लॉकडाऊन: एकोणतिसावा दिवस
लॉक डाऊन मध्ये आवडलेले चित्रपट
गेल्या काही वर्षात नेहमीच्या कॅन्टीन , ऑफिस , मित्र परिवार ह्या मध्ये नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईमच्या अनेक चित्रपटावर आणि विशेतः मालिकांवर चर्चा होत असायच्या , ह्यातील काहीही पाहिलं न गेल्याने एकदा दारू न पिणारा अट्टल बेवड्यांच्या बार मध्ये गेल्यावर जी अवस्था व्हायची तशी माझी अवस्था व्हायची !!
आपआपल्या दैनंदिन व्यवहारातून मस्त पैकी मोठी सुट्टी मिळावी आणि जे जे म्हणून भारी विग्रजी चित्रपट बघायचे आहेत ते पाहावं अशी इच्छा चक्क चीनने कोरोना व्हायरसला जन्माला घालून अप्रत्याक्षरीत्या पूर्ण केली , खर तर सुट्टी नाही मिळाली पण ऑफिसच वर्क फ्रॉम होमच काम संपून वीकांताला एखाद चित्रपट टाकावं असा विचार करून सुरुवात केली , एका मिपाकर मित्राने चक्क नेट फ्लिक्स अकाउंट शेयर केल्यावर दोन्ही पर्याय हाताशी होतेच , आठवडाभर भरपूर व्यायाम , काम , घरातून दैनंदिन व्यवहार आणि विकांताला चित्रपट असे मजेत दिवस काढतो आहे
नमनाला एवढं घडाभर पाणी घालून मुद्द्यावर येतो , पुढे जी लिस्ट दिलीय ते चित्रपट पाहिलेत , माझा जॉनर थोडा थ्रिलर , रोलर कोस्टर , हेरगिरीच्या चित्रपटाकडे आहे , ह्यातले जवळपास ५०% चित्रपट तुम्ही नक्कीच पहिले असतील (नसतील तर नक्कीच पहा) , पुढील लिस्ट बिनधास्त वाचा स्टोरी किंवा कुठली सीक्रेट फोडलेले नाहीये , तसे अजूनही काही पाहिलेत पण हे टॉप ६ चित्रपट ह्याबद्दल सध्या लिहितोय
१) Contagion (२०११) प्राईमवर :- अर्थातच हा चित्रपट न पाहिलेला गेल्या दोन महिन्यात कोणी नसेल तर विरळाच , कोरोना व्हायरसने आज जे थैमान घातलं आहे ते २०११ सालीच चित्रपटात तस च्या तस दाखवलं आहे , चित्रपटातही वटवाघुळात आणि चीन (हो इथेपण हलकटपणा ) व्हायरस पसरतो आणि काय होत ते अर्थातच चित्रपटात पहा
२) Parasite (२०१९) प्राईम वर :- गेल्यावर्षीच ऑस्कर मिळालेला कोरियन भन्नाट चित्रपट , एकदम चकाचक फ्रेम मधील , नाविन्यपूर्ण कथा , एकाच वेळेस अति सामान्य आणि अति श्रीमंत वर्ग ह्यातील सुप्त संघर्ष , हव्यास , लालसा , प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्याची धडपड , आदर , भीती , हिंसा , प्रेम , फसवणूक असे नानाविध रंग आहेत , चित्रपटाचे संवाद सुद्धा अत्यंत सुंदर आहेत एक आवडलेला संवाद देतो आहे
You know what kind of plan never fails? No plan. No plan at all. You know why? Because life cannot be planned. Look around you
३) The Angel (२०१८) नेट फ्लिक्स वर :- सत्य घटनेवर आधारित ,अश्रफ मारवान नावाच्या इस्राईलच्या हेरांची / हेरांना मदत करणारा हा माणुस चक्क इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षचा जावई होता , एकाच वेळेस दोन्ही देशांना मदत कारण किंवा मदत करण्याच्या नावाखाली फसविणे , त्यातून वाढत जाणारी गुंतागुंत ह्याची अप्रतिम कथा आहे
४) Shutter Island (२०१०) प्राईम वर :- लियोनार्डो दि कॅप्रिओ चा अप्रतिम सायको थ्रिलर , टेडी डॅनियल्स आणि चक ऑल एका बेटावर जिथे अत्यंत जातील मानसिक कैदी किंवा रुग्ण ठेवलेले आहेत अश्या ठिकाणी एका पळून गेलेल्या महिलेचा तपास करण्यासाठी येतात , तिथून टेडी मध्ये झालेली मानसिक स्थित्यंतर , बेन किंग्जले आणि मार्क राफालोची अप्रतिम साथ , टेडीचा भूतकाळ त्याला कसा गुंतवून ठेवतो हे नक्की पहाच
५) Argo (२०१२) नेट फ्लिक्स वर :- बेन अफ्लाकचा सत्य घटनेवर आधारित अर्गो एक रोलर कोस्टर चित्रपट आहे , इराणी शाहला ७०च्या दशकात राजाश्रय दिल्याने इराणी जनतेत रागाचा स्फोट होतो आणि अमेरिकन वकिलातीवर रिबेल आर्मी हल्ला करते त्यातून ६ अमेरिकन अधिकारी पळून कॅनडाच्या वकिलातीत आश्रय घेतात , तिथून त्यांना सोडवण्यासाठी एक चित्तथरारक मिशन आखलं जात , क्षणक्षणाला उत्कंठा वाढीविणारा प्लॉट आणि पुढे काय होत ते नक्की पहा
६) Operation Finale (२०१८) नेट फ्लिक्स वर : - दुसरं महायुद्ध संपल्यावर लाखो ज्यू लोकांचं हत्यांच्या आयोजक (Architect ) आणि अर्जेंटिनात लपून बसलेल्या ऍडॉल्फ आइकमनच्या मोसादने केलेल्या अपहरणाची अफलातून कथा , बेन किंग्जले आणि ऑस्कर आइसाक ह्यांची जुगलबंदी ह्यासाठी हा चित्रपट आवडल्या गेला आहे , अक्षयच्या बेबी (हिंदी) सारखे फालतू चित्रपट पाहण्यापेक्षा हा चित्रपट नक्की पहा
ह्या व्यतिरिक्त दा विंची कोड , ब्रिज ऑफ स्पाइज सारखे चांगले चित्रपट पहिले गेलेत , त्याबद्दल नंतर कधीतरी :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान माहिती.
धन्यवाद !!!
तुमच्या आवडीनुसार ..
धन्यवाद
वाह क्या बात.
३) The Angel (२०१८) नेट
मोसाद आणी बोकाशेट
धन्यवाद , मोदक राव डायरेक्ट
काल पंजाब १९८४ हा पंजाबी
turning ब्रेन चित्रपट
The platform आला आहे पाहा
लेखाचा व प्रतिसादांचा सिनेमा
व्वा ..
वाह अश्या प्रतिक्रिया पहिल्या
हेल्लारो पहाण्यसारखा आहे
लॉक डाऊन मधले चित्रपट
डिजिटल फॉर्ट्रेस डॅन ब्राऊनचं
डिजिटल फॉर्ट्रेस डॅन ब्राऊनचं
वल्लि , एंजल्स अँड डेमन्स
बघू पण नकोस, एंजल्स आणि दा
धन्यवाद , वेळ आणि श्रम दोन्ही
सोनी मराठी वर हास्य जत्रा
Death Note
सध्या द वॉकिंग डेड बघतोय,
वा. मस्त लिस्ट आहे.
वा. मस्त लिस्ट आहे.
आज मिळालेली महिती....
मस्त
पॅरासाइट
छान माहिती
LOTR म्हणजे काय हे काही वेळ
ये पीएसपीओ नही जानता ह्या
भारी लिहिले आहे,, अजून लिहीत
तुम्ही सांगितलेला shutter
बघितला आणि आवडला
डॉक्युमेंटरी
छान लिहिलंय, लेख आवडला.