मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

गझल

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा काल स्वप्नात आली गझल खुले पापणी अन् उडाली गझल कशी कोरडी मी, जरी वाहते तुझ्या आठवांच्या पखाली गझल? नसे वेगळे रूप माझे-तिचे, मला वारशाने मिळाली गझल "जरा एकटे वाटते, शब्द दे तुझे सोबतीला" म्हणाली गझल जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये, क्षणार्धात माझीच झाली गझल! नको या प्रवासात थांबा कुठे, सवे आज माझ्या निघाली गझल

शत्रु समोरून थेट वार करुन गेला -

विदेश ·
लेखनविषय:
शत्रु समोरून थेट वार करुन गेला - मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला ! मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला ! सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला - तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला ! पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला ! भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !

पांढरा किडा

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
पांढरा किडा तुझी सांग येथे दखल कोण घेतो कशाला घशाला उगा त्रास देतो असामान्य विश्लेषकांच्या भितीने गझल घप्प कपड्यात झाकून नेतो नवे रोप लावत पुढे चालताना कुणी सांड मागून तुडवीत येतो पिके फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी कुणाच्याच बापास ना घाबरे तो . गंगाधर मुटे ..........................................

टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे?? मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे?? सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!! एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!! - प्राजु *काल एक फोन आला..

ओले परीस...

स्वानंद मारुलकर ·
लेखनविषय:
डोळ्यामधील आसू परतून ना गळावे धुंदीत मी जगावे, धुंदीत मी मरावे आता न जाणवावी दुःखे उदासवाणी ’दारू’ परीस ओले जखमांवरी फिरावे तार्‍यांत वावरावे सहवास चांदण्यांचा डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे काळोख दाटलेला आहे दहा दिशांनी श्वासात ध्यास आहे तोची प्रकाश दावे आत्म्यात राम राहे, आत्म्यात कॄष्ण आहे हे राम-कॄष्ण आता बाहेरही दिसावे - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com

नव्या यमांची नवीन भाषा

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
नव्या यमांची नवीन भाषा मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी यमास थोडी दया न उरली, नव

वाट तुझी पाहात

निनाव ·
लेखनविषय:
वाट तुझी पाहात आज असा काय बसलो मी बोलविले त्याने मज अन जाणेच विसरलो मी तु जाताच अंधार अन दिवा शोधत बसलो मी शोधता-शोधता मग असा उजेड विसरलो मी तुलाच विसरण्यास आज पिण्यास बसलो मी प्यायलो असा आज अन दर्याच विसरलो मी तुझ्या आठवणीं संगे आज बोलत बसलो मी तु येताच समोर मग बोलायचेच विसरलो मी आज होतो न सोबत असा एकटाच बसलो मी सवय जडली अशी मग सोबतच विसरलो मी

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·
3

वो सांस हूं जो लबोंपे.....

जयंत कुलकर्णी ·
रफीसाहेबांची अनेक गैरफिल्मी गाणी आपल्याला माहीत आहेत, असतील. त्याची मजा काही औरच आहे. मुख्य म्हणजे कमीत कमी संगीत व ह्रदयाला भिडणारा त्या गाण्यांचा अर्थ आणि सरळ ह्रदयात एखादी सुरी उतरावी तसा मनाला भिडणारा साहेबांचा आवाज...... त्यातच त्या गाण्यात भावनांची तडफड असेल तर ते गाणे खरच ह्रदय कापत जाते.

जरी वाटेल माझे बोलणे (गझल)

अजय जोशी ·
लेखनविषय:
जरी वाटेल माझे बोलणे खोटे तुला हृदय माझे कधी नव्हते दिले उसने तुला मनाशी रोजची हितगूज होती चालली तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला जगाशी भांडल्याने आपले होते हसे जगालाही मजा येते जशी येते तुला जसा हा चंद्र आकाशी बदलतो वागणे तसे आकाश त्या बदल्यात बोलवते तुला ? महागाई किती प्रेमातही बघ वाढली तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला मला तू सोडले आहेस नाही खंत ही दिले आहे जगाशी बांधुनी नाते तुला मला सर्वांपुढे तू टाळते आहेस; पण... मला माहीत आहे कोण आवडते तुला