Skip to main content

[कविता' २०२०] - बरसती धारा

[कविता' २०२०] - बरसती धारा

Published on 19/05/2020 - 21:06 प्रकाशित

बरसती धारा




बरसती धारा सरसर झरझर साजण भेटीला निघे साजणी भरभर नाद हा करिती चुकार पैंजण टिपत असेल हा नाद तो साजण नव प्रेमाची मनी नवीच थरथर बरसती धारा सरसर झरझर धारांचा पडदा काही दिसेना कुठे शोधू मी काही कळेना काय करावे कसे मिटेल अंतर बरसती धारा सरसर झरझर ओल्या देही अशी शिरशिरी वाऱ्याची मस्ती चाले भिरभिरी अंतरी प्रेमाच्या लहरी नवथर बरसती धारा सरसर झरझर कुठे असेल तो आतुर साजण झाडामागे तो चतुर साजण आता उबेला ती मिठीच कणखर नको दुरावा आता क्षणभर बरसती धारा सरसर झरझर साजण भेटीला निघे साजणी भरभर बरसती धारा सरसर झरझर


याद्या 12249
प्रतिक्रिया 12

+1

कविता आवडली. चुकार पैंजण, कणखर मिठी अशी आलेली विशेषणे विशेष आवडले

कविता आवडली.

नादरम्य कविता. आवडली. कवी पुरूष आहे हे मात्र नक्की. स्पर्धेच्या निकालात ताडून पहायला हवे. माझा अंदाज सहसा चुकणार नाही. वाट पाहतो.

मी जर विद्यापिठाच्या पुस्तक किंवा अभ्यासक्रम मंडळावर असतो तर एम ए मराठीच्या कवितांच्या अभ्यासक्रमात हि कविता समाविष्ट केली असती.

पाषाणभेद नादरम्य कविता. आवडली. कवी पुरूष आहे हे मात्र नक्की. स्पर्धेच्या निकालात ताडून पहायला हवे. माझा अंदाज सहसा चुकणार नाही. वाट पाहतो. --------------------- वाह क्या अंदाज है !

पाषाणभेद मी जर विद्यापिठाच्या पुस्तक किंवा अभ्यासक्रम मंडळावर असतो तर एम ए मराठीच्या कवितांच्या अभ्यासक्रमात हि कविता समाविष्ट केली असती. ------------------------------------------------------------------ एवढ्या' थोर' प्रतिक्रियेबद्दल आपला खूपच आभारी आहे . मग स्पर्धेत नंबर आला नाही म्हणून काय झाले ? इतरही कवींनी सुरेख लिहिले आहे . ज्या काही मोजक्या सुंदर रचना आहेत त्या सुंदर रचनांमध्ये कवितेचा समावेश व्हायला हरकत नसावी ...