✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sat, 06/13/2020 - 13:06
पेरणा अर्थातच (जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती ) मुलगी घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून. फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा आठवड्याची भाजी, मसाले, लोणची.. बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू.. तुझ्या हातचे लाडू याला फार आवडतात असे म्हणून केलेले दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड.. कधी ब्यागेत भरते कोण जाणे! विस्कटून ठेवलेला असतो बेड. उशांचे अभ्रे, अंथरूण पांघरूण मग मी टाकते धुवायच्या कपड्यात, कपाटात तेवढा शिल्लक असतो डोकेदुखीचा बाम, डायबेटीसच्या गोळ्यांची पाकिटं. ड्रॉवरमधला पर्फ्युम, क्रीम वगैरे " हे मी घेते ग.... तुला काय करायचंय?" असे म्हणत ब्यागेत गेलेले असते मागे उरतात नातींची नावं लिहून ठेवलेली रिकामी पाकिटं.... कपाटा खाली सरकवलेली अन हमखास विसरलेली टेलर ची शिलाई .. मला आठवतात तिने फोनवरुन नवऱ्याशी उगाच घातलेले वाद आणि मग त्याचा आमच्यावर काढलेला राग तिचा चढलेला आवाज अन् उगाच त्याला केलेली दमदाटी . निघताना सामान ठेवायच्या गडबडीत राहिलेच की असे म्हणता सोयीस्कर न केलेला नमस्कार, मिठी.. हुश्य गेली एकदाची असे म्हणत मी जरा पडते तेवढ्यात फोन वाजतोच, पोचले सांगायला नाही काही... तर "ती नवी पैठणी पॉलिश करून दुकानदार घरी आणून देईल मी त्याला थोडे पैसे दिले होते बाकीचे दे आणि पैठणी कुरीयरने इकडे पाठवून दे मला गणपतीत घालायला हवी आहे...." हे सांगायला... मुलगी घरी जायला निघते आणि मी एकदाची मोकळी होते.. (निर्भीड सत्यवादी ) पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
12588 वाचन

💬 प्रतिसाद (15)

:):)

प्राची अश्विनी
Sat, 06/13/2020 - 15:24 नवीन
वाटच पहात होते तुमच्या विडंबनाची. पण मला वाटले बायकोवर येईल. विडंबन छानच.
  • Log in or register to post comments

काय सांगू?....

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/13/2020 - 16:15 नवीन
पण मला वाटले बायकोवर येईल
तेच लिहिणार होतो पण बायकोने परवानगी दिली नाही, मग विषय बदलावा लागला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

भारी हो पैजारबूवा...

सतिश गावडे
Sat, 06/13/2020 - 16:18 नवीन
अगदी अचूक वर्णन केलंय. :)
  • Log in or register to post comments

:) :)

अनन्त्_यात्री
Sat, 06/13/2020 - 16:44 नवीन
मुलगी नसल्याचे समाधान वाटायला घाऊक कारणे पुरविलीत.
  • Log in or register to post comments

मस्त.. :-))

गणेशा
Sat, 06/13/2020 - 16:57 नवीन
मस्त.. :-)) मज्जा आली मला आजच वाटले होते, विडंबनाचा धागा काढावा.. पण मला स्वतालाच विडंबन येत नाहीत जास्त.. म्हणुन अजून काढू का नको या विचारात आहे.. विडंबन करणाऱ्यांचा मला हेवा वाटतो.. आपल्याला जमत नाही म्हणुन..
  • Log in or register to post comments

माऊली माऊली

अभ्या..
Sat, 06/13/2020 - 18:01 नवीन
माऊली माऊली आमचे डोके तुमच्या पाऊली
  • Log in or register to post comments

+1

मूकवाचक
Sat, 06/13/2020 - 20:06 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=)) लैच भारी

प्रचेतस
Sun, 06/14/2020 - 06:34 नवीन
=)) लैच भारी
  • Log in or register to post comments

एकदम हुच्च!!

तुषार काळभोर
Sun, 06/14/2020 - 07:04 नवीन
नेहमी सत्य तेच लिहिणारे माऊलींचे पैजार..
  • Log in or register to post comments

=))

मन्या ऽ
Sun, 06/21/2020 - 10:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments

सत्यवचन!! _/\_

एस
Sun, 06/21/2020 - 10:52 नवीन
सत्यवचन!! _/\_
  • Log in or register to post comments

:) बेस्ट!

रातराणी
Sun, 06/21/2020 - 11:00 नवीन
:) बेस्ट!
  • Log in or register to post comments

:-)

गोंधळी
Sun, 06/21/2020 - 11:01 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

एक नुसती मजा म्हणून वाचायला

वीणा३
गुरुवार, 06/25/2020 - 01:07 नवीन
एक नुसती मजा म्हणून वाचायला चांगलं आहे. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी आळशी आहोत हे खरं, पण एवढा स्वतःच्याच आईचा गैरफायदा घेतलेला मी तरी नाही बघितला. हल्ली माझ्या आणि इतर बऱ्याच जणींकडे "तू पण बस, मी पण बसते, बाहेरून विकत आणू " हे खूप दिसतं. अर्थात माझा डाटासेट मी बघतिलेल्या घरांपुरता आहे हे मान्य.
  • Log in or register to post comments

जमलंय

मीअपर्णा
गुरुवार, 06/25/2020 - 02:12 नवीन
आताच आधीची कविता वाचली. मस्त जमलंय विडंबन.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा