी काढून टाकतो पण इंतरनल अथवा एक्सटर्नल मेमरीत त्याचे फोल्डर्स आणि त्या फोल्डर्समधे डाटा तसेच पडून राहतो. काही कचरा इंटरनलमेमरी तसाच राहतो त्यामुळे काढून टाकल्यानंतर सर्व फोल्डर्स तपासून तेही डिलीट केले पाहिजेत. कमी मेमरीच्या फोनमधे जागा हा मोठा प्रॉब्लेम असतो तेव्हा आता इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरीची फ्यासीलिटी असलेले फोन निवडावे त्याचबरोबर दोन्हीसीम चालले पाहिजेत हेही पाहिले पाहिजे. रीसेट, फॅक्टरी रिसेट, हार्ड फॉर्मेट, फ्लॅशींग, हे सर्व प्रयोग आता फोन पूर्वीसारखा चकचकाट पाहिजे असे जेव्हा वाटते तेव्हा करावे हे करत असतांना बॅकप काँटेक्ट्स आणि फोटो वगैरे सर्व बॅकप घेऊन ठेवावा. मगच हार्डरिसेट फॉर्मेटच्या नादी लागावे, नसता चकचक करत बसावे लागते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

छान!

तुर्रमखान
Sat, 07/18/2020 - 17:03 नवीन
प्रतिक्रिया तारांकीत करून ठेवलीय. नै, मोबाईलच्या माहितीसाठी नव्हे, मराठीतल्या पर्यायी शब्दांसाठी. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आभार!

गामा पैलवान
Sun, 07/19/2020 - 13:30 नवीन
प्रशंसेबद्दल आभार! :-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुर्रमखान

+१०१ :-D :-D

मन्या ऽ
गुरुवार, 07/23/2020 - 14:51 नवीन
+१०१ :-D :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुर्रमखान

आपले कौतिक

चौकस२१२
Mon, 07/20/2020 - 06:41 नवीन
गा पै ..श्रम घेऊन मराठी प्रतिशब्द वापरल्याबद्दल आपले कौतिक ( मेहनत हा शब्द वापरणार होतो पण तो अरबी/ उर्दू किंवा फारसीतून आला असावा काय?) सहज म्हणून विचारावेसे वाटते कि हे आपण पूर्णपणे शोधून काढलेत कि आंतरजालावर सहज सापडले ..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मेहनत : कष्ट (बहुधा हा शब्द

चौथा कोनाडा
Mon, 07/20/2020 - 11:11 नवीन
मेहनत : कष्ट (बहुधा हा शब्द अरबी/ उर्दू / फारसीतून आलेला नसावा) (आपण रोजच्या व्यवहारातले जे मराठी शब्द समजून वापरतो त्यातले बरेचसे शब्द अरबी / उर्दू / फारसीतून आलेले आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

बहुतसा इधर थोडा उधर ....

गामा पैलवान
Mon, 07/20/2020 - 19:19 नवीन
चौकस२१२, कौतुकाबद्दल आभार! :-) हे सगळं माझंच खटलं. पण कधी अडून राहिलं तर संदर्भासाठी खांडबहाळेवर ( https://www.khandbahale.com/all.php ) शोधतो. जो प्रतिशब्द मिळेल त्याची फोड करून वगैरे पाहतो. त्यातला हवा तो भाग घेऊन आधी ठरवलेल्या गुंफणी (theme ) शी सुसंगत करवून पाहतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

खांडबहाळे साहेब/ गुरुजींनी

कंजूस
Mon, 07/20/2020 - 19:55 नवीन
खांडबहाळे साहेब/ गुरुजींनी खरंच शब्दकोश निर्मिती केली का स्वत: ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

नाही बहुतेक ....

गामा पैलवान
Tue, 07/21/2020 - 13:14 नवीन
कंजूसकाका, माझी ऐकीव माहिती सांगतो. त्यानुसार खांडबहाळे हा एक उमदा तरुण आहे. आंतरजालावर मराठीत उच्च दर्जाचा शब्दकोश निर्माण करावयाच्या ध्यासाने पछाडलेला आहे. तो संकेतस्थळ निर्मितीत पारंगत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मानाचा मुजरा

मराठी कथालेखक
Fri, 07/24/2020 - 16:22 नवीन
सावरकरांच्या नंतर तुम्हीच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

__/\__

गामा पैलवान
Sat, 07/25/2020 - 01:54 नवीन
__/\__ -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

सॕमसंगला हा प्रॉब्लेम मलाही

संजय पाटिल
Fri, 07/17/2020 - 10:34 नवीन
सॕमसंगला हा प्रॉब्लेम मलाही आलेला ...... वर सांगितल्याप्रमाणे बॕकप घेऊन फॕक्टरी रीसेट करा .....
  • Log in or register to post comments

हा व्हिडो पहा, कदाचित उपयोगी पडेल !

