मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

राझ - द डोकेदुखी कंटीन्युज...

परिकथेतील राजकुमार ·

समीरसूर 29/01/2009 - 14:20
खूप सही परीक्षण लिहिले आहे तुम्ही. :-) हे वाचूनच हा चित्रपट टाळणे किती श्रेयस्कर आहे हे लक्षात आले. तसे आजकालचे बहुतेक सगळे हिंदी चित्रपट बिनदिक्कतपणे टाळले तरी काही फरक पडणार नाही असे वाटते. 'रब ने बना दी जोडी' आणि 'गजनी' हे चित्रपट देखील चित्रपट म्हणून किती चांगले असतील ही शंका आहेच. केवळ शाहरुख खान आणि आमीर खान हे सुपरस्टार्स असल्याने, असीन आणि अनुष्का शर्मा सारख्या सुंदर बाहुल्या असल्याने आणि पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची ऐपत असल्याने या चित्रपटांनी यश मिळवले. याच चित्रपटांमध्ये शाहरुख आणि आमीर यांच्या जागी अनुक्रमे उपेन पटेल आणि आफ्ताब शिवदासानी असते तर हे चित्रपट इतकं भव्य यश मिळवू शकले असते काय हा प्रश्न आहेच. शिवाय शाहरुख आणि आमीर आज अशा उंचीवर आहेत की त्यांचे चित्रपट कितीही भिकार असले तरी 'बंपर ओपनिंग' मिळून हमखास हिट होतात. असो. परीक्षण वाचून करमणूक झाली. इम्रान हाश्मी, कंगना रानावत, नेहा धुपिया, अमृता अरोरा, सोनु सूद, विक्रम सलुजा, मोना चोप्रा, गीता बसरा, आफ्ताब शिवदासानी, आशिष चौधरी, सायली भगत, रणदीप हुडा, अर्जुन बाजवा, रुसलान खान, झायेद खान, फरदीन खान, मिलिंद सोमण, एजाज खान, अध्ययन सुमन, हरमन बावेजा, उदय चोप्रा, तनिशा ही व अशी यच्चयावत बिनडोक दिसणारी/भासणारी/असणारी मंडळी खरच काय करत असते हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. अर्जुन रामपाल देखील काही दिवसांपूर्वी या यादीमध्ये हिरीरीने सहभागी झाला होता पण ओम शांती ओम आणि रॉक ऑन मुळे बिचार्‍याची उपासमार टळली. 'पुणे टाईम्स' मध्ये शेवटच्या पानावर यांचे फोटो येत असतात आणि यांचे चेहरे बघून प्रश्न पडतो की यांना 'सेलिब्रिटी' कसे काय म्हणायचे? रस्त्यावर पडल्यावर यांना काळं कुत्रं देखील ओळखेल की नाही ही शंका मनाला चटून जाते. यांच्या मुलाखती म्हणजे एक विनोद असतो. यांना नेहमी 'डेट्स' चे प्रॉब्लेम्स असतात; यांच्याकडे एकाचवेळी ३-४ चित्रपट असतात आणि त्यातल्या यांच्या भूमिका म्हणजे एकदम 'हटके' आणि 'डिफरंट' असतात; त्यासाठी यांनी 'रीसर्च' पण केलेला असतो. हे चित्रपट कधीच पडद्यावर येत नाहीत आले तरी त्यांच्या स्वतःच्या लक्षात राहत नाही की कधी आले आणि कधी आपटले. :-) त्यातल्या त्यात इम्रान हाश्मी म्हणजे या गरीब जनतेचा मिथून आहे. त्याचे चित्रपट येतात बर्‍यापैकी चालतात आणि गाणी मात्र सॉलीड हिट होतात. त्याचा जन्नत चित्रपट बरा होता आणि त्यातली गाणी देखील बरी होती. ती सोनल चौहान नावाची नटी पण बरी होती. राज-द मिस्ट्री कंटीन्युज मात्र बर्‍यापैकी चालतोय आणि थोडी अजून प्रेक्षकांची साथ मिळाली तर चांदनी चौक टू चायना पेक्षा जास्त किफायती ठरेल हा चित्रपट असे तज्ञांचे मत आहे. द्रोण आणि चांदनी चौक टू चायना या अतिमहत्वाकांक्षी, भव्य-दिव्य, सुपर बिग बजेट, ओव्हर्-हाईप्ड चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः भुईसपाट केले हे एका दृष्टीने बरे झाले. प्रेक्षकांना सहज मूर्ख बनवता येते हा निर्मात्यांचा गैरसमज थोडा दूर होण्यास मदत होईल आणि अभिषेक बच्चनला आपल्यासाठी अजून कुठले कार्यक्षेत्र चांगले आहे हे ही ठरवता येईल. :-) --समीर

In reply to by समीरसूर

मूळ लेख तसेच समीररावांचा हा प्रतिसाद लय भारी! चित्रपटांपेक्षा अशा प्रतिसादांनीच आमची अंमळ करमणूक होते म्हणून आम्ही (म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्य) सहसा चित्रपटांच्या वाट्याला जात नाही (तारे जमी पर, वेन्सडे असे सन्माननीय अपवाद वगळता). पावासंगे झक्कास मिसळ व तजेलदार तर्रीनेच आमचा आत्मा तृप्त होतो. आपला, भास्कर चवीचे खाणार त्याला मिसळपाव देणार

In reply to by भास्कर केन्डे

टारझन 30/01/2009 - 00:08
राज हा कितीही एक णंबरचा येडझवा थ्रिलर कॉमेडी असला तरी आपल्या गर्लफ्रेंड सोबत पाहिल्यास मणोकामणा पुर्ण होण्याचा संभव आहे, कारण त्यावेळी शुक्र पंचम स्थानात आणि चंद्र षष्टी मधे फार स्ट्राँग होतो. असो .. आपल्याला त्या राझ मधे काय आवडलं तर त्यात सगळे धप्पा धप्पा खेळतात .. दरवाज्यावर असताना नाव घेऊन बोलावण्या ऐवजी धाड धाड दरवाजा वाजवणार , कधी कोणती फ्रेम किंवा पुस्तक धाप्प कन पडणार .. ज्या भुताला ज्या व्यक्तीतर्फे आपला मेसेज द्यायचाय तेच भुत त्याच व्यक्तीला अल्मोस्ट मारणार .. आणि ह्या पिक्चर मधे हिरविण ला सर्वात जास कोणी गाभरवलं (आणि गाभारवलं) आसंत त्या हिरू नी .. ते येडझवं गुपचुप झोपलेल्या हिरविण च्या अंगावर अचाणक हात टाकून तिला झोपेतून दचकून उठवतो, आणि ती उठली म्हणून तिला म्हणतो .. "क्या जग रही हो .. सो जाओ ना " =)) इथे मी प्रचंड हसलो गडबडाट लोळलो .. पॉपकॉर्ण नाकातून उडाले. १. रँपवर चालणारी हिरवीण रापचिक दिसली . २. इम्राण हाश्मी ला ह्या पिक्चर मधे एकदाही स्कोप मिळाला णाही ३. एणिमेटेड रेडे लैच्च बकवास होते. ४. पाप केलेला मुख्य आरोपी तसाच मोकाट हिंडत आहे. ५. इम्राण हाश्मी एंट्री सिण मधे स्लमडॉग दिसतो. ६. माझे १५० रुपये वाया गेले असं म्हणणार णाही, कारण ह्या चित्रपटाणे मला तरी तुफाण हसवलं ७. ह्या चित्रपटाणे बिंधास्त लिव्ह-ईण चे प्रमोशण केले आहे. इतके की तो हिरो डेली मेस लावतो . -- टारझण मै अंदर से साफ हू , अभी जाके आया हू , आप रिव्हायटल लेणा कब सुरू कर रहे है ?

सहज 29/01/2009 - 15:34
तुम्ही राजकुमार असुन फारच सहनशील आहात असे दिसते [बहुतेक परिकथेमुळे] मोठे बॅनर, मोठे स्टार घेउन सिनेमे सगळेच काढतात त्याचे काय कौतुक? पण हे भट बंधु आपला खान्दानी बिझनेस [हौशी चित्रपट] ते देखील अवघडातील अवघड हौशी कलाकार घेउन ज्या नेटान सिनेमे रेटत असतात त्याला दाद ही दिलीच पाहीजे. भट बंधुंना हा प्रतिसाद समर्पित.

सुचेल तसं 29/01/2009 - 20:43
>>इम्रान हाश्मी, कंगना रानावत, नेहा धुपिया, अमृता अरोरा, सोनु सूद, विक्रम सलुजा, मोना चोप्रा, गीता बसरा, आफ्ताब शिवदासानी, आशिष चौधरी, सायली भगत, रणदीप हुडा, अर्जुन बाजवा, रुसलान खान, झायेद खान, फरदीन खान, मिलिंद सोमण, एजाज खान, अध्ययन सुमन, हरमन बावेजा, उदय चोप्रा, तनिशा वा!!! लिस्ट भारी तयार केलीय... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

मैत्र 30/01/2009 - 10:51
अगदी हेच म्हणतो... बेष्ट लिस्ट आहे आणि प्रतिक्रिया ही समीर.. हे लोक नक्कि काय करत असतात आणि स्वतःला काय समजतात कधीच कळत नाही..

प्राजु 30/01/2009 - 00:04
हसून हसून पुरेवाट झाली. तुम्ही लिहिलेल्या परिक्षणामुळे निदान ही सगळी गंमत अनुभवण्यासाठी हा चित्रपट बघावाच असं वाटतं आहे. जबरदस्त परिक्षण... समीर रावांचा प्रतिसाद तर त्यावर कडीच.. एकदम सह्ही! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

गरम मसाला 30/01/2009 - 00:20
आजकालचे बहुतेक सगळे हिंदी चित्रपट बिनदिक्कतपणे टाळले तरी काही फरक पडणार नाही असे वाटते. (समीर) हे अगदी खरं वाट्लं ! सिनेमा पुण॑ झाल्यावर एडीटरला सुद्धा कळाले नसेल, नक्की काय प्रकार घड्ला आहे...पण मला मुळात एक प्रश्ण सारखा पडतो की हे लोक सीनेमे कुठ्ल्या दर्जाचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून बनवतात ??? असो..निदान त्या क्षेत्रातील इतर काम करणारया लोकांची तरी पोटं भरली तरी पुश्कळ आहे,

उलट ते पाव / बिस्किट वगैरे विकणारे डोक्यावर पेटी घेउन येतातना, त्यांच्यापैकी एक वाटतो अगदी अगदी... पावबिस्किटवाला... =)) =)) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पर्‍या, पुढच्या पुणे भेटीत तुझं दर्शन नक्की घेणार. परिक्षण वाचून कृतकृत्य झालो. वाहवा!!! दुर्बिटणे बाईशी सहमत.... तुझ्या लेखात डानराव दिसले. बिपिन कार्यकर्ते

मदनबाण 30/01/2009 - 04:07
राजकुमारा मानसिक अत्याचार करुन घेण्यापासुन वाचवलेस म्हणायचे !!! इम्रान हाश्मी हा एक तर आधी मानवच वाटत नाही, त्यात त्याला बघुन का कुणास ठाउक पण मला आपण उंची वाढवलेल्या राजपाल यादवला पाहात आहोत असे वाटते. 8} 8} 8} तर आता हा माणुस चित्रकार वाटला पाहिजे ह्यासाठी ती कसली 'फ्रेंच' का काय म्हणतात तसली दाढी ठेवुन पुर्ण चित्रपटभर वावरला आहे. बापरे !!! कसं दिसत असेल ते ध्यान ते अगदी योग्य शब्दात मांडले आहेस... बर त्यामुळे तो चित्रकार तर वाटतच नाही उलट ते पाव / बिस्किट वगैरे विकणारे डोक्यावर पेटी घेउन येतातना, त्यांच्यापैकी एक वाटतो. मस्का खारी ले लो...अशी आरोळी मारतो का रे तो ? :D चांगलीच चिरफाड केली आहेस तु... :) मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

साहेब, एकदम मस्त लेखन आणि परिक्षण केलेला आहे. खरतर भट्टाचा सिनेमा आणि इम्रान हाश्मी पाहयला खुप,खुप हीमत लागते.त्या बद्द्ल आधि ....पाय कुठे आहेत तुमचे? लहानपणी असाच एक सुनिल गावस्करचा पिक्चु बघितला होता.तेव्हा असेच गडबडा लोळुन हसलो होतो. सगळ्यंअचे प्रतिसाद तर अजुन जबराच.

दशानन 30/01/2009 - 10:38
ज ब रा पण लई येळ केला राव आमच्या डोक्याचा पार भुग्गा झाला.... आम्ही अर्ध्यातून परतलो ! कालच दुपारी गेलो होतो ... डोक्याला लै वाईट शॉट लागला... राव... ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे व न देणार्‍यांचे हि धन्यवाद ;) समीरराव बाकी तुमचा प्रतिसाद म्हणजे, 'ज्ञानदेवे रचिला पाया...' असा झाला आहे बघा. मस्त प्रतिसाद दिलेत सर्वांनी त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अनिल हटेला 30/01/2009 - 13:42
छान परीक्षण दिल्याबद्दल पराचे आभार .. उत्तम प्रतीसाद दिल्याबद्दल समीर चे आणी इतर माननीय प्रतीसादींचे देखील आभार .. परा ने पून्हा एकदा सर्वाना धन्यवाद दिल्या बद्दल त्याचे पून्हा एकदा आभार !! आणी बीनकामी इतकं लिहील्या बद्दल माझे देखील आभार !! ;-) अवांतर : इम्रान हाश्मी नावाच्या प्राण्याचे चित्रपट आम्ही बघत नाही ... :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अन्वय 30/01/2009 - 19:44
खरंच अतिशय फालतू पिच्चर होता. त्या भट बंधू, तो सुरी आणि कलाकारांच्यायच्या --- -- सिनेमा पाहता अतिशय संताप आला. पण करणार काय, अख्खे पन्नास रुपये मोजले होते. मधूनच उठूनही जात येत नव्हते. निर्माते, निग्नदर्शक, न कलाकार (हाश्‍मी वगैरे) यांना शिव्या देण्यापलीकडे काहीच करू करता येत नव्हते. पण एक काम केले शेवटी चांगलं. बाहेर पडल्यावर तिकिट खिडकीवर जाऊन प्रत्येकाला सांगितलं, शाने असाल, तर मागं फिरा... उगाच पैसे देऊन मनस्ताप विकत घ्याल.... त्यातल्या कितीजणांनी ऐकलं कुणास ठाऊक. आत गेले असतील, तर नक्कीच पस्तावले असतील.

हुप्प्या 31/01/2009 - 05:39
अमेरिकेत असल्या हास्यास्पद आणि अवाच्या सवा महत्त्व मिळालेल्या सिनेमांचे विडंबन मॅड नामक मासिकात यायचे. त्यात रॉकी अन्य सिरियलची मनसोक्त टिंगल वाचली आहे. हिंदी सिनेमात असला हास्यास्पद प्रकार इतका भरलेला असतो की कुण्या प्रतिभावान विडंबकाने असे हिंदी वा मराठी मॅड काढले तर जोरदार चालेल.

काल कुठुन अवदसा आठवली आणी तो राझ नावाचा शिनिमा बघितला असे झाले आहे ! हा राझ नक्की हॉरर आहे, मर्डर मिस्ट्री आहे का सस्पेन्स थ्रिलर आहे हे शेवट पर्यंत राझच राहाते. भट (घाटावरले न्हवेत) आणी सुरी द्वयी ला नक्की काय दाखवायचे आहे तेच कळत नाही. अतिशय बाष्फळ आणी मुर्ख प्रसंगांची मालिका म्हणजे राझ असे वर्णन करता येईल. सुरुवात एकदम मुंग्या आणणारी (डोक्याला नाही तर हाता पायांना), कोणीतरी एक मरणासन्न माणुस एका गोर्‍या परदेशी माणसाला सांगत असतो की आता सगळे मरणार, 'तो' कोणालाही सोडणार नाही.

द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८)

अभिजीत ·

दशानन 26/01/2009 - 11:29
छान विष्लेशन ! बघायलाच हवा ! टोरंट मिळेलच कुठे तरी.... धन्यवाद... ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

चित्रगुप्त 17/01/2023 - 00:47
२००९ सालचा हा लेख आज वाचनात आला, आणि यूट्यूबवर हुडकता सध्या फक्त ट्रेलर आणि या सिनेमाची कथा हिंदीत सांगणारा विडियो बघायला मिळाला. हे एक प्रकारे बरेच झाले कारण आता मूळ सिनेमा बघायला मिळाला की समजणे सोपे जाईल. ट्रेलर आणि हिंदी विडियो बघून सिनेमा बघायची खूपच उत्सुकता निर्माण झालेली आहे. कुठे उपलब्ध आहे हे कुणी सांगिल्यास उत्तमच. .

द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८) न्यु ऑर्लिंस मधे एका बाळाचा जन्म होतो तो जराजर्जर व्याधीग्रस्त शरिर घेउनच... त्यात जन्म देणारी बाळाची आई जगाचा निरोप घेते आणि त्याच तिरमिरीत बाप त्या बाळाला एका वृद्धाश्रमाच्या आश्रयाला सोडुन देतो. तिथली कनवाळु केयरटेकर क्वीनी त्याला सांभाळायचा निश्चय करते आणि त्याचं नाव ठेवते "बेंजामिन" ... चित्रपट सुरु होउन १५ मिनिटातच चमत्कृतीपूर्ण घटना आणि विविध धक्कादायक प्रसंग पाहुन प्रेक्षक सरसावून बसले नाहीत तरच विशेष! तर पुढे - शरीर ऐंशीच्या घरातल्या वृद्धासारखे आणि भरीला शारिरीक व्याधी त्यामुळे डॉक्टरांच्या मते ते बाळ जगणं जवळजवळ अशक्यच ...

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - २

छोटा डॉन ·

डॉनराव, तुमचा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा फार चांगला अभ्यास दिसतो. चांगलं लिहिलं आहेत. पुढचे भागही अशाच तयारीने पण जरा लवकर टाकाल अशी रास्त अपेक्षा. अदितीताई अवखळकर पाटील. आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

दशानन 21/01/2009 - 11:35
"साहेब कधीही चमत्कार करु शकतात" " हे मात्र खरं आहे.. ! मस्त विष्लेशन ! आवडले !

अमोल केळकर 21/01/2009 - 11:46
अभ्यास पुर्ण लेख आवडला मनसे बद्दल आपले विश्लेषण वाचायला जास्त आवडेल.( कुर्ला महापालिका पोटनिवड्णूकीत मनसे चक्क तिसर्‍या क्रमांकावर जाईल असे वाटले नव्हते.) तेंव्हा पुढचा लेख मनसे बद्दल यावा ही विनंती अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by विनायक प्रभू

धमाल मुलगा 21/01/2009 - 13:25
डानराव, तुमच्या राखीव कुरणातला हाही लेख(क्रमशःचा भाग) उत्तम जमलाय.
निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा ही पक्ष खचाखच भरलेला आहे. ठिकठिकाणच्या गढ्यांमधून तर राष्ट्रवादीची माणसांची आणि पैशाची कुमक येत असते. शिवाय "बेरजेच्या राजकारणातुन" ह्यांना बर्‍याच वेळा विरोधी पक्षातली माणसेही मदत करत असल्याने तशी ह्यांना जास्त तोशीश नाही ... फक्त ह्यांनी "अंतर्गत कारभार" व्यवस्थीत सांभाळला तर ह्यांना टक्कर देणारे फार कमी आहेत ...
अत्यंत कळीचा मुद्दा! बाकी, हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील इ.इ. अगदी अचुक निरिक्षणं! बाकी, संसदेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हापिसाला दांडी मारुन दिवसभर 'लाईव्ह टेलेकास्ट' पहात बसणार्‍या राजकारणाच्या अभ्यासु माणसाला आम्ही पामरानं काय पावती द्यावी??? पु.भा.शु. :) -(गल्लीतल्या राजकारणात अपक्ष राहुन शेवटी मलिदा ओढणारा) ध मा ल दादा.

वा डान सेठ, लई भारी इश्लेसन !! तुमचा ह्या विषयावरचा अभ्यास मोटारीपेक्षा दांडगा दिसतो :) आपल्यालाबी मनसे वरचा लेख वाचायचा आहे अभिरत

21/01/2009 - 13:25
डानराव, उत्कृष्ट विवेचन केलंय आपण. अभिनंदन. छोटा प्रणॉय रॉय म्हणावे काय आपल्याला?

वाहीदा 21/01/2009 - 15:56
बाकी ईथुन तिथुन सगळे सारखेच ! खालील मराठी शेर त्यांच्याच साठी , आहे दोस्त हो दुनियेस धोका मेलो तरी आम्हि दिला, जाउनिया नर्कात पत्ता कैलासाचा आम्हि दिला, हाय हे वास्तव्य आमुचे सर्वान्स कळाले शेवटी सारेच हे सन्न्मित्र आमुचे येथेच आले शेवटी. (नर्कात ) ~ वाहीदा

शितल 21/01/2009 - 19:49
डॉन्या, राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचा अभ्यासपुर्वक आढावा घेतला आहेस. :) शरद पवार आहेत तो पर्यत तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिलच, त्याच्या नंतर मात्र रा.काँ.पक्षाच्या सत्तेतील अस्तित्वा बद्दल शंका आहे. आता भाजपावर लवकर लिहायला तुला वेळ मिळु दे. :)

डॉन साहेब, राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे वाटते. खूप छान विश्लेशन केलेत. लेख आवडला. अभिनंदन! पण उदाहरणे देताना व बेरजा वजाबाक्यांचा खेळ मांडताना आपण पश्चिम महाराष्ट्रातच रेंगाळलात असे दिसते. जरा पुढे मराठवाडा-विदर्भातही जा, अजून रंगिबेरंगि राजकारण दिसेल. उदा. विमलताई मुंदडांनी मागच्या निवडणूकीत एकहाती राखलेला बुरुज व त्याचे परिणाम. तिकडे अमरावती -नागपुरात सुरु असलेल्या धुरवडी, वगैरे. आता पुढील भाग येऊ द्यात. आपला, (प्रभावित) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

छोटा डॉन 21/01/2009 - 20:39
"विमल मुंदडा" यांचा किस्सा डोक्यात होताच पण ऐनवेळी लिहताना गडबडीत विसरुन गेलो होतो. मराठवाड्यात तसा सध्या राष्ट्रवादीच जोर कमीच आहे व विदर्भ म्हणजे अजुन स्पष्ट लिहायचे तर अमरावती-नागपुराचे मला जास्त काही माहित नाही. कदाचित ह्यामुळे हे घडले असावे ... ह्या लेखावर प्रतिक्रीया म्हणुन "विसरलेले / माहित नसलेले" वगैरे पुन्हा अभ्यास करुन मांडण्याचा प्रयत्न करीन ..! आपल्या योग्य टिपण्णीबद्दल आभारी आहे ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

तसा केवळ विधानसभेच्या संख्येवरुन बघायला गेलात तर जोर वाटणार नाही. पण स्था स्व सं, सहकार क्षेत्र, शिक्षण संस्था, आदींचा विचार केलात तर राष्ट्रवादीची ताकद लक्षात येईल. बीडच्या क्षिरसागर घराण्यातला खासदार-आमदार सद्य स्थितीत नसला तरीही त्यांची ताकद मुंडेंना पाणी दाखवण्या इतकी नक्कीच आहे. कदाचित हेच ओळखून मुंडे सुद्धा क्षिरसागरांच्या जास्त फंदात पडत नाहीत. मिळूण लोणी खातात. पण आता मुंदडांच्या भरारीने समिकरणे बदलतील असे वाटते. एकंदरीत विचार केल्यास मराठवाडा काँग्रेस व सेना-भाजप युतीच्या पारड्यात राष्ट्रवादीपेक्षा जास्त घबाड टाकेल असे वाटते. पण पवार साहेब काहीही चमत्कार करु शकतात हा फॉक्टर आलाच.

राष्ट्रवादी काँग्रेस ला पाहुन मला उत्तर पेशवाईची आठवण येते, सगळे सरदार वेगवेगळे असुन प्रत्येकाचा सवता-सुभा आहे. ज्याची त्याची पिढीजात जहागिर आहे. पण दबाव गटाचे बळ समजल्यामुळे सगळे एकत्र आले आहेत. वैचारीक बांधिलकी पेक्षा आर्थीक बांधिलकी जास्त महत्वाची आहे. उद्या अधिक चांगली ऑफर मिळाली तर, रॉकॉचे तिरडे करयला ही मंडळी कमी करणार नाहीत. काही दिवसांपुर्वी एका गुंडाला (नाव विसरलो त्याचे) पुण्यात मोठ्या थाटात रॉ़काँ मधे प्रवेश देण्यात आला आणि त्याच वेळी गुंडगिरी खणुन काढली जाईल अशी आरोळी देण्यात आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर 22/01/2009 - 08:13
आमचं मत - महाराष्ट्र हा कुणाही सामान्य जनांचा नसून तो फक्त पैसे खाणार्‍या आणि सत्तेचं राजकारण करणार्‍या राजकारण्यांचा आहे. पक्ष आणि त्यांची नावे वेगवेगळी आहेत परंतु सर्व राजकारण्यांची जात एकच आहे! तात्या.

3

मनाच्या कुपितले-तुकयाची आवली

विनायक पाचलग ·

मीनल 15/01/2009 - 08:47
विनायक , सर्वात प्रथम म्हणजे तुझ कौतुक. इतक्या लहान वयात तू इतक लिहितो आहेस. विचार पूर्वक लिहितो आहेस. वयाने बराच लहान आहेस. विज्ञान शाखेबरोबरच इतरही वाचन करतो आहेस आणि ते अभ्यास म्हणून नाही हे ही लक्षात येते आहे. तूला खूप सदिच्छा. `तुकयाची आवली `चे तू केलेले वाचन, त्यावरचा तूझा विचार आणि त्यावर लिहिलेला हा लेख सर्वच कौतुकास्पद आहे. अभिनंदन.

In reply to by मीनल

विसोबा खेचर 15/01/2009 - 13:22
`तुकयाची आवली `चे तू केलेले वाचन, त्यावरचा तूझा विचार आणि त्यावर लिहिलेला हा लेख सर्वच कौतुकास्पद आहे. अभिनंदन. हेच म्हणतो..! बाय द वे, तुक्याची आवली ह्या पुस्तकाच्या लेखिका सौ गोखले या आपल्या मिपाच्या प्राजूच्या मातोश्री होत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चायला आम्ही गंडलोच की आमची या विषयावर चर्चा झाली होती त्याच्याशी (प्राजु) पण शेवटपर्यंट त्यानी सांगीतले नाही असो आता बघु लेख लोकाना आवडला तर पाठवीन त्याना विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 15/01/2009 - 20:42
बाय द वे, तुक्याची आवली ह्या पुस्तकाच्या लेखिका सौ गोखले या आपल्या मिपाच्या प्राजूच्या मातोश्री होत! नको तिथं बोलायची सवय काही जात नाही तुमची.. ;) ह. घ्यालच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विनायक... सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन इतक्या लहान वयात चांगलं वाचायची सवय लावून घेतल्याबद्दल आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जे वाचलं ते सारांशाने व्यवस्थित लिहिण्यावद्दल. तुम्ही ह्यापुढेही खूप वाचते आणि लिहिते रहावे ह्या शुभेच्छा ! प्राजुला हा लेख नक्की आवडेल असं वाटतंय... --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

प्राजु 15/01/2009 - 20:40
प्राजुला हा लेख नक्की आवडेल असं वाटतंय... खरंच आवडला. त्याने मला व्य. नि. मधून पाठवला होता.. तेव्हाही त्याला हे मी बोलले होते. चायला आम्ही गंडलोच की.. असं म्हणू शकतोस. मी तुकयाची आवलीचे कथारूपी वाचनही केले होते इप्रसारण वर. आमची या विषयावर चर्चा झाली होती त्याच्याशी (प्राजु) पण शेवटपर्यंट त्यानी सांगीतले नाही असो मी जर आधी बोलले असते तुला तर कदाचित, मंजुश्री गोखल्यांची मुलगी या दृष्टीने तू माझ्याशी या लेखाबद्दल चर्चा केली असतीस .. कदाचित ती इतकी प्रामाणिकपणे केली नसतीस... आणि तेच मला नको होतं. आता बघु लेख लोकाना आवडला तर पाठवीन त्याना .. लेख तुझा चांगलाच आहे. यात प्रश्नच नाही. नक्की पाठव लेखिकेला.. मी ही त्याबद्दल बोलले आहे तिला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 15/01/2009 - 21:02
लेख छान आहे. पुस्तक काळजीपूर्वक वाचून छान परिक्षण करायचा प्रयत्न केला आहे. अभिनंदन !
''शेवटी का होईना त्या विठूरायानं मान्य केलं होत की तुकाराम फक्त आवलीचे होते आणि आवली तुकारामांची. ती होती फक्त तुक्याची आवली''
हेची फळ काय मम तपाला असे काहीसे तुकाबा म्हणाले ते म्हणूनच का? :) (ह.घ्या. ) विवेकानंदांचे साहित्याचा जालावर शोध घ्या. रामकृष्ण मठाच्या प्रकाशनाची अनेकानेक पुस्तके वाजवी किंमतीला दुकानांत मिळतात. त्यांचा नक्कीच उपयोग होईल. समग्र विवेकानंद साहित्य 'विवेकानंद ग्रंथावली' या नावाने दहा खंडात उपल्ब्ध आहे. त्यांची किंमतही फार नसावी. सारेगमपच्या निर्णयाबद्दल दुमत आहे. प्रेक्षकांना हवे म्हणून सर्व मुलांना महाअंतिम फेरीसाठी ठेवले यामध्ये रोहित राऊत या स्पर्धकाला झुकते माप मिळाले असे मला वाटले. तो महाअंतीमसाठी निवडला गेला नसता तर मला ठीक वाटले असते. तुमच्या लेखाला पहिले बक्षिस मिळाले याबद्दल अभिनंदन. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

घाटावरचे भट 15/01/2009 - 21:53
>>रामकृष्ण मठाच्या प्रकाशनाची अनेकानेक पुस्तके वाजवी किंमतीला दुकानांत मिळतात. त्यांचा नक्कीच उपयोग होईल. समग्र विवेकानंद साहित्य 'विवेकानंद ग्रंथावली' या नावाने दहा खंडात उपल्ब्ध आहे. त्यांची किंमतही फार नसावी. हजार ते बाराशे रुपये बहुधा. जास्तही असेल कदाचित. पण त्या पुस्तकांत जे काही अनमोल विचार भरलेत त्याच्यामानाने किंमत अगदीच किरकोळ आहे.

In reply to by घाटावरचे भट

हो घेइन माझयाकडे आहेत आणखी काही पण मेल मधुन वगैरे कोणाला काही आले असेल तर पाठवावे असे मला म्हणायचे होते असो लेखावर पण प्रतिक्रिया द्या विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by विनायक पाचलग

राघव 16/01/2009 - 17:05
सुंदर लिहिलेले आहेस. अभिनंदन! :) विवेकानंदांची पुस्तके वाचण्याचा मानस छानच आहे. जरूर वाच. ती व्यक्तीच अफाट होती! पण विवेकानंद नीट समजून घेण्यासाठी त्यांच्या ठाकुरांनाही समजून घ्यावे लागते!! शक्य झाले तर "श्रीरामकृष्ण वचनामृत" हेही वाच. मास्तर महाशयांनी लिहिलेला मास्टर पीस आहे! ब्येश्टेश्ट!! संत वाङमयातले आणखी वाचायचे असेल तर बेलसरेबाबांनी लिहिलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाच. श्रीमहाराजांच्या आठवणींचे एक पुस्तक श्री. ल. गो. मराठे तथा अप्पासाहेब मराठे लिखित "श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या हृद्य आठवणी" म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. तेही सुंदर आहे. संत वाङमयाच्या संगतीत आपली दृष्टी निर्मळ होत जाते, जगणे आनंददायी होत जाते हा स्वानुभव आहे. :) याहून अधिक माझा व्यासंग नाही. त्यामुळे बाकी जास्त नाही सांगू शकत. क्षमस्व. :) टीप: साधारण तुझ्याच वयाचा आहे मी. म्हणून अरे-तुरेच करतो.

In reply to by विनायक पाचलग

लिखाळ 16/01/2009 - 17:19
अचानक आठवले म्हणून लिहितो. 'रामकृष्ण आणि विबेकानंद' या नावाचे वि रा करंदीकरांचे पुस्तक फार छान आहे. या दोघांची चरित्रं त्या मध्ये आहेत. मिळाले तर जरूर वाच. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

माझा मनाच्या कुपितले या सदरातला हा तिसरा लेख
'' तुकयाची आवली एक अनोखी जीवनयात्रा''
'' तुकयाची आवली'' ही सौ. मंजुश्री गोखले यांची कांदबरी. तुकारामांची दुसरी पत्नी आवली हीच भावविश्व सांगणारी एका वाक्यात सांगायचे तर ''कल्पनेतला चंद्र हातात घरण्याची मनिषा बाळगून तो चंद्र प्रत्यक्षात प्राप्त करणं'' असंच या कादंबरी बाबतीत म्हणावं लागेल.

कुणीही यावे......

सुनील मोहन ·
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारने भारतीय नागरिकांना अतिशय सक्षम अशा सुरक्षाव्यवस्थेची हमी दिलेली होती. सर्व राजकारणी लोकांनी अगदी जीव तोडून सांगितले की भारताच्या सर्व तपास यंत्रणा, पोलिस,सी.बी.आय, लष्कर इत्यादींना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. पण ह्या सर्व यंत्रणा खरंच कार्यरत आहेत? बहुधा नसाव्यात अशी दाट शंका यावी अशा दोन बातम्या गेल्या काही दिवसात वाचनात आल्या. आज या दोन घटना घडून सुद्धा अनेक दिवस उलटून गेले आहेत पण सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा यापैकी कुणाकडूनही काही खुलासा केला गेला नाहीय.

गझनी/गजनी आणि करमणुक

कोलबेर ·

सहज 31/12/2008 - 12:06
ढकलपत्रातुन आलेले आहे पण खालेच चित्र दाखवायचा मोह आवरत नाही. बायकोला चुकून देखील गझनी दाखवु नका नाही तर

In reply to by नीलकांत

नीलकांतशी सहमत अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

चित्रपटाच्या सुरुवातीला शर्ट काढुन बॉडी दाखवण्यासाठी हे 'गोंदवलेकर महाराज' उभे राहतात खरे =)) =)) मागे कमल हासनचा 'अभय' नावाचा एक टूकार चित्रपट आला होता त्यात त्याने बनवलेली बॉडी ह्याहुन कितीतरी सरस होती. +१ सहमत ! मेमेंटो बघितला असल्यामुळे तसाही हा चित्रपट बघण्याची इच्छा नाहिये. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

नि३ 31/12/2008 - 17:33
कोलबेर साहेब तुम्हाला रब ने बना दि जोडी खुपच आवड्ला असेन नाही का?? जिथे बायको स्वताचा नवरा ओळ्खु शकत नाही का तर म्हणे चष्मा नाही घातला आणी मिशी उडविली ...वा..धन्य आहे ति बाई...बाकी सगळा चित्रपट पण आनंदी आनंद आहे... आणी हा शाहरुख्(कि भुख ) म्हणे सुपर स्टार वा ..रे भारतीय प्रेक्षक.. आणी कोलबेर साहेब हा तोच आमीर खान आहे ज्याने तारे जमीन पर सारखा चित्रपट बनवीला होता,नंतर लगान ,सरफरोश्,गुलाम्,दिल चाहता हे..नसेल बघीतले असेल हे चित्रपट तर एकदा बघाच ते......... असो तसेही 'राजा हिंदुस्तानी', 'मेला' वगैरे महान चित्रपट बघीतल्यावर अहो साहेब ...जरा स्वप्नातुन बाहेर या हो..गजीनी हा आमीर चा ३७ वा चित्रपट होता ....त्यात जर १-२ चित्रपट नसेल हि चांगले .. वाईट लवकर दीसत साहेब.... असो तुम्हाला सांगुन काही फायदा नाही... गेट वेल सुन ---(ख्रर्या कलाकाराची कदर करणारा आणी जो नाही करत त्यांना फाट्यावर मारणार ) नि ३.

In reply to by नि३

आनंदयात्री 31/12/2008 - 18:03
मराठी आंतरजालावर भारी माणुस म्हणुन वावरायला तुम्हाला इराणी, रशियन, फ्रेंच अन झालेच तर गेलाबाजार भुतानी आवडले पाहिजेत. हिंदी चित्रपट आवडला तर तुम्ही तद्दन सी ग्रेड आवडणारे मासेस मधले आहात हे नक्की !! - (तद्दन गल्लाभरु, भुक्कड, सी ग्रेडचे चित्रपट पहाणारा अन अत्यंत चिप चॉईस असणारा) आंद्या

In reply to by आनंदयात्री

विजुभाऊ 02/01/2009 - 13:09
मासेस आणि क्लासेस चे हे गणीत आहे. मासेस ला चित्रपट आवडला की क्लासेस त्याला वगळतात. पण हल्ली दहावी बारावी साठी मासेसना क्लासेस ला जान्याशिवाय गत्यन्तर नसते आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by नि३

आजानुकर्ण 31/12/2008 - 19:31
कोलबेर यांनी त्यांना स्वतःला हा चित्रपट कसा वाटला आहे हे लिहिले आहे. यात चिडण्यासारखे काय आहे कळले नाही. कोलबेर साहेब तुम्हाला रब ने बना दि जोडी खुपच आवड्ला असेन नाही का?? जिथे बायको स्वताचा नवरा ओळ्खु शकत नाही का तर म्हणे चष्मा नाही घातला आणी मिशी उडविली ...वा..धन्य आहे ति बाई...बाकी सगळा चित्रपट पण आनंदी आनंद आहे... आणी हा शाहरुख्(कि भुख ) म्हणे सुपर स्टार वा ..रे भारतीय प्रेक्षक.. ह्या कमेंटचा वरील लेखाशी काय संबंध आहे कळले नाही. आणी कोलबेर साहेब हा तोच आमीर खान आहे ज्याने तारे जमीन पर सारखा चित्रपट बनवीला होता,नंतर लगान ,सरफरोश्,गुलाम्,दिल चाहता हे..नसेल बघीतले असेल हे चित्रपट तर एकदा बघाच ते......... हे कोलबेर यांनी मान्य केलेच आहे. आमीर हा सर्वात चूझी मानला जातो वगैरे म्हणून. नाही का? असो तसेही 'राजा हिंदुस्तानी', 'मेला' वगैरे महान चित्रपट बघीतल्यावर अहो साहेब ...जरा स्वप्नातुन बाहेर या हो..गजीनी हा आमीर चा ३७ वा चित्रपट होता ....त्यात जर १-२ चित्रपट नसेल हि चांगले .. वाईट लवकर दीसत साहेब.... आमीरने केलेले लव, लव लव, अव्वल नंबर, तुम मेरे हो, अफसाना प्यार का, जवानी झिंदाबाद, इसी का नाम जिंदगी, दौलत की जंग, परंपरा, दिल हैके मानता ही नही, आतंक ही आतंक, अकेले हम अकेले तुम, गुलाम, मन, मंगल पांडे, फना, राजा हिंदुस्तानी, मेला हे तद्दन बंडल होते. ही १-२ चित्रपटांची यादी नसून (मोजा आता) बरीच मोठी आहे.(यादी विकिपीडियाच्या सौजन्याने) असो तुम्हाला सांगुन काही फायदा नाही... तरी सांगितलेच की :) गेट वेल सुन कोलबेरपंत थ्यांक्यू म्हणतील. ---(ख्रर्या कलाकाराची कदर करणारा आणी जो नाही करत त्यांना फाट्यावर मारणार ) नि ३. (स्पष्टवक्तेपणाची कदर करणारा आणि जे करत नाही त्यांनी फाट्यावर मारणारा) Aवन आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आपला अभिजित 01/01/2009 - 18:33
आमीरने केलेले लव, लव लव, अव्वल नंबर, तुम मेरे हो, अफसाना प्यार का, जवानी झिंदाबाद, इसी का नाम जिंदगी, दौलत की जंग, परंपरा, दिल हैके मानता ही नही, आतंक ही आतंक, अकेले हम अकेले तुम, गुलाम, मन, मंगल पांडे, फना, राजा हिंदुस्तानी, मेला हे तद्दन बंडल होते. ही १-२ चित्रपटांची यादी नसून (मोजा आता) बरीच मोठी आहे.(यादी विकिपीडियाच्या सौजन्याने) हे वाईट चित्रपट होते, असं विकिपिडियात म्हटलंय का? असो. लव लव लव, अव्वल नंबर, तुम मेरे हो, अफसाना प्यार का, जवानी झिंदाबाद, इसी का नाम जिंदगी, दौलत की जंग, परंपरा वाईट होते नक्की. ते आमिरच्या आधीच्या कारकिर्दीतले होते. तोपर्यंत त्याने मोठे नाव मिळवले नव्हते. तसं पाहायला गेलं, तर त्याला नाव मिळवून देणारा `दिल'ही भडक, बटबटीतच होता की! (इंद्र्कुमारचा चित्रपट आणि भडक, बटबटीत हे समानार्थी शब्द आहेत!) `आतंक ही आतंक' तर आमिरने नंतरच्या टप्प्यात केलेला असूनही वाईट होता. त्याहूनही जास्त वाईट वाटलं, त्यानं धर्मेश दर्शनचा तद्दन टुकार, भडक, भीषण `राजा हिंदुस्थानी' केलेला पाहून. त्याच्या वेगळेपणाबद्दलचा आदर नष्ट व्हावा, इतपत भयानक होता तो. दिल है के मानता नही, अकेले हम अकेले तुम (मन्सूर खान), मन (इंद्रकुमारचा असूनही!) मात्र उत्तम होते. `गुलाम' (विक्रम भट) तर त्याच्या कारकिर्दीला वेळं वळण देणारा महत्त्वाचा चित्रपट मानला जातो! ही यादी घाईघाईत दिलीत का आजानुकर्णराव?

In reply to by आपला अभिजित

विजुभाऊ 02/01/2009 - 13:15
राख नावाचा त्याच लायकीचा एक चित्रपट होता. त्यात अमिर खान रात्री अपरात्री व्यायाम करत असतो. ही त्याची मध्यवर्ती कल्पना असावी असे दिग्दर्शकाला वाटले होते

नि३ 31/12/2008 - 19:55
अकेले हम अकेले तुम, गुलाम,दिल हैके मानता ही नही,फना, राजा हिंदुस्तानी ह्या चित्रपटांना तद्दन बंडल म्हट्ल्यानंतर आपल्याला चित्रपटाबद्द्ल कीती ज्ञान आहे ते लक्षात आलेच.. त्याबद्द्ल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. ---नि३.

In reply to by नि३

असहमत... अकेले हम अकेले तुम तुलनेने चांगला चित्रपट होता. मला तर फार आवडला होता. कदाचित माझ्या सुमार बुद्धीमत्तेमुळे मला तो आवडला असेल. (मासेस मधला) पुण्याचे पेशवे Since 1984

नि३ 31/12/2008 - 20:01
हे कोलबेर यांनी मान्य केलेच आहे. आमीर हा सर्वात चूझी मानला जातो वगैरे म्हणून. नाही का? आमिर खानच्या बाबतीत 'नावाजलेला गुरवा देवळात जाउन ***' ह्या म्हणीचा प्रत्यय आलाच होता आता आणखी एक दाखला मिळाला इतकेच. हे पण त्यांनी मान्य केले नाही का??? तरी सांगितलेच की खुप काही जे सांगायचे होते पण समजले कि काही फायदा नाही म्हणुन तेवढ्यावरच थांबलो. (स्पष्टवक्तेपणाची कदर करणारा आणि जे करत नाही त्यांनी फाट्यावर मारणारा) Aवन आजानुकर्ण तरी वरील प्रतीसाद ...दिला आपण.... असो वाढदिवसाच्या शुभेच्छा..दील्या आहेच आपल्याला.... ---(ख्रर्या कलाकाराची कदर करणारा आणी जो नाही करत त्यांना फाट्यावर मारणार) नि३.

सूर्य 31/12/2008 - 20:59
एकदम सही परिक्षण. वाट बघतच होतो ;) तरी परिक्षणाची लांबी अजुन हवी होती. जोधा अकबर च्या परिक्षणाची आहे तशी ;) असो. माझे दोन पैसे. ;) गझनीपासुन शिकता येणार्‍या काही गोष्टी १. शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला की अंगात प्रचंड शक्ती येते. (आता फॅट लॉस करायचा की मेमरी लॉस या पेचात पडलो आहे ;) ) २. एखादी शिवी दिल्यासारखे किंवा हाक मारल्यासारखे 'अरे शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असे हिरोला म्हणता येते. ३. बसचे तिकीट सापडले की खुनी शोधुन काढता येतो. ४. बसचा पाठलाग केला की खुनी पुढच्या दाराने पळुन गेला आहे हे लक्षात येत नाही. अशा बर्‍याच काही .. १०१ तर निघतीलच. पण सर्वात महत्वाची म्हणजे, ५. अमीर खान चा प्रत्येक चित्रपट डोळे झाकुन बघितला पाहीजे असे नाही. - सूर्य

In reply to by सूर्य

घाटावरचे भट 03/01/2009 - 04:08
>>एखादी शिवी दिल्यासारखे किंवा हाक मारल्यासारखे 'अरे शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असे हिरोला म्हणता येते. चुकलात. तो 'शोर्ट टर्म मेमरी लोस' असं म्हणतो.... ;)

प्राजु 31/12/2008 - 21:01
आपले हे परिक्षण वाचून मात्र मस्त करमणून झाली. जबरदस्त! सिनेमा अजून पाहिला नाहिये. पण नक्की पाहणार आहे. कारण आमीर खान हा आवडता हिरो आहे म्हणून. पण आता तुमचे परिक्षण वाचल्यानंतर या सिनेमातील दृष्य पाहताना तुमची नक्की आठवण होईल. खास करून "गोंदवलेकर महाराज".. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजू ताई, आम्ही हा चित्रपट येथे बघितला. प्रिंट-प्रत चांगली आहे व बफरही पटकन होतो आहे. कोलबेरांचे चित्रपरिक्षण मस्तच. आपला, (चोखंदळ) भास्कर माझी चित्रपट अनुदिनी येथे आहे...

In reply to by भास्कर केन्डे

चतुरंग 02/01/2009 - 04:18
काही व्हायरस्/तत्सम सॉफ्टवेअर असावे कारण माझ्या लॅपटॉपवरच्या कास्परस्काय अँटीवायरसने 'मॅलीशियस सॉफ्टवेअर' असा धोक्याचा संदेश दिला आणि साईट ब्लॉक केली. तेव्हा इथून चित्रपट बघताना जपून. चतुरंग

एक 01/01/2009 - 01:01
आवडला नाही.. आणि ही शाब्दिक कोटी अनाठायी वाटली.. त्यामुळे पुढ्चं परिक्षण वाचवलं नाही. बाकी पिक्चर आजच बघणार आहेच तेव्हा कळेलच कसा आहे ते.

पक्या 01/01/2009 - 01:19
सिनेमात अनेक अतर्क्य गोष्टी असल्या तरी आमिर ने अक्टिंग मात्र जबरा केली आहे. बॉडी तर काय कमावली आहे ! 'उंचीत मार खाल्ला' तरी बॉडी कमावून रूबाबदार दिसणे हे आमीर ने साध्य केले आहे. ८ पॅक बॉडी कमावणे हे काही येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे. आमिरच्या चिकाटीचे आणि मेहनतीचे कौतुक. सिनेमा तितकासा रूचला नसला तरी आमिर ला वेगळ्या गेटप मध्ये बघायला आवडले. 'तू मेरी अधूरी प्यास प्यास है ' हे (एवढे एकच) गाणे आवडले. >>बाकी पिक्चर आजच बघणार आहेच तेव्हा कळेलच कसा आहे ते. नक्की बघा एकराव. आमिर साठी एकदा बघायला काही हरकत नाही.

राघव 02/01/2009 - 14:27
परिक्षण खरोखर आवडले होते. पण "गोंदवलेकर महाराज" हा अनावश्यक शब्दच्छल आघात करून गेला. पुढचे वाचण्यात रसच राहिला नाही. शाब्दिक कोटी करतांना महाराजांना कशाला हो मधे घालता. त्यांनी तुमचे किंवा कुणाचेच असे काय बिघडवलेले आहे की त्यांचा असा उल्लेख तुम्ही करावा. दुसरे काही सुचत नसेल तर निदान असले तरी काही लिहू नका.

In reply to by शंकरराव

लिखाळ 02/01/2009 - 17:59
आम्ही बुवा बाबा महराज ह्यांच्या भोंदुगिरीला फाट्यावर मारतो...
आम्ही सुद्धा ! आम्ही भोंदू नसलेल्या संतांचा आदर राखतो. गोंदवलेकर महाराजांच्या बाबतच्या मुमुक्षुच्या मताशी सहमत. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

सुचेल तसं 02/01/2009 - 21:15
१) आमीर आणि असीनची केमिस्ट्री झकास जमली आहे. (असीनला पाहिल्यावर वाटलं की तिच्यासारखीला मारल्यावर कोणीही वेडापिसा होऊन बदला घेऊ शकतो. १ नं. वाटली ती ह्या सिनेमात) २) मेमेंटो अजुन पाहिला नसल्यामुळे तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. ३) गाणी बरी वाटली (अर्थात, रेहेमानचा नेहेमीचा टच जाणवला नाही) ४) नेहेमीच्या हिंदी सिनेमापेक्षा वेगळी वाटली स्टोरी... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

धनंजय 02/01/2009 - 21:44
स्मृती (आणि अतीतच) ही तथ्यात्मक की भामक? हा तत्त्वज्ञानातला एक मोठा प्रश्न. एखाद्या क्लिष्ट प्रश्नापासून सुंदर कलाकृती निर्माण होऊ शकते - "आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही इक पल है" या शब्दांना दिलेले सुंदर संगीत हेच साधते. अशाच प्रकारे "गजिनी"मध्ये भन्नाट करमणूक करणारी चित्र-कथा निर्माण करणे शक्य होते. परीक्षण वाचून असे वाटते, की चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी ही संधी वाया घालवली... धन्यवाद कोलबेर. कोणी फुकट दाखवला तर हा चित्रपट नक्की बघीन.

In reply to by धनंजय

लिखाळ 02/01/2009 - 21:49
एखाद्या क्लिष्ट प्रश्नापासून सुंदर कलाकृती निर्माण होऊ शकते - "आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही इक पल है" या शब्दांना दिलेले सुंदर संगीत हेच साधते. अशाच प्रकारे "गजिनी"मध्ये भन्नाट करमणूक करणारी चित्र-कथा निर्माण करणे शक्य होते. परीक्षण वाचून असे वाटते, की चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांनी ही संधी वाया घालवली...
अक्षरशः सहमत. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

In reply to by धनंजय

धनंजय 02/01/2009 - 21:56
अवांतर : काही लोक कंबरपट्टा इतका उंच बांधतात, की आयुष्यात कमरेखालचे वार त्यांना फार सहन करावे लागतात. गावच्या रेड्याबद्दल ज्ञानेश्वराच्या वेद वदवल्याची कोटी कित्येकांनी केली असेल - बहुधा अशा प्रकारची कोटी "पाळीव प्राणी" मध्ये पु ल देशपांडे यांनी केलेली आहे. त्या विनोदात बहुधा प्राण्याच्या मालकांचा स्पष्ट उपहास आहे. पण त्या कोटीने ज्ञानेश्वरांचे कार्य कमी होत नाही. इतकेच काय खुद्द ज्ञानेश्वरांचा कणभरही अपमान पु ल देशपांडे करत नाहीत, असे मला वाटते. पण कंबरपट्टा गळ्याशी बांधलेल्या एखाद्याला आपल्या श्रद्धेविरुद्ध कमरेखालचा वार वाटेल. असे वाटू नये. तसेच गोंदवलेकर महाराजांबाबत. ("कंबरपट्टा फार उंच बांधणे/कमरेखालचा वार" हा दाखला पु लंचाच आहे.)

In reply to by धनंजय

लिखाळ 02/01/2009 - 22:31
सहमत आहे. अनेकदा काय बोलले या पेक्षा कोण बोलले आणि का बोलले याकडे आपले लक्ष पटकन जाते. काळ सोकावू नये म्हणून (असे उल्लेख पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून) आपण लगेच प्रत्युत्तर देतो. आपल्या उदाहरणातला रेड्याचा उल्लेख आणि इथे महाराजांचा उल्लेख निराळ्या तर्‍हेचे वाटतात. एका चर्चेत त्यांचे नाव आल्या आल्या इकडे वेगळ्या धाटणीचा उल्लेख आल्याने प्रतिक्रिया वेगळ्या झाल्या असतील. असो. आता कफनी वापरावी असा विचार आहे. :) -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. कंबरपट्टा सोडा घट्ट पँट वापरा.

In reply to by धनंजय

एक 02/01/2009 - 23:10
"..कंबरपट्टा गळ्याशी बांधलेल्या एखाद्याला आपल्या श्रद्धेविरुद्ध कमरेखालचा वार वाटेल. असे वाटू नये. तसेच गोंदवलेकर महाराजांब"....." आपण सल्ला वगैरे देत आहात का? तर थँक्स मला त्याची गरज नाही. कोलबेरने त्याला हव्या त्या कोट्या कराव्यात. मी कुठे आडवतो आहे. मी कोणालाही विरोध केला नाही. कोलबेरला "असं लिहू नये" असे सल्ले पण दिले नाहीत. मी त्याच्या लेखन स्वातंत्र्याचा आदर करतो. व्यक्तिशः मला ती कोटी खटकली, अतिशय फालतू आणि अस्थानी वाटली म्हणून ती कॉमेंट मी लिहिली. आता मला काय खटकावं आणि काय नाही हे सुद्धा इतर लोकं ठरवणार आहेत काय? बाय द वे, पु. लं. ची ती कोटी माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक अशी आहे. "ज्ञानेश्वरांनी एकट्या रेड्याला वेद शिकवले असल्यामुळे, म्हशी भाव-बिव खात नव्हत्या. दूध वगैरे व्यवस्थीत देत होत्या.." ही कोटी ज्ञानेश्वरांवर तर नक्कीच टारगेट केलेली नाही. त्यामुळे तुम्ही हयाच कोटीचा रेफरन्स दिला असेल तर मला तो चुकीचा वाटत आहे. कोलबेर ची कोटी.. आमिरखानचं गोंदणं ==> गोंदवलेकर महाराज.. अशी शाब्दिक"ईनोदी" टाईपची वाटली..

नकारात्मक समीक्षेचे उत्तम उदाहरण म्हणजे वरील समिक्षा म्हणावी लागेल ! 'गझनी' चित्रपट पाहतांना आम्हाला करमणूक महत्वाची वाटली आणि चित्रपट करमणूक करतो असे वाटले. प्रेक्षक चित्रपट का पहातो ? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. मला वाटतं त्याचा पहिला उद्देश हा करमणूकीचा असावा. चित्रपटातील कथा प्रेम याच विषयाभोवती फिरवतांना उत्तरार्धात नायकाला विस्मृतीचा दिलेला टच अनेकांना आवडेल. शेवट लैच रद्दी आहे हे मान्य. ( सिंघानिया म्हणून 'कल्पनाला' ओळखू न येणे, टिकिटावरुन माग काढणे, आणि काही दृष्य आता मसाल्याचे भाग आहेत. असे भंकस प्रसंग अनेक चित्रपटात असतात ) आता चित्रपटातून उपदेश,कलात्मकता,सामाजिक आशय, दिग्दर्शकाची कमाल, या किंवा आणखी कोणत्या गूणवैशिष्ट्यावरुन चित्रपट चांगला ठरवला पाहिजे त्याबद्दल मला माहिती नाही. पण वरील समीक्षेत त्याचा कुठेही विचार दिसला नाही किंवा चित्रपट फसतो कुठे त्याचीही मांडणी परिक्षणात दिसली नाही. चित्रपट भिकार ठरवत असतांना त्याची काहीएक तुलना कशाशी तरी असावी, चित्रपटाचे गूण-वैशिष्टे ठरवले पाहिजेत,त्यावरुन 'गझनी"चे यश-अपयश ठरवावे इतकेच सांगण्यासाठी हा प्रपंच. असो, चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे !!! -दिलीप बिरुटे

कोलबेर 04/01/2009 - 01:15
सर्वप्रथम सर्व वाचकांचे आभार! १) गोंदवलेकर महाराज उल्लेख : दारू पिउन टुल्ल झालेल्याला 'डोलकर' आणि तितकी न चढलेल्याला 'सावरकर' म्हणतात. इथे सावरकरांची खिल्ली उडवली जाते असे मला वाटत नाही. अर्थात ज्यांना वाटत असेल त्यांना तसे वाटण्याचा आणि निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे हे मान्य. २) श्री. नि३ साहेब, तुमच्या लाडक्या अमीर खानच्याच चित्रपटातील एक डायलॉग देतो आहे: " क्यु सिर्फ तेरा राजकमल है इसलिए सडेला पिक्चर भी अच्छा बन जायेगा क्या? अपुन पब्लिक है पब्लिक! जो पिच्चर देखके पैसा वसुल नही हुवा उसका डब्बा गुल" चित्रपट रंगीला. ३) बिरुटे मास्तर : चित्रपट (मला) भिकार का वाटला ह्याची पुरेशी ठळक कारणे मी दिलेली आहेत. त्यापेक्षा खोलात जाउन समीक्षा करण्याइतका महत्वाचा हा चित्रपट मलातरी वाटला नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद! -कोलबेर

In reply to by कोलबेर

चित्रपट भिकार वाटावा याची पुरेशी कारणे मला तरी वरील लेखनात दिसली नाही. खोलात जाऊन समीक्षा केली असती तर चित्रपटाचे काही भले पैलू आपल्याला मांडता आले असते असे वाटले. असो, आपल्या परिक्षणामुळे चित्रपट पाहावा वाटला याचे श्रेय मात्र आपल्या लेखनाला देतो. :) बहेका मै बहेका वो बहेखी हवासी आये......मस्तच !

अभिज्ञ 13/02/2009 - 17:07
कोलबेर ह्यांच्या परिक्षणाशी १००% सहमत. एक शंका "अमीरच्या छातीवर "कल्पना इज किल्ड" हे वाक्य उलट्या क्रमात कोणी लिहिले ?" चित्रपटात त्याचा कुठे उल्लेख आल्याचे स्मरत नाहि. हा अतिटुकार चित्रपट पाहून माझी स्मरणशक्ती काहि वेळ काम करीत नव्हती त्यामुळे देखील मला आठवत नसावे. कोणाला माहिती आहे काय? अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

>> "अमीरच्या छातीवर "कल्पना इज किल्ड" हे वाक्य उलट्या क्रमात कोणी लिहिले ?" माझ्यामते "कल्पना वॉज किल्ड" असं लिहीलं होतं ;) - (सुधारक) टिंग्यालाडु

नि३ 14/02/2009 - 07:54
. नि३ साहेब, तुमच्या लाडक्या अमीर खानच्याच चित्रपटातील एक डायलॉग देतो आहे: " क्यु सिर्फ तेरा राजकमल है इसलिए सडेला पिक्चर भी अच्छा बन जायेगा क्या? अपुन पब्लिक है पब्लिक! जो पिच्चर देखके पैसा वसुल नही हुवा उसका डब्बा गुल" चित्रपट रंगीला. कोलबेर साहेब वही सडेला पिक्चर आज बॉलीवुड की टॉप ५ मे गिना जाता है ( in terms of money earned on box office). २३० कऱोड नेट प्रॉफीट आतापर्यत ... आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर पब्लीक ला हा चित्रपट ईतकाच टूकार वाट्ला असेल तर ह्या चित्रपटाला एवढे यश कसे मिळाले असेल बुवा??? तुम्हाला आवड्ला नाही म्हणुन स्वताला संपुर्ण पब्लीक नका समजु आणी ऊगाच पब्लीक च नाव खराब नका करु. ईथे पहा . www.boxofficeindia.com (आमिर खान चा लाडका) ---नि३.

त्रास 14/02/2009 - 08:31
दुर्देवाने तुमच्या समीक्षेत अमीर त्या रोल साठी घेतलेल्या कष्टांचा काहीच उल्लेख नाही. समीक्षा ही नकारत्मक केली म्हणजे चांगली असे नव्हे. गजनी चांगला की वाईट ह्या फंदात मला पडायचे नाही. मला जर हिंदी पिक्चर बघायचा असेल तर मी डोके घरी ठेउन फक्त "करमणूक" म्हणून जातो; तो माझा निर्णय असतो व माझा हेतु फक्त मजा करणे एव्हढा असतो. त्यामुळे त्रास होत नाही. ठिकाय, गजनी वर मध्यंतरी एक पी. जे. आला होता- गजनी- हत्तीचा गुढगा.

