(थू)

पेर्णा पाभे सरांची तू http://misalpav.com/node/50075

थू -१

तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग तू हसते अशी छाती माझी धडधडे ग गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय पुस्तक - ध्वनी प्रदूषण - समस्या व उपाय सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही. ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात?

मला भेटलेले रुग्ण - २३

https://misalpav.com/node/47104 “डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.” पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला. मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.” बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही? मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ? बाप : जी हॉं ! मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है। रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे. वर हे देखील सांगीतलं की तिला अस्थमा असता तरी सगळं आयुष्य चांगलंच जगता येईल.

(मेरा कुछ सामान... (भावा...(बघ)..अनुवाद.))

सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका... पेरणा, प्राची ताईची ही कविता http://www.misalpav.com/node/49553 प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?) स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून. माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरुन सांगतो हे गाणे असे भारी आहे की दुसऱ्या कोणाlला खरा अर्थ लक्षात येण्याची शक्यताच नाही.

डोक्याला शॉट [सप्तमी]

लेखनविषय:
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

# तुम्ही(च) म्हणालात

पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

आवाज बंद सोसायटी - भाग ३

याआधीचे दोन भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ व्याख्या व विकास एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात. आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात.

आवाज बंद सोसायटी - भाग २

लेखनप्रकार
याआधीचा भाग १: http://www.misalpav.com/node/48651 ::: आवाज बंद सोसायटी - भाग १ आवाज बंद सोसायटी - भाग १ विषय प्रवेश आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या ताण तणावांना सामोरे जात असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंबहूना झोपलेल्या अवस्थेत आपले मन अर्धवट जागे राहून अनेक प्रकारचे तणाव झेलत असते. जीवनात समस्या काही वैयक्तिक खाजगी तर काही सामाजीक असतात. अनेक संस्थांनी केलेल्या पाहणीत जागतीक समस्यांच्या यादीत वातावरणातील बदल तसेच त्यात होणारे प्रदूषण वरच्या स्थानी आहे.

यारों मैने पंगा ले लिया...

लेखनप्रकार

यारों मैने पंगा ले लिया...

पेरणा चिनारसेठ चा हा लेख वाचून मलाही माझ्या मनात खोलवर दडून बसलेल्या गाण्याविषयी लिहावे असे वाटले आमचे परममित्र चिनारशेठ किंवा इतर कोणत्याही रसिकाच्या भावना दुखावण्याचा आमचा कदापी उद्देश नाही अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद अजिज, साधनाताई, अनुराधा ताई, अलका ताई, कुमारदा, उदित नारायण ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्या.

(...मारीला म्यां डोळा ;)

पेरणा http://misalpav.com/node/47605 अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा. घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी कडवी. संपतील एकद
Subscribe to औषधोपचार