आला आला रे पाऊस, असे असे बरसले
अधीरल्या धरतीचे, लाजू लाजू पाणी झाले !
अंगप्रत्यंगी थरार, गात्रे ओथंबू वाहाती
एका रात्री असे झाले, काय सांगू तुल किती !
किलकिले डोळे होतं, वाटे थांबल्यासारखे...
आळसल्या त्या सकाळी, देता आळोखे पिळोखे !
हाय! परतुनी आला, पुन्हा रत अविरत..
सुखांताने अंधारून, देई आकाश संगत !
धुंद धरा धुंद पाऊ, माग कुणालाच नाही
उद्या सकाळी परंतु, वर येई नवलाई !
तरारून येता कोंब, पहा झुलतात झुले
मीलनाच्या एकांताला, येती हिरवाळी फुले !
हिरवाळीत नवोढ्या, मन भटक भटक
उगी रोखू पाहू नको, होई पाऊल "सटक" !
:) मस्त. लेखन् विषयही आवडला.
शेवटच्या कडव्याने सॉलीड
भारी आहे
:)
In reply to :) by रातराणी
+1
भारी आहे.
In reply to भारी आहे. by किसन शिंदे
नंतर मित्र झाला काय?
=))
हा हा हा
व्वाह. मज्जा आया.
हा: हा: !