एव्हिएशन क्षेत्र हे सर्व इतर व्यवसायांप्रमाणे एक स्वतःतलं जग आहे. त्यातल्या काही टर्मिनॉलॉजीज आपल्या कानावर अधूनमधून पडतात. बहुतेक एखाद्या क्रॅशच्या बातमीच्या निमित्ताने किंवा विमान खरेदी घोटाळा वगैरे झाला तर.
मला वाटलं की अशा रँडम संकल्पना किंवा शब्द उचलून त्याविषयी थोडंसं सांगावं. बरं वाटलं म्हणजे, ठीक जम्या तर पुढे आणखी कन्सेप्ट्स घेऊन पुन्हा बोर्डावर उतरीन. आता थोडी सुरुवात करतो.
"मे डे आणि पॅन पॅन": "मे डे" हा शब्द (शक्यतो तीन तीनवेळा) फ्लाईट रेडिओवरुन म्हटला की विमान प्राणघातक अॅक्सिडेंटच्या अत्यंत जवळ आहे असं पायलटला सांगायचं असतं.