दोन स्टोरीज अर्धवट सोडल्या
मी pm वर बोललो होतो त्याला.एकावेळी एकच स्टोरी संपव ...
आता पुढे काय झालं कसं समजणार ?
उत्कंठा वाढवुन गेला वरुण.
छान माणूस होता. जवळचं कुणीतरी अचानक हुरहुर लावुन गेल्याची भावना.
प्रत्यक्ष परीचय नाही पण मिपावर वाचून वाटतं रांगडा, बहुआयामी, प्रामाणिक, दिलदार माणूस चटका लावून गेला. परमेश्वर घरच्यांना हा धक्का सहन करण्याची ताकद देओ.
ठाणे कट्ट्याला मी आणि मुवि टेबल धरून बसलो होतो सहालाच. एकेक जण येत होता. मग जरा वेळाने वरुण'आला' असं कोणी म्हटलं. अगोदरच्या त्याच्या लेखनावरून कोणी चाळीस पन्नाशीचा माणूस असावा असा माझा अंदाज होता पण अहो मीच वरुण म्हटल्यावर विश्वास बसला नाही.
एका बाजूस मुवि, खरेसाहेब, गामा पैलवान आणि पाडगावकर पतिपत्नी यांच्या गप्पा रंगलेल्या. या बाजुला वरुण, मी, सुहास झेले असा ग्रुप जमलेला. वरुणास सर्व वयाच्या लोकांशी वार्तालाप,संवाद करण्याचं सहज साधतं हे लगेच लक्षात आलं. तेवढ्या अर्ध्या तासात त्याने माझ्याशी जमवून माझी फिरकीही घेतली होती.
निवडणूक निकालानंतर त्याने कर्जतजवळ फार्म हाऊसला कट्टाही ठरवला होता. तिथूनच रामबाग माथेरान ट्रेक सुरू होतो. त्याला माझ्याबरोबर ट्रेकला यायचे होते पण आणखी बरेच मिपाकर जण आले तर वरती येणार नाहीत मग आपण दोघेतरी जाऊ असं ठरलं. मी गुपचूप एकटाच जाऊन आलो हे कळल्यावर मग पावसाळ्यात जाऊ ठरलं.
पण पण पण ते आता केवळ आठवणच राहील हे मला काय माहीत??
सातएक वर्षं झाली असावीत - कोरम मॉलमधल्या पॉप टेट्सच्या कट्ट्यात वरुणची भेट झाली होती.
गवि, रामदास, विजुभाऊ, क्लिंटन, प्रभूगुर्जी, साक्षीशेठ असे मिपाचे दिग्गज त्या कट्ट्यात होतेच; पण त्यांच्यासोबतच, वयाच्या मानाने बरीच भटकंती केलेल्या वरूणही लक्षात राहिला होता.
त्याची अशी अकाली एक्झिट अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे.
अत्यन्त धक्कादायक बातमी. त्यांचं बरचसं लेखन मिपावर वाचले आहे. एका सिद्धहस्त आणि अनुभवसमृद्ध लेखकाला मिपाकर कायमचे मुकले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
दोन आठवणी
१. मी २ वर्षांपूर्वी इथे लिहू लागलो आणि सुरवातीस माझे 'अंतर्नाद' मधले लेख पुन्हा प्रकाशित केले. तेव्हा वरुणने ते त्या मासिकात वाचल्याची पोच दिली. असा एखादा तरुण ते मासिक वाचतोय हे कळणे हा सुखद धक्का होता. मग आम्ही व्य नितून त्या मासिकावर बोलत असू.
२. १० जुलैला त्याचा माझ्या पित्तखड्यावरील लेखाला उत्साहवर्धक प्र आला. त्या लेखात काविळीचा उल्लेख आहे. ….आणि ११ ला त्याचे निधन…. छे, कसतरीच झाले.
कुठल्या अवस्थेत त्याने तो वाचला असेल या कल्पनेने मला जाम अस्वस्थ झालो.
असो, पुन्हा एकवार श्रद्धांजली.
एक अवलिया होता वरुण, गेल्यावर्षी एक धमाल छुपा कट्टा केलेला, फक्त आम्ही दोघेच होतो...अर्ध्या तासासाठी भेटायचे ठरवून 3-4 तास गप्पा हाणत बसलेलो (मासे, चिकन होतेच)
मध्येच थोडावेळ जरा उदास झालेला वाटला पण नंतर परत मूडमध्ये आला
अधेमध्ये कायप्पावर मेसेज व्हायचे
बोक्यानंतर आणखी एक चांगला मित्र चुटपुट लावून गेला :(
वरूण मोहिते यांचे लिखाण वाचल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू कसे पडले असतील याचा नेहमी विचार यायचा. प्रत्यक्ष भेटून विचारायचीही इच्छा होती. दुर्दैवाने ती आता पूर्ण होऊ शकत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली!
Sandy
माझा एक मित्र आजारी पडला डॉक्टर नी निष्कर्ष काढला कावीळ .
मरणाच्या दारात पोचल्यावर योग्य डॉक्टर
कडे पोचला निदान झाले
Thyroid .
औषध चालू केली दोन महिन्यात टणाटण
काल वमो च्या घरी गेलो होतो. बरोबर भारत मुंबईकर होते .
वरुण याच्या घरी आई , आजोबा त्यांची मैत्रीण आणि इतर नातेवाईक होते .
आई किमान बोलण्या इतपत सावरलेल्या दिसल्या . खरो खर काय बोलावे हे आम्हाला कळत नव्हते
त्या दोघी कडून कळले त्या प्रमाणे परवा संध्याकाळच्या सुमारास प्रकृती खालावल्या सारखे वाटले , तेंव्हा त्यांना रिक्षात घालून इस्पितळात नेले , वरुण चालत रिक्षात बसला , व्यवस्थित बोलत होता . शुगर लो झाल्यासारखी वाटली म्हणून त्याने एक केक खाल्ला .
इस्पितळात रक्तदाब आणि शुगर प्रचंड कमी झालेली दिसली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली .
असे वाटते कि वेदना झाल्या नसाव्या .
आई व मैत्रिणी कडून मिपा चा अनेकदा उल्लेख झाला . व मो चे मिपा वर खरेच प्रेम होते .
अजून काय लिहू, .
आई अजून एक बोलल्या कि व मो कोठलेच पथ्य पाळत नव्हते , यात बरेच सांगून गेल्या .
या दिलदार मित्रास आपल्या सर्वा तर्फे श्रद्धांजली , त्याने जे आनंदाचे क्षण दिले होते त्याची आठवण म्हणून शेवटचे जावू शकलो .
त्याच्या घरी मुलुंड ला अनेकदा जायचे होते , त्याच्या बरोबर ठरवले होते पण असे जावे लागेल असे वाटले नाही !
इस्पितळात रक्तदाब आणि शुगर प्रचंड कमी झालेली दिसली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली
मी या अनुभवातून गेलो आहे, मिनिटाला खडीसाखर कडंम - कडम करून खात होतो आणि भोवताली काय चालू आहे याचे भानही येत न्हवते इंजेक्शन आणि सलाईन मिळे पर्यंत जीवात जीव न्हवता. नंतरचे नेमकं काय घडले ते आठवत नाही. शारीरिक वेदना जरी कमी असल्या तरी मनाची भीती, अनियंत्रित श्वासोश्वास व मनाची शरीराशी बांधून राहण्याची अविरत तडफड पराकोटीची अस्वस्थता निर्माण करते इतर काही विचारासाठी उसंतही देत नाही असं नक्कीच म्हणेन.
रक्तदाब कमी झाल्याने जरी हृदयावर फार ताण येत नाही तरी पॅरालिसिसचा धोका असतोच खडीसाखर व पाणी हाच यावर घरगुती उपाय आहे असं अल्पमतीला वाटते बाकी वस्तुस्थिती तज्ञच जाणोत.
हे प्रचंड वाईट झालंय! कुणीतरी जवळचं, खास अकाली गेल्यावर जो धक्का बसतो अगदी तसं झालंय मला....कसं शक्य आहे हे? वरुण मोहितेंशी एका धाग्यावर नुकताच संवाद झाला होता माझा...उमदं व्यक्तिमत्व!!! अतिशय हुशार आणि बुद्धिमान लेखक आणि वाचक असंच वरुण मोहितेंचं वर्णन करावं लागेल. माझं कधी प्रत्यक्ष बोलणं-भेटणं नाही झालं त्यांच्याशी पण एक सुसंस्कृत आणि व्यासंगी तरूण म्हणून त्यांची माझ्या मनात प्रतिमा होती.
खूप हळहळ वाटतेय....त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
@ उपयोजक ,, धन्यवाद तुम्ही कैक मिपाकरांची सुप्त इच्छा नकळतपणे पूर्ण केलेली आहे .. मलापण वरुणला भेटण्याची इच्छा होती पण ती आता कायमची राहिली .. त्याचा फोटो पेस्ट करून तुम्ही त्याला श्रद्धांजली वाहण्यात मोठा हातभार लावलेला आहे ..
अरेरे.. काय हे? एवढ्या लहान वयान अकस्मात, तेपण काविळीने निधन? बरंच काही अर्धवटच राहून गेलं, मित्रा..
अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक बातमी..
भावपुर्ण श्रद्धांजली..
एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या कळत आहेत मिपावर. भयानक अनपेक्षित! एक अतिशय उमद्या मनाचा माणूस गेला... वरुण मोहित्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली! वाईट झालं!
मला अजूनही खरं वाटत नाहीये. इतके दिवस प्रतिसाद लिहायची पण इच्छा होत नव्हती.
प्रत्यक्ष भेट झाली नाही पण बाकी संपर्क होता. एवढ्या लहान वयात एवढे अनुभवसमृद्ध कसे याबद्दल मला कायम प्रश्न पडत आला आहे आणि हेवा सुद्धा वाटला आहे. वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी होती हे तर नक्कीच आहे.
आपण जे ६०-७० वर्षे जगून अनुभवणार नाही ते वमोपा एवढ्या कमी वयात अनुभवून गेले. त्यांच्या जाण्याचं दुःख तर आहेच पण ते जिथे असतील तिथेही कट्टा जमवून इतरांचे आयुष्य समृद्ध करत असतील याबद्दल खात्री आहे.
वरुण मोहिते यांच्या अकाली निधनाने खूप धक्का बसला व वाईट वाटले.
अत्यंत अनुभवसंपन्न आयुष्य अन कसलीही भीडभाड न ठेवता स्वतःचे अनुभव थेट लिहिण्याची बेधडक वृत्ती कायम स्मरणात राहील.
वरुण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
दोन स्टोरीज अर्धवट सोडल्या
चांगला मित्र गमावल्याचे खूपच
धक्कादायक
ठाणे कट्ट्याला मी आणि मुवि
भावपूर्ण श्रद्धांजली
धक्कादायक आणि दुर्दैवी!
आधी मला वाटलं धागा काथ्याकूट
अगदी अगदी
वरुणराजा खरोखर रुसलाय
वरुणराजा खरोखर रुसलाय
भावपूर्ण श्रद्धांजली !
खरे डॉक्टरांचे शब्द ....
श्रध्दांजली!
अत्यंत धक्कादायक, शब्द सुचत
अत्यंत धक्कादायक, शब्द सुचत
:( अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर!!
दोन आठवणी
बापरे! वाईट बातमी.
फार वाईट बातमी. दोन तीनदा
एक अवलिया होता वरुण,
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली..
फट म्हणता जातात चांगली माणसे
अत्यंत धक्कादायक बातमी
चुकीचे निदान
भावपूर्ण श्रद्धांजली..
भेट
इस्पितळात रक्तदाब आणि शुगर
बॅनर
बॅनर
अनुमोदन
अनुमोदन
बापरे ! भावपूर्ण श्रद्धांजली..
श्रद्धांजली
श्रद्धांजली
धक्कादायक!!!
लय वाईट झालं यार
_/\_
श्रद्धांजली
श्रद्धांजली
अरेरे..
एकामागोमाग एक धक्कादायक
श्रद्धांजली
अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक
भावपूर्ण श्रद्धांजली
कधी बोलणे झाले नाही पण नाव
लग्न झाले होते का त्यांचे?
:-(