✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मागे वळुन पाहताना..

म — मन्या ऽ, Wed, 05/20/2020 - 21:18
मागे वळून पाहताना.. मागे वळुन पाहताना एक निरागस चेहरा दिसतो मज मनसोक्त खळखळुन हसताना मागे वळुन पाहताना तोच चेहरा दिसतो मज भेदरलेल्या डोळ्यांनी आसपास पाहताना मागे वळुन पाहताना लोकांचे चेहेरे न्याहाळताना तो चेहरा दिसे मज ओंगळवाण्या नजरा सहन करताना मागे वळुन पाहताना ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे पाहिले मी मुखवटे एकावर एक चढवताना मागे वळुन पाहताना स्वतःला आरशात बघताना पाहिले आहे मी स्वतःचीच किळस करताना मागे वळुन पाहताना ते स्पर्श सहन करताना पाहिले आहे मी स्वतःलाच तीळ तीळ तुटताना मागे वळुन पाहताना रोज रोज मरताना पाहिले आहे मी स्वतःलाच नैराश्याच्या खाईत झोकताना मागे वळुन पाहताना आजही जाणवतो तो कोमल हातांचा स्पर्श; केसांमधुन फिरलेला प्रेमाने ओथंबलेला मागे वळुन पाहताना तो स्पर्श अनुभवताना रोखते. अन् हात देते स्वतःलाच जगु पाहते पुन्हा एकदा ती जळमटे दुर करुनी शोधते मी स्वतःलाच.. -दिप्ती भगत (९ मार्च,२०२०)

प्रतिक्रिया द्या
5073 वाचन

💬 प्रतिसाद (5)

छान

कौस्तुभ भोसले
Fri, 05/22/2020 - 00:42 नवीन
छान
  • Log in or register to post comments

कवितेतल्या

चांदणे संदीप
Fri, 05/22/2020 - 08:35 नवीन
कवितेतल्या भावना पोचल्या. सं - दी - प
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मन्या ऽ
Fri, 05/22/2020 - 21:11 नवीन
कौस्तुभ, संदीप आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! वाचकांचे आभार! :)
  • Log in or register to post comments

छान !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/22/2020 - 22:02 नवीन
लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर!

मन्या ऽ
Sat, 05/23/2020 - 07:47 नवीन
लिहिते राहा.>>> नक्कीच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा