( दाराआडचा वास )
कुबट वास दाराआडुन पडतो आहे बाहेर
किती बाहेर?
यत्र तत्र सर्वत्र , नाकाच्या आर पार
नाकातले केस जळून जात आहेत , जळत आहेत
किती वेळ ?
पोटातले ढवळतंय, येतेय बाहेर, कोण आहे तिथे आत
कुणी तरी एक बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही त्या भयानक वासाचा विचार?
जळत असतील का त्याचेही नाकातले केस
दरवाज्याबाहेर , दरवाज्याच्या पलीकडे?
कुणी उभाही राहू शकत नाही , त्या वासाशिवाय ...
मग मी माझे नाक घट्ट दाबून , आलेली कळही दाबून ,
डोळे आणि डोळ्यात जीव आणि पाणी घेऊन
शांतपणे उभा राहतो....
वासाला चैत्र पालवी फुटलेली असते
नाक नसलेल्या दाराआडून बहरत राहते...
बहरतच राहते....
हा हा... भारी...
तोबा तोबा...
हे बघा अजून जमलंय का ते .. डेटॉलची जाहिरात