✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्मृतीगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास"

व
वामनसुत यांनी
Mon, 03/23/2009 - 02:14  ·  लेख
लेख

Book traversal links for स्मृतीगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास"

  • ‹ स्मृतीगंध-११ "गोकुळ"
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31397 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

मजा आली!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/23/2009 - 16:37 नवीन
काका, अतिशय मजा आली वाचताना. तुमच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याच्या वृत्तीचे खूपच कौतुक वाटले. इतक्या सगळ्यातून जाताना तुमचा दृष्टीकोण बव्हंशी सकारात्मक असला पाहिजे असे वाटते. आणि म्हणूनच तुम्ही हे लिखाण केले पण त्यात कुठेही थोडीही कटुता दिसली नाही. (कटुता येण्या सारखे प्रसंग घडले असतील तरीही). तुम्ही म्हणता तसे ' हे अगदी सर्वसामान्य जीवन' आहे, पण त्यातही मजा आली ती शैली मुळे. आता तुम्ही तुमच्या अजूनही काही गंमतीदार किंवा इतर अनुभवांबद्दल वगैरे लिहा. आम्ही वाट बघतो आहोतच. आणि स्वातीताई म्हणते तसे, तुम्हालाही प्रतिसादांची चटक लागली आहेच. ;) तर मग होऊन जाऊ दे... आता थांबू नका. अवांतर : खरं तर पहिल्याच भागानंतर अगदी अपघातानेच तुमची खरी ओळख कळली होती. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

उत्तम

भडकमकर मास्तर
Mon, 03/23/2009 - 17:08 नवीन
उत्तम लेखमाला... रहस्यभेदही छान... .. आता इतरांसारखेच म्हणतो की अजूनही काही आठवणी येउद्यात... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख लेखन!

चतुरंग
Mon, 03/23/2009 - 17:32 नवीन
आयुष्यातल्या सर्व ठळक घटनांचे तटस्थ राहून केलेले वर्णन वाचताना इतका गुंगून गेलो होतो की अचानक शेवटचा भाग आल्याचे पाहून जरासा धक्का बसला! अजून वाचायचे आहे असे राहून राहून वाटते आहे. तुमच्या आयुष्यातल्या सर्व घटनाक्रमाकडे बघता "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान!" ही उक्ती तुम्ही सार्थपणे जगला आहात असे वाटते. कडू-गोड अनुभवातून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्यासाठी लागणारी मनाची ताकद टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य तुमच्या तटस्थतेत आणि विचारसरणीत आहे असे वाटते. तुमची वहिनी ही तर तुम्हा भावंडांची दुसरी आईच जणू. एका स्त्रीने स्वतःचे दु:ख असे काळाच्या उदरात चिणून टाकून पुढच्या पिढीसाठी जीवन झिजवणे परिकथेतले वाटते! तसेच तुमची आई. पुरुष माणूस घरात नसताना एकहाती एवढा मोठा संसार रेटणे येरागबाळ्याचे काम नाही. जिद्द, कणखरपणा, भविष्यात मुलांनी खितपत पडायचे नसेल तर पुढे जायलाच हवे ही महत्वाकांक्षा, धन्य आहे! तुमची वहिनी आणी आई ह्या दोघींसमोर मी नतमस्तक आहे! तुमच्या कष्टांचे तुमच्या मुलामुलींनी चीज केले. तुमच्या आयुष्यातल्या चढउतारांचे ओझे तुम्ही त्यांच्या खांद्यावर टाकले नाहीतच उलट तुम्ही त्यांना स्फूर्तीदाते बनलात हे पाहून आपलेही कौतुक वाटते. तुम्ही लिहिते रहा. आणखी आठवणींचा खजिना घेऊन या. मला खात्री आहे जगभरात मिपाकर वाट पहाताहेत! तुम्हाला लिहायला लावून आणि त्या आठवणी आमच्यापर्यंत पोचवून देणार्‍या स्वाती-दिनेश ह्या दोघांचेही खास आभार. एक अप्रतिम लेखमाला वाचायला मिळाली ह्याबद्दल मी धन्य आहे! "व्हेळ ते फ्रँकफुर्ट" असे शीर्षक बघताक्षणीच तुम्ही स्वाती आणि दिनेशचे बाबा आहात हे लक्षात आले (तशीही स्वातीताईची एकही प्रतिक्रिया ह्या लेखमालेत नव्हती तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

सुरेख लेखमाला

संदीप चित्रे
Mon, 03/23/2009 - 19:18 नवीन
मनापासून लिहिले की लेखन किती ओघवतं होतं ह्याचं ही लेखमाला उत्तम उदाहरण आहे. स्वातीताईंनाही स्पेशल धन्स -- ही लेखमाला मिपावर आणण्यासाठी.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

क्रान्ति
Mon, 03/23/2009 - 19:28 नवीन
अत्यंत अप्रतिम लेखमाला! स्वातिताईचे आभार मानावे तेवढे थोडेच! इतकी सुंदर कलाकृती वाचायला मिळाली की शब्द नाहीत अभिप्राय द्यायला! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

अशक्य...ग्रेट

केवळ_विशेष
Tue, 03/24/2009 - 14:47 नवीन
पावरबाझ लिहिलं आहे... बोलतीच बंद! :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

वामनसुत
Tue, 03/24/2009 - 22:07 नवीन
आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादांनी भारावून गेलो आहे. पुनश्च सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. आता खरडवही आणि पोस्टहापिसाची सुविधा तात्यांनी चालू केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद, आपल्या प्रश्नांची उत्तरे लवकरच देईन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखमाला!

मुशाफिर
गुरुवार, 03/26/2009 - 02:29 नवीन
मी संपूर्ण लेखमाला वाचून प्रतिसाद द्यावा, असे ठरवले होते. त्यामुळे बरेचदा तुमचं सुंदर कथन वाचुन प्रतिसाद द्यायचा असुनही मोह आवरला. खरंतरं मी तुमच्या लेखनाबद्दल तुमचं अभिनंदन करणं किंवा तुमचं कौतुक करणं, हे वावगं ठरेल. कारण तेव्हढं माझं वय नाही आणि पात्रताही! पण, जुन्या काळातील लोकांनी पुढच्या पिढीच्या भल्यासाठी (वैयक्तिक पातळीवर का होइना) किती खस्ता खाल्ल्या? हे तुम्ही तुमच्या अनुभव कथनातुन आजच्या पिढीला दाखवून दिल आहे. त्याबद्दल आपले शतश: धन्यवाद! हे लेखन वाचून आमंच जीवन कितीतरी सहजं आणि सोपं आहे ह्याची जाणीव झाली. आपण मि.पा. वर असेच लिहितं राहाल अशी अपेक्षा. मुशाफिर.
  • Log in or register to post comments

नाना..

योगी९००
गुरुवार, 03/26/2009 - 02:36 नवीन
प्रतिकुल परिस्थितीत कष्ट करून आपली परिस्थिती सुधारणार्‍या आपल्यासारख्या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत राहिला आहे. एक सुंदर कथन.. आपले शतश: धन्यवाद !! आपल्यापासून सध्या जवळच्याच देशात आहे. जर जर्मनीत आलो तर आपली भेट घ्यायला नक्कीच आवडेल मला. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

गाईम्हशी विकत घेणें ....

सुधीर कांदळकर
गुरुवार, 03/26/2009 - 19:10 नवीन
त्या काळीं कर्ज काढून घर बांधणें, एकाचीं तीन घरें करणें, नोकरी सोडून फंडातून कर्जफेड करणें ही उद्योगशीलता असामान्यच म्हणायची. फक्त लागलें एवढेंच कीं प्रकृतीची योग्य ती काळजी घेतलेली दिसत नाहीं. असो. पण त्या काळीं तेवढा हेल्थ कॉन्शसनेस नव्हता. कर्तृत्त्व असामान्यच. स्वातीताईंनीं नात्याचें गुपित जपलें तेंहि योग्यच. झकास. मजा आली. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

आज...

बबलु
Mon, 04/06/2009 - 14:36 नवीन
वामनसुत काका.... आजच स्मृतीगंधचे १ ते १२ भाग सलग वाचून संपवले. [मिपा वरची "वाचनखुणा साठवून" ठेवायची सोय उत्तम आहे (तात्या, धन्यवाद) ]. काका... काय सुंदर रीतिनं लिहिलंय !! हिमपर्वतातून उसळणारा पांढराशुभ्र ओढा खळाळत जातो तसं ओघवत्या शैलीतलं लेखन आपल्याला फार आवडलं. तुमचा हा ओढा व्हेळया मध्ये उगम पावून राजापूर/गिरगाव/गोरेगाव/डोंबिवली/फ्रांकफुर्ट असा खळाळत जातोय. दरम्यान अनंत अडचणी आल्या. त्या तुम्ही समर्थपणे पार केल्यात. धन्य होय !! ही लेखमाला संपूच नये असं वाटतं. (लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक). ....बबलु
  • Log in or register to post comments