नितिन थत्ते 14/02/2009 - 11:37
कोलबेर यांची समीक्षा चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी आणि त्या मांडणीची परिणामकारकता याविषयी आहे. या कारणांमुळे त्यांनी तो चित्रपट चांगला नाही असे म्हटले आहे. ज्यांना तरीही तो आवडला त्यांनी कोलबेर आपल्याला मूर्ख म्हणत आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर टीका केलेली दिसते. जे करमणूक म्हणून आणि डोके घरी ठेवून चित्रपटाला जातात त्यांना कोणताही चित्रपट आवडून घेण्याचा हक्क आहेच. कोलबेर यांनी त्यावर काही आक्षेप घेतलेले नाहीत. परंतु हिरोने चित्रपटासाठी मेहनत घेतली, बॉडी बनवली, चकोट केला, मिशा वाढवल्या, गोंदवून घेतले वगैरे गोष्टी चित्रपटाची हवा निर्माण करण्यास उपयोगी असल्या तरी त्यावरून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये. (ठाकूरची भूमिका उत्तम वठवण्यासाठी संजीवकुमारला हात तोडून घ्यावे लागले नव्हते). तसेही गजनी या व्हिलनचा सूड घेण्यासाठी ८ पॅक ऍब आणि बलदंड शरीर असण्याची आवश्यकता होतीच असे नाही. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

नि३ 14/02/2009 - 12:57
ज्यांना तरीही तो आवडला त्यांनी कोलबेर आपल्याला मूर्ख म्हणत आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर टीका केलेली दिसते. आम्हाला चांगले चित्रपटच आवडतात तुम्ही कोण ते तरीही आवडला म्हणनारे आणी कोलबेर आम्हाला मूर्ख म्हणत आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर आम्ही टीका केली नाही तर आम्ही तुम्हाला मूर्ख समजुन तुमच्यावर टीका करत आहोत. परंतु हिरोने चित्रपटासाठी मेहनत घेतली, बॉडी बनवली, चकोट केला, मिशा वाढवल्या, गोंदवून घेतले वगैरे गोष्टी चित्रपटाची हवा निर्माण करण्यास उपयोगी असल्या तरी त्यावरून चित्रपटाचा दर्जा ठरवू नये. हवा निर्माण केली हो म्हणुन काय त्याने घेतलेली मेहनत व्यर्थ ??? आणी का म्हणुन नाही करणार हवा निर्माण एक वर्ष कठोर मेहनत केली त्याने . त्याने रीलीज केलेला व्हीडीओ ( you tube वर आमीर खान टाईप करा) पहा त्यात त्याने दाखवलेले आहेच की त्याने कशी बॉडी बनवली ती. ठाकूरची भूमिका उत्तम वठवण्यासाठी संजीवकुमारला हात तोडून घ्यावे लागले नव्हते अश्या वाक्यावर हसुपण येत नाही पुन्हा एकदा वाचत चला आपण काय लिहले आहे ते. कश्या सोबत काय कंपेयर करायचे ??? तसेही गजनी या व्हिलनचा सूड घेण्यासाठी ८ पॅक ऍब आणि बलदंड शरीर असण्याची आवश्यकता होतीच असे नाही. बर झाले तुम्ही डायरेक्टर नव्हता ते. ( खर्या कलाकाराची ( स्टार ची नव्हे) कदर करणारा) ---नि३.

१५ मिनिट टीकणारी स्मृती घेउन प्रेक्षक चित्रपट बघायला येतात ह्या समजातुन आमिर खानचा नविन गझनी हा चित्रपट बनवला आहे. समोरच्या प्रसंगात काय चालले आहे ह्याची १५ मिनिटापुर्वीच्या चित्रपटाशी सांगड घालायचा प्रयत्न केलात तर तुम्ही फसलात. कशाचा कशालाही आगापीछा नाही.

मुतलुलुक- ब्लिस

मॅन्ड्रेक ·

पक्या 28/12/2008 - 00:13
छान लिहीलाय लेख. सिनेमाची कथा ही चांगली वाटतीये. कुठे मिळेल हा सिनेमा पहायला?

पाषाणभेद 28/12/2008 - 01:07
त्या मुलीला तो मुलगा स्विकारतो का नाही? फारच भावनिक गुंता आहे त्याच्या साठी. -( सणकी )पाषाणभेद

परिक्षण सुंदरच लिहिलं आहे.... पण किन्नरीताई, एक रिक्वेष्ट!!!! ते शीर्षक जरा "मुतलुलुक ब्लिस - एक चित्रपट परीक्षण" किंवा "मुतलुलुक ब्लिस - तुर्की चित्रपट" असं काहीतरी ठेवा हो.... नुसतं "मुतलुलुक - ब्लिस" म्हणजे काहीतरी भलतंच वाटतं!!!! मी तर प्रथम ते "मुतलुकलुक - ब्लिस" असं वाचलं! आणि लेखिका "किन्नरी"!!! मनात म्हटलं मिपा आता भलतंच पुढारत चाललेलं दिसतंय!:)) इथे आमच्यासारखी म्हातारी माणसंही आहेत हो! हार्ट ऍटॅक द्याल एखादे दिवशी!!!!:) (ह. घ्या)

मदनबाण 28/12/2008 - 04:55
चांगले परिक्षण.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

प्राजु 29/12/2008 - 06:11
मी यू ट्युब वर ट्रेलर पाहिला. मुलगी खरंच निरागस आहे. परिक्षण मस्तच. युट्युब वर बहुतेक संपूर्ण चित्रपट असावा.. कारण काही भाग दिसताहेत. पाहिनच १-२ दिवसात. धन्यवाद चांगल्या चित्रपटाची ओ़ळख करून दिलीत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु, लिंक्स देऊ शकशील का, इथे किंवा खवमधे? परीक्षणाबद्दल धन्यवाद. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

कथा भयंकर आहे. छान परीक्षण ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

मुतलुलुक- ब्लिस हे एका तुर्की चित्रपटाचं नाव.परदेशी चित्रपटाचं नाव योग्यवेळी आठवणं, त्याचा योग्य उच्चार समजणं, तो समजल्यावर तो योग्य पध्दतीनं करता येणं हा सगळा नव्याने शाळेत जाण्यासारखा अनुभव असतो. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या (आणि दरवर्षी नेमाने होणाऱ्या)थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला उदघाटनाचा मान मिळाला होता. मुतलुलुक चित्रपटाच्या पहिल्याच चौकटीत दिसतं एका निर्मनुष्य तळ्याच्या काठी कुशीवर पडलेलं एका वयात आलेल्या मुलीचं शरीर.चित्रपटाची नामावळ चालू होते आणि कॅमेरा तिच्यावर आवर्तनं घेत आणखी वर जाऊन दृष्याची पार्श्वभूमी उलगडत असताना, तळ्याचा निर्मनुष्य परिसर दाखवत असताना मुलीच

अंड्याची टरफले आणि बुटाची लेस

लिखाळ ·

आजानुकर्ण 24/12/2008 - 01:38
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं... आणि कांद्याचीही आजही ऑम्लेट वाटतं! आपला (ऑम्लेटवाला) उद्धव महाराज आजानुकर्ण लेस काढलेले माझे बुट पाहत आहेत माझ्याकडे आ वासून... सांगताहेत जणू आता तरी सॉक्स धू की लेका. आपला (घाणेरडा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

लिखाळ 24/12/2008 - 20:51
:) हा हा.. हे मस्त. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

चतुरंग 24/12/2008 - 01:59
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली कल्पनांची टरफलं आजकाल लेखन असेच काहीसे वृत्त आणि मात्रांना बहर यायच्या आधीच... फाडतो आहे.. रचलेल्या कविता अस्ताव्यस्त.. ----------------------------- माझ्या उरलेल्या केसांच्या बटा पाहत आहेत आरशात आ वासून...म्हणत आता तरी कलप लावणं थांबव की! 'शाळा' करत बसलेला टोणगा पाहतोय वाट बाईंची मारण्यासाठी कागदी बाण! चतुरंग

In reply to by चतुरंग

लिखाळ 24/12/2008 - 20:54
वृत्त आणि मात्रांना बहर यायच्या आधीच... फाडतो आहे.. रचलेल्या कविता अस्ताव्यस्त..
ह्म्म असेच काहीसे वाटले म्हणूनच हा लेख लिहिला. पण अशी तुटक वाक्ये रस पूर्ण असतात असे अनेकांना वाटते. खाली असे काही प्रतिसाद आहेत, त्यांची मते सुद्धा बरोबर वाटतात. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

चतुरंग 24/12/2008 - 21:30
तुटक वाक्ये अर्थपूर्ण असली की त्यातून स्फूर्ती घेऊन नवीन काव्य होते. कृपया गैरसमज नसावा. चतुरंग

In reply to by चतुरंग

लिखाळ 24/12/2008 - 21:37
गैरसमज कसला ! उलट तुमची प्रतिक्रिया मार्मिक होती. मला आवडली आणि पटली होती. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

धनंजय 24/12/2008 - 02:31
मग अश्या कल्पनेला पूर्ण स्वतंत्र काव्याचा मान केवळ शब्दरचना बदलल्याने मिळावा का? असे मनात आले.
हा प्रश्न ठीक वाटला नाही. "स्वतंत्र काव्याचा मान" असे प्रमाणपत्र कुठलेच नसावे असे वाटते. ॐ या एका अक्षराला स्वतंत्र जपमंत्राचा मान असावा काय? असे विचारण्यासारखे आहे. पण "ओळी तोडून आशयात काही फरक पडतो का?" असा फेरबदल करून तुमचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. माझ्या मते कधीकधी फरक पडतो. शब्द रचणार्‍याच्या मनात वाक्य वाचण्याची लय काय होती? अति-स्वल्पविराम कुठे होते? या बद्दल काही निर्देश ओळी तोडल्यामुळे मिळतात. शब्दवाचनाला सुयोग्य लय असली, ठेका असला, तर वेगळा आशय, आशयाचा वेगळा पैलू वाचकापाशी पोचतो. लयीशी फारकत घेऊन ओळी तोडू नयेत, उदाहरणार्थ -
हिरवेहिरवे गार गालिचे हरिततृणाचे मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती
असे वाचताना बरे वाटत नाही. पण तुमच्या लेखात बहुतेक ओळी ज्या ठिकाणी तोडल्या त्या ठिकाणी ठीक वाटतात. काहीतरी सुंदर किंवा अर्थपूर्ण वाचकापर्यंत पोचवायचे असेल, ओळी तोडून काही विशेष परिणाम साधत असेल, तर शब्द रचणार्‍याने "स्वतंत्र काव्याचा मान" वगैरे अवांतर कल्पनांनी स्वतःला जोखडू नये. **अंड्यांच्या टरफलांची कल्पना अजून कच्ची वाटली. बुटांची कल्पना आवडली. टायची कल्पना तशी आवडली, पण खूप नाही. लेखकाला स्वातंत्र्य असते, तसे वाचकालाही!** मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय असते? विचार करतानाच्या कल्पना या मांडल्या. नक्की काय म्हणायचंय? पूर्ण वाक्यात न मांडता छंदोबद्ध रचना न करता तुटक तुटक वाक्यांत कशा भावतात वाचकाला?

In reply to by धनंजय

टग्या 24/12/2008 - 02:41
नक्की काय असते? विचार करतानाच्या कल्पना या मांडल्या. नक्की काय म्हणायचंय? पूर्ण वाक्यात न मांडता छंदोबद्ध रचना न करता तुटक तुटक वाक्यांत कशा भावतात वाचकाला?
का व्य तित केसे जम ले ना हीसे वाट ले पु न्हा य त्न जरू र करा वा

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 24/12/2008 - 02:52
काही बारीक फेरफार करून ओळी तोडून लेखातली वाक्ये लिहिलेली आहेत. ओळी तोडताना लय सांभाळावी लागते याचे उदाहरण म्हणून आहे... "हिरवेहिरवेगार गालिचे" अयोग्य ठि़काणी ओळी तोडून वाचताना बरे वाटत नाही, हेसुद्धा उदाहरणच, काव्य म्हणून नाही. येथे स्फूर्ती लिखाळ यांना झालेली आहे, या विषयावर काव्यगुण असलेली कविता त्यांनाच जमेल. शाब्दिक उदाहरणाची काव्य-यत्नाशी गफलत झाल्यास दिलगीर ;-)

In reply to by धनंजय

लिखाळ 24/12/2008 - 21:03
पण "ओळी तोडून आशयात काही फरक पडतो का?" असा फेरबदल करून तुमचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. माझ्या मते कधीकधी फरक पडतो. शब्द रचणार्‍याच्या मनात वाक्य वाचण्याची लय काय होती? अति-स्वल्पविराम कुठे होते? या बद्दल काही निर्देश ओळी तोडल्यामुळे मिळतात.
बरोबर. अशीच काही साधकबाधक मते मांडली जावीत अशी आपेक्षा होती. आभारी आहे.
**अंड्यांच्या टरफलांची कल्पना अजून कच्ची वाटली. बुटांची कल्पना आवडली. टायची कल्पना तशी आवडली, पण खूप नाही. लेखकाला स्वातंत्र्य असते, तसे वाचकालाही!**
वास्तविक अंडी कच्ची असतानाच फुटली :) या सारख्या केवळ ओळी भलतीकडे तोडून काव्य निर्माण होते का? असा संभ्रम निर्माण झाला होता. उदाहरणादाखल मी सुद्धा दोन मिनिटात चार कविता पाडू शकतो अश्या तिरिमिरीत मी वरिल दोन रचना अक्षरशः मिनिटाभरात रचल्या आणि समोर ठेवल्या. एखाद्या मोठ्या लेखात ज्या नाविन्यपूर्ण दोन कल्पना एक दोन ओळींची जागा मिळवतील, त्याच कल्पना वाक्यरचनेत बदल केल्याने 'काव्य' ठरल्या. असे होते का? होणे योग्य का? असे प्रश्न पडले म्हणून आपणा सर्वांसमोर मांडले. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

एकलव्य 24/12/2008 - 02:42
लिखाळ - आपले स्फुट चटकन मनाला स्पर्श करून गेले. एखाद्या पूर्ण वाक्यात मांडता येणारा अनुभव वाक्ये तुटक करुन आणि शब्द वेगळ्या क्रमाने मांडले की त्यातून सौंदर्य निर्मिती कशी होते याबद्दल जाणकारांकडून काही समजून घ्यावेसे वाटले. नक्कीच होते... अहो तेच शब्द आणि तीच वाक्ये योग्य ठिकाणी तोडली की वेगळीच गोडी आणि अर्थ निर्माण होतो. आपल्या छोटेखानी कविता (आ वासून तर झकासच!) तेच तर सांगत आहेत. बोलत किंवा वाचत असाल तर योग्य जागी घेतलेला पॉज शब्दांना एक वेगळीच ताकद देऊन जातो तसेच काहीसे आहे हे! (जाणकार नसताना मत देणारा) एकलव्य

In reply to by एकलव्य

लिखाळ 24/12/2008 - 21:06
नक्कीच होते... अहो तेच शब्द आणि तीच वाक्ये योग्य ठिकाणी तोडली की वेगळीच गोडी आणि अर्थ निर्माण होतो. आपल्या छोटेखानी कविता (आ वासून तर झकासच!) तेच तर सांगत आहेत. बोलत किंवा वाचत असाल तर योग्य जागी घेतलेला पॉज शब्दांना एक वेगळीच ताकद देऊन जातो तसेच काहीसे आहे हे!
आपण फार योग्यच उत्तर दिलेत. माझी भूमिका मी वरती धनंजयांना लिहिलेल्या उत्तरात मांडलीच आहे. आपण जे म्हणता ते विचारात टाकणारे आहे. मला आत्तातरी ते पटल्या सारखे वाटते आहे. मुक्तछंदाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बनायला या चर्चेमुळे काही मदत होईल ही आशा फळत आहे :) -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विसोबा खेचर 24/12/2008 - 07:32
काय लिखाळराव, मनस्थिती बरोबर नाही वाटतं हल्ली? :) अहो एखादी साधी, सोपी परंतु पटकन आवडून जाणारी कविता लिहा की! तात्या.

टग्या 24/12/2008 - 09:22
"लेस"साठी "नाडी" हा अस्सल मराठमोळा शब्द आहे असे वाटते. त्यामुळे "बुटाची नाडी" हा शब्दप्रयोग अधिक उचित ठरला असता असे वाटते. (या विषयावरील अधिक चर्चा येथे करणे उचित ठरेल असे वाटते. ;) )

विसोबा खेचर 24/12/2008 - 09:44
त्यामुळे "बुटाची नाडी" हा शब्दप्रयोग अधिक उचित ठरला असता असे वाटते. (या विषयावरील अधिक चर्चा येथे करणे उचित ठरेल असे वाटते. हा हा हा! :) आमचा टग्या साला पहिल्यापासून एक नंबरचा भिकारचोटच आहे! ;) असो, अवांतरा/विषयांतराबद्दल क्षमस्व. या संबंधीची पुढील चर्चा कृपया आमच्या खरडवहीत करावी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 24/12/2008 - 21:11
तात्या,
काय लिखाळराव, मनस्थिती बरोबर नाही वाटतं हल्ली? अहो एखादी साधी, सोपी परंतु पटकन आवडून जाणारी कविता लिहा की!
तात्या, मी वरील दोन कविता का लिहिल्या ते धनंजय यांना दिलेल्या उत्तरात लिहिलेच आहे. तब्येत ठीक आहे :). कधी जमले तर चांगली कविता करावी अशी इच्छा आहेच :) टग्या, लेसला नाडी म्हणावे असे एकदा वाटले. वास्तविक मी बुटाची नाडी असेच नेहमी म्हणतो. लेस क्वचितच म्हणतो. पण नाडी आणि टाय जुळले नसते असे वाटले. आणि नाडी-पट्टी मुळे मिपावर नाडीला जो अर्थ निर्माण झाला आहे त्यामुळे या चर्चेत नाडी शब्दावर कोट्या होत राहू नयेत असे वाटल्याने तो शब्द टाळला. प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

चतुरंग 24/12/2008 - 21:49
तुमचे मूळ पद्य घेतले आणि त्याचे गद्य रुपांतर केले आहे. फिकट करड्या अक्षरातले कंसातले शब्द हे रीडिंग/फीडिंग बिटवीन द लाईन्स अशा स्वरुपाचे आहेत. सरळ हेच शब्द लिहून वाक्य लिहिलेत तरी अर्थ पोचतोच पण त्यात वाचकाच्या कल्पनाशक्तीला आवाहन फारसे रहात नाही. करड्या रंगाचे शब्द गाळून फक्त गाभ्याच्या मूळ कल्पना वाचकासमोर ठेवणार्‍या पद्याचे सामर्थ्य असे की वाचकागणिक हे कंसातले शब्द बदलू शकतात, नव्हे बदलतातच, आणि त्यातून वेगवेगळे कल्पनांचे धुमारे फुटतात. विचारांना एक वेगळीच गती येते. आजानुकर्णाने वरती केलेला कल्पनाविस्तार आणि माझे विडंबन हे अशाच कल्पनातून स्फुरलेले आहे. गद्यात हे होत नाही. हा मला वाटते गद्य/पद्यातला फरक आहे. वाक्य कुठे तोडायचे हे मूळ कल्पना काय पोचवायची आहे ह्यावर ठरते, वाचकाच्या कल्पनाशक्तीचा विस्तार जिथून होतो/होणे अपेक्षित आहे तिथे जागा मोकळी सोडून पुढच्या कल्पनेकडे वळता येते. हे जितके सशक्तपणे होत जाईल तितके काव्य समर्थ होत जाते. ---------------------------------------------------------------------------------- नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. ------------------------------ नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं (बघितली/दिसली, मनात आलं) आपले अनुभव असेच काहीसे (असतात का?) निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच (अंडी फुटून त्या कल्पना बाहेर पडतात). (कल्पनांची) अस्ताव्यस्त पडलेली टरफले पहातो आहे. चतुरंग

In reply to by चतुरंग

लिखाळ 26/12/2008 - 16:18
प्रतिसाद फारच आवडला. या चर्चेतून असेच काही समजून घेण्याची ईच्छा होती.
सरळ हेच शब्द लिहून वाक्य लिहिलेत तरी अर्थ पोचतोच पण त्यात वाचकाच्या कल्पनाशक्तीला आवाहन फारसे रहात नाही.
वाक्य कुठे तोडायचे हे मूळ कल्पना काय पोचवायची आहे ह्यावर ठरते, वाचकाच्या कल्पनाशक्तीचा विस्तार जिथून होतो/होणे अपेक्षित आहे तिथे जागा मोकळी सोडून पुढच्या कल्पनेकडे वळता येते. हे जितके सशक्तपणे होत जाईल तितके काव्य समर्थ होत जाते.
छान. आवडले. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

कवटी 24/12/2008 - 22:28
नुकतीच फुटलेली फसफसत ओसांडणारी बीअरची बाटली आणि वेफर्सही.. आज पार्टी वाटत...... रिकामा ग्लास पाहतोय माझ्याकडे आ वासून..... भाड्या आतातरी प्यायची थांबव...... कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by कवटी

लिखाळ 26/12/2008 - 16:19
:) छान. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'हे होणार असे मी परवाच कुणाला तरी म्हणालो.' असली वाक्ये आपल्या 'दूरदृष्टीची' बतावणी करायला उपयोगी पडतात.

मॅन्ड्रेक 26/12/2008 - 14:53
अहो कवटि, बीअरची बाटली, रिकामा ग्लास आणि वेफर्सही.. आज पार्टी वाटत.. ph D करताय वाटत. ph D म्हण्जे - पिण हेच ध्येय.

पॅपिलॉन 26/12/2008 - 15:28
मर्मिक चर्चा आणि बरीचशी उद्बोधकही! ओळी मध्येच तोडण्याचे (वा पुढे खेचण्याचे) स्वातंत्र्य नवकवींनाच आहे असे नव्हे. अगदी केशवसूतदेखिल - आम्ही कोण म्हणूनि काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया असे लिहून गेलेच की! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

In reply to by पॅपिलॉन

लिखाळ 26/12/2008 - 16:22
:) प्रतिसादाबद्दल आभार. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'असे काहीतरी होणार असे मी परवाच कुणालातरी म्हणालो.' असली वाक्ये आपल्या 'दूरदृष्टीची'बतावणी करायला उपयोगी पडतात.

नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.

नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?

चेतन सुभाष गुगळे ·

क्षमस्व, मी तरी नाही पाहीला. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

एका वाक्यात उत्तरे द्या. प्रश्न :- नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय? उत्तर :- असे पिक्चर कोणी बघणे णामूमकीण आहे. प्रश्न :- सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? उत्तर :- आम्ही फक्त णामूमकीण ह्या चित्रपटाविषयी उत्तरे देण्यास बांधिल आहोत. तरी 'सदर' ह्या चित्रपटाविषयी अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न विचारु नयेत. (हुकुमावरुन) प्रश्न :- या चित्रपटाची संकल्पना परकीय कथेवर आधारित आहे काय? उत्तर :- आपल्याला स्वदेशी कथेवर आधारलेला एखादा चित्रपट आठवत आहे काय ? (संत तुकाराम , राजा हरिश्चंद्र वगैरे नावे तोंडावर फेकु नयेत. हुकुमावरुन) सविस्तर उत्तरे द्या. प्रश्न :- हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे? उत्तर :- (शंका १) जे चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहित त्यांनाच गाजलेले चित्रपट असे म्हणतात. ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे, त्यामुळे ह्यास गाजलेला पिक्चर असे न म्हणता आल्याने त्याच्याविषयी कुठलेही 'छापील धंदे' उदयास आले नसावेत. (शंका २) हृषिकेश मुखर्जी + डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, + झीनत अमान हे णामूमकीण 'भरीत' बघुन त्या काळच्या चित्रपट समिक्षकांच्या हातावरुन वारे गेले असावे !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

या चित्रपटाविषयी परिकथेतील राजकुमाराने कल्पना केल्याप्रमाणे 'ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे' असे काही मला वाटत नाही. एक तर हा चित्रपट १९८९ सालचा आहे असे ह्याच्या प्रमाणपत्रावरून कळते व त्या काळी मी चित्रपटांची अत्यंत उत्सुकतेने माहीती घेत असे व त्या काळी झीनत अमान हे चलनी नाणे नव्हतेच मूळी. तो माधुरी, श्रीदेवी व जूही यांचा काळ होता. असो, तर मुद्दा हा की झीनत अमान च्या नावावर चित्रपट चालवणे शक्य नव्हते. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या चित्रपटाचे साल जरी १९८९ असले तरी तो १९८९ ला प्रदर्शित झाल्याचे मला तरी आठवत नाही. मी हा चित्रपट प्रथम पाहिला तो १९९३ च्या डिसेंबर महिन्यात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात. त्या काळी दूरदर्शनवर दर शनिवारी सायंकाळी हिन्दी चित्रपट दाखविला जाई. परंतू ११ डिसेंबर १९९३ च्या त्या शनिवारी काही अपरिहार्य कारणामुळे चित्रपट अचानक सायंकाळच्या ऐवजी दुपारी दाखविण्यात आला. ही बाब आधी जाहीर न केल्यामुळे अनेक जण तो पाहू शकले नाहीत. मी घरात त्यावेळी एकटाच असल्याने कंटाळलो होतो व त्यामुळे टीव्ही लावला तर चित्रपटाचे प्रमाणपत्र दाखवले जात होते. पुढे चित्रपट संपेपर्यंत टीव्ही समोरची नजर ढळली नाही. हृषिकेश मुखर्जींनी एक अगदी अशक्य वाटणारी कथा सादर केली होती. या कथेने मला अगदी भारावून टाकले. हा चित्रपट इतरांना कसा वाटला हे जाणण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. पण नंतर मला कळले की प्रसारण ठरलेल्या वेळे अगोदर झाल्याने तो माझ्या माहितीतल्या कुठल्याच व्यक्तिने बघितला नव्हता. त्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा तरी बघायचाच असे मी ठरवले आणि माझ्या प्रयत्नांना ११ वर्षांनी यश आले. २००४ मध्ये मला या चित्रपटाची VCD मिळाली. त्यानंतर मी स्वत: हा चित्रपट कुटूंबियांसमवेत पुन्हा बघितला त्याचप्रमाणे परिचयातील इतर अनेकांना दाखविला. सर्वांनाच तो फ़ार आवडला. इतका अप्रतिम चित्रपट आपल्या पाहण्यात कसा आला नाही तसेच या चित्रपटाविषयी काहीच चर्चा ऐकण्यात / वाचण्यात कशी आली नाही यावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चित्रपट :- नामुमकीन (१९८९) दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी गीतकार :- आनंद बक्षी संगीतकार :- राहूल देव बर्मन गायक :- किशोर कुमार गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा अभिनेत्री :- झीनत अमान सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

छोटा डॉन ·

स्वप्निल.. 14/12/2008 - 03:20
डॉन भाऊ, मस्त लेख आहे..माझे पण काँग्रेसबद्दल असेच काहिसे मत आहे..त्यांची जातीयवाद विरोधी इमेज खोटी आहे..सगळ्यात जास्त जातीचे राजकारण मला वाटते काँग्रेसच करते.. >>तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सगल मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. >>प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे १००% सहमत!!! स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

आजानुकर्ण 14/12/2008 - 05:31
प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले?

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 14/12/2008 - 19:00
>> प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. सहमत आहे ह्या वाक्याशी. आज बहुतांश पक्षांची तशीच इमेज आहे. भाजपा म्हणजे "ब्राम्हणांचा, बनियांचा, उच्च्वर्णीयाम्चा" पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस जरी दावा करत नसले तर बहुसंख्य नेत्यांच्या नावांवरुन तो सरळसरळ "मराठा समाज" डोमीनेटेड पक्ष आहे असे दिसते आहे, शिवसेनाचा तसा अजुन काही "जातीयवादी" चेहरा दिसला नाही, बसपा नेहमीच "बहुजन समजाच्या" मागे उभी राहिली आहे व त्यांनीसुद्धा बसपाला बर्‍यापैकी हात दिला आहे. तसे सध्या बसपाने पुर्वी "४ जुते" मारलेल्या "ब्राम्हण वर्गाला" सुद्धा चुचकारायला सुरवात केली आहे म्हणुन बेहनजींच्या खास गोटात सध्या मिश्रा, शर्मा, त्रिवेदी सारखी नावे प्रामुख्याने समोर येत आहेत, समाजवादी पक्षाचा "मुस्लीम अनुयय" हा काही लपुन राहिलेला नाही पण त्यांनी बर्‍याच वेळा "बहुजन समाजाचा" तारणहार बनण्याचा प्रयत्न केला, दक्षिणेत तर द्रविडी-अद्रवीडी वाद हा खुप जुना आहे व त्यावर अजुन मते मागीतली जातात... राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर ह्यांनी अजुन तरी "सर्वसमावेशक" हा चेहरा टिकवण्यात यश मिळवले आहे पण जेव्हा जेव्हा संधी मिलेल तेव्हा हा पक्ष "जाती आणि धर्माचा" फायदा घेण्याचा चान्स सोडत नाही. आजही गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंतच्या तिकीटवाटपात बहुसंख्यवेळा या गोष्तींचा विचार होतोच. शिवाय आरक्षण, नामांतरे, खास आयोग, योजना वगैरे ह्या बहुसंख्य वेळा काँग्रेसकडुन प्रमोट केल्या गेल्या आहेत. नुकतेच उठलेले "ओबीसी आरक्षणाचे" वादळ हे काँग्रेसच्याच एका मंत्र्याच्या डोक्यातुन निघालेली पिल्लु आहे व ह्यात सरळ सरळ जातीच्या आधारे आपली "वोट बँक" मजबुत करण्याचे इरादे आहेत हे स्पष्त आहे. >>प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? मुंडेंना प्राथमीक अवस्थेत "मागासर्गीय उभरते नेतॄत्व" म्हणुन महाजनांनी प्रोजेक्ट केले ही जरी खरी गोष्त असली तरी जसा काळ गेला तसा मुंडे हे "सर्वांचेच नेते" झाले. त्यांच्यामागे जरी वंजारी समाज मोठ्ठ्या संख्येन उभा असल्याचे खरे असले तरी ही मुंडे सध्या खास करुन त्या वर्गाचे नेते नव्हे तर "सर्वांचेच नेते" म्हणुन प्रोजेक्ट होत आहेत. >>छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. छगन भुजबळ ह्यांच्या शिवसेना सोडण्यामागे "मंडल आयोग" हे एकमेव न्यात कारण असल्याचे मानले जाते. शिवसेनेने कधीही जातीय राजकारण (कमीत कमी समोरासमोर ) केले नाही, ह्याच तत्वाने त्यांनी "मंडल आयोगाला" विरोध केला व भुजबळांचे बाळासाहेबांशी मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली असा इतिहास ( मलातरी ) ज्ञात आहे. नारायण राणेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न पटल्याने, पक्षातच स्पर्धक निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली असल्याच्या बातम्या आहेत. ह्यात कुठेच "जात" आल्याचे मला ज्ञात नाही. >>राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले? दोन्ही प्रश्नाचे उत्तर ( माझ्यामाहितीप्रमाणे ) वर दिले आहे. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

कलंत्री 14/12/2008 - 08:00
आपली कळकळ आवडते. आपण आपले मत व्यक्त करा. बर्‍याच वेळेस आपल्याला हवी असलेली प्रतिक्रिया येत नाही अथवा विषय भरकटवला जातो. अशा वेळेस मनाची शांती आपल्या उपयोगी येते. मी सर्वसाधारण पणे खालील विचारसरणी स्विकारतो. १. आपला लेख आल्यानंतर अनेक विरुद्ध प्रतिक्रियेचे उत्तर परस्परच दिले जाते. २. काही मुद्दयांचे उत्तर मात्र आपणच द्यायला हवे. ३. पुढील लेखात या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावयाचा. ४. व्यक्तिश: कोणाबद्दलही द्वेष न ठेवता, आपण प्रबोधनाचे कार्य करित आहोत या वर अबाधित विश्वास ठेवायचा. आपल्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.

शक्तिमान 14/12/2008 - 10:36
काँग्रेसचे निर्णय अमराठी हायकमांड वर अवलंबून असणे आणि यातून महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर होणारी गळचेपी थांबवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना संधी मिळावयास हवी. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष चांगला म्हणायचा या बाबतीत. (इतर पक्ष राज्यपातळीवर म्हणावे एवढे तुल्यबळ नाहीत म्हणून उल्लेख केला नाही.) (जर त्यांनी हे धोरण बदलले नाही तर..) काँग्रेसला अधिक संधी देण्यात काही अर्थ नाही.

विसोबा खेचर 14/12/2008 - 12:08
"राजकारण म्हणजे गटार" असे मानणार्‍या मान्यवरांनी ह्या लेखाला तशा अथवा त्या अर्थाच्या प्रतिक्रीया देण्याची "तसदी घेऊ नये". उत्तम! आम्ही ही तसदी घेत नाही/घेऊ इच्छित नाही..कारण "राजकारण म्हणजे गटार" असेच आमचे मत आहे.. आम्ही आपले ह्याबद्दल आत्ताच आभार मानत आहोत. धन्यवाद. हा चांगला व आम्हाला सोयिस्कर असा डिस्क्लेमर टाकल्यामुळे आम्हीही आपले आभार मानत आहोत.. चालू द्या... तात्या.

कॉन्गेस ची नाव बुडेल असे मला तरी वाटत नाही. एकतर विरोधी पक्षात फारसा जोर नाही. आणि मुबंई-ठाणे जेथील जागा वाढल्या आहेत, तीथले परप्रांतिय कॉन्गेस किंवा राकॉ ला मदत करतील. मला नाही वाटत की राणे मुंबई - कोकणा बाहेर फारसे बिघडवु शकतील आणी मुळात कॉन्गेस कोकणात जीवच किती होता???. जे आता दिसत आहे ते राणेंमुळे. निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. -- दुर्दैवाने हे एक उघड सत्य मागच्या काही निवडणुकांपासून अनुभवाला येत आहे. कळीच मुद्दा.

लिखाळ 15/12/2008 - 18:20
डॉन्या, लेख छान आहे. मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे. कधी नव्हे तो या घटनेनंतर थेट पाकिस्तानचे नाव घेऊन पंतप्रधान-संरक्षणमंत्री त्यांच्याशी युद्ध करावे न कारावे अशी मते प्रकट करत आहेत. माझ्या मते याचा सरळ संबंध जनतेला तात्पुरते तुष्ट करुन या निवडणूकीमध्ये इतर मुद्दे दाबून स्वदेशप्रेम वगैरे दाखवून हेतू साध्य करणे याच्याशी आहे. आपले केंद्रातले मंत्री लोक अचानक इतके कठोर कसे झाले याचे उत्तर निवडणुका जवळ येत आहेत हेच वाटत आहे. आता स्थानिक जातीय दंगगली, वीज, पाणी यांपेक्षा मोठा व्यापक प्रश्न आयताच मिळाला आहे. याचाच उपयोग महाराष्ट्रात सुद्धा होईल असे वाटते. एकदा का सूनबाई सभेत येऊन म्हणाल्या की या देशासाठी मी माझ्या सासूबाई,.. वगैरे की सगळे वातावरण भारले जाईल. :) पुढचा भाग वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

सुनील 15/12/2008 - 19:18
मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे दिल्ली आणि राजस्थानातील निवडणूकांतील मतदान ह्या घटनेनंतर आठवड्याभरात झाले होते. तरीही दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडून आली. मला॑ वाटते, विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

छोटा डॉन 15/12/2008 - 20:26
>> विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. असेच म्हणतो ... प्रत्येक पातळीवरच्या निवडणुकांसाठी "विषय आणि मुद्दे" सर्वस्वी भिन्न असतात. त्याचा बहुतेक करुन "इतर पातळीशी" संबंध नसतोच / नसावाच. स्थानीक परिमाण, स्थानीक समस्या, स्थानीक नेतॄत्व, स्थानीक राजकारण ह्यांचा प्रामुख्याने संबंध येतो. तुम्हीच पहा ना, जेव्हा पंचायत समित्यांच्या वगैरे निवडणुका होतात तेव्हा एखाद्या महान / मोठ्ठ्या / बलदंड अशा मंत्री असलेल्या नेत्याच्या पॅनेलला स्थानीक पातळीवरची एखादी "आघाडी / पॅनेल / महासंघ " चक्क धुळ चारतो. कारण त्या मंत्र्याने स्वतः मंत्री म्हणुन केलेल्या कामापेक्षा स्थानीक संदर्भ जास्त वरचढ ठरतात. आपल्या राज्यात तर अशी भरपुर उदाहरणे आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये येणार्‍या पंचायत समित्यात, बँकात, परसंस्था यांच्या इलेक्शनमध्ये तेथील "आमदार / खासदार" यांचे पॅनेल भुईसपाट होऊन राज्याच्या राजकारणात काडीचे स्थान नसलेली एखादी "विकास आघाडी" निवडुन आली आहे ... >>महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. नक्की सांगता येणे कठीण आहे, अजुन बराच वेळ आहे ना निवडणुकीला. आत्ताच लगेच जर निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित "दहशतवादी हल्ल्याच्या ओघाने येणारा सुरक्षेचा मुद्दा" महत्वाचा ठरला असता ( असे मी मानतो) . छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 15/12/2008 - 20:32
बरोबर आहे.. पण मुंबई प्रश्न हा केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर आहे. (मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून.)त्यामुळे मराठी माणसांच्या नोकरी प्रश्नाला देशभक्तीचे वातावरण टक्कर देऊ शकेल असे वाटते. काँग्रेसने जर देशभक्तीची लाट आणली तर ते शक्य होईल. पण अशी लाट किती टिकेल आणि खेडोपाडी याचा किती परिणाम होईल ते माहित नाही. ते असो. -- लिखाळ.

अनामिका 15/12/2008 - 19:07
छोटे सरदार! मस्तच जमलाय लेख.सध्या काही भाष्य करत नाही. जरा वेळ घेऊन व विचार पुर्वक मत मांडलेले बरे नाहि का? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आम्ही सुद्धा! लिखाळ यांच्या मताशी मी सहमत आहे. "अनामिका"

डॉनबा, तुमच्या कल्पनाशक्ती समोर आम्ही नेहमीच चाट पडतो. आपणा सर्वांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात राजकीय पक्ष बदल घडवून आणत असतात. त्यामुळे एक मतदार म्हणून आपणांस त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्रयस्थाच्या नजरेतून आपण एक चांगली लेखमाला उतरवत आहात असे दिसते. अभिनंदन! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) भास्कर