करोनाकाळात श्रमिकांच्या दु:खांच्या अनेक कहाण्या वाचल्या, पाहिल्या. माध्यमांनी मुख्यत: श्रमिकांचे, गरीबांचे हाल ह्यावर स्टोर्या केल्या. चित्रपट केले. सुखवस्तू जनतेने लॉकडाऊन च्या काळात रोज नवीन पदार्थ बनवून त्याचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करुन "आठडयातून रविवार येईल का रे तिनदा, भोलानाथ ?" ची मजा देखील लुटली. ही कथा २०२० च्या करोनाकाळात संघर्ष करण्यार्या अशाच एका मध्यमवर्गीयाची आहे. (सत्य)कथेत पात्रांची नावे देत नाही. शेवटी मध्यमवर्गीय लाज / अब्रू आड येते म्हणून.....
फेब्रुवारीअखेर त्याच्याकडे एका कंपनीचे काम होते. केबल टाकण्याचे.