मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्भावना

म्हातारबाँचा दिवस...

डॉ.श्रीराम दिवटे ·
लेखनप्रकार
आजकाल आमचे म्हातारबॉ भलतेच खुश असतात. कारण त्यांचे दिवटे चिरंजीव म्हणजे आम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो असून आम्हांमुळे म्हातारबाँच्या कितीतरी आगंतुकांना बांडगुळासारखे हक्काचे शोषण करुन घेण्याची नामी संधी त्यायोगे मिळालीय. खायचं, प्यायचं अन् ह्याचं जुळव, त्याचं मोड अशी लावालावी करीत गावोगाव उंडारायचं. हेच त्यांचं ज्येष्ठ काम उरलंय. त्यांची साठी उलटली तेव्हा आम्हांला वाटलं त्यांच्या हाती काठी येईल पण छे! म्हातारबाँनी अनेक सवलतीच्या पासांची ताटीच बांधली... यष्टी, रिल्वे यांचे तर अर्ध्या तिकिटाचे पास आहेतच.

लतादिदी ची एक आठवण.

कलंत्री ·
लेखनविषय:
लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त्य अनेक लेख वाचण्यात आले आणि अनेक गाण्यांचा आस्वादही घेण्यात आला. १९६४ च्या सूमारास लतादिदींना गीतेच्या अध्यायावर गायन करण्यासाठी एका संगितमंडळीने सांगितले. लतादिदी आपल्या प्रघातानूसार त्यावर चिंतन, मनन आणि वाचनाची तयारी सुरु केली. उच्चारावर लतादिदींचे खास लक्ष असते. उच्चारात कोणताही दोष असु नये यासाठी त्यांनी गोनिंदा यांना तातडिने येण्यासाठी पत्र पाठविले. गोनिदा यांच्या देखरेखीखाली लतादिदी यांच्या सरावासाठी सुरवात झाली. लता एकनंतर एक असे अध्याय वाचत आणि गोनिंदा त्यात र्‍हस्व आणि दिर्घाच्या उच्चारात काही त्रुटी राहत तर नाही ना यावर लक्ष देत.

धक धक करने लगा...

डॉ.श्रीराम दिवटे ·
कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी.

आज मराठवाडा मुक्तिदिन

मितान ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मराठवाडा मुक्तिदिन ! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत भरडला जात होता. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदासांच्या या भूमीत मुस्लिम रझाकारांनी हैदोस घातला होता. त्यावेळी काँग्रेस पुढार्‍यांपैकी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभारली गेली. शेवटी सैनिकी कारवाईत निजामाला शरणागती पत्करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ पासून मराठवाडा स्वतंत्र भारताचा घटक झाला. माझे या विषयातले ज्ञान फार तोकडे आहे. कृपया इतिहासाच्या जाणकारांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या महत्त्वाच्या पानावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

शांघाईचे बाप्पा.

Manoj Katwe ·
लेखनविषय:
मी सध्या शांघाईला वास्तव्यास आहे. इथे ह्या वर्षी बाप्पांचे दर्शन होईल का नाही, बाप्पांची आरती कानावर पडेल का नाही, बाप्पांचा प्रसाद खायला मिळेल का नाही, ह्यासाठी गेले काही दिवस मन कासावीस होत होते. पण बाप्पांच्या कृपेने *श्री. आराध्ये ह्यांचे 'गणरायाचे आगमन निमंत्रण' बघून खूप आनंद झाला. ठरल्या वेळेप्रमाणे काळ संध्याकाळी, आम्ही( मी, माझी पत्नी शीतल, माझा मित्र नीरज, आणि त्याची पत्नी निशा) चौघे श्री. आराध्ये ह्यांच्या घरी निघालो. घरी पोहोचल्यावर बाप्पांचे दर्शन झाले. शांघाईतले सजवलेले बाप्पा बघून मन भरून आले.

आले गणराज आले हो...

मदनबाण ·
ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले... गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...

गणपती बाप्पा मोरया!

अनामिक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्याकडे बाप्पाचं आगमन फक्तं दिड दिवसांसाठीच असतं. लहान असताना बाप्पाची मुर्ती आणायला जाताना जो आनंद होत असे, तो अजूनही कायम आहे. आम्ही राहतो (म्हणजे मुळ गावी) तिथे सगळ्यांकडे बाप्पाचं आगमन आणि पुजा गणेशचतुर्थीच्या दुपारपर्यंतच होउनही जात असे. पण आमच्याकडे मात्र बाप्पाची पुजा संध्याकाळी असल्याने शेजार्‍यांकडची तयारी, पुजा बघून आम्हा भावंडांनाही कधी एकदा संध्याकाळ होते असे वाटायचे. आम्ही दोघे भाऊ आणि बाबा सकाळीच बाप्पांची मुर्ती घेऊन येत असू. पण त्याही आधी सकाळी उठल्यावर घरात सगळीकडे बाप्पाच्या पाऊलांच्या खूणा चुन्याने काढत असू.

आशा भोसलेंचा आज वाढदिवस!

चतुरंग ·
युवती मना पासून नैना लगाई ले पर्यंत आणि चांदणे शिंपीत जाशी पासून बुगडी माझी पर्यंत अप्रतिहत सहज संचार असलेल्या ह्या सूरसम्राज्ञीला ७७ वर्षे पूर्ण झाली ह्यावर विश्वास बसणे कठिण जाते! आपल्या आवाजातल्या विविधतेच्या जोरावर तब्बल ६७ वर्षे एखाद्या क्षेत्रात उत्तम काम करीत रहायचं म्हणजे खायची गोष्ट नव्हे म्हाराजा! व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढउतार पचवूनही आशाताईंच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. अनेक मानसन्मान मिळूनही साधेपणा टिकवून आहेत त्या.