मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

आज मला समजलं

अभिषेक पांचाळ ·
आई , ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आठवणीच्या डोहामध्ये , मन पुरं भिजलं तहान भूक झोप सारं , क्षणात परकं होतं अनोळखी ते मोठं घर , गिळून मला खातं मनात माझ्या उत्तरांचं , काहुर एक माजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं गर्दी असते बाजूला , पण हाकेला तो ओ नसतो दूर जाऊन उमगलं , एकटेपणा काय असतो दूर जाऊन सहवासाच्या , किंमतीचं ते बीज रुजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आवाजाची किमया न्यारी , ओढीची ती तहान सारी शब्द ऐकता तुझे ते सारे , होते जणू जादू प्यारी आवाजातही ओढ असते , हे तुझ्याशी बोलून समजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं - अभिषेक पांचाळ , पुणे

:( ?

अॅस्ट्रोनाट विनय ·

गवि 27/02/2017 - 20:27
क्या बात है... मिसळलेला काव्यप्रेमी हा आयडी म्हणजे तुम्हीच ना? खरं खरं सांगा.. इट्स अ कॉम्प्लिमेंट...

खरे म्हणजे मिपावरील चांगल्या कविता एकत्र करुन एक चांगला कवितासंग्रह होईल... छान कविता.... तथाकथित सध्याच्या प्रसिद्ध कविंपेक्षा बरे कवी आहेत इथे....

खरे म्हणजे मिपावरील चांगल्या कविता एकत्र करुन एक चांगला कवितासंग्रह होईल... >> सहमत. दरवर्षीच्या ( किंवा दर सहा महिन्यातील) उत्तमोत्तम कविता, कथा, बोलीभाषा यांचे e books बनवल्यास सर्वाँच्याच सोईचं होईल. असे e books offline सुद्धा वाचता येतील, वाचायला देता येतील. मिपा बद्दल अजून जास्त लोकांना कळेल आणि वाचकसंख्या वाढेल.

तुझ्या रूपाने मिळाला, अस्तित्व घडवणारा एक वटवृक्ष. माझ्या पावलांना प्रकाश पुरवणारी तुझी सावली, पानापानांना जीवनरसाने ओथंबून टाकणारी मुळंही तुझीच. माझी सगळी शस्त्र इथेच परजलेली, संकटसमयी तुझ्याच ढोलीत लपवलेली. हरवलो जरी कधी तरी, स्वतःला शोधायला आलो, तुझ्याच गार सावलीत सापडत गेलो स्वतःला, दरवेळी नव्याने. पण आपल्या छोट्याशा विश्वाचा आधार असलेली तुझी मु़ळं, खोलवर जाऊ लागलीत, अनोळखी विश्वाच्या दिशेनं. माझ्यावरचा ऊनपाऊस अलगद झेलणाऱ्या तुझ्या फांद्या, आधार शोधू लागल्यात अनंताचा. जाळी होत चाललेल्या तुझ्या पानांमधुन, अंधार झिरपू लागलाय अताशा. मुक्त होत चाललीस तू, कणाकणाने, क्षणाक्षणाने. पण... तु

तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

प्राची अश्विनी ·

माहितगार 26/02/2017 - 17:17
कविता आवडली मस्तच आहे, तुमच्या बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही .. अतूट काही... आणि आताची हि कविता स्त्रीत्वातील भारतीयता दाखवते. नको वाटते.. या कवितेतील स्त्री मागत असलेला 'खुला पैलतीर' कवितेची पार्श्वभूमी नाही सांगितली तर स्त्री मुक्ततावादी वाटेल पण कवितेतील 'खुला पैलतीर' अर्थ पारंपारीक भारतीय संकल्पनेतील मुक्ति मागणारा वाटतो. प्राची अश्विनी यांच्या कविता स्त्रीयांच्या नवीन पिढी पेक्षा एखाद पिढी आधीच्या स्त्रीची भावना रेखाटतात की भारतीय स्त्रीयांची नवी पिढीही या कवितांप्रमाणे विचार करते असा एक प्रश्न सहजच मनात येऊन गेला.

सुन्दर रचना ! फक्त " किलबिल" च्या जोडीला "चारीठाव" हा शब्द (जो चौरस व पोटभर जेवणाच्या सन्दर्भात वापरतात) थोडा खटकला.

