माकडांच्या पुढे नाचली माणसे!
माकडांच्या पुढे नाचली माणसे!
पाहता पाहता काय झाले असे?
माकडांच्या पुढे नाचली माणसे!
या हवेला कुणाची हवा लागली?
चित्त कामामध्ये ना तिचे फारसे
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे
मेघही वागती की पगारी जसे
नित्य येणे तिचे वादळासारखे
मग लपावे हृदय हे कुठे नी कसे?
व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती
तू अभय बोल तू, तू हवे तू तसे
गंगाधर मुटे 'अभय'
==०==०==०= =०==०==०==
बाल कविता आहे का?
या वर्षीच्या पावसाळा ऋतू
धन्यवाद
ओह, लक्षात नाही आले!
छान गझल
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसेहे आवडलंधन्यवाद
मस्त कविता
कशाला?
अरे मुटे साहेब !
धन्यवाद
या हवेला कुणाची हवा लागली?
धन्यवाद
अनाकलनीय. जमल्यास सोपं करून
धन्यवाद
छान
धन्यवाद