@काही कळ्ळं नाही....
वरदाताई, ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे.
असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच.
>>वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.)
तरी बरं की या वरदाबाईंचे आडनाव वैद्य नाही.
वैद्यबुवांचे तर्कट आवडले.
असे विनोद अजून अनुभवायला मिळाले तर आपल्या चेह-यावर खळीसंगे हास्य फुलतं... व आपण आनंदलो आहोत ह्या जाणीवेनेच समाधान वाटतं... येऊद्यात अजून काही विनोद(भावार्थासकट द्या - आम्हांला काहीच 'कळ्ळे' नाही असे होता कामा नये)
शूलिजातः कदशनवशाद भैक्ष्ययोगात्कपाली
वस्राभावाद्गगनवसन स्नेहशून्याज्जटावान
इथ्थम राजन्स्तवपरिचयात इश्वरत्त्वमयाप्तम
तस्मान्मैह्यम किमिति क्रुपया नार्धचंद्रम ददासि
भावार्थ : ( कवी राजाकडे मदत मागत असावा)...( हे राजा बघ माझे कसे हाल झाले आहेत, )अन्न नाही, वस्त्र नाही, तेल नसल्यामुळे केसांच्या जटा झाल्या आहेत्,म्हणजे मी ईश्वरत्त्वालाच पोचलो आहे (मी जणू जटाधारी शंकर झालो आहे)..तर मग हे राजा तू मला ( एकच गोष्ट उरली ती म्हणजे) अर्धचंद्र का देत नाहीस?...( याचा दुसरा अर्थ म्हणजे मला हाकलून का देत नाहीस?)
अवांतर : संस्क्रुत शुद्धलेखन मिष्टेक्ससाठी माफी असावी... बर्याच वर्षांनी लिहितोय ...
पुरा कवीनाम् गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः
अद्यापितत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव
भावार्थ : पूर्वी एकदा कवींची गणना करताना ( करंगळीपासून मोजणी सुरू केली) प्रथम स्थान कालिदासाला दिले गेले. पण अजूनही कालिदासाच्या तुलनेचा कवी नसल्यामुळे ( शेजारील बोटाचे )अनामिका हे नाव सार्थ झाले.
हे अगदी फ़ेमस आहे...
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन
अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख
भावार्थ : हे ब्रह्मदेवा, ( माझ्या नशिबात) बाकी काहीही वाईट लिही , ते मी सहन करेन पण अरसिक माणसाला कवित्त्व शिकवण्याचे काम माझ्या माथी नको लिहूस ,नको लिहूस ,नको लिहूस....
अस्माकम् बदरीचक्रम् युष्माकम् बदरीतरु:
बादरायणसंबंधात् यूयम् यूयम् वयम् वयम्
भाषांतर : आमच्या ( बैलगाडीचे)बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड...
( मात्र) बादरायणसंबंधामुळे तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत.............
भावार्थ : हा प्रवासी बैलगाडीतून आपली फ़ॆमिली घेऊन निघालाय आणि मुक्कामाच्या जागी दूरदूरच्या ओळखी काढून, संबंध जोडून फ़ुकटात मुक्काम करायची आणि पाहुणचार झोडायची कला त्याला चांगली साधली आहे.....म्हणून पहिल्या ओळीत फ़ुकट्या प्रवासी म्हणतो, " आमच्या बैलगाडीचे बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड...आपला मोठा संबंध आहे"त्यावर तो खमक्या यजमान दुसया ओळीत म्हणतो, "आपल्यात असले ओढून ताणून नातं क्रिएट करू नका , हा असला बादरायणसंबंध आहे आणि तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत...थोडक्यात चालू पडा..."
वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.)
अहो हा विनोद आहे असं तुम्हाला वाटलं म्हणजे सगळ्यांनाच वाटेल असं नाही खरं ना?
असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच.
गरज नाही वाटत मला...कळ्ळं नाही म्हणजे त्यात कसलाच विनोद वाटला नाही असं म्हणायचं होतं मला...
ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे.
आता ते तुम्ही बघा बुवा मी प्रामाणिक प्रतिसाद दिला...
बाकी सतलज यांचं सुभाषित आवडलं माझी आजी असं काहीसं म्हणंत असल्याचं आठवतंय छान सुभाषित आणि भावार्थही छान दिलाय....आणि मी यांचं सुभाषित आमच्या नववीच्या पुस्तकातलं खुप वर्षांनी वाचून छान वाटंलं.....
तातेन कथितं पुत्र |
पत्र लिख ममाज्ञः |
न तेन लिखितं पत्र |
पितुराज्ञा न लंघिता ||
बापाने पोराला सांगितले, माझ्या आज्ञेनुसार पत्र लिही. पोराने पत्र लिहिले नाही आणि बापाची आज्ञाही उल्लंघली नाही !!
आता हे कसे ?
तातेन कथितं पुत्र |
पत्र लिख ममाज्ञः |
नतेन लिखितं पत्र |
पितुराज्ञा न लंघिता ||
नतेन = नम्रपणाने.
टीप : संस्कृत लिखाण हे स्मरणशक्तीच्या आधारे केले आहे. चुका आढळल्यास समजून घ्या आणि शक्य असल्यास सुधारून ध्या, ही विनंती.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
मला
छान आहे
अरेरे
सहमत..
हा हा हा
तरी बरं की
हाहाहा..
मस्तच
शूलिजातः
अवांतर :
मृ --- mRu--- असे
पाय मोड्या म.....!
पायमोड्या म
अर्धचंद्र
वैद्य राज
पायमोड्या जमलं बरंका... म्
अजून एक आठवलं
बादरायण संबंध
हा हा
ढेकणाचा प्रताप
एकदम मस्त
काय म्हणता?
श्लेश