In reply to by अनन्त्_यात्री

माहितगार 01/03/2017 - 08:52
चारीठाव सर्वसाधारण पणे आहाराच्या संदर्भाने वापरला जात असला तरी 'चारीठाव' म्हणजे दिवसातून चार वेळा खाणे अशा अर्थाने येतो का ? म्हणजे चारीठाव या शब्दाचा मूळ अर्थ दिवसाच्या चार वेळा असा असावा असे आता पर्यंत समजत आलो होतो. ऑनलाईन डिक्शनर्‍यांमध्ये हा शब्द मिळाला नाही कुणि छापील शब्दकोशातून सांगू शकेल का ?

In reply to by माहितगार

माहितगार 01/03/2017 - 09:08
गूगलले असता चारीठाव हा शब्द चारवेळा, चार दिशा, चौरस आहार, असाही वापरात येऊ लागल्याचे दिसते आहे. मोल्सवर्थातली नोंद मात्र 'चार ही ठाव' (Even the four, the very four, the main or preeminent four, dishes,--भात, भाजी, वरण, पोळी) A term for a decent, comfortable, or respectably-furnished feast or meal:--as disting. from घड्याळ टिपरूं &c. A poor meal--mere bread and a chili. अशी मिळाली संदर्भ

शिव कन्या 01/06/2017 - 22:03
फार सुंदर आहे सगळं. पण हे कुठेतरी हरवत चाललय हे ही खरे. बाकी माहितगार - होय, लिहिताना नव्याची उत्सुकता उमटते, पण जुने लोभसवाणे खुणावत राहते.

In reply to by संजय क्षीरसागर

हे एकदम बरोबर आहे झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावं चारीठाव म्हणजे सतत असा अर्थ होतो.

तुझ्या ऊन्हाचं कौतुक किती करावं करावं माप पदरी सुखाचं किती भरावं भरावं बघ तुळशीला आल्या मखमालीच्या मंजिर्या चिऊताईच्या दातांनी किती खुडावं खुडावं खिडकीच्या गजावर झुले डांगराचा वेल बोटभर आधारानं वर चढावं चढावं नंदी बसलेला दारी गळी लेणं घुंगराचं येताजाता भक्तीभावे तिथं नमावं नमावं झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावं पुण्य कुठल्या जन्माचं आज फळुनिया आलं भरलेल्या गोकुळात दिस सरावं सरावं

ट्रिंग ट्रिंग !!!!!

बटाटा चिवडा ·
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

वेदना..

राघव ·

@
कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते!
››› आहाहा! सल्लाम!

फुकाचे भरवसे मिळतात सारे, हवे ते नेहमीच हुलकावते.. मागावयाचे कुणाला-कशाला.. वेदना मनातील वदू लागते! जगातील घडणे - जगाचे बिघडणे.. जगाचीच सारी दोषांतरे.. विवेकात शक्ती किती ती असावी.. डोळ्यात दिसती जुनी जळमटे! कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते! आशा-निराशा.. पुन्हा तीच रेषा.. गिरवण्यात आयुष्य शिलगावते! असावी मनाची किती लक्तरे ती.. वेचावयाला उलटती युगे! राघव

पाऊस असा रडतो

चांदणशेला ·
पापण्यांच्या दाराशी हाक येती जीवास जखमांचे रंग फुटती घन वेदनांतूनी पाऊस असा रडतो दूर दूर वारा टाहो फोडतो उरात क्षितिजाच्या वैषम्य पेटले वैरी वादळ डोळ्यांत आले आगीत बुडाला प्राण वेडापिसा राऊऴातला नाद अस्त झाला कसा

कदाचित (भयगुढ कविता)

अॅस्ट्रोनाट विनय ·

सचिन७३८ 23/02/2017 - 11:51
कदाचित ती आली असेल, रक्त तहान विझवायला, न शमणाऱ्या तृष्णेला, वेदना हुंकारांनी सजवायला! बेसावध देह आपल्या नखांनी लुचायला, आसुसली अंधारी रात्र, मला काळगर्तेत ओढायला!!!

सचिन७३८ 25/02/2017 - 12:31
शांतचित्त भक्ष्य ते एककल्ली निजले, शमविण्या कंडू तीचे हात दोन झेपावले, भ्रम तीचा असा की सहज सावज मिळाले, पण सत्यास सामोरे जाता तीचे अवसान गळाले! सावज शिकाऱ्याच्या जाळ्यात होते, तीला भुलविण्या नाटक रंगले होते, सुटण्याची धडपड व्यर्थ कळून चुकली, ही चकवी रात्र पुन्हा डाव खेळून गेली!

कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल -------------------

एवढं करंच...

अॅस्ट्रोनाट विनय ·

शेवटचं कडवं असं होईल का पाहा तुला पाहून कळेल त्यांना काहीतरी झालायं बदल, ठणकावून सांग संकटांना... मृत्यूला मी दिलीये बगल

शेवटचं कडवं असं होईल का पाहा तुला पाहून कळेल त्यांना काहीतरी झालायं बदल, ठणकावून सांग संकटांना... मृत्यूला मी दिलीये बगल >> हम्म. शेवटचं कडवं वेगळ्या लयीत चाललं होतं. हे बेटर आहे. फक्त मृत्यूला मी दिलीये बगल ऐवजी मृत्यूला तू दिलीये बगल असावं असं वाटतं.

In reply to by अॅस्ट्रोनाट विनय

`मृत्यूला मी दिलीये बगल' असं होईल ते. पण तुझी काव्यकल्पना खरंच सुरेख आहे. आणि तुझ्या प्रत्येक लेखनातून दिसणारा पॉझिटीव अ‍ॅटिट्यूड मला नेहमी भावतो.

अविचार करण्याआधी एक काम कर कृत्रिम जगाच्या चौकटीतून एकदातरी बाहेर पड दऱ्याखोऱ्या कडेकपारीतून पाखरासारखं उडून बघ खळाळणाऱ्या नदीमध्ये मासोळीसारखं पोहून बघ फेसाळ धबधब्याखाली निमुट उभा रहा पावलं थकेपर्यंत बेलगाम धावून पहा रस्ता हरवलेल्या पावलांना खोलवर जंगलात ने गळा फाटेपर्यंत ओरड आसवं संपेपर्यंत रडून घे संध्याकाळ झाली की डोंगरमाथ्यावर जा सावल्या लांबताना अन सुर्य हरवतांना पहा शक्य झाल्यास रात्रीही थांब तिथं जंगल अंगावर येईल, रातकिड्यांचे आवाज ओरबाडतील हरवलेल्या दाही दिशा, गळा दाबायला सरसावतील पण लवकरच जिवंतपणा घेऊन पहाटकिरणं उगवतील अंधाररस्ता उजळेल पक्षी आशेचं गीत गा

नसतेस घरी तू जेव्हा

संजय क्षीरसागर ·

In reply to by मोदक

हे नेहमी एक आव्हान असतं. सुभाष घईंसारख्या ख्यातनाम दिग्दर्शकानी, ताल चित्रपट करतांना म्हटलं होतं की एआर रहेमानची गाणी पडद्यावर सादर करणं माझ्यातल्या दिग्दर्शकाची कसोटी असते. माझ्या मते या कवितेचा भाव विडिओत बांधणं अशक्य आहे, ती ऐकून अनुभवायची चिज आहे म्हणून फक्त ऑडिओ दिलायं.

चिनार 18/02/2017 - 14:45
सुंदर कवितेचं सुंदर रसग्रहण !! अवांतर: संदीप उत्तमच लिहितो. पण प्रत्येक कवितेचं गाण्यात रूपांतर झालंच पाहिजे हा आग्रह कधी कधी कवितेला मारक ठरतो. उदा. :- १. हे भलते अवघड असते.... धडा वाचल्यासारखी चाल लावली आहे. २. कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे... अरे किती घाई किती घाई..आपण पहिल्या ओळीवर रेंगाळतो तोपर्यंत गाणं संपलेलं असते.

In reply to by चिनार

मोदक 18/02/2017 - 15:11
अवंताराशी बेशर्त सहमत आम्ही समव्यावसायिक मित्रांनी एकदा "आयुष्यावर बोलू कांही" या कार्यक्रमाचे SWOT analysis केले होते ते आठवले अशी अनेक निरीक्षणे शोधली होती.

In reply to by चिनार

सलील कुलकर्णीचा दोष असेल तो. मला तो काही आवडत नाही. पण कसे सरतील सये चांगलय हो. इतकी गडबड वाटली नाही.

In reply to by चिनार

रेवती 19/02/2017 - 19:02
अरे किती घाई किती घाई. हेच संक्षींच्या मागील धाग्यावर म्हटलं होतं. कविता मनात उतरायला वेळ मिळत नाही. का कोण जाणे मला त्याच्या दोन तीन ऐकलेल्या कविता तरी नाही भावल्या. खूपच चर्चेत होती म्हणून दमलेल्या बाबाची कहाणी कविता ऐकली होती. उगीच ह्रुदयाला पीळ पाडण्याचा सफल प्रयत्न इतकच वाटलं. फारतर आजच्या काळातलं वास्तव! संदीपची पिढी, जी लहानाची मोठी होताना जसं शांत वातावरण होतं, मनुष्य मनुष्याला ओळखत होता, घटकाभर गप्पा होत होत्या ते तो मिस करतो असं वाटतं, जे मीही करतेच पण असं शब्दात मांडता आलं नसतं, ते त्यानं केलं त्यामुळे बरं वाटलं इतकच!

In reply to by रेवती

संदीपची पिढी, जी लहानाची मोठी होताना जसं शांत वातावरण होतं, मनुष्य मनुष्याला ओळखत होता, घटकाभर गप्पा होत होत्या ते तो मिस करतो असं वाटतं, जे मीही करतेच पण असं शब्दात मांडता आलं नसतं, ते त्यानं केलं त्यामुळे बरं वाटलं इतकच! ज्या तीन कवितांचं रसग्रहण केलंय ते फक्त सध्याच्या पिढीचे नाहीत तर चिरंतन विषय आहेत. सगळं आलबेल असतांना अचानक येणारी उदासिनता, केवळ माणसाला सतावणारी भविष्याची चिंता आणि जीवनाचा केंद्रबिंदू असलेलं पती- पत्नीचं नातं हे तीन काव्यविषय हरपिढीचे आहेत. आणि संदीपनं ते सुरेख मांडलेत.

स्रुजा 19/02/2017 - 06:30
"दिवस असे की " चं संगीत शैलेश रानडे ने केलंय, सलील ने नाही. सलील ने खरं तर सुंदर काम केलंय संदीप च्या कवितांवर ! आणि इथे बरेच जणं म्हणतात की संदीप च्या कविता आवडत नाहीत , का कोण जाणे.. कुणाला आवडत नसतील असं वाटलं ही नव्हतं इतक्या मला आवडतात त्या कविता. संक्षींना जसा संदीप ज्वर चढलाय तसा मला पीरियॉडिकली चढतो आणि मग लूप मध्ये फक्त सलील- संदीप ची गाणी वाजत असतात ( त्यात हा अल्बम पण आलाच) .

In reply to by स्रुजा

"दिवस असे की " चं संगीत शैलेश रानडे ने केलंय, सलील ने नाही. बरोबरे. पण सम हाऊ, संदीप पुढे आला ते `आयुष्यावर बोलू काही' मुळे. आणि त्याहूनही नवल म्हणजे सलीलसारखा सुमार गायक पुढे आला तो संदीपमुळे ! नसतेस घरी तू जेव्हाचं म्युझिक संदीपनं केलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

स्रुजा 19/02/2017 - 21:33
सुमार ??? अहो, काय हे संक्षी !! सलील कुलकर्णी सुमार गायक किंवा संगीतकार मुळीच नाहीये. या जोडीमध्ये तुम्हाला संदीप च्या कविता जास्त आवडतात असं म्हणा हवं तर. सलील ला काय सुमार डिक्लेअर करताय !

In reply to by संजय क्षीरसागर

स्रुजा 19/02/2017 - 22:17
छे , छे ! भावना नाही दुखावल्या पण मला खुप आश्चर्य वाटलं . संदीप च्या कविता आवडत नाही असं ऐकल्यावर वाटलं होतं तेवढंच.

खरंच तुम्ही खूप सुंदर रसग्रहण करत आहात. तुमचा कवितेचा धागा आला की नकळत उघडला जातो. धन्यवाद. संदीप खरेची जोडी सलील बरोबर का जमली असेल असा विचार करून पहा. सलीलच्या चालीत त्याचं शब्दांवरचं प्रेम दिसतं. शब्दांवरचं प्रेम हाच तर धागा आहे. सलीलचा संधीप्रकाशात अल्बम ऐकला असेल ना? तिथेही हेच जाणवतं.

In reply to by रायबा तानाजी मालुसरे

संदीप खरेची जोडी सलील बरोबर का जमली असेल असा विचार करून पहा. सलीलच्या चालीत त्याचं शब्दांवरचं प्रेम दिसतं. शब्दांवरचं प्रेम हाच तर धागा आहे. सलीलचा संधीप्रकाशात अल्बम ऐकला असेल ना? तिथेही हेच जाणवतं. संदीपनं आयुष्यावर सुरु करण्यापूर्वीच म्हटलं होतं की त्याला कविता रसिकांपर्यंत गाण्याच्या माध्यमातून पोहोचवणारा गायक हवा होता. त्याच्या दृष्टीनं संगीतापेक्षा कवितेला जपणारा साथीदार महत्त्वाचा होता आणि आहे. अजून त्यांची जोडी टिकून आहे म्हणजे सलीलनं संदीपच्या अपेक्षापूर्ण केल्यात. थोडक्यात माझ्या सलीलबद्दलच्या मताला शून्य किंमत आहे. तरीही, सलील संदीपच्या कवितेत करत असलेले बदल, संदीपला मंजूर असूनही, एक रसिक म्हणून मला फार त्रासदायक वाटले आहेत. एक उदाहरण देतो `नसतेस घरी' मधे `श्वासाविण हृदय जसे की' या ऐवजी `श्वासाविण हृदय अडावे' असा बदल सलीलनं केला आहे आणि ते कडवं कायम तसंच गायलं जातं. हा बदल माझ्या अ‍ॅस्थेटिक्सला क्लेषदायी ठरला आहे. संदीप ती कविता जगला आहे आणि जगतो आहे. त्याचे शब्द ही त्याच्या अनुभवाची अभिव्यक्ती आहे आणि संदीपचा म्युझिकसेन्ससुद्धा तितकाच उत्तम आहे. तुम्ही सुद्धा वरच्या ओळी मूळ कवितेप्रमाणे म्हणून पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की वजन हृदयावर नसून अगतिक होण्यावर आहे. सलीलच्या बदलामुळे नेमका हेतूच फसला आहे. अगतिक हा शब्द शेवटी येत असला तरी `अडावे' या शब्दामुळे सगळा महौलच बिनसतो.

आवडती कविता आणि सुंदर रसग्रहण . पण पत्नीच्या अनुपस्थितीवर बोरकरांची देखील एक कविता आहे. तूं गेल्यावर फिकें चांदणें, घरपरसूंहीं सुनें-सुकें मुलें मांजरापरी मुकीं अन दर दोघांच्या मधे धुकें तूं गेल्यावर घरांतदेखील पाउल माझें अडखळतें, आणि आटुनी हवा भवतिची श्वासास्तव मन् तडफडतें... तूं गेल्यावर या वाटेनें चिमणीदेखील नच फिरके, कसें अचानक झालें न कळे, सगळें जग परकें परकें... तूं गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळूं, गळ्यांतले मम झुरतें गाणे , वाटे मरतें हळूहळू... तूं गेल्यावर दोन दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती, खरीच माझ्याआधीं गेलिस तर मग माझी कशी गती ??? ( मूळ कवितेतील सर्व अनुस्वार मुद्दाम तस्सेच टंकले आहेत ):)

संदीपच्या या कवितेविषयी लिहीण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, फक्त एक उत्कट अनुभव आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. ही कविता कार्यक्रमात एकदा तरी सलीलऐवजी संदीपनं गावी, अशी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे, कारण तो ही कविता जगलायं. आयुष्यातली सगळी नाती मान्यतेची आहेत कारण विवाह या बेसिक मान्यतेतून ती निर्माण होतात. पत्नी ही व्यक्ती नाही, ते तुम्ही घडवलेलं एक नातं आहे. जो हे नातं अत्यंत उत्कटतेनं आणि हृदयाची बाजी लावून घडवतो, त्याला ही कविता कळू शकेल.

मंद मंद पहाट

चांदणशेला ·
मंद मंद पहाट वेडी दवांत नाचती अजूनही थोडी उतरता माथ्यावरूनी रात्र खुळी उमलली गगन वेलींतूनी सूर्य कळी निळ्या निळ्या अभ्रांच्या छतावरूनी गेले कोमल किरणांचे कर फिरूनी फडफड पाखरांची उभ्या झाडांवरती उषाराणी अशी तेथूनी फिरती ऐसे लावण्य झाकाळती धुके असीम धरेचे रम्य गूढ बोलके