✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समज-गैरसमज

आ
आपला अभिजित यांनी
गुरुवार, 03/12/2009 - 00:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12852 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

खूप आहेत.

प्राजु
गुरुवार, 03/12/2009 - 00:26 नवीन
अगदी भरपूर. एक समजूत होती म्हणजे.. सिनेमात गाण्यावर नाचणारी/रा नट/ नटी हीच गात असते. मग एकदम तीला सगळं कसं अगदी नीट येतं असं वाटायचं. दुसरी समजूत होती..अगदी लहान असताना जेव्हा जीवशास्त्र या विषयाबद्दल काहीही माहिती नव्हती तेव्हा.. कधी कधी आजी नकळतपणे बोलून जायची "तुझा भाऊ लाडका आहे.. बरोबर! तुला भाकरिच्या तुकड्यावरच (विकत)घेतली ना!!" तेव्हा वाटायचं .... मला भाकरीच्या तुकड्यावर घेतली तर भावाला बहुतेक श्रीखंड आम्रखंडावर घेतलं असावं .. म्हणून आजीचा तो लाडका आहे. आजी उपहासाने म्हणते आहे हे नंतर लक्षात आलं. आणि मुलं अशी कोणत्याही तुकड्यावर घेत नाहीत हे फारच नंतर लक्षात आलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मला

निखिल देशपांडे
गुरुवार, 03/12/2009 - 11:54 नवीन
मला सुद्धा..... घरचे सांगायचे कि तुला बोहारणि कदुन जुने कपड्यांचा बद्ल्यात घेतले आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

टि. व्हि. वरिल जहिराती

कुमार भिडे
गुरुवार, 03/12/2009 - 00:26 नवीन
टि.व्हि. वरिल जाहिराती मुळ्ये मुलान्चे मराठी बिघडत आहे का?
  • Log in or register to post comments

जहिराती,

टिउ
गुरुवार, 03/12/2009 - 00:38 नवीन
जहिराती, मुळ्ये, मुलान्चे
इतका टिव्ही बघु नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुमार भिडे

वरील, बघू!!!

आपला अभिजित
गुरुवार, 03/12/2009 - 00:45 नवीन
टीव्ही, वरील, बघू!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

व्वा!

आपला अभिजित
गुरुवार, 03/12/2009 - 00:36 नवीन
`अवांतर' असा उल्लेख न करताही तुम्ही जी समर्पक प्रतिक्रिया टाकली आहे, त्याबद्दल धन्यवाद कुमार भिडेसाहेब!!! :? माफ करा, हा कौल आहे का?? :S
  • Log in or register to post comments

लेख आवडला !

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/12/2009 - 00:55 नवीन
लेख आवडला. थोडेसे स्मरणरंजन , थोडेसे चिंतन , थोडीशी मजा. "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" म्हणजे काय ? लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याच अंकुशाचा मार. थोडक्यात थोर्थोर लोकांना अंकुश पडतो , लहान मुंगीस साखरेचा रवा मिळतो. तस्मात , देवा मला लहानच ठेव ! असा अर्थ. बाकी लहानपणच्याच अनेक चुकीच्या संकल्पना , गैरसमज (इतरांप्रमाणे) माझ्याही होत्याच. तुमच्या लेखात लहानपणीच्या गमतीजमती सांगताना त्यामधे अचानक ठाकरे-पवार आले याची मला थोडी गंमत वाटली.
  • Log in or register to post comments

"महिना

भडकमकर मास्तर
गुरुवार, 03/12/2009 - 01:30 नवीन
"महिना संपला की दिनदर्शिकेवरील महिन्याचे पान देव उलटून देतो का? " असे मी चार वर्षांचा असताना आईला विचारले होते....( घराघरांतील दिनदर्शिकेचे महिन्याचे पान बदलून देणे हे देवाचे महिनाअखेरीचे महत्त्वाचे काम आहे अशी माझी पक्की समजूत होती.) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

(घराघरांती

शितल
गुरुवार, 03/12/2009 - 02:02 नवीन
(घराघरांतील दिनदर्शिकेचे महिन्याचे पान बदलून देणे हे देवाचे महिनाअखेरीचे महत्त्वाचे काम आहे अशी माझी पक्की समजूत होती.) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

वाह अशा

भाग्यश्री
गुरुवार, 03/12/2009 - 01:58 नवीन
वाह अशा बर्‍याच गोष्टी होत्या! आत्ता दुर्दैवाने काहीच आठवत नाही आहे.. पण मजा असायची लहानपणी.. काय एकेक समज गैरसमज.. ! आणि जे मनात येईल ते बोलायची निरागसता... मी लक्षद्वीपला जायच्या आधी अगदी दारात आईला खूप निरागसपणे विचारले होते, आपले जहाज बुडले तर?? आई हताश.. आणि मी वर म्हणतीय, कित्ती मज्जा ना! डॉल्फीन्स बरोबर येऊ आपण घरी वगैरे ! :| http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

:-)

सहज
गुरुवार, 03/12/2009 - 05:59 नवीन
मला देखील वाटायचे की समुद्रात मदतीची गरज असली की दरवेळी डॉल्फीन धावून (पोहून) येतोच :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

आई माझा

शितल
गुरुवार, 03/12/2009 - 02:10 नवीन
आई माझा अभ्यास घेत होती, तिने विचारले मेणबत्ती कधी विझते मी उत्तर दिले होते लाईट आल्यावर मेणबत्ती विझते. :( आमच्या वाड्यात पाण्याचे ड्रम भरलेले असायचे कामवाल्याबाईसाठी त्याला बाथरूम कोणता तरी सौम्य करंट बसत होता, पाण्यात हात घातला की तो सौम्य करंट जाणवे, मी आमच्या आजुबाजुच्या मुला मुलींना आणी भावाला त्या पाण्यात हात घालायला सांगे आणी मग आपल्या ड्र्म मध्ये आकाशातील वीज पडली त्यामुळे ते आपल्याला ते तसे लागते असे अनुमान मी काढले होते. :(
  • Log in or register to post comments

लहानपणच्या महान शंका...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/12/2009 - 02:27 नवीन
अभिजितनी छानच विषय लावून दिला डोक्याला. मी ५-६ वर्षांचा असताना आजीला विचारलेला प्रश्न... जेव्हा कोणालाही बाळ होते तेव्हा ते बाळ मुलगा की मुलगी हे कसे ओळखतात? :( (अर्थात उत्तर मिळायचा प्रश्नच नव्हता... "शहाणाच आहेस. हो तिकडे" असं काहीसं तिने म्हणलेलं आठवतंय.) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अच्छा!

चतुरंग
गुरुवार, 03/12/2009 - 06:15 नवीन
म्हणजे ही चिकित्सक बुद्धी तेव्हापासून 'कार्यकर्ते' आहे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मलाही हाच प्रश्न... ;)

केदार_जपान
गुरुवार, 03/12/2009 - 06:51 नवीन
मलाही हाच प्रश्न होता...तेव्हा आई म्हणाली...सोप्पे आहे.. मुलगी असली तर तिच्या डोक्यावर केस असतात आणि मुलगा असेल तर केस खूप कमी असतात... :) आणि माझाही तोच (गैर) समज होता बरेच दिवस... ;) --------------------------------- केदार जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

४-५ वर्षाचा असेन

चतुरंग
गुरुवार, 03/12/2009 - 06:23 नवीन
प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण नाव समजलेच पाहिजे असा काही ग्रह मी करुन घेतला होता. आजोबांनी गोष्ट सांगताना विष्णूचा उल्लेख आला, मी विचारले "आजोबा, विष्णूचे पूर्ण नाव काय?" क्षणभर आजोबा विचारात पडले मग म्हणाले "मला माहीत नाही. विष्णूचं पूर्ण नाव विचारणारा तू पहिलाच असशील!" मग बराच वेळ मी विचार करत राहिलो की आजोबांनाही माहीत नाही अशा काही गोष्टी असतात. त्याचा धक्का बसला होता मला! चतुरंग
  • Log in or register to post comments

विष्णू

मनिष
गुरुवार, 03/12/2009 - 09:22 नवीन
विष्णू वसुदेव यादव - पुरा नाम, अय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ते तर

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/12/2009 - 11:34 नवीन
ते तर श्रीकृष्णाचे नाव झाले. विष्णूचे नाव. विष्णू वैकुंठकर किंवा विष्णू शेषशायी वगैरे काहीतरी असेल. :) जसे लक्ष्मीचे 'सौ. लक्ष्मी विष्णू वैकुंठकर' असे होऊ शकते. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

अरे हो!!!

मनिष
गुरुवार, 03/12/2009 - 11:38 नवीन
हे विसरलेच होतो! विष्णू चे नाव हवेय नाही का? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

लग्न झाले

सँडी
गुरुवार, 03/12/2009 - 07:05 नवीन
लग्न झाले की "आपोआप" मुलं होतात हा आम्चा लहानपणीचा सगळ्यात मोठा (गैर)समज, आमच्या शेजारच्या colonyतील एका कन्येने "दुर" केला!
  • Log in or register to post comments

हो..

प्राजु
गुरुवार, 03/12/2009 - 07:45 नवीन
माझी आजी मला तिच्या शाळेतल्या गमतीजमती सांगत होती. सांगता सांगता, म्हणाली "मॅट्रीक झाले आणि मग माझं लग्न झालं." मी म्हणाले "म्हणजे तू मोठी होतीस का तेव्हा??".. आजी म्हणाली "हो ..१४-१५ वर्षांची होते." मग मी विचारलं मग तेव्हा "तुला किती मुलं होती??" आजीने सणसणीत शिवी हासडली मला आणि "हो बाजूला तिकडं" असं म्हणाली. तेव्हा आपलं नेमकं काय चुकलं हेच समजलं नव्हतं :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

छान विषय!!

मुक्ता २०
गुरुवार, 03/12/2009 - 07:39 नवीन
मला सुद्धा असे बरेच गैरसमज होते. त्यातला एक म्हणजे कि माझी आई दूरदर्शनवर बातम्या देते. म्हणुन रोज आजोबांसोबत बसुन टि.व्ही बघायचे!! नंतर बरेच वर्षानी कळलं कि ते तसं नाहिच! प्र. माझ्या बहिणीने विचारला होता बाबांना, " बाबा, माकडं कपडे का नाही घालत? " तेव्हा ती ३-४ वर्शांची असेल.. इतक्यात आमच्या कुत्रिने (डायना) ७ पिलांना जन्म दिला. पहिलं पिल्लु झालं तेव्हा लगेच, "काकू, पिल्लं कुठुन येतात?"-इति माझा चुलत भाऊ. :)
  • Log in or register to post comments

मलाही

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/12/2009 - 10:16 नवीन
मलाही या बेडकी प्रकाराने मुंज होईपर्यंत धडकी भरली होती.
मलाही जाम भीती वाटायची. मग मी एक आयडिया केली होती. हळुच ब्लेडने मांडीवर छेद दिला व नंतर ती जखम भरु दिली. त्याचा वण उमटु दिला. मुंजीत मांडीत बेडूक भरायची वेळ आली कि गुरुजींना सांगायच कि अगोदरच तो दुसर्‍या गुरुजींनी भरलेला आहे. आता आवश्यकता नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

बालपण

मन्जिरि
गुरुवार, 03/12/2009 - 10:25 नवीन
आम्हि गावाला गेलो होतो . बहिण होति चार वर्शाचि बोबडि.तिने महिस (माफि दोन मात्रा आल्या नहित) पहिल्यादाच पाहिलि तिने आइला विचारले होते "अग हे ताळ ताळ काय दिसतय ग ''
  • Log in or register to post comments

बस कन्डक्टर

चिरोटा
गुरुवार, 03/12/2009 - 10:34 नवीन
बस कन्डक्टरला लोक सारखे पैसे देत असतात म्हणुन मी घरी 'बाबा,तुम्ही बस कन्डक्टर का नाही होत?"असा प्रश्न विचारला होता.
  • Log in or register to post comments

लहानपणी

अमोल नागपूरकर
गुरुवार, 03/12/2009 - 10:44 नवीन
लहानपणी ढगान्च्या गडगडण्याचा आवाज ऐकून मला असे वाटायचे की स्वर्गमध्ये सर्व देव आपआपल्या रथातून जात असावेत. त्यामुळे इथे जसा ट्रक, बस वगैरेन्चा आवाज येतो तसा तिथला आवाज येत असावा.
  • Log in or register to post comments

आकाशवाणी

पाषाणभेद
गुरुवार, 03/12/2009 - 10:53 नवीन
लहाणपणी रेडिओ ऍकतांना सगळे गायक खरच रेडिओत बसून गातात असे वाटे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

माझाही मोठा गैरसमज

योगी९००
गुरुवार, 03/12/2009 - 11:15 नवीन
अगदी ७/८ वी पर्यंत माझा पं नेहरू फार आदरणीय वाटायचे. मी जर झोपा काढत असलो आणि कोणी हटकलेच तर चाचा नेहरूच "आराम हराम है" असे म्हणतात असे मीच सांगायचो. जसे आपणं पैसा वैसा, अलाणा फलाणा असे जोड शब्द म्हणतो तसे मला आराम-हराम हे जोडशब्द वाटायचे. तेव्हा झोपायला जाताना बर्‍याचदा म्हणायचो की चला आराम-हराम करूया. सुदैवाने लोकांना वाटायचे की मी जोकच करतोच. म्हणून ते हसायचे. तसेच मला लहानपणी गायी म्हशींची धार काढतात आणि दुध मिळते असे सांगितल्यावर पहिल्यांदा कळले नव्हते की शिंगाची धार काढल्यावर दुध कसे काय मिळते? (हाच गैरसमज आदरणीय पु.ल.नां सुद्धा होता. त्यांनी हसवणूक मध्ये माझे बालजीवन मध्ये सांगितले आहे. पण माझा गैरसमज तो लेख वाचायच्या आधीचा होता. ) पण बाबांनी एकदा मला कोल्हापुरला कट्ट्यावर नेले आणि धारोष्ण दुध पिऊ घातले. तेव्हाच हा समज दुर झाला. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

माझी मुलगी

जागु
गुरुवार, 03/12/2009 - 12:19 नवीन
माझे नाव प्राजक्ता आहे. आमच्या घरी प्राजक्ताचे झाड आहे. रोज त्याचा सडा पडतो. घरातले लोक प्राजक्ताच्या झाडाबद्दल बोलत असतात. माझी मुलगी २.५ वर्षाची होती तेंव्हा तिची काकी सकाळी प्राजक्ताची फुले गोळा करत होती. माझ्या मुलीने ते बघितले आणी तिला म्हणाली ती फुल नको घेऊ माझ्या आईची आहेत ती.
  • Log in or register to post comments

माझ्याही मुलाने

प्राजु
गुरुवार, 03/12/2009 - 19:12 नवीन
मी मागच्या वर्षी भारतात गेले होते तेव्हाचा हा किस्सा. आईकडे कोल्हापूरला प्राजक्ताचं झाड आहे. माझं नावही प्राजक्ता आहे ना, तर माझा लेक मला विचारतो, "तू या झाडाच्या ट्रंकमधून (बुंध्यातून) बाहेर आलीस आणि मग आजीनं तुला पाहिलं आणि घरात आणलं का? " - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

आता राहवत नाही!

आपला अभिजित
गुरुवार, 03/12/2009 - 19:17 नवीन
आईचं पोट फाडून डॉक्टर मूल बाहेर काढतात, मग ते शिवलेलं पोट कधीच कसं दिसत नाही, या प्रश्नानं तर माझं अर्ध बालपण अस्वस्थ केलं आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

व्वा!

आपला अभिजित
गुरुवार, 03/12/2009 - 18:08 नवीन
सगळे बालपणाच्या बावळटपणाच्या आठवणींत न्हाताहेत नुसते!! लेखात अन्य काही गमतीदार गैरसमज सांगायचेच राहिले. 1. पृथ्वी गोल असते, मग ती स्वतःभोवती फिरताना माणसे पडत कशी नाहीत, असा प्रश्‍न मला पडायचा. (भूगोल शिकल्यानंतरही त्याचे पूर्ण निरसन मला झाले आहे, असे वाटत नाही.) 2. पृथ्वीचं शेवटचं टोक कुठे असेल, असाही एक प्रश्‍न कायम सतावायचा. म्हणजे, कुठेतरी असं एखादं ठिकाण असेल, जिथे जमीन, पाणी संपतच! पुढे थेट दरी! म्हणजे विमानाच्या खिडकीतून खाली बघितल्यासारखं! त्याचंही समर्पक उत्तर देणारा कुणी "माई का लाल' लहानपणात तरी भेटला नाही! 3. "माकडाचं घर बांधून झालंच नाही,' असा धडा शाळेत होता. तेव्हा खरंच माकडाचं घर असतं कुठे, या कुतूहलानं पछाडलं होतं. अजूनही ते कुतूहल शमलेलं नाही. आता आमच्या इमारतीसमोरच खिडकीच्या तावदानाच्या जागेत कबूतरं उभ्या उभ्या रात्रभर राहताना, झोपा काढताना पाहूनही आश्‍चर्य वाटतं!! बाकी, लैंगिकतेबद्दलचे (लहानपणचे) प्रश्‍न आणि शंका अनंत आणि अगाध आहेत. त्याविषयी अख्खा ग्रंथ लिहून होईल. त्यामुळे न बोललेलंच बरं!!
  • Log in or register to post comments

१. >>पृथ्वीच

शक्तिमान
Fri, 03/13/2009 - 00:19 नवीन
१. >>पृथ्वीचं शेवटचं टोक कुठे असेल, असाही एक प्रश्‍न कायम सतावायचा. म्हणजे, कुठेतरी असं एखादं ठिकाण असेल, जिथे जमीन, >>पाणी संपतच! पुढे थेट दरी! म्हणजे विमानाच्या खिडकीतून खाली बघितल्यासारखं! असंच सेम-टू-सेम वाटायचे मला... आणि आकाशात दिसणारे ग्रह-तारे खूप मोठे असतात आणि त्यांच्यावर माती (? :P ) असते हे मला पटायचेच नाही. २. रेडिओ आणि टी.व्ही. च्या आत माणसे असतात असे मलाही वाटायचे... एकदा तर मी एका बातम्या देणार्‍या निवेदिकेला वाकुल्या दाखवून पळालो होतो... त्यानंतर काही दिवस ती माझ्यावर चिडली आहे मला वाटत असे. ३. बातम्या देणारे निवेदक अगदी तोंडपाठ असल्यासारख्या बातम्या देत असत.... तेव्हा मला प्रश्न पडे की रोज रोज हे लोक बातम्या कशा काय पाठ करत असतील.. ४. इंग्रजी बातमी देणार्‍यांना एवढे भारी इंग्लिश कसे काय येते हा एक प्रश्न मला पडत असे.... त्याचे उत्तर मीच शोधून काढले होते... की बहुतेक त्यांना मराठीतूनच इंग्रजी बातम्यांचे उच्चार लिहून देत असावेत. ५. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला म्हणजे नक्की कुठे आणि ते चक्रव्यूह कसे दिसते, कशाचे असते हाही प्रश्न मला पडला होता.. ६. चित्रपटांतील गाण्यांमध्ये हिरो-हिरॉईन एवढ्या पटापट कपडे कसे काय बदलतात... तसेच.. हिरो हिरॉईनला अलगद उचलतो तसे आपले पप्पा आईला का उचलत नाहीत.. हा प्रश्न पडे... यावर आईने काय उत्तर दिले होते ते मला आठवत नाहीये :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

पैसे

अनामिक
गुरुवार, 03/12/2009 - 18:19 नवीन
पैसे झाडावर लागतात असा समज असल्याने, मी, दादा आणि ताईने मिळून घरामागच्या आंगणात पैसे पुरले आणि त्याजागी दररोज पाणी घालत असू :) पण झाड काही उगवलेच नाही :( ! अनामिक
  • Log in or register to post comments

मस्त

लिखाळ
गुरुवार, 03/12/2009 - 18:22 नवीन
मस्त लेख..आठवणी आणि प्रतिसाद ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

मी सात आठ

रेवती
गुरुवार, 03/12/2009 - 18:35 नवीन
मी सात आठ वर्षांची असताना नातेवाईकांकडे मुंजीला गेले होते. मलाही दादाच्या दंडात बेडूक भरणार की कायसे सांगूनच नेले होते. घेरा ठेवायला नकार दिल्याने रडणार्‍या मुंजामुलाला दोघा तिघांनी धरून ठेवले होते. रडणे चालूच होते. आता हे बघायला बायका मंडळींची गर्दी झाले होती. नक्की काय चालले आहे हे न समजल्याने मला वाटले की दादाचा दंड कापून त्यात बेडूक भरतायत. त्या गर्दीतूनही आवाज येत होते की अरे बाबा, हलू नकोस, वस्तरा लागेल, रक्त येइल, इ. मला समजेना की इतक्या वाईट प्रसंगी सगळ्या बायका शालू नेसून का आल्यात? रेवती
  • Log in or register to post comments

मस्त --

लिखाळ
गुरुवार, 03/12/2009 - 18:39 नवीन
मस्त :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

धम्माल!!!!!! अ

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/12/2009 - 18:42 नवीन
धम्माल!!!!!! अवांतर: शालू नेसायला काहीही निमित्त चालते... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शालू नेसायला

चतुरंग
गुरुवार, 03/12/2009 - 18:48 नवीन
काहीही निमित्त चालते.. अगदी, अगदी! कित्येकदा तर आधी शालू नेसून मग कायसेसे निमित्त शोधलेले सुद्धा आढळेल!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ढिश्क्यांव!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/12/2009 - 18:53 नवीन
ढिश्क्यांव!!!!!! और ये गोली निशाने पर!!!!!! =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हाहाहा!

प्रमोद देव
Sun, 03/29/2009 - 13:33 नवीन
रंगाशेठ,काय विचार आहे? ;) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

रेवती..

प्राजु
गुरुवार, 03/12/2009 - 19:15 नवीन
डायरेक्ट ऍटक केलाय.. सांभाळ बरं. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अगं मला

रेवती
गुरुवार, 03/12/2009 - 19:21 नवीन
अगं मला माहितीये कुठला सल आहे मनात ते! आता जावळासारख्या प्रसंगी कुणी नवी साडी घेतं का? बहुतेकवेळा नाही... पण मुकुलच्या जावळाला मी पैठणी घेतली (बजेट चुकून दुप्पट झाले, माझ्याकडून;)). अज्जून तेच आहे मनात, असं दिसतय तरी. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

पैठणीचा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/12/2009 - 19:26 नवीन
पैठणीचा राग शालूवर निघतोय तर! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

दुप्पट!!!!! :(

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/12/2009 - 19:34 नवीन
बजेट चुकून दुप्पट झाले, माझ्याकडून चुकून? आणि दुप्पट? ह्यॅह्यॅह्यॅ.... काही खरं नाही रंगाशेठ.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

युती.

अमोल खरे
गुरुवार, 03/12/2009 - 19:47 नवीन
सर्व नारी एक होतायत ह्या विषयावर बिपिनदा.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

टाटा...

मदनबाण
गुरुवार, 03/12/2009 - 18:45 नवीन
मी तर आकाशात विमान दिसल की जोरात ओरडत असे.... चाचा नेहरु टाटा,,,इंदिरा गांधी टाटा (कारण हे दोन व्यक्तीच विमानाने प्रवास करतात ही माझी ठाम समजुत होती.) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

अगायायाया

शक्तिमान
गुरुवार, 03/12/2009 - 23:51 नवीन
अगायायाया ssssssss.... =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हा बाणा

शितल
Sat, 03/21/2009 - 06:02 नवीन
हा बाणा लहानपणापासुनच असा आहे तर मला वाटले शिफ्ट करून करून असा झाला आहे. ;) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान

रेडिओत

टिउ
गुरुवार, 03/12/2009 - 20:20 नवीन
रेडिओत लहान लहान माणसं बसुन गातात असं मलाही वाटायचं, किती वेळा मी रेडिओ चालु असतांना आत कुणी दिसतय का बघत बसायचो. लहानपणी एक गावातल्या आजी भाजी विकायल्या यायच्या. आल्यावर नेहमी 'तुला ५ रुपयाला विकत घेतलय. तुझी आई वाट बघतेय, चल माझ्या बरोबर गावाला' म्हणायची. असला राग यायचा म्हातारीचा. पण ती येतांना दिसली रे दिसली की माझा भोंगा चालु व्हायचा. पण म्हातारी एवढी खमकी की पोरगं रडतय, कशाला त्रास द्या असंही तीला कधी वाटलं नाही. शेवटी शेवटी तर मला खरं वाटायला लागलं. मग जन्मदाखला, मी जिथे झालो तो दवाखाना आईनी दाखवला तेव्हा समाधान झालं!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा