मत

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
14 Nov 2015 - 2:15 pm

*ढिस्क्लेमर*
१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.
२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

थोडी गम्मत

मीउमेश's picture
मीउमेश in जनातलं, मनातलं
6 Nov 2015 - 2:22 pm

महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत.

आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती.
किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत.

फार गम्मत आहे ना,

मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल.

थोडी गम्मत

कलामत

कोवळ्या वयातलं व्यसन

जातवेद's picture
जातवेद in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 4:25 pm

आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?

जीवनमानशिक्षणविचारअनुभवमत

माझी शाळा: मोठेपणीचा निबंध!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
21 Oct 2015 - 12:17 pm

काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही!

कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्‍या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्‍यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच!

आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात. कोण कुठे बसायचं, कोण कस शिकवायचं हे इतरांकडून विचारून खात्री करून घ्यावी लागते!

कथामुक्तकशिक्षणमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभवमतविरंगुळा

द वॉक - एक अप्रतिम अनुभव

कोमल's picture
कोमल in जनातलं, मनातलं
18 Oct 2015 - 11:39 pm

जर मी तुम्हाला विचारलं कि तुमची आवड काय आहे? तर मला कैक उत्तरे मिळतील. स्वतःच्या आवडीचं काम कोण कोण करत आहे असं विचारलं तर बऱ्यापैकी कमी हात वर येतील. पण जर मी असा प्रश्न केला की, स्वतःच्या आवडीलाच ध्येय बनवून, एक स्वप्न बघून त्याच्यासाठी वेडं होणं कितीजणांना जमतं, तर फारच कमी उदाहरणं मिळतील.

अशाच एका वेडयाची गोष्ट आहे "द वॉक".

कलाचित्रपटसमीक्षामत

झहीर खान निवृत्त!

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
16 Oct 2015 - 8:04 am

क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्‍हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.

क्रीडाशुभेच्छाप्रतिक्रियाबातमीमत

संदर्भांचा विसर आणि भुलाबाईंचा उत्सव

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
10 Oct 2015 - 12:29 am

मराठी विकिपीडियावर भोंडला या लेखास कुणीतरी हात घालेल आणि सुधारणा करेल या आशेवर अल्पसे लेखन करून लेख सोडून दिला होता. पण गेल्या तब्बल नऊ वर्षात तसा मुहुर्त येणे कदाचित त्या लेखाच्या नशिबी नसावे.

मांडणीसंस्कृतीवाङ्मयतंत्रविचारसमीक्षामाध्यमवेधमतसंदर्भ

---------------द्वं--द्व---------------

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
9 Oct 2015 - 11:19 am

संध्याकाळी ऑफिसवरुन सिटीत मित्रांकडे बाईक वरुन जात असेन. यूनिवरसिटी चौकातल्या जगातल्या सर्वात मोठ्या सिग्नलला गाडी बंद करून उगाच हिकडं तिकडं बघत असेन. तेवढयात एक काळं-शेंबडं पोरगं कडेवर घेतलेली -त्या पोरापेक्षा थोड़िशीच मोठी पोरगी , स्वत् अन कडेवरच्या त्या पोराला कशीबशी सावरत 'कितीही कललं तरी ते बारकं पडणार नाही' या कॉंफीडन्सनं समोर चालत येईल. क्षणार्धात डोळ्यात अतिशय करूण अन हतबल भाव आणून , मारून-मारून शिकवलंय तितकं बारकं तोंड करून खाडकन 'आशेने' आपला तळहात पुढे करेल.

कथासमाजजीवनमानविचारप्रतिक्रियालेखअनुभवमत

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 9:10 pm
धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा