✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्मृतीगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.."

व
वामनसुत यांनी
Tue, 03/17/2009 - 12:32  ·  लेख
लेख

Book traversal links for स्मृतीगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.."

  • ‹ स्मृतीगंध-५ " त्रिपुरी पौर्णिमा"
  • Up
  • स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास" ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13197 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

खुप सोसलत हो

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 03/17/2009 - 12:47 नवीन
वामनराव खुप सोसलत मुंबईत येउन खरच तुमच्या लिखाणावरुन अस वाटत आहे एक वेळ जेउन अस दुसर्‍याच्या घरी राहुन तुम्ही खुप खस्ता खाल्ल्या अस्तील राव आजकाल कोनी नाहि करत ऍव्हड सख्या भावासाठी पण नाही करत मानतो तुम्हाला आणी तुमच्या अण्णांना खरच ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

नेहेमीप्र

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/17/2009 - 12:45 नवीन
नेहेमीप्रमाणेच सुंदर लिखाण. किती सोपं आयुष्य जगले/ते मी असं वाटलं. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

मीही

भिडू
Tue, 03/17/2009 - 12:56 नवीन
मीही आयुष्य किती सोपं जगत आहे मी असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१ सहमत

शेखर
Tue, 03/17/2009 - 12:58 नवीन
विशेष म्हणजे जगण्यासाठी इतकी प्रतिकुल परिस्तीथी होती तरी लेखनात कुठेही जीवनाविषयीचा सल जाणवला नाही. सुंदर लिखाण.. शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

स्ट्रगल

सहज
Tue, 03/17/2009 - 12:52 नवीन
जे काय वाचतो आहे, ते डोळ्याला दिसत आहे, समजत आहे पण कधीतरी संगणक नुस्ता घर्र आवाज काढत तापत असतो, स्क्रीन फ्रीज झाली असते, ना धड चालू असतो ना धड बंद होत असतो, तसे झाले आहे. चार तास होत आले की आता काय खायचे हा विचार त्रस्त करत असतो. मागे एकदा प्रवासात एका वयस्कर दांपत्याशी गप्पा मारताना, ते सांगत होते आमच्या लहानपणी (दुसरे महायुद्धाचा काळ) परिस्थीती इतकी बिकट होती, टंचाई होती, गरीबी होती की लहान मुलांना पुरेसे अन्न देउ शकु की नाही असे वाटायचे. आता नातवंडे सांभाळताना इतके जिन्नस त्यांच्या समोर आणून ठेवले असतात पण पुरेसे व योग्य खात नाहीत ही चिंता असते. ही लेखमाला औरच!
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Tue, 03/17/2009 - 12:55 नवीन
वरील प्रतिसादींशी पूर्ण सहमत आहे. 'भोगले जे दु:ख ज्याला'च्या पलीकडे जाऊन साध्यासरळ भाषेत, कुठल्याही उपदेशा/अभिनिवेशाशिवाय होतं ते असं होतं, हे मांडणारी तुमची लेखमाला - प्रत्येक भागागणिक अधिक आवडायला लागली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

असेच

प्रदीप
Wed, 03/18/2009 - 10:37 नवीन
म्हणतो. जे झाले त्याबद्दल कसलीही कटुता नाही, जे भोगले त्याबद्दल आक्रस्ताळीपणा न करता अत्यंत शांतपणे सांगणे, हे फारच भावले. वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुन्न झालो . . .

सुक्या
Tue, 03/17/2009 - 13:05 नवीन
हा भाग वाचुन अगदीच सुन्न झालो. तुमचा भुतकाळ पाहीला की आम्ही आता किती राजेशही जीवन जगतो आहोत हे वाटुन जातं. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मदनबाण
Tue, 03/17/2009 - 13:07 नवीन
अप्रतिम लेख मालिका.... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

+१

दिपक
Tue, 03/17/2009 - 13:23 नवीन
खरच अप्रतिम लेखमाला. "लाईफ इज सफरींग" पेस्तनकाकांचे वाक्य आठवले. ही लेखमाला परत परत वाचायला आवडेल अशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+२

शितल
Tue, 03/17/2009 - 19:10 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

प्रत्येक

रेवती
Tue, 03/17/2009 - 18:42 नवीन
प्रत्येक भाग वाचते आहे. दरवेळेस प्रतिक्रिया देतेच असे नाही. साध्या भाषेत लिहिल्यानेच लेखन मनाला भिडते आहे. रेवती
  • Log in or register to post comments

समाजजीवनाचा दस्तैवज

विसुनाना
Tue, 03/17/2009 - 19:16 नवीन
"असे होते दिवस..." अशा नावाचे आत्मचरित्र वाचतो आहे असे जाणवत राहते. अत्यंत प्रांजळ आणि वास्तव लेखन. खूप आवडले. ('हरून' अरुण वडुलेकरांची आठवण झाली. कुठे आहेत?) कोणता काळ आहे हा? १९४०?५०? या लेखनात स्वतःच्या जीवनविषयक अनुभवांसोबत समाजातील घडामोडींचे अथवा भौगोलिक परिस्थितीचे (जसे राजकीय घडामोडी, गोरेगावचा (मुंबईचा) त्यावेळचा विस्तार , बोट सर्विसची शिपिंग कंपनी इ.) वर्णन आले तर हे लेखन त्या काळातल्या समाजजीवनाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. कृपया सूचनेचा विचार व्हावा.
  • Log in or register to post comments

काळ

प्रदीप
Wed, 03/18/2009 - 10:58 नवीन
कोणता काळ आहे हा? १९४०?५०?
अगोदरच्या एका भागात ४४ साली सातवी (व्ह. फा.) झाल्याचा उल्लेख आहे. तेव्हा आता सुरू आहे तो चाळीशीच्या दशकाचा काळ असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

प्रत्येक लेख वाचतोय!

चतुरंग
Tue, 03/17/2009 - 20:11 नवीन
हलाखी, गरिबी, कष्ट, शिक्षणाची हेळसांड, मुंबईची वाट धरणे, तिथल्या व्यवस्थेत स्वतःला बदलवून चिणून टाकणे हे सगळे प्रकार मला वाटते त्यावेळच्या कोकणवासियांसाठी थोड्याफार फरकाने अनुभवायला येत असावेत. असे जरी असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून गेलेल्याकडून हे लिहिलेले वाचताना त्यातले बारकावे उमजतात. तुम्ही सांगितलेल्या कोकणातल्या जीवनमानाशी जुळणार्‍या घटना माझ्या आजोबांच्या तोंडून ऐकल्याचे आठवते. तुलनेने अत्यंतिक सुखाच्या परमावधीत तर मी लहानपणापासून जगत नाहीये ना? असा प्रश्न मनात येतो आणि अस्वस्थता आणखीनच वाढते! चतुरंग
  • Log in or register to post comments

प्रत्येक भाग

लवंगी
Tue, 03/17/2009 - 20:16 नवीन
प्रत्येक भाग अधिकाधिक पकड घेतोय मनाची. पूर्विच्या पिढ्यांनी खूप सोसलय याची जाणिव होतेय.
  • Log in or register to post comments

वा.. हा भाग

लिखाळ
Tue, 03/17/2009 - 20:29 नवीन
वा.. हा भाग सुद्धा उत्तम. फार चांगली लेखमाला...
आम्ही दोघेजण चौपाटीला गेलो असता माझ्या पायात चपला नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि ही गोष्ट त्याने अण्णाच्या कानावर घातली. सकाळी गणपतीच्या देवळात गेलो असता तेथे चपला गेल्या अशी थाप मी मारली तेव्हा काकाजवळ पैसे देऊन अण्णाने माझ्यासाठी चपला घेऊन येण्यास सांगितले.
ह्म्म.. अश्यावेळी त्या चपला नकोत असेच वाटले असेल....पण स्वाभिमान जपण्यालासुद्धा पोषक परिस्थिती लागते असे अनेकदा वाटते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

छान.

क्रान्ति
Tue, 03/17/2009 - 21:00 नवीन
श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी वाचत असल्यासारख वाटत आहे. सहज, सोपी ओघवती भाषा आणि सुन्दर शैली यामुळे सगळ वर्णन अगदी प्रत्यक्ष एखाद्या चित्रपटाप्रमाणे समोर येतय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

बापरे..

प्राजु
Tue, 03/17/2009 - 21:24 नवीन
या रूपयांचं मूल्य तेव्हा किती होतं.. मी फारच सोपं आणि सहज जगले असं वाटतं आता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Wed, 03/18/2009 - 08:27 नवीन
>>.. मी फारच सोपं आणि सहज जगले असं वाटतं आता. +१, असेच म्हणतो ... आयला आमचे आयुष्य फारच सोपे आणि सुलभ होते असे वाटायला लागले आहे. सुंदर लेखमाला, आंतरजालीय साहित्यातील एक वेगळ्याच धाटणीचा अनुभव म्हणुन जरुर ह्याची प्रशंसा केली जावी ... जाता जाता : आईनस्टाईनने गांधींबद्दल जसे उद्गार काढले त्याच धर्तीवर मी " कोणी एका काळी हाडामासाचा माणुस अशा प्रकारचे जीवन जगत होता ह्यावर कदाचित पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत" असे म्हणु इच्छितो ... अर्थात माझा रोख त्या काळातल्या एकुणच कठिण असणार्‍या जीवनशैली व त्यासाठी कराव्या लागणार्‍या अत्यावश्यक तडजोडींवर आहे ... अजुन येऊद्यात, आम्ही वाचतो आहोत ... ------ (वाचक)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अत्यन्त सुन्दर

उनाड
Wed, 03/18/2009 - 07:24 नवीन
या लेखनात स्वतःच्या जीवनविषयक अनुभवांसोबत समाजातील घडामोडींचे अथवा भौगोलिक परिस्थितीचे (जसे राजकीय घडामोडी, गोरेगावचा (मुंबईचा) त्यावेळचा विस्तार , बोट सर्विसची शिपिंग कंपनी इ.) वर्णन आले तर हे लेखन त्या काळातल्या समाजजीवनाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. कृपया सूचनेचा विचार व्हावा. वरील विसुनानान्च्या सूचनेचा जरून विचार व्हावा. खुपच सुन्दर लिहिताय तुम्ही. तुमचे लेखन एक अमुल्य ठेवा ठरेल पुढच्या पिढिसाठी.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुनील
Wed, 03/18/2009 - 11:18 नवीन
कुठलाही अभिनिवेश न आणता केलेले सहज सुंदर कथन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/18/2009 - 11:49 नवीन
वाचायला खूपच मजा येत आहे. अवांतर : त्या वेळच्या गोरेगावबद्दल अजून वाचायला खूपच मजा येईल. (गोरेगावकर) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वामनसुत
Wed, 03/18/2009 - 18:06 नवीन
आपणा सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

७

स्पंदना
Mon, 10/21/2013 - 07:11 नवीन
स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास"
  • Log in or register to post comments

भांबेड, तिवरे या गावी मी जाउन

खटपट्या
Mon, 10/21/2013 - 08:02 नवीन
भांबेड, तिवरे या गावी मी जाउन आलो आहे. या भागाचे शहरीकरण न झाल्यामुळे अजून बकालपणा आला नाही आहे. अजूनही गावपण आहे. हे असेच राहावे असे वाटते. गणपतीला कोकणात जातो तेव्हा एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा