तुझी आठवण मला आता ,मुळी सुद्धा येत नाही
उगीच डोळे भरुन येतात, बाकी खरंच काही नाही..
फूल बघुन मला आता कुणी सुद्धा आठवत नाही
हळुच नजर वळवते मी, बाकी खरंच काही नाही....
चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही
भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही...
पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही
झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही...
एकटं एकटं वाटतं पण ,तू मुळीच आठवत नाहिस
विसरलेच नाही तुला मी ,बाकी खरंच काही नाही...