Skip to main content

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 17/01/2019 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
लोक हो केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत). सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो. खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत. 10pc
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 116930
प्रतिक्रिया 247

प्रतिक्रिया

अमिब्रोकर हे असेच लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ते वापरून अल्गोट्रेडींग करता येते. ही एक अशी तयार अल्गोट्रेडींग आहे, असे वाटते. मी माझे स्वत:चे अल्गो तयार केले आहेत. पण ते सुपरवाईज्ड आहेत. स्वयंचालित नाहीत. पण माझ्यासाठी ते पुरेसे आहेत. मी कुंडली बघायचो. आता बंद केले आहे. कुंडलीचा मी ट्रेडींगसाठी वापर करत नाही ( माझ्याकडच्या सॉफ्टवेअरमध्ये अमावस्या आणि पौर्णिमा आलेखावर मांडता येतात).

आज दुध का दुध पानी का पानी करण्याचा एक उपाय माझ्याकडे आहे. हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. (माझा आणि या अॅपचा दुराव्ययानेही संबंध नाही) यात आपल्याला वर्चुअर ट्रेडींग करता येते. म्हणजेच ख-या नावाचे शेअर ख-या किंमतीत खोटी खोटी खरेदी करता येतात. शेअरच्या अॅपमधल्या किंमती आणि बाजारातील किंमत यात थोडा फरक असतो. बाकी हे अॅप आपल्याला शेअर बाजारात आपण किती नफा कमवू शकलो असतो हे व्हर्चुअली दाखवतात. युयुत्सु यांना आपला दावा सिद्ध करायचाच असेल तर अॅप डाऊनलोड करुन त्यावरुन शेअरची खरेदी करावी.महिना अखेरीस ते या अॅपमधून त्यांनी निवडलेल्या शेअरचा स्टेटस दाखवू शकतात. यात कुठेच कुणाचेच पैसे खिशातून जाणार नसल्याने कोर्ट वगैरे भानगड नसतील. दुध का दुध पानी का पानी मात्र करता येईल. बाकी हे करायचे की नाही ती युयुत्सु यांची मर्जी. ते त्यांनी करावेच असा आमचा हट्ट वगैरे नाही. पण आपण हे जर केलेत तर पुरावे हातात असल्याने आपल्या दाव्याला पुष्टी मिळेल. असे काहीही न करण्याचा आपणाला पुर्ण अधिकार आहेच. बाकी मिपाकरांनीही हे अॅप वापरून पहायला हरकत नाही. खरोखर पैसे बुडण्यापेक्षा आपला अभ्यास किती हे समजून घेण्यासाठी हे उपयोगी ठरेल. "माझा आणि या अॅपचा दुराव्ययानेही संबंध नाही"

शब्दानुज, या ॲपच्या लिंकबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! ॲप उतरवुन घेतले आहे. "खरे" तर मला या ॲपचा माझ्या अल्गोच्या फाईन ट्युनिंगसाठी खुप उपयोग होईल कारण मी दर वेळेला माझ्या मॉडेल ने सुचवलेले शेअर्स पैसे अडकलेले असल्यास घेऊ शकत नाही. ते इथे मला जमेल असे वाटत आहे. पण या ॲपवर प्राथमिक नजर टाकली असता आपल्याला हवा तो शेअर शोधणे अतिशय जिकीरीचे आहे. पण प्रयत्न करून बघतो. मी आपल्या सूचनेचा खुल्या मनाने विचार करत आहे, हे लक्षात आले असेलच!

In reply to by युयुत्सु

आपणास जर मी सुचवलेल्या अॅपमद्दे शेअर शोधण्यास अडचण येत असेल तर या दुस-या अॅपमधून तुम्ही शेअर सर्च करून पाहू शकता. हे काहीसे सपोर्टींग अॅपसारखे आहे पहिल्या अॅपसाठी. https://play.google.com/store/apps/details?id=com.alifesoftware.stocksc… बाकीच्या टेक्नीकल गोष्टी तुम्ही अॅप वापरायला चालू केलेत की कळत जातील. मलाही मूळात शेअर बाजाराची माहिती नसल्याने यात मी फार खोल गेलेलो नाही.

माझ्या धाग्यावर झालेल्या गदारोळात एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे दूर्लक्ष झाले. स्टॉक निवडायचे निकष विशिष्ट क्रमाने बदलले तर खालिल चित्र दिसते - १०% पेक्षा जास्त परतावा दिलेले स्टॉक गेला १ आठवडा - २ गेले २ आठवडे - ५ गेले ३ आठवडे - १३ गेले ४ आठवडे - १९ गेले ५ आठवडे - २५ गेले ६ आठवडे - ४१ गेले ७ आठवडे - ६५ गेले ८ आठवडे - ४९ गेले ९ आठवडे - ६० गेले १० आठवडे - ५६ हे जर परताव्याचे प्रमाण १०% पेक्षा ८% वर आणले तर याच संधींची संख्या आणखी वाढते. अभ्यास (तुमचे मॉडेल) व्यवस्थित असेल तर या संधी पकडता येणे कठीण अजिबात नाही. हे फक्त ग्लास अर्धा भरलेला ज्यांना दिसतो त्यांनाच दिसते. मार्केट्च्या नावाने शंख करणा-यांना हे कधीच दिसणार नाही. जाता जाता - हा प्रतिसाद टंकत असताना हे माझे मॉडेल पॉलिश करायच्या आणखी कल्पना सुचल्या, त्यामुळे मी आत्ता खुष आहे.

मी या धाग्यावर माझ्या मॉडेलने सुचवलेल्या स्टॉकचे उदा० म्हणून federal bank चे उदाहरण दिले होते. आजच ही बातमी वाचायला मिळाली आणि मी बरोबर असल्याचा आणखी एक संकेत मिळाला. स्वत:च्या अभ्यासाला पर्याय नाही.

कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की मी हा धागा थंड झाल्यावर पण महिन्याला ८-१०% मिळु शकतात का या दृष्टीने अत्यंत गंभीरपणे विचार सुरु केला आणि स्वत:लाच आह्वान दिले. मग संशोधन करत पूर्वलक्षी पद्धतीने (historically) असा परतावा देईल असा अल्गॉरीदम विकसित करायचा प्रयत्न केला आणि सध्या सरासरी महिना ८.५% देणारा अल्गॉरीदम विकसित केला आहे. यात एक ग्यानबाची मेख आहे, ती अशी की अल्गॉरीदमने समजा क्ष इतक्या कंपन्या सुचविल्या तर सर्व क्ष कंपन्यांचे समभाग विकत घेणे आवश्यक ठरते. तेव्हढे भांडवल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हा अल्गॉरीदम डोळे मिटून (संगणकाने करायच्या ट्रेडींगसाठी असल्याने) करण्यासाठी असल्याने मध्येच आपण काही लुड्बुड केली तर परताव्यावर परिणाम होऊ शकतो. मार्केट गडगडत असताना हा अल्गॉरीदम कसा काम करतो हे अजून तपासलेले नाही. पण इकॉनॉमी जेव्हा गती घेते तेव्हा डोळे मिटून हा अल्गॉरीदम वापरता येईल. यात मला एका प्रश्नाचे उत्तर अजून सापडलेले नाही. गेले काही दिवस महिन्याला अंदाजे ३०-३५ कंपन्या १०% पेक्षा अधिक परतावा देत असताना माझा अल्गॉरीदम फक्त १०-१५ कंपन्या सुचवून सरासरी ८.५ % देत आहे. तेव्हा ही तफावत का हे शोधायचा प्रयत्न चालु आहे. टीप - अल्गोट्रेडींगची संकल्पना ज्यांना ठाऊक आहे त्यांना मी काय म्हणतो ते कळणे अवघड जाऊ नये. १% वाल्या ’विद्वानांनी’ या फंदात अजिबात पडू नये.

तर मंडळी, ३० जानेवारीला प्राज इं० घेतला. तो आजच लाभांश धरून ६.६२% वर आहे. ही एका आठवड्यतली कामगिरी आहे. माझ्या मॉडेलप्रमाणे तो आणखी वर जाणार आहे.

In reply to by युयुत्सु

इतके ट्रेडस लावले तर ते बिझिनेस इन्कम होणार नाही का? टॅक्स च्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे. कृपया यावर प्रकाश टाकाल का? (सध्या माझे स्ट्रीक आणि ट्रेंडलाईन वरती अल्गोज रन होतात)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

प्रश्न चांगला आहे आणि मला पण पडला होता. कारण Frequent trading ची व्याख्या संदिग्ध आहे. मला एका ब्रोकरने त्याच्या सेमिनारमध्ये असे सांगितले की की income की prophit हे आपणच एकदा सुरुवातीला घोषित करायचे असते (त्याने एका सर्क्युलरचा संदर्भ दिला होता). पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर ’ज्ञानव किंवा कुणी करतज्ञ चांगले देतील.

तर मंडळी ९ जानेवारीला Info Edge India घेतला. आज ७.१२ % (लाभांश धरून) नफा मिळवून काढुन टाकला.

तर मंडळी त्या एक टक्कावाल्याना सांगा. प्राज इं० आत्ता ८.८४% वर पोचला आहे. तो पण एका आठवड्यात.

लोकहो, Neuland Laboratories - १८ जानेवरीला ५७७.५९ ला घेतला आणि आज ६४८ ला काढला एकूण नफा १२.१९% आणी तोही ३ दिवसात!

In reply to by युयुत्सु

युयुत्सु आपणास याबाबत आधीच्या चर्चेतही सांगितले होते की आपण वा अन्य कोणी "एखाद्या" शेअरवर १० टक्के नफा कमवू शकता. यात कोणताही वाद नव्हताच. "एकूण" गुंतवलेल्या रकमेवर "एकूण " मिळकत १० टक्के असू शकती का हा मुद्दा चर्चेचा होता.अशा एक एकट्या शेअरच्या उदाहरणावरून आपला मुद्दा सिद्ध होत नाही. जर आपण निवडलेले शेअर नुकसानमद्धे जात असतील (जर असतील तर) तर ते मात्र तुम्ही इथे देण्यात टाळाटाळ करत आहात. केवळ ज्या शेअरमद्धे आपण नफा कमावला त्याचेच उदाहरण देत आहात. जोपर्यंत आपण पुर्ण महिनाचा , पुर्ण गुंतवणूकीचा लेखाजोखा ( फायद्या तोट्यासहित) इथे दाखवत नाहीत तोपर्यंत तुमचा दावा सिद्ध होत नाही. रचाक्याने बाकी आमच्या सारख्या लोकांना (ज्यांना शेअरचा 'श'हि कळत नाही त्यांच्यासाठी ) किती टक्के नफा यापेक्षा गुंतवणूकीचा अभ्यास जास्त महत्वाचा वाटतो. ते सोडून इतर धाग्यांप्रमाणे यातही सर्वांनी (दुर्दैवाने लेखक महोदयांनाही) वाद घालण्यात उर्जा वाया घालवली आहे. जरी पुढे मागे जावून आपण हे सिद्ध जरी करून दाखवले तरी त्याचा इतरांना काहीच उपयोग नाही कारण तुम्ही तुमच्या पद्धती , अभ्यास उघड करायला तुम्ही तयार नाहीत. यासाठी आपण दिलेली कारणेही न पटणारी होती. आपल्या ज्ञानाबद्दल आदर बाळगूनही हे खेदाने म्हणावेसे वाटते की या धाग्याचे प्रयोजन 'मी कसा परतावा देवु शकतो पहा ' असे होते. त्यामूळे धागा दुसरीकडेच गेला. आपण सप्रमाण सिद्धता देवून जर आपल्या पद्धती वा किमान ठोकताळे समजावून दिले असते आणि इतरांच्या काही पद्धती तपासून ,जोखून पाहिल्या असत्या तर सगळ्यांनाच फायदा झाला असता. असो. हा प्रतिसाद आपण वैयक्तिकरित्या घेणार नाहित ही आशा आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.

In reply to by शब्दानुज

दरमहा १०% परतावा. 20 Jan 2019 - 9:22 pm | ज्ञानव हे सोदाहरण दिलेत तर चर्चेला उधाण येईल. बरेच पंटर आहेत इथे. माझा पहिला प्रतिसाद हाच होता. जो तुम्ही (शब्दानुज) विस्तृतपणे मांडला आहे. पुढे त्याला वादाचे वळण देणारे सत्याचे प्रयोग बरेच झाले. दरमहा १०% परतावा मिळू शकतो का ? ही अप्सराच बऱ्याच विश्वामित्रांना ह्या धाग्यावर खेचून घेऊन आली अन्यथा जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी वाचून सोडून दिले असते. म्हणजे ज्यांना मार्केटमधले कळते त्यांनी कळते म्हणून सोडून द्यावे आणि ज्यांना कळत नाही त्यांनी एकतर सोडून द्यावे किंवा वाचनमात्र राहावे; पण इतरांना सावध करण्याचा आव आणून १०% महिना कसे बुवा मिळवतात? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे गेल्या ३० वर्षात बरेच पाहिले आहेत. त्यांचा प्रयत्न असा असतो कि जर मेख कळली तर आपला फायदाच आणि असे काही नसते हे कळले तर बघा मी म्हणत नव्हतो असे म्हणून स्वतःचे सत्कार समारंभ करून घ्यायला मोकळे म्हणजे तिथे हि माझाच फायदा. हेजिंगच एक प्रकारे. विषयाला धरून प्रश्न विचारले जात असतानाच किंवा धागा विषयाला धरून पुढे सरकत असतानाच त्याला वेगळे वळण देणारे झारीतले शुक्राचार्य पदोपदी आडवे येणे नवीन नाही. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे युयुत्सुनि आपली पाने ओपन करून दाखवावीत किंवा आपले मुद्दे विषयाला धरून मांडावेत हेच मला प्रेरित होते. मूळ धाग्यातील ? लक्षात घेऊन त्यावर सर्वांनी आपली मते मांडणे अपेक्षित होते पण............................

In reply to by ज्ञानव

काय ज्ञानव सर, तुमचे सोन्याचे ट्रेडिंग आणि तुमची ती सिस्टीम यांचे काय झाले? कशी काय प्रगती चालू आहे? जुना संदर्भ देतो शोधून हवा असेल तर.

Mr X-- when someone says stupid and absurd things what do you do? ME --I say, you are right Mr X-- but that is ridiculous ME -- you are right

In reply to by सुबोध खरे

२३ जानेवारीला शेवटचा म्हणून वर किती प्रतिसाद टाकलेत हो खरे साहेब? :) बरं आता माझ्यावर चिखलफेक करतात म्हणून येतो वगैरे म्हणू नका, एका जुन्या आयडीचा ट्रक ठराविक कंपू इथे अजूनही फिरवत असतो पण तो आयडी त्या प्रत्येक धाग्यावर स्वतःचा इगो कुरवाळायला टोमणे मारत फिरताना दिसला नाही मला तरी. जातो म्हणाला आणि गेला (आता दुसर्‍या आयडीने आला असेल तर गोष्ट वेगळी पण तो आयडी परत नाही आला :) ). याला म्हणतात निग्रह. असो तुमच्याशी चर्चा करताना काय करायला हवे त्याची हिंट दिल्याबद्दल धन्यवाद... So Khare sir, you are right.

युयुत्सुनि आपली पाने ओपन करून दाखवावीत मी माझे सर्व पत्ते कधीही उघड करणार नाही. मागच्याच आठवडात श्री० विवेक बजाज नावाच्या एका अत्यंत हूशार तज्ञाची कार्यशाळा मी अटेंड केली. या गृहस्थानी पण आपल्या स्ट्रॅटेजीज खुल्या केल्यास त्या काम करत नाहीत असेच सांगितले. शिवाय अशा माध्यमांवर सविस्तर लिहीणे (त्यातही आर्थिक व्यवहारांवर) अत्यंत मनस्ताप देणारे ठरते, असा माझा अनुभव आहे. डमी व्यवहार करून हे खरखोटे करता येईल पण त्यासाठी पुरेसा वेळ द्यायला द्यायला हवा. कोरा वर मूळ प्रश्न मी जेव्हा विचारला तेव्हा "अशक्य नाही पण अवघड आहे" असे उत्तर मिळाले. आपला फोलिओ जर ४ ते ५ स्टॉक पर्यंत मर्यादित असेल तर एकूण गुंतवणुकीवर असा परतावा मिळवता येईल असे वाटते. पण त्यापेक्षा जास्त असल्यास हे अवघड होत जाईल. सध्या माझ्याकडे ५०+ स्टॉक्स आहेत (हे असे का याची माझी कारणे आहेत आणि त्याची चर्चा इथे मला अभिप्रेत नाही), त्यामुळे मला स्वत:ला एकूण गुंतवणुकीवर असा परतावा मिळवणे अवघड आहे. मला असे वाटते मी लिहीताना संदिग्धता टाळण्याचा शक्य तेव्हढा प्रयत्न केला आहे.

In reply to by युयुत्सु

दरमहा १०% परतावा. 20 Jan 2019 - 9:17 pm | ज्ञानव शक्य आहे. पण मिळत नाही. श्री युयुत्सु, मार्केटमध्ये लाखो strategy ज आहेत. त्यातल्या काही उत्तम चालतात. साधी wma क्रॉस ओव्हर पण उत्तम चालते. त्यामुळे काय वर्क आऊट होईल त्याची चिंता करण्यापेक्षा ते वर्क आउट होण्यासाठीचा संयम आणि शिस्त आपल्याकडे आहे का हयावर फोकस होणे गरजेचे असते. बजाज काय म्हणतो ते सोडून द्या. पण जर तुम्ही तुमचे पत्ते ओपन करणार नसाल तर हा व्यर्थ धागा काढण्यामागचे तुमचे प्रयोजन काय ? ते स्पष्ट केलेत तर बरे होईल.

In reply to by युयुत्सु

१. स्वत:च्या अभ्यासाला पर्याय नाही. २. मी माझे सर्व पत्ते कधीही उघड करणार नाही. वरील दोन्ही मुद्द्यांशी सहमत. बाकी एकंदर सगळा धागा भलताच विनोदी आहे. मला तर लाँग-टर्म महिना २ टक्के फक्त परतावा मिळाला (ते पण साधे व्याज, चक्रवाढ व्याज न्हवे) तरी मला हर्षवायू होईल.

मंडळी ते जाऊ दे. आज ३० जानेवारीला घेतलेला प्राज इं० आज ९.३७% फायदा घेऊन काढून टाकला.

पण जर तुम्ही तुमचे पत्ते ओपन करणार नसाल तर हा व्यर्थ धागा काढण्यामागचे तुमचे प्रयोजन काय ? मूळ प्रश्नावर लाऊडथिंकींग करणे आणि संधी असतात का, या प्रश्नाचे उत्तर शोधणे इतकेच अभिप्रेत आहे.

आज लोकसत्ता अर्थवृत्तांता मधे आलेल्या खालील लेखा बाबत काय मत आहे. पुस्तकी मुल्या पेक्षा बाजार भाव कमी आहे. अर्थात हा एकच निकष नसणार. https://www.loksatta.com/arthvrutant-news/best-investment-options-in-in…

तर मंडळी २१ आणि २७ फेब्रु०ला घेतलेले NCC आणि GAIL आत्ता ४.९० % आणि ३.६७% वर आहेत. आणखी प्रगती झाली की इथे सांगेनच.

५०-६० शेअरवर "एकूण" गुंतवणूकीवर १० % दरमहा परतावा मिळणे अवघड आहे. दरमहा "काही" कंपन्या १०% परतावा महिन्यात देतात. अशा संधी बाजारात असतात.आपला अभ्यास असेल तर त्या कंपन्यपैकी आपल्याला काही आधी घेऊन ठेवता येतात. केवळ त्या ठराविक शेअरवर १०% टक्के परतावा मिळतो , पुर्ण पोर्टफोलिअोवर नव्हे. काहीच शेअरचा प्रश्न असल्याने जरी ठराविक शेअरवर १०% महिना परतावा मिळाला तर मिळणारी रक्कम कमीच असते. (लाखाच्या तुलनेत )त्यामूळे कोणी महिन्यात अब्जाधीश होत नाही. आपला पोर्टफोलिअो वर "एकूण वार्षिक" परतावा २५% , ५०% पर्यंत जावू शकतो. मला वाटते यावर सगळेच सहमत होतील. अजून काही चर्चा करण्यासारखे उरले आहे असे वाटत नाही.

आपला पोर्टफोलिअो वर "एकूण वार्षिक" परतावा २५% , ५०% पर्यंत जावू शकतो. हे वाक्य असे पाहिजे आपला पोर्टफोलिअो वर "एकूण वार्षिक" परतावा २५% , ५०% पर्यंत किंवा अधिक ही जावू शकतो.

तर मंडळी NCC ltd २१ फेब्रु०ला घेतला आणि आज ११% नफा मिळवुन काढुन टाकला!

लोक हो, ही क्लिप अवश्य बघा!>>>>> खूप छान आहे! अशीच एक CD पाहीली होती, "Secrets" का काहीतरी नाव होतं!!!

तर मंडळी Lemon Tree Hotels - १० दिवसात ६.२०%

तर मंडळी निवडणुकपूर्व रॅलीसाठी तयार आहात ना?

काही कोडगे लोक याला बालीशपणा म्हणतात. पण हा धागा "हा सूर्य हा जयद्रथ" करण्यासाठी चालु ठेवला आहे. बरं ७ मार्चला घेतलेला गुजरात गॅस आत्ता ७.३९% वर आहे.

अजून जळजळ जात नाही का? तुमचा जाहीर सत्कार करण्यासाठी तुम्हाला सोईची जागा सांगा.

आपण घेतलेल्या शेअरच्या किमतीत १०% वाढ होवून नफा मिळणे कठीण वाटत असले तरी आपण गुंतवलेल्या रकमेवर १०% परतावा शक्य आहे. ICICIDirect वर तरी सहज शक्य आहे. ICICIDirect - margin trade साठी NSE वर T+5 दिवसात तर BSE वर T+180 मध्ये Square off करण्याची मुभा देते. एका दिवसात Square off करण्यापेक्षा हा पर्याय कमी जोखमीचा ठरतो खास करुन BSE वर. त्याचवेळी margin order असल्याने पुर्ण किंमतीप्रमाणे रक्कम गुंतवावी लागत नाही. गुंतवलेली रक्कम पुर्ण किमतीप्रमाणे होणार्‍या रकमेच्या साधारण ३०% (वा कमी) असते. म्हणजे शेअरची किंमत या काळात ३% जरी वाढली तरी गुंतवणूक रकमेच्या १०% परतावा मिळेल. उदा : मी गोदरेज कन्ज्युमरचे ५० समभाग ६७७ च्या दराने १ मार्च रोजी BSE वर विकत घेतले (म्हणजे margin order केले). याकरिता सुमारे ९००० रु मला गुंतवावे लागले. आता ९००० वर १०% म्हणजे ९०० रुपये परतावा येण्याकरिता हा समभाग केवळ १८ रुपयाने वाढून ६९५ पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सध्या तो ७२३ पर्यंत पोहोचला आहे आणि माझा नफा २३०० च्या जवळ आहे. (मी अजून Square off केलेल नाही..त्याकरिता माझ्याकडे २८ ऑगस्टपर्यंत वेळ आहे.)

In reply to by मराठी कथालेखक

हा दुधारी तलवारीसारखा असतो. नफा डबल हि हाव लॉस डबल ह्या भीतीवर आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवते. ब्रोकर्स ज्या काही जुगारी सवलती देतो त्यामागचे तर्क आणि अर्थ काय असावेत ? का तो तुम्हाला लिव्हरेज म्हणजेच त्याच्या पैशावर कमावण्याची संधी देतो? मला हे प्रश्न नेहमीच अस्वस्थ करतात.

In reply to by ज्ञानव

इथे तुम्हाला मार्जिन ट्रेडिंगचे फायदे मिळत आहेत पण डिलिव्हरीप्रमाणे रिस्क कमी करण्याची संधी आहे. १८० दिवस म्हणजे सहा महिने.. इथे एका महिन्यात परतावा घेण्याची चर्चा चालू आहे. एका महिन्यात शेअरची पुर्ण किमंत गुंतवून त्यावर १०% मिळवण्यापेक्षा शेअरची सुमारे ३०-३५% किमंत गुंतवून सहा महिन्याची संधी मिळत असेल तर त्यात वाईट काय ?..एका महिन्यात फायदा होण्याच्या शक्यतेपेक्षा सहा महिन्यात फायदा होण्याची शक्यता (probablility) नक्कीच जास्त असेल.. इथे मी गुंतवणूक (invesetment)शी तुलना करत नसून margin trading (intra day) आणि short term trading (डिलिव्हरी घेवून केलेले) यांच्याशी तुलना करत आहे. icicidirect चे brokerage काहीसे जास्त आहे हाच काय तो तोटा...

In reply to by युयुत्सु

हो कारण ते एका दिवसार स्क्वेअर ऑफ करायचे असते. पण स्क्वेअर ऑफ ला १८० दिवस मिळत असतील तर ?

शब्दानुज यांनी सुचवल्या प्रमाणे डमी ट्रेडींगचे ॲप उतरवुन घेतले आणि काही व्यवहार केले. पण त्याचा अहवाल इथे देता येत नाही. जास्तीत जास्त पुढे दिल्याप्रमाणे स्क्रिनशॉट दिसतो. त्यामुळे काही नतद्रष्ट लोकांना पट्वण्याचा उद्योग करण्यात मला आता रस नाही. शिवाय डमी फोलीओ रोजच्या रोज बघुन होत नाही.

तुमची जी काही स्ट्रेटेजी आहे, त्याच सक्सेस रेट किती आहे? म्हणजे तुम्ही १० आयडीया शोधुन काढल्या तर त्यातील किती १०%+ एका महिन्यात रीटर्न देतात. आपण हे किती वर्षे वापरत आला आहात, जर अनेक दशके वापरत असाल तर.... ही स्ट्रेटेजी मार्केटला किती % नी बीट करत आली आहे? का कायम अब्सोलुट १०% रीटर्न मिळतोच. मला अनेक प्रश्न पडले आहेत, कारण १०% दरमहा (कंन्सिस्टंटली) मिळवणे अति अवघड आहे (मायक्रोसॉफ्ट अथवा अ‍ॅपल कंपनी शून्यातुन उभी करण्याईतकेच)

In reply to by बेकार तरुण

योग्य प्रश्न -ह्यांची उत्तरे मिळाली तर बरय. दरमहा १०% म्हणजे १ लाख आज टाकले तर ६० महिन्यात २.७ कोटी. मग मस्त रिटायर होउन मज्जानु लाईफ :)

In reply to by ढब्ब्या

मला वाटते त्यांना प्रश्न बेकार वाटले म्हणुन त्यांनीच उत्तरेच दिली नाहीत. पण इतरत्र उत्तरात त्यांनी अस्वल बाजारात (बेअर मार्केट) रीटर्न १०% मिळेलच असे नाही असे म्हणल्या सारखे वाटते. माझ्या मते सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणता शेअर १०% रीटर्न देईल आणी ते ओळखण्यात किती वेळा आपण चुकतो. जर सक्सेस रेट १० पैकी ७ पेक्शा जास्ती असेल तर कुठलाही मुच्युअल फंड (अगदी फिडेलिटी सुद्धा) तुम्हाला सी आ ओ म्हणुन नक्की घेईल (फंड मॅनेजर लहान राहिला). मार्केटमधे महिना १०% काय ४०% वर जाणारेही स्टॉक असतातच, पण गोम असते ते आपण कन्सिस्टंटली ओळखतो का (विथ लेसर मार्जिन फोर एरर). तेच महत्वाचे आहे. तसच बुल रन प्रमाणे बेअर रन मधे मार्केटला कितीने बीट करतो हेही महत्वाचे. असो, मला काहीच फार कळत नसल्याने मी वाचुन काही कळते का ते बघतो.

In reply to by उपाशी बोका

मी सध्या जे मिळवत आहे, त्यात पूर्ण समाधानी आहे. सोन्याची अंडे देणारी कोंबडी कापून खायची नाही अशी मला लहानपणापासून शिकवण आहे.

In reply to by युयुत्सु

हायला लक्षावधी रुपये मिळवणारे यांचे ग्राहक आहेत तर हे ५०० +९० (जी एस टी) रूपड्या (ज्यात चहा नाश्ता सुद्धा देत आहेत) अशी चिल्लर जमवून का जगताहेत? हे म्हणजे आपल्याला राजयोग किंवा भरभराट देणारा ताईत किंवा गंडा ११ रुपयात विकणाऱ्या माणसासारखी स्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

आपला बघायचा दृष्टीकोन "प्रगल्भ" नसल्याने आपण अशी विधाने करत आहात (आता त्याचे हसु पण येत नाही). असे सेमिनार करणारे लोक सहसा भरपूर कमवून झाल्यावर परमार्थ म्हणुन लोकशिक्षणाकडे वळतात. असे सेमिनार पोटे भरण्यासाठी करत नसतात.

In reply to by युयुत्सु

कोण गंडे आणि ताईत वाले ? का शेअर वाले? तुम्ही हसूच नका लोकच हसताहेत तुम्हाला. ८ ते १०% महिनोन्महिने सातत्याने परतावा देण्याचा भंपक दावा करताय म्हणून. कशाला उगाच फुक्या मारताय? असे समाजसेवा करणारे भरपूर लोक फुकट सेमिनार घेतात. इथे पण २०% ROI every month चा दावा करत आहेत. २० % वर्षाला म्हणालात तरी साडे तीन वर्षात साध्या हिशेबाने पैसे दुप्पट होतात. ७२ भागिले व्याजाचा दर इतक्या वर्षात पैसे दुप्पट होतात. उदा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये ८ टक्के व्याजाने ९ वर्षात पैसे दुप्पट होतील. http://www.moneychimp.com/features/rule72.htm चढत्या बाजारात असे भंपक दावे करणारे पडत्या बाजारात तुमचे पैसे घेऊन गायब होतात असा (मिपाकरांचापण) अनुभव आहे. इतके दिवस मी शांत होतो पण तुमचे महा भंपक दावे पाहून उगाच कोणी तरी होतकरू फशी पडायचा आणि धुवून निघायचा म्हणून हा प्रपंच. अन्यथा मी बाजारात १३ वर्षे आहे आणि दोन आवर्तने पाहून तिसरे आवर्तन पाहतो आहे. असे भंपक दावे करणारे डझनाने पाहिलेले आहेत आणि त्यात धुवून निघणारे अनेक होतकरू तरुणही पाहतो आहे.

In reply to by सुबोध खरे

खरे सर, मला वाटतं की हा लेख शेअर "ट्रेडिंग"मधून चांगला नफा मिळवता येतो यावर आहे. आपल्याला शेअर मार्केटचा आणि एकूणच गुंतवणुकीचा चांगला अनुभव आहे. तरीही आपण शेअर मार्केट मध्ये डे ट्रेडिंग करता किंवा डे ट्रेडिंगचा तुमचा अनुभव या बाबतीत आपल्या प्रतिक्रियेमधून काही वाचलेले आठवत नाही. डे ट्रेडिंगमधून बरेच लोक पैसे कमावतात आणि घालवतात. मला वाटतं मूळ मुद्दा टेकनिकल अॅनॅलिसीस आणि चार्टस् वापरून ट्रेडिंगमधून 8 ते 10 टक्के परतावा, तेही काही दिवसांत कसा मिळवता येईल हा आहे. आता एखाद्याने गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा का ट्रेडिंगचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एकूणच धाग्याचा विषय चांगला आहे. अजून काही अनुभव वाचायला आवडेल. धन्यवाद.