✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लॉकडाऊन: पंचविसावा दिवस

इ
इरसाल कार्टं यांनी
Sat, 04/18/2020 - 07:28  ·  लेख
लेख
"दूधपावडरचा डबाही घे किमान एक" - मी. बायकोच्या मते मी खूपच घाबरत होतो. आधीच दोन तीन महिन्याचे रेशन भरायला सांगितल्याने ती वैतागली होती. पण लॉकडाऊन येणार हे निश्चित आहे हे मी तिला पुन्हा पुन्हा सांगत होतो. "उद्या दुकानातील सगळी पेंडिंग कामं उरकून घे आपण परावापासून दुकान बंद ठेवतोय, अनिश्चित काळासाठी" माझा आणखी एक धक्का त्याच दिवशी तीस एप्रिलपर्यंतच्या फोटोग्राफीच्या सगळ्या ऑर्डर्स रद्द करून झाल्या होत्या . "अख्ख्या जगाची भीती तुम्हालाच" म्हणून तिने अमूल स्प्रेचा डबा बास्केटमध्ये भरला आणि बिल घेऊन आम्ही वाणसामानाची 'गोण' घेऊन निघालो. घरातल्या टीव्हीला केबल कनेक्शन नसल्याने रोजच्या बातम्या पाहणे होत नाही आणि एवढे दिवस थोडेफार ऐकून असली तरी मी तिला खरी परिस्थिती सांगितली नव्हती. त्यामुळे तिची चिडचिड स्वाभाविक होती पण माझी भीतीही अनाठायी नाही हे तिला तिसऱ्याच दिवशी कळले. आम्ही नवरा बायको एक सायबर कॅफे वजा फोटो स्टुडिओ चालवतो, रेल्वे तिकीट, विमान तिकीट, मनी ट्रान्स्फर सारख्या सुविधा देत असल्याने उत्तर भारतीय, कामासाठी प्रवास करणारे हे आमचे मुख्य ग्राहक. त्यामुळे साहजिकच मी इतरांपेक्षा जास्त घाबरलो होतो. आणि माझ्या परिसरातील इतर दुकाने चालू असताना मी दुकान बंद केले. अर्थात हि परिस्थिती फक्त एक दिवसा पुरती रहिलि कारण पोलीस प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी नाक्यावरची सगळी दुकाने बंद करावी लागणार हे जाहीर केले आणि अनेकांची तारांबळ उडाली. आता एवढ्या मोठ्या सुटीत काय करायचे हे मी ठरवून ठेवले होते. वॉचलिस्टमध्ये असलेले फोटोग्राफीसंबंधित असंख्य युट्युब व्हिडीओ आधी पाहायचे आणि युडेमीवर असलेला फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी कोर्स सबस्क्राईब करून पूर्ण करायचा एवढं लक्ष्य होतं कारण रोजच्या कामाच्या वेळात हे शक्य होत नव्हते. त्याचबरोब फोटोग्राफीमध्ये काही प्रयोग करायचेच होते. पण लॉकडाऊन सुरुवातीलावाटलं तेवढं सोपं नसणार हे पहिल्या दोन तीन दिवसांत कळून चुकलं. नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त दिवसेंदिवस कडक होत असल्याने दुकानात जाणे कठीण वाटू लागले. त्यात मी राहात असलेल्या इमारतीतील लोक अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदार वागत असल्याने इथे न थांबता गावातील घरी जावं लागेल एवढं कळून चुकलं. आता गावात इंटरनेटही अगदी स्लो असल्याने फोनवर व्हिडिओ पाहणे कठीण झाले. तसेच घरी असताना मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आपसूकच माझ्यावर येऊन पडल्याने काही शिकायचं झालं तरी त्यात व्यत्यय येत होता. आता शेवटचा एकच पर्याय शिल्लक राहिला होता आणि तो म्हणजे फोटो काढणे. गावात असल्याने एक फायदा झाला होता कि मला मॉर्निंग वॉकला जात येत होते. घरापासून गावचे निवांत असलेले शिवमंदिर दोन किमीवर आहे आणि तिथून नदी एक किमी, येऊन जाऊन सहा किमी चालणं सहज होऊन जातं. सकाळी या अख्या पायपिटीत एकही माणूस भेटत नसल्याने सोशल डिस्टंसिंग वगैरेची चिंता नव्हती. मग सकाळी कॅमेरा, एक १८-५५एमएम ची किट लेन्स आणि एक ५०एमएम लेन्स असं सामान घेऊन रोजची पायपीट सुरु झाली. सुरुवातीला फोटो कश्याचे काढायचे हा प्रश्न होता मन निसर्गाने तो सहज सोडवून दिला. उन्हाळ्यात होणारी वृक्षतोड, वणवे आणि गाव ते नदी असे झालेले रस्त्याचे खोदकाम यामुळे बरीच झाडे तोडली/उपटली गेली होती. आणि या झाडांना आता नव्या जोमाने पालवी फुटत होती. मग मनात तोच थीम ठेऊन रोजचे फोटो काढू लागलो. (सुरुवातीला काढलेले फोटो) 1 2 3 4 ( सुरुवातीला काढलेले सूर्योदयाचे फोटो) त्यातच मधले काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने सूर्योदयाच्या वेळी होणारे प्रकाशाचे खेळ टिपता आले. 5 7 (बॉटल्सचे फोटो) गावातील एका मित्राने मिनरल वॉटर चा कारखाना सुरु केलाय त्याला काही दिवसांपूर्वी त्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे फोटो फ्लेक्स डिझायनरला हवे तसे काढून दिलेले. त्याचे डिझाईन आल्यावर बाटल्यांची पारदर्शकता मनासारखी नसल्याने थोडे यूट्यूबच्या मदतीने 'रिऍलिस्टिक' वाटतील असे डिझाईन बनवून दिले. त्या निमित्ताने 'प्रॉडक्ट फोटोग्राफी'चा सराव झाला. transperant table मूळ फोटो : IMG_8071 (मॉन्स्टर ट्रकचे फोटो) त्यात अजून प्रयोग म्हणून मुलाच्या खेळण्यांपैकी दोन मॉन्स्टर ट्रक्स घेऊन त्यांवरही प्रोडक्ट फोटोग्राफीचा सराव केला. 10 IMG_8420 (मित्रांबरोबर काढलेला लाईट पेंटिंग फोटो)खूप दिवसांपासून लाईट पेंटिंग करायचे होते त्यासाठी बाजारातून साहित्य आणले होते त्याचे प्रोटोटाइप तयार करून काही फोटोग्राफर मित्रांबरोबर लाईट पेंटिंगचे प्रयोग करून बघितले. तेही बऱ्यापैकी यशस्वी झाले. 12 13 (मित्राने काढलेला लाईट पेंटिंग फोटो) आणखी एक फोटोग्राफर मित्राने फोनवरूनच लाईट पेंटिंगबद्दल माहिती घेतली. त्याच्या अडचणी सुधारल्या आणि त्यालाही छानपैकी लाईट पेंटिंग करता आलं. 14 15 (दिव्यांचे फोटो)माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला मान देऊन लावलेल्या दिव्यांचेही दोन तीन फोटो काढलेले. 20200405210221_IMG_8498 20200405210023_IMG_8494-01 अश्या तऱ्हेने लॉकडाऊनचे उनाड दिवस काही प्रमाणात सत्कारणी लावतोय. जसे जमेल तसे आणखी प्रयोग करीनच आणि नीट जमुन आल्यास त्याचेही फोटो एखाद्या नवीन धाग्यावर टाकेन.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22602 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

अरे वाह असे फोटो

चौकस२१२
Sat, 04/18/2020 - 11:23 नवीन
जरूर .. जरूर .. आणि गावाकडचे अजून फोटो टाका... अरे वाह असे फोटो काढता यायला पाहिजेत .... तर मज्जा .. आमची फटोग्राफी म्हणजे ४ थाटला निबंधाच्या प्रतीचे लेख असतात तशी ! शिकलं पाहिजे ...
  • Log in or register to post comments

नक्कीच

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 13:58 नवीन
नक्की टाकेन पण बहुदा लॉक डाऊन नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

जमेल की

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:08 नवीन
थोडा वेळ मात्र द्यायला हवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

सुंदर फोटो

सुबोध खरे
Sat, 04/18/2020 - 11:31 नवीन
सुंदर फोटो
  • Log in or register to post comments

वाह... भारी फोटो आहेत.

सतिश गावडे
Sat, 04/18/2020 - 11:49 नवीन
वाह... भारी फोटो आहेत. विशेषतः नुकतेच आलेल्या पालवीचे फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

निसर्गाची कमाल

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:01 नवीन
हे फोटो लॉकडाऊनच्या सुरुवातीला काढलेत. ते मी सोशल मीडियावर hope या कॅप्शनखाली शेअर केले होते. खरंतर हे फोटो काढताना मला स्वतःलाही खूप सकारात्मकता जाणवत होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सर्वच फोटो आवडले. कसे काढले

कंजूस
Sat, 04/18/2020 - 11:55 नवीन
सर्वच फोटो आवडले. कसे काढले याची उत्सुकता वाढली.
  • Log in or register to post comments

लाईट पेंटिंग

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 13:57 नवीन
लाईट पेंटिंग/लॉंग एक्सपोजर फोटोग्राफी वर धागा काढतो लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फोटो छान आलेत

संजय क्षीरसागर
Sat, 04/18/2020 - 12:41 नवीन
लगे रहो !
  • Log in or register to post comments

धन्स

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:02 नवीन
धन्स हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सुंदर फोटो

ज्योति अळवणी
Sat, 04/18/2020 - 12:42 नवीन
सुंदर फोटो
  • Log in or register to post comments

वाह, सुपरभारी फोटोज !

चौथा कोनाडा
Sat, 04/18/2020 - 12:43 नवीन
वाह, सुपरभारी फोटोज ! इरसालरावांनी प्रकाशखेळच दाखवला जणू ! पु. फो. प्र.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:02 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

फोटो सुंदर आहेत,

सौंदाळा
Sat, 04/18/2020 - 12:55 नवीन
फोटो सुंदर आहेत, प्रतिसादांमध्ये अजून फोटोंची भर घाला. नदीकाठ, शिवमंदिर वगैरे येऊ दे
  • Log in or register to post comments

नक्की

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:03 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

पाण्याच्या बाटलीचे फोटो खुपच

अर्जुन
Sat, 04/18/2020 - 13:04 नवीन
पाण्याच्या बाटलीचे फोटो खुपच मस्त, मागील देखावा कसा बदलला ?
  • Log in or register to post comments

या धाग्याच्या मदतीने

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:05 नवीन
https://youtu.be/uX_iinoB1fA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन

फोटो आवडले.

प्रचेतस
Sat, 04/18/2020 - 13:33 नवीन
फोटो आवडले. ह्या लेखमालिकेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मिपाकरांचे अनुभव वाचणे भलतेच रोचक झाले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:07 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुरेख वर्णन!

Nitin Palkar
Sat, 04/18/2020 - 13:51 नवीन
लेख आणि फोटोज दोन्ही सुंदर!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:06 नवीन
धन्यवाद काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

सगळेच फोटो सुंदर आहेत रे!

केडी
Sat, 04/18/2020 - 14:14 नवीन
सगळेच फोटो सुंदर आहेत रे! असेच पुढे सुरू ठेव....
  • Log in or register to post comments

नक्की

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:36 नवीन
धन्स केडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केडी

फोटो सुंदर

प्रशांत
Sat, 04/18/2020 - 19:33 नवीन
फोटो सुंदर आहेतच. के डी सर यावर कॅप्शन येवु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केडी

खुप छान आहेत फोटो खास करुन

आंबट चिंच
Sat, 04/18/2020 - 14:32 नवीन
खुप छान आहेत फोटो खास करुन तो ट्रक्टर पाण्याचे बाजुला आहे त्याचा आणि लाईटनिंगचे विषेश करुन आवडले. हि अशी फोटोग्राफी मोबाईलद्वारे करता येते का?
  • Log in or register to post comments

मॅन्युअल किंवा प्रो मोड असेल तर

इरसाल कार्टं
Sat, 04/18/2020 - 14:35 नवीन
तुमच्या मोबाईल मध्ये मॅन्युअल किंवा प्रो मोड असेल तर काही प्रमाणात जमेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच

असे एकेकाला धन्यवाद

मोदक
Sat, 04/18/2020 - 14:47 नवीन
असे एकेकाला धन्यवाद देण्यापेक्षा दोन दिवसांनी सर्वांना एकदम घाऊक धन्यवाद दे. तू काढलेले अप्रतिम फोटो आणि केडीने त्याला दिलेले भारी कॅप्शन असा एखादा धागा काढ.
  • Log in or register to post comments

मस्तच

चांदणे संदीप
Sat, 04/18/2020 - 15:15 नवीन
सर्वच फोटो भारी आलेत. पहिला फोटो विशेष आवडला. सं - दी - प
  • Log in or register to post comments

छान फोटो

रीडर
Sat, 04/18/2020 - 15:42 नवीन
छान फोटो
  • Log in or register to post comments

फोटोग्राफीची कमाल!

पाषाणभेद
Sat, 04/18/2020 - 16:20 नवीन
फोटोग्राफीची कमाल! कमालीची फोटोग्राफी!!
  • Log in or register to post comments

Intelligent photo !

सस्नेह
Sat, 04/18/2020 - 17:38 नवीन
Intelligent photo !
  • Log in or register to post comments

लइच इरसाल कार्टं

वामन देशमुख
Sat, 04/18/2020 - 18:57 नवीन
तुम्ही लइच इरसाल कार्टं हाइत वो! काय काय तरी फोटू टाकताय! येकदम भारी!
  • Log in or register to post comments

वेळ खूप सत्कारणी

स्वधर्म
Sat, 04/18/2020 - 19:08 नवीन
लावलात, आणि फोटोही सुंदर.
  • Log in or register to post comments

मस्त

अभ्या..
Sat, 04/18/2020 - 19:14 नवीन
मोन्स्टर ट्रक चे फोटो आवडले. पाणी बॉटल पण.
  • Log in or register to post comments

मोन्स्टर ट्रक फोटोमध्ये

कंजूस
Sat, 04/18/2020 - 19:26 नवीन
मोन्स्टर ट्रक फोटोमध्ये कल्पकता आहे आणि ही तंत्रज्ञान, भारी ग्याजेट्स यांच्या पलिकडे असते.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो अप्रतिम आहेत.अजून

सौ मृदुला धनंज…
Sat, 04/18/2020 - 19:40 नवीन
सगळेच फोटो अप्रतिम आहेत.अजून फोटो बघायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो !

मदनबाण
Sat, 04/18/2020 - 19:50 नवीन
सुंदर फोटो ! अवांतर :- मी बबिता फोगाट चे समर्थन करतो, तिला सुरक्षिततेची गरज असेल तर तिला ती ध्यायला हवी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat
  • Log in or register to post comments

जाम भारी फोटोज!!!

जव्हेरगंज
Sat, 04/18/2020 - 21:49 नवीन
जाम भारी फोटोज!!!
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

MipaPremiYogesh
Sat, 04/18/2020 - 23:42 नवीन
वाह एक से एक फोटो आहेत. मी पण हौशी फोटोग्राफर आहे, लोकडाऊन झाल्यावर भेटू एकदा..स्टुडिओ ची माहिती द्या..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरसाल कार्टं
Sat, 05/09/2020 - 16:05 नवीन
नमस्कार, आपण नक्की भेटूया. माझा मोठा स्टुडिओ वगैरे नसून छोटंसं ऑनलाईन कामं करण्याचं दुकान आहे. त्यातच छोटा सेटअप केलाय. पत्ता:कुडूस गाव, तालुका वाडा, जि. पालघर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MipaPremiYogesh

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/19/2020 - 09:55 नवीन
लॉकडाऊनचा उत्तम सदुपयोग. फोटो एकसे बढ़कर एक. फोटो आणि लेखन आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा जबरदस्त

झेन
Sun, 04/19/2020 - 20:14 नवीन
लॉकडाउन कडे बघण्याचा अप्रोच आवडला, फोटो खूप सूरेख आहेत , लायटिंगच्या माहिती साठी पुढील धाग्याच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

छान फोटो

मित्रहो
Sun, 04/19/2020 - 23:51 नवीन
मस्त फोटो
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो आहेत सगळे आवडले..

गणेशा
Sun, 04/26/2020 - 09:52 नवीन
सुंदर फोटो आहेत सगळे आवडले.. तो पहिला hope हा फोटो मी चोरू का? खूप आवडला आहे मला तो
  • Log in or register to post comments

बिनधास्त

इरसाल कार्टं
Sat, 05/09/2020 - 16:06 नवीन
बिनधास्त चोरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा