कवी बिचारा
मेटाकुटीने
कविता पाडत असतो
शाई ओली
असताना हा
टपली मारून जातो
वसुदेवाच्या
मनी जशी
कंसाची दहशत होती
तसे मिपा-कवि
विडंबनाचा
कंस बघुनी हादरती
कवितारतिच्या
विनयाचा हा
भंग त्वरेने करतो
शीघ्रकवित्वा
याच्या बघुनी
मनोमनी मी जळतो
हात जोडुनी
हतप्रभ कवि हा
दारी तुझिया उभा
दयावंत हो
पैजारा तू
आवर निर्दय प्रतिभा
विडंबनाच्या
वावटळीतुनी
कविता माझी सुटावी
ज्ञानोबांनी
पैजाराला
सज्जड तंबी द्यावी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8543
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
पैजारांवर
क्षमापना....
__/\__ अत्यंत सुरेख.
In reply to क्षमापना.... by ज्ञानोबाचे पैजार
दंडवत !!!
In reply to क्षमापना.... by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to क्षमापना.... by ज्ञानोबाचे पैजार
अप्रतिम
यात्री आणि पैजार दोघांच्याही
हा हा हा हा
यात्री आणि पैजार दोघांच्याही उपरोक्त काव्य जुगलबंदीस सादर प्रणामहेच म्हणतेकहर! =))
वराती मागुन घोडे
असे नाही नाखु काका..
In reply to वराती मागुन घोडे by नाखु