चौथा कोनाडा
Fri, 07/17/2020 - 12:59 नवीन
  • Log in or register to post comments

मोबाईल रूट करून त्यातले नको

महासंग्राम
Fri, 07/17/2020 - 14:11 नवीन
मोबाईल रूट करून त्यातले नको ते ऍप्स उडवले कि बरीच जागा रिकामी होईल. मी सॅमसंग ला करून घेतला होता मला बराच फायदा झाला. नोट : रूट करतांना योग्य पद्धतीने न झाल्यास डेड होण्याचा धोका आहे तेव्हा जाणकार व्यक्तीकडून आपल्या जबाबदारी वर करावा
  • Log in or register to post comments

माझा गॅलक्सी ऑन ७ आहे. मेमरी

माहितगार
Fri, 07/17/2020 - 14:49 नवीन
माझा गॅलक्सी ऑन ७ आहे. मेमरी विषयक सिमिलर प्रॉब्लेम लैकरच येईल अशि शक्यता असताना नेमका उपयूक्त धागा वाचनात आला त्याबद्दल धन्यवाद माझ्या फोनची गेल्या वर्षाभरापासून नेट थोडावेळ चालू राहीला तरी बॅटरी पहाता पहाता गंडते. त्या बॅटरींकरता एक्स्टर्नल चार्जर न मिळाल्याने एक्सट्रा बॅटरी विकत घेऊन ठेऊनही उपयोग होत नाहीए. कुणि सॅमसंगची ऑरीजनल बॅटरी नवी घेण्यास सुचवले आहे करून पहावे लागेल.
  • Log in or register to post comments

त्या बॅटरींकरता एक्स्टर्नल

चौथा कोनाडा
Fri, 07/17/2020 - 17:31 नवीन
त्या बॅटरींकरता एक्स्टर्नल चार्जर न मिळाल्याने ...........
पॉवर बँक हा पर्याय वापरून पाहिला नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

Wifi file explorer app वापरून

कंजूस
Fri, 07/17/2020 - 16:39 नवीन
Wifi file explorer app वापरून तुमच्या फोनमधल्या फाइल्स PC वर पाहता येतात. ( जर त्यातून डिलीट करता आल्या तर एक कायमचा सोपा निर्धोक मार्ग सापडेल. ) Apps मधल्या काही युक्त्या फक्त पेड वर्शनमध्ये ठेवल्या आहेत. तरीही शंभर दोनशे रुपयांत एक खात्रीचा आपल्याकडेच चावी असणारा उपाय मिळणे हे चांगलेच.) ---------------- ब्याटरी भराभर डाऊन होणे - १) ब्याटरी काढता येत असेल किंवा काढण्यासारखी असते त्या फोनासाठी - ब्याटरीचे लीड्स आणि फोनमधील लीडस यामध्ये टच कॉन्टॅक्टस होतात ते साफ केल्याने ८०% सुधारणा होते. २) ब्याटरी फिक्स असणारे फोन्स - - सिन्क्रोनाइजेशन केलेले apps मधले फीचर्स बंद करणे. - apps नोटिफिकेशन्स बंद करणे - whatsapp auto download बंद. - मागच्या बाजूस active राहणारी apps बंद करणे. - थोडक्यात सर्व apps चा ओटो कंट्रोल काढणे. अगदी ट्रुकॉलरचाही. याने फरक झाला तर कोणते app खवट झाले ते शोधणे.
  • Log in or register to post comments

- मागच्या बाजूस active

मन्या ऽ
गुरुवार, 07/23/2020 - 14:59 नवीन
- मागच्या बाजूस active राहणारी apps बंद करणे. हे कसं करायचं? आमचे फोनोबा या कारणासाठी गरम होत असतात.. चार्जिंग सुरू असताना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हाच

आवडाबाई
Sat, 07/18/2020 - 11:22 नवीन
प्रोब्लेम मला पण आला होता. फोन laptop ला जोडल्यावर एका फोल्डर मध्ये बरेच फोटो दिसले, हा फोल्डर फोन वर दिसत नव्हता. असे एखादे फोल्डर आहे का चेक करता येईल.
  • Log in or register to post comments

Factory reset जातस्थ करणे.

कंजूस
Sat, 07/18/2020 - 14:59 नवीन
Factory reset जातस्थ करणे. - Jul 2020 - 5:43 pm | गामा पैलवान ------------ काय झालं की माझे दोन विंडोज फोन्स माइक्रोसॉफ्टने सपोर्ट काढल्यावर लटकले. म्हणजे स्टोरचा सर्वरच उडवला. मग मी भराभर अगदी कामाची apps फोन मेमरीत ढकलली. एसडी कार्डावर भाराभर आहेत ( विंडोजवाले करू देत होते.) तर आता रिसेट मारलं तर माझ्याकडे काहीच राहणार नाही. कारण नंतर कार्डावरची पुन्हा validate करता येणार नाहीत आणि मेमरीतली रिसेटात उडतील. फोनच्या क्याम्राने काढलेले फोटो/विडिओ एका app मुळे वाइफाइ ट्रान्सफर करता येताहेत यावर सगळा भरोसा आहे. क्याम्रे उत्तम आहेत. शिवाय माइक्रोसॉफ्ट ओफिस सूट अजून सिस्टममध्ये जिवंत आहे. या कारणामुळे मी रिसेट करण्याला फार घाबरतो. दुसरे उपाय शोधतो. Android फोनाचे तसे नाही. Apps उडाली तर पुन्हा घेता येतील. फोन पिसीला जोडून जेवढ्यास तेवढेच डिलिट मारणे हाच चांगला उपाय वाटतो. इतर नेटवरचे लेख वाचल्यावर रिसेटचा आणखीच बागुलबोवा वाटतो.
  • Log in or register to post comments

File explorer app वापरले.

वेलांटी
Sat, 07/18/2020 - 16:22 नवीन
जवळपास 250mb डेटा miscellaneous मधून क्लिअर झाला. अजून पाचशे mb आहे. शिवाय मोबाईलमधे system memory मधे app deta ही खूप दाखवतोय. आता मोबाईल लॅपटाॅपला कसा जोडायचा आणि त्यासाठी कोणती केबल लागते( मला नविनच घ्यावी लागेल). शिवाय महत्वाचे म्हणजे एकदा लॅपटाॅपमधे मोबाईलच्या फाईल्स आल्या की या टेम्पररी फाईल्स कशा ओळखायच्या जेणेकरून त्या डिलिट करता येतील.
  • Log in or register to post comments

ते आणखी एक app आहे. एकाच wifi

कंजूस
Sat, 07/18/2020 - 17:40 नवीन
ते आणखी एक app आहे. एकाच wifi वर तुमचा पिसी आणि मोबाईल जोडल्यावर app सुरू करायचे. मग एक address दाखवेल तो पिसीच्या ब्राउजरमध्ये ओपन केला की तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या फाइल्स पिसीवर दिसतात. केबल वगैरे नाही लागत. प्रथम निरिक्षणच करा. फाइल टाइप वगैरे. हळहळू एखादी फाइल कोणती कुठे समजले की काम सोपे होईल. जमलं तर पुढेही हे करता येईल. कारण तशा फाइल्स जमवणे त्या मोबाइलचा गुण असेल. रिसेट मारणे म्हणजे तयारी करा, इकडचे तिकडे फिरवा हे आलेच.
  • Log in or register to post comments

मिपा फोनवर पाहायला

Prajakta२१
Sun, 07/19/2020 - 00:08 नवीन
मिपा फोनवर पाहायला लागल्यापासून storage space running आऊट of space हा message सारखा येतो मिपा ला जास्त डेटा लागतो का? अँप्लिकेशन मॅनेजर मध्ये जाऊन बऱ्याच इनबिल्ट अँप चा डेटा सारखा क्लिअर करत राहावे लागते एवढे ब्राउजिंग नाहीये तरीपण डेटा कुठून येतो काळात नाही you ट्यूब तर बंदच आहे मेल पण नाही तरी पण एवढा डेटा कसा काय दाखवते ? फोन बदलण्याची गरज आहे वाटते सॅमसंग मध्ये सध्या १० च्या आत कुठला चांगला येईल? सॅमसंग m ३१,m २१,m १० मध्ये कुठला चांगला येईल? चर्चेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

हे एक छोटे app फोनची RAM किती

कंजूस
Sun, 07/19/2020 - 09:11 नवीन
हे एक छोटे app फोनची RAM किती वापरली जात आहे ते आणि ब्याटरी टेंपरेचर वगैरे दाखवते simple system minister ( by darshan parajuli ) तर available RAM पाहा. वेबसाईटवर लेख edit करण्यासाठी ,किंवा विडिओ editing साठी RAM वापरली जाते. Memory मध्ये जागा असेल तर app डाऊनलोड करता येईल. _________________ M series phones मध्ये जाहिरातींना जागा देऊनफोन्स स्वस्त केल्यासारखे केले आहे. क्याम्रा डब्बा. असा रिव्यु आहे.
  • Log in or register to post comments

*system moniter*

कंजूस
Sun, 07/19/2020 - 09:12 नवीन
*system moniter*
  • Log in or register to post comments

कधी कधी गुगल क्रोम खुप स्पेस

सिरुसेरि
Mon, 07/20/2020 - 15:19 नवीन
कधी कधी गुगल क्रोम खुप स्पेस खातो . अशा वेळी settings-->apps-->google chrome--> clear cache --> clear data अशा प्रकारे स्पेस मोकळी होते . norton , 360 हि अ‍ॅप वापरुन जंक फाईल्स काढु शकता .
  • Log in or register to post comments

आता android ८ पासून ती क्याश

कंजूस
Mon, 07/20/2020 - 15:58 नवीन
आता android ८ पासून ती क्याश {एकादमात} काढण्याची कामं करणारी apps चालणार नाहीत अशी व्यवस्था केली आहे. असं एकेक app पकडून लोकर ( क्याश) काढावी लागते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा