*वरुणराजा खरोखर रुसला*
मृग त्यानंतर आर्द्रा एकामागून एक कोरडा जातोय....आजच्या या दुःखद वारतेनंतर तर खात्रीच पटली की वरुणराजा खरेच रुसलाय....
एका उच्च शिक्षित , हरहुन्नरी, हजरजबाबी, व्यवहारी ,लोकप्रिय , वाचनवेडा आणि समंजस, उमद्या तरुणाचे असे अचानक एक्सिट घेणे चटका लावून गेलंय...
अशीच हळहळ गेल्या वर्षी बोकशेठ गेल्यावर वाटली होती.....
या आभासी जगात या दोघांनाही प्रत्यक्ष न भेटता आल्याची हुरहूर वाटत राहील...
त्यांच्या अगणित लोकसंग्रहाच्या अश्रूंच्या धारेत माझीही दोन टीपे.
स्वर्गीय वरूणभौच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच विठठलाच्या पायी मनःपूर्वक प्रार्थना !
हरी: ओम शांती !
मागे ठाणे येथील कट्ट्याला भेट झाली होती. खरं तर जाण्याचं वय अजिबातच नव्हते. बातमी खरी वाटत नाही. नक्की काय झालं ?
ईश्वर त्यांच्या कु़टुंबियांस दु:ख झेलण्याचे बळ देवो आणि आत्म्यास शांती देवो !
वरुण मोहितेंना श्रद्धांजली.
असे कोणाचे अकाली जाण्याबद्दल ऐकले कि फार जास्त उदासवाणे वाटते.
ईश्वर त्यांच्या आप्त परिवारास धीराने उभे राहण्याची शक्ती देवो.
मी त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही.
पण त्यांच्यासोबत झालेल्या चर्चा कायमच रंजक असायच्या
प्रत्येक वेळी त्यांचा एक नवीन पैलू दिसायचा.
एक जबरदस्त व्यक्तिमत्व गमावल्याची हुरहूर कायम राहील.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
श्रद्धांजली! :-(
वमोपा म्हणजे वरुण मोहिते-पाटील असा आदरमिश्रित गंमतीने उल्लेख होत असे.
मध्यंतरी माझं मिपा खातं स्थगित झालं होतं. मालकांची माफी मागून प्रकरण मिटवायचं म्हणंत होतो. मी माफी मागायच्या बेतात आहे हे वमोपांना आजिबात सहन झालं नाही. खरंतर माझ्याच चुकीमुळे खातं गोठवलं गेलं होतं. पण त्यांनी शेवटपर्यंत मला माफी मागू दिली नाही. एव्हढी आस्था दाखवायला मी त्यांचा कोण लागून राहिलो होतो? कोणीच नाही. तो माणूस मुळातूनच दिलदार होता.
दिलदारीवरनं माझी मागल्या ऑगस्टातली (साल २०१८) भेट आठवली. तेव्हा तर माझी त्यांच्याशी ओळखही नव्हती. पण गा.पै. आलेत असं कळताच त्यांनी सरळ कट्टा जाहीर केला. त्यांच्या ओळखीच्या हॉटेलात. शुक्रवार होता तरीही बरेच लोकं आले. खाणं भरपूर झालं, आणि पिणंही. यथावकाश एकेक जण निघू लागला. तेव्हा लोकांना कळलं की बिलाची व्यवस्था वमोपा परस्पर पाहणार आहेत. पूर्णत: अनपेक्षित आदरातिथ्य करण्यासाठी दिलदारी हवीच.
सर्वांनी आपापल्या प्रकृतीस जपा, इतकंच तूर्तास सांगेन.
-गामा पैलवान
या कट्ट्याला झालेली वरुण ची भेट पहिली आणि आता दुर्दैवाने शेवटची... बाकी मिपा आणि कायप्पा मुळे ओळख. समविचारी असल्यानं अनेकदा गप्पा व्हायच्या... कायप्पा समूहावर मी कुणाशी भांडत असलो की फोन करून "जाऊ दे रे, सोड रे..." असं सांगायचा.
त्याचं वाचन अफाट होतं. आणि अनुभवविश्व भलतंच समृद्ध! ममव लोकांच्या कल्पनेत पण येणार नाहीत अशा कित्येक विषयांवरचे त्याचे अनुभव तो शेअर करत असायचा... आणि (माझ्याशी नसले तरी इतरांशी) मतभेद झाले, तरी त्याच्या वागण्या-बोलण्यात कधीही कटुता नसायची.
आठवड्यापूर्वी एका कामानिमित्त फोनवर बोललेलो. ठाण्यात माझ्या ऑफिस जवळ भेटायचं ठरवलेलं. त्यांनतर एक-दोन दिवसात, 9 जुलै ला त्याचा फोन आलेला. पण काही ऐकू येत नव्हतं. आणि कामात असल्यानं नन्तर फोन करायचं राहून गेलं...
आयुष्यभर चुटपुट राहणार आता! :(
वरुण मोहिते यांच्याशी प्रत्यक्ष परिचय नव्हता पण त्यांच्या लिखाणातून, संदेशांमधून त्यांच्या जिंदादिल स्वभावाची ओळख होत असे. जिथे असतील तिथे धमाल करत असोत....
भावपूर्ण श्रद्धांजली
मनाने सुद्धा राजा असलेल्या जिंददील चतुरस्र मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली.
कितीही विरोधी राजकीय मत असले तरी वैयक्तिक कटुता निर्माण न होउ देता मत मांडण्याचे धाडस आणि कसब ज्या मोजक्या मिपाकरांना आहे त्यात वमोपा नक्कीच आहेत
अत्यंत दुःख झाले असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु
अत्यंत वाईट बातमी. अजूनही खरे वाटत नाही.
इतक्या अल्प वयात जाणे धक्कादायक आहे. आधी ओंकार पत्की, नंतर तात्या आणि आता वरूण मोहिते . . . तीन मिपा सदस्य एक वर्षाच्या आत गेले. तिघांचंही जायचं वय नव्हतं. मिपाला दृष्ट लागली कोणाची तरी.
वरूण मोहितेंचा उल्लेख मी गंमतीने मोहितेसाो असा करायचो. क्रिकेट, राजकारण, पुस्तके अशा विविध विषयांवर ते बोलायचे. काही महिन्यांपूर्वी ते पुण्यात आल्यानंतर भेट होणार होती, पण आयत्यावेळी काही कारणाने भेट झाली नाही.
मोहितेसाोंच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना!
प्रतिक्रिया
श्रद्धांजली
*वरुणराजा खरोखर रुसला*
*वरुणराजा खरोखर रुसला*
वरुण यांच्या जाण्यावर विश्वास
श्रद्धांजली!
वरून मोहितेंना श्रद्धांजली.
भावपूर्ण आदरांजली
भावपूर्ण आदरांजली
श्रद्धांजली
बोकाशेठ, तात्या आणि आता वमो
क्काय ?
ओह !
वरुणला भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपुर्ण श्रध्दाजंली
र्रर्रर्रर्र
भावपुर्ण श्रध्दांजली
भावपुर्ण श्रध्दांजली
फारच धक्कादायक.
_/\_
श्रद्धांजली!
:( इतक्या अकाली वयात?
त्यांनी मला फोन करूनही
खूपच दुःखदायक घटना
धक्कादायक बातमी
विश्वासच बसत नाही
भावपूर्ण आदरांजली
माणूस दिलदार होता :-(
समविचारी, दिलदार मित्र गेला...
अरे बापरे! हे काय? अवघडेय :(
धक्कादायक...
काय ???
श्रद्धांजली
धक्कादायक बातमी.
भावपूर्ण आदरांजली
अतिशय दु:खद
ध्क्कादायक बातमी
खुपच त्रास देणारी बातमी.
धक्कादायक ! :'(
भावपूर्ण श्रद्धांजली!
वमोपा
भावपूर्ण श्रद्धांजली वमोपा...
भावपूर्ण आदरांजली....
भावपूर्ण आदरांजली.
माझीही ......
धक्कादायक!
दुःखद बातमी.
अत्यंत वाईट बातमी. अजूनही खरे
वरुण मोहितेंना श्रद्धांजली.
वमोपांना आदरांजली!
धक्कादायक बातमी :(