पयला पयला प्यार

लेखनविषय:
लेखनप्रकार
बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते. मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस. 'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं मी सुसाटलो ९३२२ १७ ३३ १४ सूर्‍याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू. 'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.' सूर्‍या आला 'क रं बाला क बोल्तोस? 'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.' 'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा.

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव.

लेखनविषय:
लेखनप्रकार
रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे. ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत. परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो. मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात

आमचा बॉस आणि आम्ही

लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकवावा' , पण... चेहेर्‍यावर 'आपल्याच घड्याळाचे काटे मोडल्याचा' भाव आणावा लागतो. आमचा बॉस विचारतो, "उशीर का झाला?" आम्ही सांगतो, " ट्रेन लेट" "मग तूमच्या बरोबरचे देशपांडे वेळेवर कसे?" " ट्रेन पकडायला लेट. " आम्ही उत्तरात थोडासा बदल करतो. आमचा बॉस आमच्या हजेरी बूकात एक फूली मारतो. आम्ही बॉसला मनातल्या मनात ३ ते ४ 'फूल्या' वहातो.

"आई मी असं पुन्हा करणार नाही गं!"

लेखनविषय:
लेखनप्रकार
देसायांचा नातू तसा उनाड होता.पण तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं.

वाचा आणि थंड बसा

आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

दुरून डोंगर साजिरे

लेखनविषय:
लेखनप्रकार
"बडा घर पोकळ वासा ", "नांव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा ", "वरून कीर्तन आंतून तमाशा " अशा "दिसतं तसं नसतं " या अर्थाच्या किंवा जे दिसतं आणि जे असतं यातला विरोधाभास दाखवणार्‍या अनेक म्हणी प्रचारात आहेत. "दुरून डोंगर साजिरे " ही तशीच एक म्हण आहे. या म्हणीचा "जवळ जाता दर्‍या खोरी " हा उत्तरार्ध प्रचलित आहे. त्यातल्या खोल दर्‍या जरी भयावह वाटल्या तरी त्यांची सांगड खोर्‍यांबरोबर कां घालावी? खोर्‍यांमध्ये झुळुझुळू वाहणारे पाण्याचे प्रवाह असतात, त्यांच्या काठाने झाडाझुडुपांचे विश्व बहरलेले असते, त्यांच्या आधाराने विविध प्राणी आणि पक्षी रहात आणि संचार करत असतात.

सरकारी नोकर

लेखनविषय:
लेखनप्रकार
अण्णा सुपरींटेन्डन्ट ऑफ एक्साईझ ह्या प्रमोशनवर मुंबईला जाण्यापुर्वी,अख्या रतनागिरीचे हेड होते.पुर्वी सरकारी नोकरांच्या घरी शिपाई नोकर घरकामाला रहायचे. त्याना घरात आईला मदत करण्या पलिकडे मला आणि माझ्या धाकट्या भावाला संभाळायचं काम पण करावं लागायचं.ब्रिटीश लोकानी ती पद्धत घालून दिली होती. आमचे आजोबा आमच्याकडे रहायचे. एकदा काय झालं,एका शिपायाची बदली झाल्यावर त्याच्या जागी दुसरा शिपाई आला होता.तो जरा पायाने अधू होता.म्हणून अण्णांनी त्याल घरचीच हलकी हलकी कामं करायला घरीच ठेवला होता. तो जरा कायदेबाज होता.

विक्रमादित्य

लेखनविषय:
लेखनप्रकार
११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल.
Subscribe to लेख