तू ठरव...
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा
फायदा नात्यात आता फारसा नाही!
एवढा केला खुबीने खूनही माझा
वारही केला असा जो वारसा नाही!
सांगतो आहे जगाला कोण हा वेडा!
मी असा नाही असा नाही असा नाही!
कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना
एवढीही या मनाला लालसा नाही!
तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही...
—सत्यजित
लेखनविषय:
याद्या
12356
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
वाह !
जबराव जबराव जबराव
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kumमस्त आवडली
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही!अप्रतिम....मस्त!!!
अप्रतिम!!
वाह वा!
"हात घे हातात आधी,आरसा नाही!"
धन्यवाद!
वाह!
धन्यवाद!
In reply to वाह! by प्राची अश्विनी
तुमचा फॅन सत्यजित भाऊ