user

शृंगार

अंतरंग

अंतरंग

पावसाच गाणं
मातीच न्हाणं
माझ समुद्र होण
अंतरंगी

ओला पक्षी
हिरवी नक्षी
मी एक साक्षी
अंतरंगी

चींब सर
ओली थरथर
अधिर हे अधर
अंतरंगी

उठे उधाण
नुरे देहभान
मन हे तुफान
अंतरंगी

झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी

जयपाल ७/७/२०१०

शॄंगार

भिजलेले चिंबुन केस चुंबून सखे मोहरतो
ओलेती झालिस तू, अन् न्हाऊन मनी मी निघतो

डोळ्यातिल काजळ रेखा काळजात मी गिरवीतो
शृंगार तुझा होतो अन् रंगून आत मी निघतो

मलमली ओढणी मधला गंधार मनी घुमघुमतो
नक्षीत बिलोरि तिच्या मी माझेच बिंब पाहातो

काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो
ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो

कृष्णपिसे

आभाळ रीत होतंय आणि मोतीचूर सांडतय
तरारून धरा आलीये आणि काहूर उठतय

सावळभूल उठलीये कृष्णपीस लागलाय
यमुनेच्या पुरापलीकडे मन वेड् धावतंय

सरीबरोबरी भिजता भिजता सुरातही चिंब होतेय
लाघव त्याच्या बासरीच जीवघेण छळंतय

अशी ही निळी मेघभूल मला पुरती वेढतेय
"इथेच आहे तो" भास असा सारखा देतेय

चांदण्या शिवाय अवघं आकाश श्याममय झालंय
मलाच तो गवसेना पण आभाळ त्याने व्यापलाय

वर्षेसारखी तुटून तुटून मीही मनभर ओसंड्तेय
कृष्णंगहिरे रूप साजिरे ठाई ठाई शोधतेय

आणि अचानक मला कसली चांदण मिठी पडली
आणि माझी ओळखा सगळी त्याच्यामध्ये विरली

सापडला माझा कृष्णसखा अन मी मुरली झाले
आभाळ रिते होतच होते मी कृष्णं ओठातून सांडले

अनुजा (स्वप्नजा)

गीत: वाटे मज अपार सुख

वाटे मज अपार सुख
वाटे मज अपार सुख, धरूनी हाती हात
कोणी नसे जवळी तरी तुच द्यावी साथ ||धृ||

कुंजविहारी यमुनाजळी
ऐकून कान्हाची मुरली, राधीका आली प्रेमभरात ||१||

शांत शांत या उपवनी
पाखरे मधूर कुजन करोनी, चोच देती चोचीत ||२||

नकोच काही दुसरे मजला
तुच सखया जवळी असता, साथ देईल चांदरात ||३||

दोन नयनांचे झाले मिलन
ओळख विसरून तन, द्यावया निघाली साथ ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०६/२०१०

<चूळ>

हातात दातून
घेवुन आम्ही दात घासायचो
ती एक चूळ भरायची अन्
मी दुसरी चूळ भरायचो

दात घासत
चूळा भरत असताना,
चुंबनाआधी माउथफ्रेशनरची शिस्त पाळायची
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो

माउथफ्रेशनर वापरता वापरता
कधी तिची बत्तीशी पडली कळलच नाही
मी मात्र भरत आहे त्याच चूळा
माऊथफ्रेशनर वापरत... डे टु नाईट.

युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे

युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे
ती :
अलवार गुपित उमगले प्रितीचे
माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ||

ती :
हळूच आज सांज फुलली
नभानेही लाली ल्याली
लकेर घेवूनी सुरांची सुस्वर
ताला सुरांचे गीत मी गातसे ||१||

दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे....

तो :
दुरवर बघ त्या डोंगर रांगी
खुणावीतसे तो रंगीत पक्षी
बोलावी का तुला मला तो
समजेल का कधी बोल त्याचे ||२||

दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे....

ती :
लहरून वारा मंद धुंदला
अस्सा झोंबला अस्सा कुंदला
लगडून जायी सार्‍या शरीरा
सावरून घेई मला तुच आता जवळ ये ||३||

दोघे :
अलवार गुपित उमगले प्रितीचे
माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०६/२०१०

" स्वप्न" पहिला पाउस

" स्वप्न" पहिला पाउस

सुटला वैरी वादळवारा,
रिमझिम बरसतील रेशीम धारा,
इंद्र धनुचे रंग घेउनी,
भेटावीस तू अशाच प्रहरा.

पहिला पाऊस तू होऊन यावी,
प्रेमघनासम मजवर बरसावी,
तव प्रीतीच्या जलधारांनी,
प्रेमसागरा भरती यावी.

ओलेती तव रूप पहावे,
संमोहित गात्रांनी व्हावे,
प्रेमरंगी तल्लीन होऊनी,
प्रीतीचे अमृतघट प्राषावे,

विसारावीस तू क्षणिक ह्या जगा,
मजसी माझा विसर पडावा,
तव मिलनाचा अपूर्व ठेवा,
हृदय अंतरी जतन करावा,.
सुटला वैरी वादळ वारा ………

निरंजन वहाळेकर

लावणी: सोन्याची अंगठी मजला आणुन द्या

सोन्याची अंगठी मजला आणुन द्या
तुमची माझी प्रित जडली
आठवण राहू द्या
प्रितीची निशाणी म्हणून
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||धृ||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)

साडी चोळी आहे मजला
नको दुसरे काही
श्रॄगांराची टिकली बांगडी
उगाच मागत नाही
सोनाराकडे आजच जावू या, नको की उद्या
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||१||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)

राव पाटिल बाजीराव आहात तुम्ही
कशाला कधी केलं नाही कमी
घाटदार पाच तोळे चोख वजनी
अंगठी साखरपुड्याला घेवूनी
भेटा सगळ्यांसमोर तेव्हा, आता जावूद्या
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||२||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०६/२०१०

“ रात्र यौवनांत ”

“ रात्र यौवनांत ”

गंध सुगंधि, परिचित वारा,
आभासले, आली प्रिया,
प्राजक्त बरसले आज नभातून,
चंद्र साक्षीला अन उभी प्रिया..

स्पर्शून पाहीन तुज
आस होती ही जिवनी
आज सामोरी तू अशी
जाग आली स्वप्नातुनी

“ दूर इतुकी का उभी ” ?
आज जवळी असूनही
ये अशीच मज समिप
याद राहील रात्र ही

रात आहे यौवनांत
अन अधिरता ही अंतरी
लाज हृदयीं का वृथा
जाईल वाया रात्र ही

आज बहरू दे प्रितवसंता,
फुले गुलाबी, धुंद प्रितिचे,
जतन करू या सदैव हृदयीं
क्षण सोनेरी अन गंध प्रितिचे.

निरंजन वहाळेकर

< पहीलं अ‍ॅडव्हेन्चर , पहीलं चुंबन>

प्रेरणा पुढील सुंदर कविता - http://misalpav.com/node/12795

पहीलं अ‍ॅडव्हेन्चर
आमचं पहीलं चुंबन

तो रंगात आलेला
मी जरा अलिप्तच

त्याचा तो चावटपणा
माझं सावध हास्य

अचानक त्यानी मागणं
एकत्र चुंबन घेणं

त्याचं ते आतुर धटींगणपणा
माझं शुद्ध नवखेपण

त्याने धसमुसळ्यासारखं
मला दुखावणं

यावेळी, त्याचा तो विजयी चेहरा
आणि माझं समजूतदार हास्य

Syndicate content
Scroll to Top