चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला
तो झाला सोहळा तिहारात
जाहली दोघांची तुरुंगात भेट
मनातले थेट मना मध्ये
मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर
अवघाची inx खाऊन टाकला
चिदू म्हणे, एक ते राहिले
तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी
मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले
त्याने तडे गेले प्रामाणिकतेला
मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी
माझी पाटी कोरी राज्य करोनिया
चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट
प्रत्येकाची कोठडी वेगळाली
वेगळीच ताटे वेगळीच वाटी
जेवायला भेटे पुन्हा डाळ भात
ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी
जेलर बाहेर वाट पाहे
दोघे निघोनिया गेले दोन दिशा
कौतुक माध्यमा आवरेना
#सॉरीविंदा
वाचने
9634
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
:) :D :))
=))
=))
+1
lol
मस्त
आवडल्या गेली आहे
पैजारबुवा,
प्रत्येकाची कोठडी वेगळाली
प्रत्येकाची कोठडी वेगळालीवेगळीच ताटे वेगळीच वाटी
=))
=)) =)) =))
=)) =)) =))
मनमोहन सायेब एकटे गेले नव्हते, सोबतीला कोणीतरी होते. :)
हा हा हा ते खरंय पण मॅडम
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा ते खरंय पण मॅडम मिटरात बसत नै ना म्हणून :)
भारीच आहे की
पुढील काव्य प्रतिक्षेत!!
नाखु
:);)
:);)
+१
भारी......