ए sssssssssssssssss टकी, सळ्ळै sssssssssssssssssssssssss य्या !
नेहेमीप्रमाणे ललकारी ऐकु आली आणि मी बाहेर आलो.
" नमस्कार आज्जी, आज काय म्हणताय? काय काय आहे आज डोक्यावरच्या पाटीत? आणि काय काय चाललंय तुमच्या, पाटीखालच्या डोक्यात?"
सुरुवातीला, साधारणपणे दोन वर्षापुर्वी कुर्ल्याच्या पोलीस क्वार्टर्समधुन इकडे शिफ्ट झालो, तेव्हा आज्जी काय म्हणताहेत ते कळायचेच नाही.