अगदी भावपूर्ण!
पण एक अवांतर : मी असं पाहिलं आहे की आधी जरी मुलींना दुजाभाव मिळत असला तरी समहाऊ लग्नानंतर त्या माहेरी आल्या की अगदी वारेमाप कौतुक त्यांच्या वाटेला येत असे. तसेच त्यांची मुलं मोठी होईपर्यंत 'मामा' ला जबाबदारी सांभाळावी लागे. त्यांची दुखणी खुपणी, शिक्षणं, मानपान........!!
कदाचित आधीच्या दुजाभावाची थोडी भरपाई व्हावी म्हणून विशेषतः आया, आपल्या मुलाकडून जबरदस्तीने करवून घेत.....
त्यात मग जावयांचे अती लाड कौतुक, बहिणीचा मानभावीपणा, ती कशी जाचात आहे व इथे भावजयीला कसे आम्ही सुखात ठेवतो ही तुलना....... हे येई!
वरील गोष्टीचाच हा उत्तरार्ध म्हणायचा....!
फक्त पूर्वीच नाही तर आजही गरीब कुटुंबाला येणारे अनुभव आहेत हे. यातील कित्येक प्रसंग स्वतः अनुभवले आहेत. आपल्या हालअपेष्टांची कुणालातरी जाण असावी, कुणीतरी मायेने थोडे कौतुक करावे असे लहानपणी खूप वाटायचे.शाळेत गणित बरोबर आल्यावर गुरूजींनी दिलेली शाबासकी म्हणजे जणूकाही आभाळ मिळाल्याचा आनंद व्हायचा. हुरूप येऊन खूप अभ्यास करायचे. एकेक आठवण म्हणजे अनुभवच आहे.
चित्रदर्शी लिहिलेय हो. आवडले पण मन हळवे झाले.
काही वाक्ये तर अगदीच न विसरता येण्यासारखी आहेत :-
मुली काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली.
इतकी शांतता पसरली की नखाखाली ऊ चेचली असती तरी टाळीसारखा आवाज वाटला असता.
"असू द्या हो वन्सं. पोराबाळांचं घर आमचं."
आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना..आता दारु प्यालो तरी दुसर्या पेगनंतर दूधाची आठवण येतेदोन मिनीटात जीभेपेक्षा गाल जास्त रंगले.पण यांच्या डोळ्यात पाणी नाही.वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.
तुमचा हा लेख आजवर किमान तीसेक वेळा वाचला आहे पण तरीही पुन्हा वाचावासा वाटतो इतके सुंदर लेखन आहे तुमचे. लेखातील तुमचा मार खाल्ल्यामुळे दूध सोडण्याचा प्रसंग, तुमच्या धाकट्या बहिणीचा डोहाळ जेवणातील पान खाण्याचा प्रसंग तर प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणतात. मलाही जुळ्या लहान मुली आहेत त्यामुळे असेल कदाचित पण तुमच्या बाबांचे मुलींप्रति प्रेम पाहून खुप हळवे व्हायला होते.
आज खूप दिवसांनी हा लेख परत वर आला. अप्रतिम लेख. कितीही वेळा वाचला तरी तेव्हढाच उत्कट.
आपण भारतीय कुटुंब किती दुटप्पी आहोत आणि एखाद्याची किती फरफट करतो. एकत्र कुटुंब व्यवस्थेचा टेंभा मिरवणाऱ्या लोकांना हा लेख वाचायला दिलं पाहिजे.
माझ्या अंगावर पांघरूण घातलं आणि हातात गुंडाळी केलेली पोळी दिली.एक संपली मग दुसरी दिली.पोळीला काय लावलं होतं ते आठवत नाही पण मिठाची काही कमी नव्हती.
आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना....."
खोटं बोलायला मुलगा व्हायला लागतं.या शेळीच्या शेपट्या.खोट्याची झाकपाक करायला एकदम नालायक.
बाबांनी एक पान जावयाच्या हातात दिलं .जावई रसीक .त्यानी सगळ्यांच्या समोर अर्धं पान बहीणीला भरवलं.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.
प्रतिक्रिया
जितक्या वेळा ही कथा वरती येते
जितक्या वेळा ही कथा वरती येते
अफाट सुंदर आहे हे __/\__
सुरेख लेख
पुन्हा एकदा वाचली...
वास्तव
निशब्द कथा मनापासुन आवडली,,
अप्रतिम
चित्रदर्शी लिहिलेय हो. आवडले
+१
नि:शब्द. दंडवत.
अतिशय ह्रुदयस्पर्शी लेखन
+1
आज खूप दिवसांनी हा लेख परत वर
अप्रतिम
ही कथा कितीतरी वेळा वाचली आहे
बाडीस
काका तुमच्याबद्दल कितीही लिहले तरी कमीच पडणार, खूप सशक्त लेखन
निशब्द _/\_
खुपचं भावस्पर्शी!
सहमत.
काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
मूळ कथा जितकी सुंदर आहेत
कथा आवडली
जबरजस्त लेख.