नमस्कार मि.पा.कर !
आज १४ मे , एका थोर सेनानींची जयंती ! कुणाची हे आपण ओळखले असेलच असे गृहित धरुन लिहित नाही , पण पुढील लेखावरून त्याची सहज कल्पना येईल !
या अद्वितीय योध्द्यास कोटी कोटी प्रणाम !
उदय गंगाधर सप्रेम-ठाणे.
३५२ वर्षांची तळमळ.....
नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो !
आमचा जन्म आजपासून बरोबर ३५२ वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे !