हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (२)
पहिल्या भागात हिंदू मुस्लिम धर्मांतर्गत विवाहाच्या सामाजिक-राजकीय पैलुंच्या इतिहासाचा अंशतः विचार केला. हिंदू परंपरावाद्यांनी आताच्या काळात १८ पेक्षा अधिकच्या वयोगटास थांबवणे आता त्यांच्या सहज बसची बात राहिलेली नाही . कोर्ट कचेरी १८+ वर्षे वयाच्या मुला मुलींची जी काही बाजू असेल ती घेणार . प्रतिष्ठेसाठी कायदा हातात घेणे ऑनर किलींग या तसेही आदर्श बाबी नाहीत आणि २१ व्या शतकात त्याला स्थान नाही. मिडिया, सोशल मिडिया चार दिवस चघळेल नंतर परिस्थिती तुमची तुम्हालाच हाताळावी लागणार . परिस्थितीच्या नावाने रडणार कि त्यातल्या त्यात रचनात्मक काय करता येईल हे पहाणार, हे ठरवले पाहीजे.
हिंदू मुलींचे मुस्लिम मुलांशी लग्न झाले कि मुस्लिम मुलीही हिंदू मुलांशी लग्ने झाल्याची काही उदाहरणे पुरोगामींकडून दिली जातात, हि लोकसंख्या प्रोपोर्शनेट असती तर हिंदूंएवजी मुस्लिम समाज काळजीत पडला असता.
मुस्लिम स्त्री अजूनही अंशतः पडद्यात आणि पारिवारीक विवाहात अडकलेली आहे. किंवा शिक्षण घेतले तरी सहसा उर्दू माध्यमातून घेतले गेल्यामुळे मेट्रोपॉलीतील कॉन्व्हेट शाळातून शिकणार्या काही मुली को एज्युकेशन मध्ये पोहोचतात तेवढाच काय तो सहसा हिंदू मुलांशी संपर्क येत असणार, हिंदू मुलांचीही मोठ्या प्रमाणावर अरेंज्ड मॅरेजेसच होतात मग मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा असे विवाह-लव्ह मॅरेज त्याच प्रोपोर्शन मध्ये दिसत नाहीत. पण समजा एखाद्या हिंदू मुलास अथवा कुटूंबास मुस्लीम मुलीशी शोधून विवाह करुन सून म्हणून परिवारात स्विकारुन घ्यायचे असेल तर काय मार्ग असू शकतात अशा मुली उपलब्ध असू शकतात का ?
कोणत्याही समाजातील लिबरल लोकांची एकुण संख्या किती ते शैक्षणिक, सामाजिक, राजकिय परिस्थितीवर अवलंबून असले तरी किमान १५% ते २० % लिबरल तुम्हाला कोणत्यही समाजात सापडावेत उर्वरीत ८५ पैकी केवळ १५ टक्के कट्टर असण्याची शक्यता असते मधला ७० टक्के वर्ग सहसा परंपरावाद्यांच्या बाजूने उभा असतो पण या ७० टक्क्यांना पालकांनी दिलेल्या बेसिक इंट्रो पलिकडे स्वतःच्या धर्माचाही अभ्यास नसतो तत्वज्ञानाची तात्विक भूमिका घेता येणे दूरची गोष्ट असते. म्हणजे तुम्ही स्विकारण्यास तयार असाल आणि तत्वज्ञानाचा अभ्यास तुमचा स्वतःचा पक्का असेल तर १५ टक्के समाजातील मुली सहज तर उर्वरीत ७० टक्के पैकी जराशा प्रयत्नाने विवाहास उप्लब्ध होऊ शकाव्यात. असे होईलच याची गॅरंटी नाही म्हणून चुभूदेघे . आता मुस्लिम मुलींशी संवाद वाढवण्याचे मार्ग कोणते असू शकतील ? -वृत्तपत्रिय जाहीराती विवाह पोर्टल हे सहज मार्ग असावेत. अर्थात जे काही कराल ते कायदेशीर मार्गाने मुलीच्या पालकांची आणि भावांची संमती घेऊन केले म्हणजे शांततेत पार पाडणे सोपे होऊ शकते - त्यांच्या कडचे अधिकतर विवाह परिवारात होतात त्यामुळे परिवारातले अथवा त्यांच्या जातीतले पर्यायी प्रोपोजल असेल तर जनुकीय दृष्ट्या परिवारीय अथवा जातीअंतर्गत विवाहापेक्षा आंतरधर्मीय विवाह श्रेयस्कर असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. एक तर महिलांसाठी १/३ आरक्षणाचे समर्थन करणे . हिंदू मुलांशी विवाह करणार्या मुस्लिम महिलांना खास करुन तलाक पिडीतांना नौकर्यात आणि उत्पादन कौशल्याचे ट्रेनिंग व फायनान्सला प्राधान्य देणे, विशेषतः खेळ, नाटय, अभिनय, नृत्य, संगित, साहित्य, काव्य, चित्र, मुर्तीकला अशा असंख्य कलातील कलात्मकता विकसित करण्यास हिंदू संसकृती इस्लामी संस्कृती पेक्षा नक्कीच अधिक मोकळीक अधिकृतपणे देऊ शकते या सकारात्मक बाजुस पुढे ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा.
आता दोन्ही बाजूने येणारी नेहमीची समस्या त्यांच्या मुलामुलींचे आणि पालक आणि नातेवाईकांचे मुर्ती पुजा अणि अनेकेश्वर पद्धत चुकीची असल्याचे रोज ब्रेन वॉशींग झालेले असते. इथे हिंदू धर्मातील तत्वज्ञानाची बाजू मजबूत आहे पण त्या बाबत भूमिका मांडणी अधिक व्यवस्थित जमली पाहिजे. पहिला प्रश्न मी कोणत्या जातीत येणार असा फसवा प्रश्न विचारला जाऊ शकतो ईस्लाम-ख्रिश्चन मध्ये जाणारा प्रत्येक नवा ईस्लाम-ख्रिशचन मधील विशीष्ट जात पंथात लगेच जोडून घेत नसतो तसे गरजेचेही नसते , इतर धर्मात जाती नाहीत तसे हिंदू धर्मातही अधिकृतपणे कोणतीही जात अस्तित्वात नाही हे लक्षात आणून दिले पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी वर्ण स्विकारणे गरजेचे राहीलेले नाही पण तुम्हाला तुमच्या समाधानसाठी हवा असेल तो निवडायचा असल्यास निवडा. तुम्ही अमुकच का निवडला हे विचारण्यास कुणिही येऊ शकत नाही.
दुसरी बाब त्यांच्या लक्ष्यात आणून दिली पाहिजे की ईश्वराच्या निर्गुण निराकार असण्या बद्दलच्या फेज मधून हिंदू धर्म केव्हाच पुढे येऊन त्याने नंतर ईतर विवीध पद्धतीने ईश्वरा शी जोडून घेण्यास प्रत्येकाला मोकळीक दिलेली आहे. तुम्ही भारत देशावर आई या रुपा एवजी समजा वेगळ्या नात्याने जोडून घेता तसेच काहीसे हिंदू धर्मात इश्वरीय शक्तीशी केवळ गुलाम नात्याने जोडून न घेता विवीध नात्यांनी जोडून घेता येते. 'हिंदू धर्मातील एक एक मुर्ती एक एक पुस्तकातील ईश्वरीय शक्तीचे स्मरण देते . ' हे वाक्य तुम्हाला समजले नाही तरी मुस्लिमांना समजण्यास सोपे जावे. कारण त्याच्यांत ईश्वराची जाणीव व्हावी म्हणून सुर्य चंद्रादी तार्यांची योजना केलेली आहे हे समजते- तशीच हि इश्वराची आठवण करण्याची मुर्तींची योजना आहे. हे ही पचनी पडेलच असे नाही आणि पचनी पडलेच पाहिजे असेही नाही हे त्यांच्या आधी लक्षात आणून दिले पाहीजे. अगदी ईश्वराचे नामःस्मरण करनारेअनेक स्पिकर लावून त्यांची मुर्ती बनवली तर मुर्ती पुजा विरोधक काय भूमिका घेतील माहित नाही पण पादुका पुजेच्या विरोधात भूमिका घेणे सर्वात कठीण असावे. पण एवढेही नको असेल तर कोणतीच मुर्ती नघेता कोणताही ग्रंथ घेऊन किंवा ग्रंथा शिवाय पण हिंदू रहाता येते आता तेही नकोय कुराण (किंवा बायबल किंवा अजुन कोणता आहे तो ) सांभाळायचा आहे तर हिंदू धर्म वस्तुतः धर्म ग्रंथ, प्रार्थना पद्धती सर्वाचेच स्वातंत्र्य देतो दुसर्यांच्या प्रार्थना आणि भक्ती पद्धतीचे स्वातंत्र्य हिरावू नका, स्वतःच्या देशावर प्रेम करा म्हणजे झाले.
तिसरी बाब हि लक्षात आणून दिली पाहिजे की बर्याचदा धर्म आणि संस्कृतीची गल्लत केल्याने बरीच पंचाईत होते, हिंदू धर्मातील अनेक प्रथा परंपरा या सांस्कृतिक आहेत. हिंदू धर्मीय प्रत्येक गोष्टीत देव किंवा ईश्वरी शक्ती पहातो म्हणजे प्रत्येकाने पाहिले पाहिजे असे नाही किंवा म्हणून टाळले पाहिजे असे नाही. हिंदू धर्मीय प्रकाश स्त्रोतांना पाहूनही नमस्कार करता त म्हणून तुम्ही ते सगळे प्रकाश स्त्रोत वापरणे सोडू शकत नाही . रांगोळी सारख्या अनेक कला व्यक्ति चित्रांशिवाय काढणे शक्य आहे .
एकुण सामाजिक-राजकीय सक्रीय हिंदूंनी स्वतःच्या मनातली असुरक्षीततेची भावना दूर करून घेण्यासाठी मंगलमय हिंदू संस्कृतीची कवाडे मुस्लिम महिलांना मनमोकळे पणाने उघडली पाहीजेत असे वाटते.
* मुस्लिम महिलांनी मुस्लीमेतरांशी विवाहाबद्दल एका आमेरीकन लेखकाचा उदारपंथी दृष्टीकोण असलेला लेख
* Why this deference towards Islam? सुनील शरण टाईम्स ऑफ ईंडिया २७ ऑगस्ट २०१८
* हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (३)
* टिकटॉक एका खुपलेल्या विषयाची चर्चा
हि जाहीरात, जाहिरात आहे अद्याप वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती असती तर जाहिरातीची जरुरी भासली नसती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कुणी कुणाशीही लग्न करा ..
हिंदू धर्मांतर्गत कोणीही
हे जाळ्यात ओढणं वगैरे
मला माहित असलेली घटना
फंडिंग उनाडक्या करणाऱ्या
कि बोलाचीच कढी, बोलाचाच भात ?
काय विनोदी लिहिता राव
मार्ग शोधायचे सोडून पळवाटा शोधणारे पुरोगामीत्व, काय कामाचे ?
याचे उत्तर खाली दुसर्या
" प्यार किया नही जाता , हो
अगदी अगदी
स्वतंत्र धागा चर्चा
पुरोगामीत्वाची गाडी
एक म्हण आठवली.
केवळ असहमतीत सहमत
गाडी रुळावरुन भरकटलेली दिसतेय
मन मोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
डॉक्टर मुलगा आणि टपोरी गँग या
ऐकीव माहितीतल्या लव्ह जिहाद
तुम्ही प्रत्येक वेळेस गडबड
बरं माझा गोंधळ होतोय आणि मी
थँक्स गॉड , चला तुम्ही मान्य
अफलातून प्रतिसाद !!
होत कधी ! कधी !!
१) अशा टपोरी मुलांच्या प्रेमात मुली कशा पडतात ?
तुलना चुकीची वाटते
<<<सुरवातीला तो मुलगा स्वतः
सोमनाथ खांदवे
तशीही धर्मही संकल्पनाच आता
धर्म कालबाह्य होत आहे कारण
@ मराठी कथालेखक
संक्रमण एका दिवसात पुर्ण होत
विशुमित भावू ,
प्रतिसादामुळे एक म्हण आठवली
येईल.....
मनातला लेख जरुर लिहावा. मीही
कोणता शब्द किती शोधला जातो
किमान दहा वर्षांचा डेटा
बरुबर हाये पण आस्ली आकडीवारी
...तशीही धर्मही संकल्पनाच आता
नास्तिकांना काही शोधायची गरज
असो , या विशीष्ठ धाग्याचा
हाहाहा
मराठी कथा लेखक ,
काहि लिन्क्स वाचुन बघा
म्हणून च बाहेर देशात त्या
सोमनाथ खांदवे साहेब इथल्या
बरोबर आहे..
+१
इतिहास काळापासून चालत आलेल्या