नमस्कार,
मी अशोक गोडबोले यांच्याशी बोलल्यावर या वेबसाईटवर डोकावले. आणि ही पहिली वेबसाईट आहे जी linux मधेही अतिशय उत्तम चालते, त्याचे मला खूप कौतुक वाटले. आपले आभार आणि अभिनंदनही!
एकच विनंती .... मराठी आणि English मधे बदल करण्याची कळ जर "प्रतिक्रिया" या खिडकीच्या शेजारी असेल तर फार उत्तम होईल.
मी अशी सुंदर, सहज, सोपी, साधी आणि आकर्षक वेबसाईट पाहून बेहद्द खूष झाले आहे.
संहिता
मिसळपावी तंत्रज्ञांना एक विनंती,
एखाद्याला लेखन करायचे असेल तर ई-मेल सर्विसेस मधे ड्राफ्ट फोल्डरमध्ये ते साठवून ठेवता येते
तशी सोय करता येईल का?
म्हणजे ज्याला जसा वेळ मिळत जाईन तसा तो लेखन करत जाईन. आणि जेव्हा वाटेल तेव्हाच त्याला प्रकाशित करता येईल...
यामुळे माझ्यासारख्यांची चांगलीच सोय होईल व लेखनासाठी मिळणारी २ मिनिटे - ५ मिनिटे - १० मिनिटे सत्कारणी लावता येतील
व लेखकांना जास्तीत जास्त लेखन मिसळपाव वर देता येईन :)
धन्यवाद
सागर
तात्या, नीलकांत,
माझ्या सूचनेची दखल घेत आहात त्याबद्दल मनापासून आभार...
माझी खात्री आहे की जर आपण ही सुविधा देऊ शकलो तर मिसळपाववर अधिक प्रमाणात लेखन पहावयास मिळेल. यात शंका नाही...
धन्यवाद
सागर
चतुरंगराव,
नीलकांत हे नक्की करतील यावर माझा विश्वास आहे.
खरे तर प्रत्येकाची ही गरज असेल..
त्यामुळे तुमचे चतुरस्त्र लेखन आता अधिक प्रमाणात वाचावयास मिळेल अशी अपेक्षा आहे.
दुसरे असे की ... मी वेळेअभावी प्रत्येक लेखाला वा मताला प्रतिसाद देऊ शकत नाही... पण वाचत मात्र नक्की असतो...
तेव्हा तुम्हाला (आणि समस्त सदस्यांना) आत्तापर्यंत माझा प्रतिसाद मिळाला नाही तर मनात काही ठेवू नये एवढीच विनंती...
धन्यवाद
सागर
सरप॑च,
याहू कि॑वा इतर स॑स्थळा॑वर जशी निरनिराळे हावभाव दाखवणारी "स्माईलीज" आहेत तसे मिपावर करता येइल का?
बर्याच इ॑ग्रजी बोर्डवर ही सुविधा उपलब्ध असल्याचे स्मरत॑.
तात्या, नीलकांत...
आज मेंटेनन्स करणारच आहात तर अजून थोड्या सूचना सुचवू इच्छितो...
- येथे इमेजेस जशी जोडता येतात तशा फाईल्स साठवता येतील का? (पीडीएफ, वर्ड, एक्सेल...) म्हणजे एखाद्या चर्चेमध्ये कोणाला संदर्भ द्यायचा असेल तर डायरेक्ट ती फाईल जोडता येईल.... म्हणजे दुसर्या ठिकाणी अवलंबून राहणार नाही कोणी (लिंक्स वगैरे)
- खरडवहीतील नोंदीतील प्रतिसाद कोठेही क्लिक न करता का नाही बघता येत? आणि प्रतिसाद दिल्यावर आपल्याला हे कळतही नाही की प्रश्नकर्त्याच्या खरडवहीत आपली नोंद जाते की नाही... खरडवहीत जर मी एखाद्याला प्रतिसाद दिला तर तो प्रतिसाद त्या सदस्याच्या खरडवहीत दिसायला हवा.... कारण तांत्रिकदृष्ट्या माझा प्रतिसाद हा दुसर्या सदस्याच्या खरडवहीतील नोंद होते..... याबाबतीत काही करता येईल का?
- टंकलेखन रंगीत करता आले तर खूप छान.."मिसळपाव"वरील वातावरण रंगीत होईल...कसे?
ह्या सूचना कोणत्याही संकेतस्थळाशी तुलना करुन सांगितलेल्या नाहीत. तर "मिसळपाव"वर ह्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर मिसळपावचे वजन अधिक वाढेल असे वाटल्याने सुचविल्या आहेत....
सध्यातरी एवढेच....
सागर
प्रतिक्रिया
उत्तम वेबसाईट
गमन
लेखन साठवून ठेवता येईल का?
अरे नीलकांता,
मनापासून आभार...
अगदी माझ्या मनातलं
नीलकांत हे नक्की करतील यावर माझा विश्वास आहे.
स्माईलीज...
आज मेंटेनन्स करणारच आहात तर अजून थोड्या सूचना सुचवू इच्छितो...
नीलकंता,