✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उम्फ वर्ल्ड

अ
अन्या बुद्धे यांनी
Tue, 05/07/2019 - 16:37  ·  लेख
लेख
उम्फ वर्ल्ड डेविड इंगलमन या शास्त्रज्ञाचा एक टॉक ऐकला. एकदम भारी. डोक्याच्या पलीकडे! म्हटलं तर कल्पना अगदी साधी आणि सरळ. पण ती वाढवणे प्रत्यक्षात आणणे खरंच भन्नाट आहे. या जगाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा! आपल्या मेंदूच्या क्षमताच आपलं जग केवढं हे ठरवत असतात. नुसतं केवढं हेच नव्हे तर त्याचा गुणात्मक दर्जा देखील. पाच इंद्रियां मार्फत येणाऱ्या संवेदनांवर हे अवलंबून असणार हे उघड आहे. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्याला अपुऱ्या गंधविश्वावर समाधान मानावं लागतं. पण अनेकजण किती समृद्ध गंधविश्व अनुभवतात हे मी (असूयेने) पहात असतो. बहिरे लोक किती मोठ्या आनंदाला मुकतात हे मी संगीतप्रेमी असल्याने सहज समजू शकतो. पण या अडचणी दूर झाल्या तर किती छान होईल नाही! हे नक्कीच शक्य आहे.. नव्हे प्राथमिक स्वरूपात शक्य झालं देखील आहे. कसं ते विस्कटून सांगायचा प्रयत्न करतो. हे खरंय की इंद्रिये संवेदना मेंदूकडे पाठवतात. आणि मेंदूत त्या संवेदनांचा अर्थ लावला जातो. म्हणजे एका अर्थी घटना मेंदूच अनुभवत असतो. गार पाण्यात हात घातला तर हाताच्या त्वचेमार्फत संवेदना जाते हे खरं पण ती जाणवते मेंदूतच. पण मेंदूचा पाण्याशी संपर्क आलेला नसतो. हेच सर्व संवेदनांबाबत घडत असते. मेंदू स्वतः काहीच न अनुभवता सर्व काही अनुभवत असतो. शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की जिभेकडून निघणारे मज्जातंतू त्याचा अर्थ लावणाऱ्या केंद्राकडे न पोचू देता मधेच कानाच्या मज्जातंतूला जोडले आणि जिभेवर लिंबाचा रस टाकला तर कानात आवाज झाल्याची संवेदना होते. कारण मेंदूतील ऐकण्याच्या केंद्राकडून चवीची संवेदना आवाजाची असल्याप्रमाणे समजून घेतली जाते. डोळ्याकडून जाणाऱ्या मज्जातंतूना जोडली तर विशिष्ट रंग दिसतो चवी ऐवजी! याचा उपयोग करून पुढले प्रयोग केले गेले. आवाजातून कानाला जाणवणारे कम्पन त्वचेला देता येऊ शकेल. आणि ठराविक प्रकारचे कंपन म्हणजे ठराविक आवाज असे मेंदूला शिकवता येऊ शकेल या आधारावर प्रयोग सुरू झाले. एक असे पॅड बनवले जे पाठीवर चिकटवता येईल आणि ते ध्वनीकंपन त्वचेला जाणवेल असे बदलून त्वचेला पोचवेल. मग प्रत्येक उच्चार म्हणजे वेगळे कंपन असा सराव मेंदूला करून दिला की झालं! हे खरंच घडलं आहे. असं कंपन त्वचेकडून ग्रहण करून त्याचा अर्थ लावायला शिकलेले ठार बहिरे लोक पाठीच्या त्वचेच्या सहाय्याने 'ऐकू' लागले आहेत. तसे यशस्वी प्रयोग झाले आहेत. आणि हे लीप-रीडिंग नव्हे. डोळे बांधून देखील हे करता येऊ शकतं सरावाने. यामुळे बहिरे लोक देखील 'ऐकू' शकतात. इतकंच नव्हे पाठीच्या त्वचेच्या सहाय्याने वेगळे पॅड लावून आंधळे 'पाहू' देखील शकतील! शारीरिक उणिवा दूर होऊ शकतीलच पण त्या पलीकडे सारे विश्व देखील खुले होऊ शकेल आपल्या सगळ्यांसाठी! कसे ते सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याला जग जस आहे तस जाणवत नाही. त्या आकलनाला आपल्या इंद्रियांच्या ग्रहण क्षमतेच्या नैसर्गिक मर्यादा आहेत. काही ठराविक रंगतरंग फक्त पाहू शकतो आपण इन्फ्रा रेड आणि अल्ट्रा वायोलेट आपण पाहूच शकत नाही ही आपल्या डोळ्यांची मर्यादा आहे. तेच ऐकण्याबाबत. जे वटवाघूळ ऐकू शकतं असे आवाज आपण ऐकूच शकत नाही. या अशा मर्यादित जगाला 'उम्फ वर्ल्ड' अशी संज्ञा दिली आहे. तर या नव्या तंत्राच्या सहाय्याने आणि सरावाने आपण आपलं उम्फ वर्ल्ड आपल्या मेंदूच्या क्षमते इतकं वाढवू शकू! एखादा कुशल संगीतकार मानवी कानांच्या मर्यादा ओलांडून स्वर वापरून संगीत देऊ शकेल किंवा एखादा चित्रकार नजरेला न दिसणारे रंग वापरून कलाकृती बनवेल आणि रसिक त्याचा यथायोग्य आस्वाद देखील घेऊ शकतील. या वाढलेल्या विस्तारलेल्या उम्फ वर्ल्डचा आनंद घेता येणे किती भन्नाट असेल नाही!! - अनुप
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9652 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

मजाच!!

कंजूस
Tue, 05/07/2019 - 17:55 नवीन
मजाच!!
  • Log in or register to post comments

ऐला भारीच गोंधळ

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 05/07/2019 - 19:20 नवीन
पण मानवी उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या टप्प्यानंतर आपण कानाने ऐकणे , तोंडाने बोलणे ,डोळ्याने पहाणे. त्वचेने स्पर्श जाणवणे , जिभेने चव बघणे वगैरे "शिकलोय". आता हे सगळे उलटेपालटे करायचे म्हणजे सगळी गडबड होणार की!! मजा सोडुन देउ. पण दिव्यांग लोकांना हे वरदानच वाटेल.
  • Log in or register to post comments

भन्नाट कल्पना आहे! _/\_

टर्मीनेटर
Tue, 05/07/2019 - 21:36 नवीन
भन्नाट कल्पना आहे! _/\_
  • Log in or register to post comments

काही लोकांना हे

अमेरिकन त्रिशंकू
Wed, 05/08/2019 - 00:31 नवीन
काही लोकांना हे नैसर्गिकरीत्या होतं. त्याला सिनस्थेशिया असं म्हणतात. Synesthesia is a condition in which one sense (for example, hearing) is simultaneously perceived as if by one or more additional senses such as sight. Another form of synesthesia joins objects such as letters, shapes, numbers or people's names with a sensory perception such as smell, color or flavor.
  • Log in or register to post comments

हे शक्य आहे का?

Rajesh188
Wed, 05/08/2019 - 08:39 नवीन
पण हे सर्व शक्य आहे का की फक्त कल्पना आहे .
  • Log in or register to post comments

शक्य आहेच घडलं देखील आहे..

अन्या बुद्धे
Wed, 05/08/2019 - 13:26 नवीन
शक्य आहेच घडलं देखील आहे.. https://youtu.be/4c1lqFXHvqI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

वॉव ! रोचक आहे की .

उगा काहितरीच
Wed, 05/08/2019 - 19:14 नवीन
वॉव ! रोचक आहे की .
  • Log in or register to post comments

रोचक !

अनिंद्य
गुरुवार, 05/09/2019 - 11:46 नवीन
रोचक !
  • Log in or register to post comments

रोचक विषयावरचा लेख.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/09/2019 - 12:02 नवीन
रोचक विषयावरचा लेख. सद्या मानवी शरीराला "इलेक्ट्रो-मेकॅनिकल-केमिकल डिव्हाईस" समजून (ते एका अर्थाने तसे आहेच म्हणा !) त्याच्यावर प्रयोग करणे चालू आहे. आणि त्यातून अनेक चमत्कृतीपूर्ण माहिती पुढे येत आहे. लेखाचे शीर्षक "उमवेल्ट किंवा उम्वर्ल्ड" असे हवे कारण तो मूळ जर्मन शब्द "Umwelt (environment or surroundings)" असा आहे.
  • Log in or register to post comments

ओहक्के.. सुधारणेसाठी धन्यवाद!

अन्या बुद्धे
गुरुवार, 05/09/2019 - 12:20 नवीन
ओहक्के.. सुधारणेसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा