Skip to main content

शृंगार

पाऊस क्षण- प्रणय क्षण!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 27/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले!
काव्यरस

मा़झ्या चारोळ्या

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!
काव्यरस

कितीक दिवस हे

लेखक कौस्तुभ आपटे यांनी शनिवार, 10/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक दिवस हे दुरुन दुरुन पहाणे मनातिल गुपीते सारीत सारीत बोलणे सोंग हे पांघरुन गुज मनी दडवून उगीच उगीच हासणे कितीक दिवस हे... हले ना ओठ जरी भाषेचा आड काही लपत्ये श्वासांची माळ तुझी कुणाचे नाव उरी जपत्ये,जपत्ये,जपत्ये कसल्याशा कळेला दाबीत दाबीत जगणे कितीक दिवस हे... सुनेसे गाव जसे, मनात भाव तसे दाटले भवती भिड जरी,एकटा जीव असे भासले,भासले,भासले आपुल्याच जीवाला जाळीत जाळीत रहाणे कितीक दिवस हे... फुटु दे बांध आता, मुखाचे बंध से सुटू दे भारला सूर उरी, जाऊ दे पार नभी भिडू दे, भिडू दे, भिडू दे हवे हवे असताना टाळीत टाळीत वागणे कितीक दिवस हे... गीत -- कौस्तुभ आपटे हे गाणे खालील लिंकवर ऐकू शक
काव्यरस

केव्हा तरी पहाटे...

लेखक एस यांनी शनिवार, 10/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश तारकांचा उतरून साज गेले अर्धोन्मिलीत नयनी एक स्वप्न साजलेले हा मंदगंध वारा विसरून तोच गेला निष्पर्ण सावलीचे एक पर्ण तरंगलेले बेधुंदल्या कळ्यांचे निःश्वास दाटलेले उन्मीलनाचे स्वप्न स्वप्नात पाहिलेले हलक्याच पावलांची ती वाट धुकटलेली स्मृतिगंधल्या मनांचे हृदय स्पंदलेले पौगंडल्या उषेचा प्रियकर नभी तो आला थरारले अधरही, आरक्त गाल झाले निस्तब्ध शांतताही विस्कटून सारी गेली पंखांतली कुजबूज, आसमंत व्यापलेले चेहर्‍यावरी बटांचे रेंगाळणे उगाच निःश्वासही उगाच, उगाच कूस बदलणे शराबल्या नजरेनं मनपक्षी कैद केला पुन्हा त्याच मिठीत हरवून सारे गेले...
काव्यरस

ऊन-सावली नाते अपुले

लेखक जयवी यांनी गुरुवार, 08/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
. पानावरच्या दवबिंदूपरी सजते, निसटुनिया विरते ऊन - सावली नाते अपुले कधी हसते अन्‌ कधी रुसते कधी हिरवाईच्या मखमाली भिरभिरते अन्‌ बागडते कधी काहिली, कधी होरपळ कधी पेटुनी धगधगते कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी चमचमते अन्‌ लखलखते कधी गर्द अवसेच्या राती काळोखातुन पाझरते लडीवाळ कधी मोरपिसापरी हळुच कानी कुजबुजते कधी अनावर प्रपातापरी दुमदुमते अन्‌ कोसळते कधी मौनाच्या बंद क्षणांनी हिरमुसते अन्‌ मुसमुसते कधी शब्दांच्या पागोळ्यातुन गहिवरते अन्‌ रिमझिमते विरहाच्या एकांती नाते उष्ण आसवांनी भिजत
काव्यरस

वाधल्या दाढी-मिश्या

लेखक खान यांनी गुरुवार, 01/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कर मन्दलि, मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे.
काव्यरस

सावलीत माझ्या

लेखक ज्ञानराम यांनी शुक्रवार, 19/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सावलीत माझ्या , सुर्यही विसावला, अमावस्येला आज , चंद्र कसा डोकावला , तु नसता समीप , पाऊसही सोकावला विजेचे येता भान , मागे मग सरसावला भिजवूनी चिंब धरतीला, , तोही मग सुखावला ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला.
काव्यरस

वसंततिलका

लेखक राजघराणं यांनी गुरुवार, 18/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : वसंततिलका (वसंत ऋतू. (Spring) त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणी त भ ज ज ग ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. वसंततिलका वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने.(माझे म्रुत्युपत्र) ही सावरकरांची कविता होय. .) कवितेचे नाव : वसंततिलका वृत्त : वसंततिलका कवितेचा विषय :वसंततिलका (Spring) वसंत ऋतू. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक.

घनघन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 14/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
घन मंदावले मन धुंदावले जळ वाकून वाकून ओघळले झाकलेल्या कळा आत ओढाळल्या रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या झाडपानात सण पळ श्रावण श्रावण अंग अंगणात चाहुली पागोळल्या लवे भरून डोळा कणकण हळवेला एक एकटाच जीव होई खुळा बावळा पापणीची स्थिती आळवावी किती ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती .........................अज्ञात
काव्यरस