केवळ सुंदर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/06/2009 - 19:28 नवीन
स्मृतीगंध काय आहे म्हणून उचकले आणि सर्वच भाग आजच वाचून काढले. हा भाग वाचल्यावर प्रतिक्रिया काय लिहावी असा प्रश्न पडला. आपला जीवनपट उलगडून दाखवतांनांचा सहजपणा आणि आपले अनुभव वाचून आम्ही वाचक संपन्न झालो इतकेच म्हणावेसे वाटते. अजून खूप लेखन येऊ द्या ! मिपावर भेटत राहू !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पुनर्वाचन

नंदन
Sun, 10/20/2013 - 14:38 नवीन
आज पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बाराही भाग सलग वाचून काढले. एखादी साधी, अनलंकृत पण ठाव घेणारी दीर्घ कथा वाचावी तसा पुनर्वाचनाचा अनुभव पुन्हा एकदा मिळाला. काही नवीन सदस्यांच्या वाचनातून सुटले असेल म्हणून हे किंचित उत्खनन.
  • Log in or register to post comments

नंदन, बेष्ट काम केलेस.

यशोधरा
Sun, 10/20/2013 - 14:44 नवीन
नंदन, बेष्ट काम केलेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अगदी!!

चतुरंग
Mon, 10/21/2013 - 05:04 नवीन
मी ही पुन्हा वाचले. फारच छान. याव्रुन मला कर्मयोगी! मालिकेची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही! -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नंदनचे या उत्खननाबद्दल लैच

बॅटमॅन
Sun, 10/20/2013 - 17:17 नवीन
नंदनचे या उत्खननाबद्दल लैच आभार. योग्य शब्द सापडले की मग प्रतिक्रिया देतो. तोपर्यंत फक्त _/\_
  • Log in or register to post comments

मीही पुन्हा एकदा ही मालिका

रेवती
Mon, 10/21/2013 - 08:57 नवीन
मीही पुन्हा एकदा ही मालिका वाचून काढली. आणखी एकदोनदा तर वाचली जाईलच. एकच भाग वाचायचा असे ठरवून सगळी मालिका वाचत बसले. अश्या लेखनासाठी ती. वामनसुतांचे आभार. नंदनने धागा वर आणून छान काम केलय.
  • Log in or register to post comments

सर्व भाग एकाच वेळी

खटपट्या
Mon, 10/21/2013 - 09:00 नवीन
सर्व भाग एकाच वेळी अधाश्यासारखे वाचून काढले. एक सुंदर चित्रपट बघितल्यासारखे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

+ १११११११११११.........

सुबोध खरे
Mon, 10/21/2013 - 10:46 नवीन
+ १११११११११११.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

+ १११११११११११.........

राघवेंद्र
Wed, 10/23/2013 - 21:31 नवीन
+ १११११११११११.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खुपच सुंदर लिहिले आहे. गरम

मृत्युन्जय
Mon, 10/21/2013 - 12:55 नवीन
खुपच सुंदर लिहिले आहे. गरम गरम वरण भात, मीठ, लिंबु आणि वर साजुक तुपाची धार आणि तोंडी लावायला लिंबाच्या लोणच्याची फोड या साध्याश्या जेवणात जो कमालीचा आनंद मिळतो तसाच आनंद मिळाला. स्वातीतै आणी नंदनचे आभार. @स्वातीतै: लेखमाला आवडली हे नानांना आवर्जुन सांगा
  • Log in or register to post comments

+१११

अर्धवटराव
गुरुवार, 10/24/2013 - 00:22 नवीन
शिवाय हे जेवण अत्यंत आपुलकीच्या, मायेच्या हातांनी भरवलं असं काहिसं वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सुंदर लिखाण. पुन्हा वाचतान

विजुभाऊ
Mon, 10/21/2013 - 16:56 नवीन
सुंदर लिखाण. पुन्हा वाचतान तीच मजा अनुभवली. एका तृप्त व्यक्तीचे सरळ साधे निवेदन भावले.
  • Log in or register to post comments

काल बसून ही सगळी लेखमाला

स्पंदना
Tue, 10/22/2013 - 04:42 नवीन
काल बसून ही सगळी लेखमाला वाचुन संपवली. वामनकाका तुम्ही माझ्या वडिलांच्या पिढीचे म्हणुन काका म्हणायचा अधिकार घेतेय. एक अतिशय महत्वाचा पैलु जाणवला या लेखनात अन तो म्हणजे एका स्त्रीचा दुसर्‍या स्त्रीच्या प्रति असणारा आदर,अन श्रद्दा! तुमच्या आई, चार मुलांच्या आई होत्या. त्यांनी आयुष्यात पतिसुख अनुभवल, पण वयाने २ वर्षे मोठ्या असलेल्या सावत्र सुनेवर त्यांनी जो विश्वास दाखवला, किंवा त्यांना जो तुमची आई होण्याचा अधिकार दिला, तो शब्दातीत आहे. शेतीवाडी तुमच्या वैनींना करायला देउन त्या आपली मुले घेउन त्यांच्या शिक्षणासाठी बाहेर राहु शकत होत्या. पण त्यांनी ते काम तुमच्या वैनींना दिलं. आपली मुले इतक्या विश्वासाने दुसर्‍या व्यक्तीच्या हातात सोपवली अन तो विश्वास तुमच्या वहीनींनी सार्थ ठरवला. हा नात्यांचा सुरेख गोफ उलगडणे हे तुमच्या लिखाणाचे सार्थक आहे. लिहायला बसले तर या नात्याचे अनेक पैलु सामोरे येतील. पण येथेच थांबवते. फार भिडल तुमच साध सोप लिखाण. अगदी हळव करुन गेलं.
  • Log in or register to post comments

पुन्हा "मनकर्णिका" चालू करायला हवी....

बहुगुणी
गुरुवार, 10/24/2013 - 04:27 नवीन
श्री. वामनसुत यांच्या परवानगीने मी या अतीव सुंदर आत्मकथनाचे सात भाग ध्वनिमुद्रित करून मिपावर दुवे दिले होते, आणि प्रतिसादांवरून तो उपक्रम वाचक-श्रोत्यांना आवडलाही होता असं वाटतं: मनकर्णिका १ मनकर्णिका २ मनकर्णिका ३ दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते टाकले होते ती सुविधा गायब झालेली दिसते आहे :-( . असो, हे लिखाण इतकं उच्च प्रतीचं आहे की पुन्हा एकदा ध्वनिमुद्रण करण्यासाठी वेळ काढण्याची माझी तयारी आहे, इतर कुणी सहभागी होऊन मदत केली तर स्वागतच आहे!
  • Log in or register to post comments

एरर येतीये हो. काय करावं?

रेवती
गुरुवार, 10/24/2013 - 06:03 नवीन
एरर येतीये हो. काय करावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

युजर आणि परवलीचा शब्द द्या

खटपट्या
गुरुवार, 10/24/2013 - 07:05 नवीन
युजर आणि परवलीचा शब्द द्या
  • Log in or register to post comments

सॉरी, मंडळी!

बहुगुणी
गुरुवार, 10/24/2013 - 17:53 नवीन
सॉरी, मंडळी, मी वर लिहिल्याप्रमाणे, दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते ध्वनिमुद्रण टाकले होते ती मोफत सुविधा गायब झालेली दिसते आहे. (आणि डोमेन नेम ही वेगळे आहे, बहुतेक ती मूळची साईट विकली गेली असावी.) माझ्याकडे लॉगिन सुविधा नाही. तेंव्हा नव्याने पुन्हा ध्वनिमुद्रण करून मी "मनकर्णिका" सुरू करू शकेन. इथेच मिपावर दीर्घ ध्वनिमुद्रण टा़कायची सोय झाली तर अत्युत्तम!
  • Log in or register to post comments

नाना आजोबा

मेघनाद
Fri, 10/25/2013 - 01:07 नवीन
नाना आजोबा, अहो काय मस्तच लिहील आहात हो तुम्ही. १ ते १२ हे सर्व भाग एका दिवसात वाचून काढले मी, अगदी ट्रेन मध्ये बसलो असताना मोबाईल वरती वाचल. माझ पण आजोळ राजापूर जवळ मिठगवाणे येथे आहे, त्यामुळे आपल्या लेख मालिकेतील सर्वच ठिकाणे डोळ्यासमोर येत होती. तुमच्या अश्याच लेख मालिका वाचायला आवडतील. वाट बघतोय आम्ही सर्व मिपाकर……
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर मालिका. १ ते १२

प्यारे१
Fri, 10/25/2013 - 03:39 नवीन
अतिशय सुंदर मालिका. १ ते १२ भाग सलग वाचले. नंदन शेठचे उत्खननाबद्दल आभार. जुन्या काळातल्या एका अत्यंत धडपड्या स्वभावाच्या व्यक्तीची जीवनगाथा. त्या त्या कालाचा तटस्थपणे अ‍ॅज इट इज घेतलेला आढावा. विशेष भावलं ते म्हणजे प्रत्येक वेळी ज्येष्ठ व्यक्तीचा केलेला आदरार्थी उल्लेख. तीर्थस्वरुप नाना यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना. (भाग २ मधलाच मायना वापरलाय) ती. स्वाती दिनेश ह्यांना सविनय नमस्कार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा